‘युनेस्को’ने नुकताच अहवाल सादर करून मुलांच्या मोबाईल वापरण्यासंदर्भात काही निरीक्षणे नोंदवली. तसेच, शाळांमध्ये मोबाईल वापरण्यासंदर्भात निर्बंध आणले. परंतु, शाळेचे ६-७ तास झाल्यानंतर मुले घरात असतात. घरात त्यांच्या मोबाईल वापरण्यावर मर्यादा नसतात. त्यामुळे ‘युनेस्को’ने शाळेच्या पातळीवर जरी विचार केला असला, तरी मुलांच्या घरातील वापरावर कोण मर्यादा आणणार ? यासाठी पालकांनीच पावले उचलणे आवश्यक आहे. पालकांकडून मुलांच्या हातात मोबाईल कशाप्रकारे जातो, त्याचे होणारे परिणाम आणि त्याअनुषंगाने उपाय जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरेल.

‘युनेस्को’ने नोंदविलेली निरीक्षणे

कोविड २०१९ नंतर अनेक क्षेत्रात महत्त्वाचे बदल झाले आहेत. या काळात शिक्षण क्षेत्रातही डिजिटल क्रांती घडून आली. परंतु, शिक्षण क्षेत्रातील ही डिजिटल क्रांती विद्यार्थ्यांसाठी चिंताजनक असल्याचे मत युनेस्कोच्या अहवालातून नोंदवण्यात आले आहे. अभ्यासातील व्यत्यय टाळणे, शिकण्यात सुधारणा करण्यासाठी आणि मुलांचे साबयर बुलिंगपासून संरक्षण करण्याकरिता शाळांमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध घालावेत, अशी शिफारस युनेस्कोने (The United Nations Educational, Scientific and Cultural Organization) त्यांच्या अहवालातून केली आहे. “मोबाईलचा अतिरिक्त वापर झाल्याने शैक्षणिक कामगिरी मंदावते. स्क्रीन टाईम वाढल्याने मुलांच्या भावनिक स्थिरतेवर नकारात्मक परिणाम होतो. परिणामी मुले चिडचिडी आणि रागीट बनतात”, असेही युनेस्कोने म्हटले आहे. अनेक शाळांमधून आज ऑनलाईन शिक्षण दिले जाते. अनेक विद्यापीठातही ऑनलाईन शिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे. मात्र, या सोयीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याकडे युनेस्कोने लक्ष वेधले आहे.

Mumbai Municipal Corporation , Class two Test,
मुंबई : स्वयंअध्ययनातील निपुणतेसाठी दुसरीच्या विद्यार्थ्यांची चाचणी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
99 crore RTE fee refund, RTE, refund ,
ठाणे : ९९ कोटी रुपयांचा आरटीई शुल्क परतावा थकीत !
Naga Sadhus Enchant Devotees At Triveni Sangam on Makar Sankranti
संक्रातीच्या मुहूर्तावर ‘अमृत स्नान’; नागा साधूंना पहिला मान; त्रिवेणी संगमावर भाविकांचा महापूर
Pandit Vishnu Rajoria on 4 Children
Video: ‘चार मुलांना जन्म द्या, एक लाख रुपये मिळवा’, ब्राह्मण जोडप्यांसाठी परशुराम मंडळाच्या अध्यक्षांची ऑफर
Two rickshaws collided after minor driver lost control of tempo
अल्पवयीन चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने दोन रिक्षांना धडक
Parents who give nylon manja to their children are also facing action by nashik police
मुलांना नायलॉन मांजा देणारे पालकही कारवाईच्या फेऱ्यात
School Girl Uniform
संतापजनक! मुख्याध्यापकाने ८० मुलींना शर्ट काढायला लावले; दहावीच्या विद्यार्थीनींनी ‘पेन डे’ साजरा केल्याची शिक्षा

मुले मोबाईलकडे कशी आकर्षित होतात ?

लहान मुले ही अनुकरणप्रिय असतात. तसेच, नवीन शिकण्याची, जाणून घेण्याची जिज्ञासा त्यांच्यामध्ये अधिक असते. लहान मुलांना मोबाईलमधील मजकुरापेक्षा त्यातील प्रतिमा अधिक आकर्षित करतात. त्यामुळे गेम्स, कार्टून्स, रिल्स मुले अधिक बघतात. व्हिडिओ त्यांना बघण्यास आवडतात. त्या व्हिडीओमधील संवाद ऐकण्यापेक्षा त्यातील हालचाली, दृश्ये मुले बघतात. हे साधारण ५ ते ६ वर्षांपर्यंतच्या मुलांचे होते. नंतर त्यांना त्यातील मजकूर, संवाद, संदेश कळू लागतात.

हेही वाचा : विश्लेषण : ‘कलम ३७०’ची कूळकथा; हे कलम का आणि कोणासाठी ?
मुले ही आईवडिलांना लॅपटॉप, मोबाईलवर काम करताना बघत असतात. पालक काय काम करत आहेत यापेक्षा त्यांच्याकडे कोणते गॅझेट आहे, हे मुलांसाठी महत्त्वाचे असते. मग रडून-मागून मुले ते गॅझेट मिळवतात. अनेक पालक मुलांना सर्व सुखे पायाशी आणून देण्यास तयार असतात. मुलांनी रडू नये, मुलांना त्रास होऊ नये, हा त्यांचा पालक म्हणून प्रयत्न असतो. तंत्रज्ञान समजणे, त्याचा वापर करता येणे आवश्यक आहे, अशा अट्टाहासापायी पालक मुलांना इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स देतात. ‘युनेस्को’च्या मते, ”या तंत्रज्ञानाचा मुलांना केवळ २ टक्के उपयोग असतो.”

पालकांची भूमिका

युनेस्कोने शाळेतील मोबाईलच्या वापरावर निर्बंध घातले. शालेय शिक्षण घेत असताना मोबाईलचा वापर करण्याची आवश्यकता नसते, असे युनेस्कोचे मत आहे. त्यामुळे शाळेत मोबाईल वापरला जाणारही नाही. परंतु, घरात काय? मुले अधिक वेळ ही घरात असतात. यावेळी पालकांची भूमिका काय? यासंदर्भात काही पालकांशी बोलले असता असे लक्षात आले की, मुले शालेय अभ्यास पूर्ण करतात, यांची नेहमीची कामे पूर्ण करतात. तरीही त्यांच्याकडे वेळ उरतो. अशावेळी मुले मोबाईल किंवा टीव्हीची मागणी करतात. लहान मुलांना एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज किती देणार असा प्रश्न असतो. त्यामुळे त्यांना मोबाईलवरील लहान मुलांसाठीचे व्हिडीओ, क्लिप्स दाखवल्या जातात. मुलांना सर्वच तंत्रज्ञान माहीत हवे म्हणून मोबाईल दिला जातो. घरातील कामे आवरायची असतात म्हणून मोबाईल दिला जातो, मुलांनी शांत बसावे, रडू नये म्हणून मोबाईल देण्यात येतो. काही पालकांच्या मते, आम्ही त्याला कीड्स युट्युब बघायला देतो. मोबाईल्सना कीड्स लॉक केलेले असते. एक ठराविक वेळ मोबाईल पाहणे, हे आम्हाला योग्य वाटते, अशी पालकांची भूमिका आहे. पण, योग्य म्हणजे किती वेळ हे सदसद्विवेकबुद्धीने ठरवलं पाहिजे. लहान मुलांना कुतूहल हे अधिक असते. नवीन गोष्टी जाणून घेणे, अनुकरण करणे, प्रश्न पडणे हे सर्वसाधारणतः लहान मुलांमध्ये अधिक असते. त्यामुळे त्यांना मोबाईल मिळाल्यावर ते त्यातील अन्य गोष्टीही बघतात. तसेच करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना पडणारे प्रश्न शोधण्याचा प्रयत्न करतात. पालक होताना या सर्व गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. नोकरी-व्यवसायामुळे अनेक पालकांवर मर्यादा येतात. त्यांना पुरेसा वेळ देता येत नाही. त्यामुळे लहान मूल शिकवणी, शाळा, डेकेअर यामध्ये जे शिकवले जाते, समवयस्क जे सांगतील ते अधिक ऐकते. शाळेत ऑनलाईन गेम्स संदर्भात बोलले जात असेल, तर अर्थात ते न खेळणाऱ्या मुलाला त्याविषयी कुतूहल वाटते. जेव्हा त्याला मोबाईल मिळतो, तेव्हा ते गेम्स, ऑनलाईन गेम्स खेळू लागते.

हेही वाचा : मायग्रेनचा त्रास होतोय ? कशी कमी कराल डोकेदुखी


पालकांनी तंत्रज्ञान जाणून घेण्याची गरज

काही पालक हे तंत्रज्ञानस्नेही नसतात. त्यांना व्हॉट्सऍप, फेसबुकच्या पलीकडील जग माहीत नसते. त्यामुळे आपले मूल मोबाईलवर काय करते, काय शोधते, हे त्यांना कळत नाहीत. तंत्रज्ञान हे दुधारी आहे. त्याचे चांगले आणि वाईट दोन्ही उपयोग केले जातात आणि तसे परिणाम होतात. तंत्रज्ञानाने लॉक सिस्टीम, कीड्स लॉक, कीड्स युट्यूब, मोबाईल युजिंग टायमर, सिक्युरीज, डबल टॅब व्हेरिफिकेशन, ड्युअल युजेस, असे पर्याय दिलेले आहेत. यामुळे पालक मुलांना मोबाईल देताना सोशल मीडिया वापरते का ? किंवा ते वापरले जाऊ नये, कोणत्या वेबसाईट्स बघितल्या गेल्या, गुगल अकाऊंट कुठे लिंक केला गेला, अशा अनेक गोष्टी समजतात. परंतु, त्यासाठी पालकांनी तंत्रज्ञानाच्या बाबत जागृत असायला हवे. लहान मुलांकरिता कोणते तंत्रज्ञान विकसित होत आहे, त्याचे फायदे-तोटे जाणून घेतले पाहिजे आणि त्याचा वापरही केला पाहिजे.


मुलांना मोबाईल दिला नाही, तर…

आज सर्वच आपण हायब्रीड जीवन जगत आहोत. हायब्रीड म्हणजे फोनसहित आणि फोनशिवाय. मुलांनाही फोनसहित आणि फोनशिवाय समतोल जीवन जगण्यास शिकवावे लागेल. प्रत्यक्ष संवाद, प्रत्यक्ष भेट हे ऑनलाईन चॅटिंग मध्ये नसते, हे त्यांना सांगावे लागेल.अभ्यासातली एखादी समस्या व्हॉट्सअ‍ॅप वर विचारून सोडवणे आणि प्रत्यक्ष शिक्षकांना भेटून समजून घेणे यातला फरक मुलांना दाखवणे आवश्यक आहे. ऑफलाईन जगातही अनेक ऍक्टिव्हिटीज आहेत. अनेक कलांपैकी एखादी कला शिकता येते. नवीन गोष्ट शिकण्यासाठी मोबाईलच हवा असे नाही, हे मुलांना शिकवणे आवश्यक आहे. मोबाईल न घेता शाळेत जाणे आणि शाळेतून परत घरी सुरक्षित येणे ही जीवन कौशल्ये त्यांना शिकवली पाहिजे. स्वसंरक्षणाचे धडे यानिमित्ताने देता येतात. अनुभव घेणे, अनुभवातून शिकणे, प्रयोग करायला शिकवणे हा पालकत्वाचा एक भाग आहे. हातात सतत मोबाईल देऊन ही जीवन कौशल्ये विकसित करण्याची संधीच मुलांकडून काढून घेतली जाईल.

‘युनेस्को’ने शाळेत मोबाईलवर निर्बंध आणले हे उत्तमच आहे. त्यासंदर्भात त्यांनी निरीक्षणेही नोंदवली आहेत. परंतु, पालकांनी घरी याबाबत शिस्तबद्ध आणि विचारी होणे आवश्यक आहे.

Story img Loader