देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, करोनाबाधिताच्या संख्येत पुणे आघाडीवर आहे. सोमवारी पुण्यातील करोनाबाधितांची संख्या दोन लाखांपर्यंत पोहचली. करोनाबाधितांच्या संख्येत पुण्याने मुंबई व दिल्ली या दोन्ही शहारांना देखील मागे टाकले आहे.

पुण्यातील करोनाबाधितांचा उच्चांक काय सांगतो ?
दिल्ली व मुंबईच्या तुलनेत पुण्यातील लोकसंख्या कमी आहे, मात्र ही दोन्ही शहारं करोनाबाधितांच्या संख्येत दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत व इथे दाट वस्ती देखील आहे. मुंबई व दिल्लीमध्ये स्थलांतरितांची संख्या अधिक आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशी देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात. शिवाय, येथे आर्थिक उलाढाली देखील मोठ्या प्रमाणार घडतात. सर्वाधिक करोनाबाधितांची संख्या असलेले शहर म्हणून पुण्याचे असणे काहीसे विलक्षण आहे. मात्र, आश्चर्यकारक नाही. कारण सुरूवातीपासून करोनाचा सर्वात जास्त संसर्ग असलेल्या पहिल्या पाच शहरांमध्ये  पुणे  होते. पुण्यात सर्वाधिक करोनाबाधितांची संख्या आढळण्यामागचे हे देखील एक कारण आहे की, या ठिकाणी मोठ्याप्रमाणवर चाचण्या होत आहेत. मुंबईसह महाराष्ट्रातील अन्य कोणत्याही शहरांच्या तुलनेत पुण्यात सर्वाधिक करोना चाचण्या होत आहे.

पुणे सर्वाधिक करोनाबाधितांची संख्या असलेले शहर ठरण्यास काही गोष्टी जबाबदार आहेत, शास्त्रज्ञ, आरोग्य अधिकारी व अधिकाऱ्यांनी त्या निदर्शनास आणल्या आहेत.

मोठा संसर्ग :
पुण्यात नुकत्याच झालेल्या सिरोलॉजिक सर्वेमध्ये असे दिसून आले की, सर्वे झालेल्या काही भागांमधील ५० ते ६० टक्क्यांपेक्षा जास्त नागरिक हे आधीपासूनच बाधित आहेत व त्यातील बहुतांश आतापर्यंत देखील सापडले नाहीत. असाच सर्वे दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, चेन्नई या सारख्या अन्य शहारांमध्ये देखील झाला, त्या ठिकाणी करोनाचा संसर्ग तुलनेत कमी झाल्याचे दिसून आले. याचा अर्थ असा होतो की पुण्यात नागरिक अगोदरपासून बाधित असल्याने संसर्गाचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे आता चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्याने, मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळत आहे. हेच कारण आहे की, करोना संसर्गा संबधी नुकत्यातच समोर आलेल्या अहवलात करोनाबाधितांची सर्वाधिक संख्या पुण्यात आहे.

विलगीकरण उपायांची कमी प्रभावी अंमलबजावणी :
महाराष्ट्रातील पहिला करोनाबाधित पुण्यात ९ मार्च रोजी आढळला होता. सुरुवातीपासूनच राज्यातील बाधितींची बहुतांश संख्या ही मुंबई व पुण्यातील आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्यामुळे एक टप्प्यात मुंबईमध्ये सर्वाधित रुग्णसंख्या होती. यानंतर पुण्यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढल्याचे दिसून आले. तज्ज्ञांच्या मते कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि विलगीकरण मुंबईत जसे झाले, तेवढ्या प्रभावीपणे पुण्यात झाले नाही.

चाचण्यांचे जास्त प्रमाण :
पुण्यात दिवसाकाठी सरासरी १३ हजार ५०० ते १४ हजार ५०० नमूने तपासणी होते. जी राज्यात सर्वाधिक आहे आणि यातील बहुतांश आरटी-पीसीआर चाचण्या आहेत. ज्या रॅपिड अॅन्टिजेन चाचण्यापेक्षा अधिक विश्वासार्ह ज्या दिल्ल्लीसह अन्य शहारांमध्ये बहुताशं प्रमाणात होतात.

पुरेसे अंतर न राखणे :
आणखी काही मुद्दे प्रकर्षाने जाणले आहेत. पुण्यात लॉकडाउनच्या नियमांची देखील प्रभावीपणे अंमलबाजवणी झाली नाही. नागिरकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन काटेकोरपण केले नाही. याचबरोबर लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन व मास्कचा वापर न केल्याबद्दल दंड करण्यात आलेल्यांच्या संख्याही पुण्यात सर्वाधिक आहे. पुण्यात करोनाबाधितांची सर्वाधिक संख्या असण्यामागे ही देखील काही कारण आहेत.

Story img Loader