पावसाळा सुरू होऊन सव्‍वा महिन्‍याचा काळ उलटला असला, तरी विदर्भात सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नाही. अनेक भागात पेरण्‍या रखडल्‍या, त्‍याविषयी….

विदर्भात खरीप हंगामाचे भवितव्‍य काय?

जुलैच्‍या पहिल्‍या आठवड्यात अमरावती विभागात विखुरलेल्‍या स्‍वरूपात का होईना, पेरणीयोग्‍य पाऊस झाल्‍याने ८० टक्‍क्‍यांच्‍या वर पेरण्‍या आटोपल्‍या असल्‍या, तरी नागपूर विभागात मात्र समाधानकारक परिस्थिती नाही. या विभागात केवळ ४६ टक्‍के क्षेत्रात पेरणी झाली आहे. अनेक तालुक्‍यांमध्‍ये पेरण्‍या खोळंबल्‍या आहेत. भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्‍ह्यांमध्‍ये भात पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. भात पिकाच्‍या लागवडीसाठी दमदार पावसाची गरज भासते. पावसाअभावी रोवणीची कामे रखडली आहेत. विदर्भात सार्वत्रिक पाऊस नसल्‍याने चिंतेचे ढग कायम आहेत.

unseasonal rain, Vidarbha, temperature, rain ,
विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Thane Municipal Corporation prepares water supply plan for next 30 years amid urbanization
अवाढव्य वाढलेल्या ठाण्याची तहान वाढीव पाणी पुरवठा भागवेल का?
last two days temperature in Mumbai increased and dew in atmosphere has reduced
मुंबईत ढगाळ वातावरणाची शक्यता
Artificial Intelligence, Sugarcane Farming, Lokshiwar ,
लोकशिवार : ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता
soybean procurement deadline extension news in marathi
सोयाबीन खरेदीस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांची मागणी केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून मान्य
Olympics to visit India How is the 2036 Games being planned Why are more than one city preferred 
ऑलिम्पिकचे भारतभ्रमण? २०३६ च्या स्पर्धेचे नियोजन कसे? एकापेक्षा अधिक शहरांना का पसंती?
congress mla vijay wadettiwar criticize cm devendra fadnavis over crime increase in state
चंद्रपूर : वडेट्टीवार म्हणतात, ‘मुख्यमंत्री फडणवीसांचा धाक नाही, त्यामुळेच गुन्हेगारी…’

विदर्भातील पिकांची स्थिती कशी?

अमरावती विभागात सरासरी लागवडीखालील ३१.६७ लाख हेक्‍टर क्षेत्रापैकी २५.६९ लाख म्‍हणजे ८१ टक्‍के क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. पाऊस लांबल्‍याने मूग, उडीद या कडधान्‍याची लागवड १६ टक्‍क्‍यांवरच स्थिरावली आहे. १५ जुलैपर्यंत कडधान्यांची पेरणी करता येईल. त्यानंतर मूग, उडीद आणि भुईमुगाची पेरणी करू नये, अशी कृषी विभागाचीच शिफारस आहे. त्‍यामुळे मूग, उडदाचे क्षेत्र कमालीचे घटण्‍याची शक्‍यता आहे. सोयाबीन, कापूस पिकाच्‍या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून आला आहे. या पिकांच्‍या वाढीसाठी पुरेशा पावसाची गरज आहे. नागपूर विभागात भात रोवणीची कामे पुरेशा पावसाअभावी रखडली आहेत. या विभागात पावसाअभावी पेरणी उलटण्‍याचा धोका आहे. अनेक ठिकाणी पेरण्या जगविण्यासाठी टँकरने पाणी द्यावे लागते आहे.

हेही वाचा…‘लेडी सिंघम’ वनाधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास का रखडला? प्रकरण बंद करण्याचा प्रयत्न?

विदर्भात पावसाची तूट किती?

नागपूर विभागातील सहा जिल्‍ह्यांमध्‍ये ८ जुलैअखेर २३१ मिमी म्‍हणजे सरासरीच्‍या ८२ टक्‍के पावसाची नोंद झाली असून या विभागात पावसाची १८ टक्‍के तूट आहे. विशेष म्‍हणजे विभागातील एकूण ५४ तालुक्‍यांपैकी तब्‍बल ४१ तालुक्‍यांमध्‍ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. अमरावती विभागात आतापर्यंत २४६ मिमी म्‍हणजे सरासरीच्‍या ११७ टक्‍के पावसाची नोंद झाली असली, तरी एकूण ५४ तालुक्‍यांपैकी १३ तालुक्‍यांमध्‍ये पावसाने सरासरी गाठलेली नाही. विदर्भात असमान पाऊस झाला आहे. निसर्गाची वर्तनवृत्ती बदलत चालली आहे. काही भागात तुरळक पाऊस आणि काही ठिकाणी कमी दिवसांत तीव्रतेने कोसळणाऱ्या धारा असा पाऊस शेतीच्या हिताचा नसतो.

विदर्भात टँकरची गरज किती?

गेली अनेक वर्षे विदर्भातील लोक जीव टांगणीला लागल्यासारखे मे महिन्यापासून पावसाची वाट पाहतात. गेल्‍या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्‍याने नागपूर विभागात यंदा टँकरची गरज भासली नाही, पण अमरावती विभागात मे अखेरीस टँकरची संख्‍या ही शंभराच्‍या वर पोहोचली. सध्‍या भर पावसाळ्यात बुलढाणा आणि अमरावती या दोन जिल्‍ह्यांमधील ७२ गावांना टँकरने पाणी पुरवावे लागत आहे. यंदाच्‍या उन्‍हाळ्यात बुलढाणा जिल्‍ह्यात पाणीटंचाईची तीव्रता सर्वाधिक होती. जलस्‍त्रोत आटल्‍याने पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी नागरिकांना टँकरवर विसंबून राहण्‍याची वेळ आली. अमरावती जिल्‍ह्यातील मेळघाटात तर पाण्‍याचे दुर्भीक्ष्‍य हे नेहमीचेच.

हेही वाचा…पावसाचा शंभर टक्के अचूक अंदाज अशक्य का?

विदर्भातील धरणांमध्‍ये जलसाठा किती?

विदर्भातील मोठ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोर धरलेला नाही. उद्योग आणि पिण्या-वापरण्याखेरीज सर्वाधिक पाणी शेतीसाठीच लागत असले, तरी गावा-शहरांनाही पुरेल, इतके पाणी साठवले जाऊ शकत नाही. अनेक शहरे धरणाच्‍या पाण्‍यावर अवलंबून आहेत. अमरावती विभागातील मोठ्या सिंचन प्रकल्‍पांमध्‍ये ५०५ दशलक्ष घनमीटर (३६ टक्‍के), मध्‍यम प्रकल्‍पांमध्‍ये २८० दशलक्ष घनमीटर (३६ टक्‍के), तर लघु प्रकल्‍पांमध्‍ये २०१ दशलक्ष घनमीटर (२१ टक्‍के), असा एकूण ९८७ दशलक्ष घनमीटर (३१ टक्‍के) पाणीसाठा आहे. नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्‍पांमध्‍ये १३०७ दशलक्ष घनमीटर (३७ टक्‍के), मध्‍यम प्रकल्‍पांमध्‍ये २२५ दशलक्ष घनमीटर (३५ टक्‍के) तर लघु प्रकल्‍पांमध्‍ये १७५ दशलक्ष घनमीटर (३४ टक्‍के), असा एकूण १७०९ दशलक्ष घनमीटर (३७ टक्‍के) पाणीसाठा आहे. विदर्भातील बहुतेक शहरे पावसाकडे डोळे लावून आहेत. याच जलसाठ्यावर शेतीचे सिंचनदेखील अवलंबून आहे.

हेही वाचा…विश्लेषण : ग्रामीण भागांतील बँकांच्या कमतरतेमुळे असमतोल का वाढतो?

शेतकऱ्यांसमोरील चिंता कोणती?

यंदा मोसमी पाऊस लवकर दाखल होणार असल्‍याचे अंदाज वर्तविले गेले होते, पण ते फोल ठरले. पाऊस येईल या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली, पण अपवाद वगळता सार्वत्रिक पाऊस नाही. ढग दाटून येतात. कधी रिमझिम पावसाला सुरुवात होते, पण पुरेसा पाऊस पडत नाही. यंदा मृगाचाही पाऊस झाला नाही. मूग आणि उडदाची पेरणी आता होऊ शकणार नाही. विदर्भातील बहुतांश शेती कोरडवाहू आहे. सोयाबीन, कापसावर शेतकऱ्यांची भिस्‍त आहे. सध्‍या अमरावती विभागात पावसाने हजेरी लावून दिलासा मिळवून दिला असला, तरी नागपूर विभागात मात्र खरीप हंगाम धोक्‍यात येणार का, ही चिंता भेडसावत आहे.

mohan.atalkar@expressindia.com

Story img Loader