केरळमधील कोझिकोड शहराला युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या साखळीमधील सूचीत (UNESCO Creative Cities Network -UCCN) स्थान देण्यात आले आहे. या साखळीत आतापर्यंत जगभरातील ५५ शहरांची नोंद करण्यात आली आहे. कोझिकोडसह मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर हेदेखील एक शहर त्यात आहे. हस्तकला आणि लोककला, डिझाईन, चित्रपट, आहारशास्त्र, साहित्य, मीडिया आर्ट्स व संगीत अशा सात सर्जनशील कला श्रेणींपैकी एका श्रेणीला वाहिलेल्या शहरांची निवड या साखळी सूचित करण्यात येते. कोझिकोडची निवड साहित्य; तर ग्वाल्हेरची निवड संगीत या कला श्रेणीत करण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी जागतिक शहर दिनानिमित्त (World Cities Day) युनेस्कोकडून ही नवी सूची जाहीर करण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
युनेस्को सर्जनशील शहरांची साखळी (UCCN) म्हणजे काय?
सर्जनशीलता हा शाश्वत शहरी विकासासाठीचा धोरणात्मक घटक मानून जगभरातील शहरांमधील सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी २००४ मध्ये UCCN ची स्थापना करण्यात आली. आज जगभरातील १०० देशांपैकी ३५० देशांचा या साखळीत समावेश करण्यात आला आहे. युनेस्कोने आखलेल्या सांस्कृतिक विविधतेच्या उद्देशाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि हवामान बदल, वाढती असमानता व जलद शहरीकरण यांसारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी, तसेच त्याविरोधात अधिक लवचिकतेने कृती करण्यासाठी युनेस्कोकडून UCCN ची स्थापना करण्यात आली. या UCCN च्या स्थापनेमागे या साखळीच्या माध्यमातून विविध शहरांतील सर्जनशील, सामाजिक व सांस्कृतिक उद्योगांतील आर्थिक क्षमतांचा लाभ इतर शहरांना व्हावा, असा उद्देश आहे.
साखळीतील भारतीय शहरे कोणती?
कोझिकोड व ग्वाल्हेर यांच्याव्यतिरिक्त वाराणसी (संगीत), श्रीनगर (हस्तकला आणि लोककला) व चेन्नई (संगीत) या शहरांचाही या साखळीतील सूचीमध्ये समावेश झालेला आहे.
कोझिकोडची साहित्यिक परंपरा
केरळच्या उत्तरेकडे असलेल्या कोझिकोड शहरात साहित्यिक आणि सांस्कृतिक जगतातील अनेक प्रतिभावंत व नामवंत व्यक्तिमत्त्वे वास्तव्यास आहेत. या शहरात काही मोठ्या माध्यम समूहाची मुख्य कार्यालये आहेत. शेकडो प्रकाशन संस्था आणि अनेक ग्रंथालयांनी या शहराची साहित्यिक परंरपरा समृद्ध केली आहे.
१८८७ साली ‘कुंडलथा’ (Kundalatha) ही पहिली मल्याळम कांदबरी याच कोझिकोड शहरात लिहिण्यात आली. अप्पू नेदूंगडी यांनी या कादंबरीचे लेखन केले. एस. के. पोट्टेक्कट, वायोकम मुहम्मद बशीर, उरुबू, थिक्कोदियन, एन. एन. कक्कड, पी. वलसला, अकबर कक्कट्टील, पुनाथिल कुंजाब्दुल्ला व एम.टी. वासुदेवन नायर अशा सुविख्यात लेखकांमुळे कोझिकोड शहराला एक वेगळाच बहुमान मिळाला आहे. मागच्या ५० वर्षांत या शहराने अनेक चित्रपट आणि नाट्यकलाकारांनाही घडविले.
UCCN चा उद्देश
युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या साखळीद्वारे सदस्य असलेल्या इतर शहरांना शहरविकासाचा एक आवश्यक घटक म्हणून सार्वजनिक व खासगी क्षेत्रे आणि नागरी समाज यांच्या सहभागातून सर्जनशील ओळख निर्माण करण्याची संधी प्राप्त करून दिली जाते. या माध्यमातून सदस्य शहरांमध्ये भविष्यात सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्ण संशोधन करणारी केंद्रे विकसित करणे आणि सांस्कृतिक क्षेत्रातील निर्माते व व्यावसायिकांसाठी विस्तृत संधी विकसित करण्याची कल्पना मांडली गेली. UCCN शहरांनी संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाचे ध्येय गाठलेले आहे.
सदस्य शहरे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील शहरांमध्ये यूसीसीएनचा उद्देश राबविण्याचा संयुक्त राष्ट्रांचा विचार आहे. ज्या शहरांचा या सूचीमध्ये समावेश केलेला आहे, त्या शहरांचा अनुभव, ज्ञान व सर्जनशीलता निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरलेली परिस्थिती किंवा उपाययोजना यासंबंधीची माहिती इतर शहरांना पुरविली जाते. व्यावसायिक व कलात्मक देवाणघेवाण कार्यक्रम राबविणे, सर्जनशील शहरांच्या अनुभवाचे संशोधन व मूल्यमापन करणे आणि या शहरात होत असलेल्या इतर कार्यक्रमांची माहिती इतर शहरांना करून दिली जाते.
साखळी शहरांची वार्षिक परिषद
साखळीतील शहरांचे महापौर आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींची वार्षिक परिषद आयोजित करून, इतर सर्जनशील शहरांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित करणे आणि त्यांना जगातील इतर शहरांशी जोडण्याचा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येतो. सर्जनशील शहरांनी राबविलेल्या प्रत्यक्ष योजना किंवा धोरणांची माहिती इतर शहरांना पुरविणे आणि त्यातून शहरांतर्गत सहकार्याला चालना देण्याचे काम या परिषदेच्या माध्यमातून होते.
ब्राझीलमधील सँटोस शहरात शेवटची परिषद आयोजित केली गेली होती. या वर्षीची परिषद इस्तंबूल शहरात होईल. पुढील वर्षाची परिषद जुलै २०२४ रोजी पोर्तुगालमधील ब्रागा शहरात होणार आहे.
सदस्य शहरांना काय करावे लागते?
प्रत्येक चार वर्षांनी सदस्य शहरांना त्यांचा सदस्यत्व देखरेख अहवाल सादर करावा लागतो. यूसीसीएनच्या ध्येयाप्रति सदस्य शहरांची भक्कम वचनबद्धता आहे की नाही? हे या अहवालाच्या माध्यमातून सदस्य शहरांना दाखवून द्यावे लागते. यावेळी शहरांकडून पुढील चार वर्षांसाठीचा कार्यक्रम सादर करण्यात येतो. सदस्य शहरांनी सर्जनशील शहरांकडून गिरवलेले धडे आणि त्यावर केलेली कृती, सदस्य शहरांनी मिळवलेल्या यशाचा सविस्तर अंतर्गत अहवाल आणि शहराच्या स्थितीवर पडलेला प्रभाव यांची माहिती सदस्य शहरांना द्यावी लागते.