देशात करोना विषाणू संसर्गाची वाढती प्रकरणे आणि कोविडची तिसरी लाट येण्याची भीती या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सौम्य / लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मंत्रालयाने असे म्हटले आहे की, होम आयसोलेशनमध्ये रुग्णाला सुट्टी दिली जाईल आणि किमान ७ दिवस पॉझिटिव्ह न आढळल्यास आणि सलग ३ दिवस ताप न आल्यास विलगीकरण संपेल. होम आयसोलेशनचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा चाचणी करण्याची गरज नाही.

मंत्रालयाने म्हटले आहे की, संक्रमित व्यक्तीने त्याच्या वैयक्तिक वस्तूंचा इतर कोणाला वापर करू देऊ नये. तसेच असे देखील म्हटले आहे की, ब्लड ऑक्सिजन सॅचुरेशन आणि तापमान नियमितपणे तपासले पाहिजे. त्यात कमतरता आढळून आल्यास रुग्णालयाला कळवावे. मंत्रालयाने सांगितले आहे की, होम आयसोलेशनच्या रुग्णांनी ट्रिपल लेयर मास्क घालावा आणि ७२ तासांनंतर तो कापून कागदाच्या पिशवीत टाकावा. मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे की, हात सतत धुवावेत आणि शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नये.

ayurvedic experts to hold seminar on garbhavigyan event at iit bombay
आयआयटी प्रांगणात ‘गर्भविज्ञान’ धडे; उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून विरोध
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Prataprao Jadhav
बुलढाण्यातील ‘केस गळती’ची मोदी सरकारकडून दखल; दिल्ली, चेन्नईतील डॉक्टरांची पथकं येणार, ICMR कडून संशोधन सुरू, केंद्रीय मंत्र्याची माहिती
Chief Minister Devendra Fadnavis directs to evaluate the health system Mumbai news
आरोग्य व्यवस्थेचे मूल्यमापन करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
Aaple Sarkar, devendra fadnavis, mumbai,
‘आपले सरकार’द्वारे सेवांमध्ये वाढ करा : मुख्यमंत्री
Health Department Launches Campaign to Inspect Private Hospitals
आरोग्य विभागाचे खासगी रुग्णालयांवर ‘लक्ष’! राज्यभरात नियमभंग शोधून कारवाईची मोहीम
assistant professor without NET-SET
सहायक प्राध्यापक होणे नेट-सेटशिवायही शक्य?
Tata Hospital, Genetic Counseling Centre,
टाटा रुग्णालय अनुवांशिक समुपदेशन केंद्र उभारणार, निधीसाठी खासगी कंपनीशी करार

जिल्हा प्रशासनाने आपले नियंत्रण कक्ष सक्रिय करावेत –

रुग्णाला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या संपर्कात रहावे लागेल, असे मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. तसेच, दहशत निर्माण करणाऱ्या बनावट माहितीपासून सावध रहा. जिल्हा आणि उपजिल्हा नियंत्रण कक्ष सुरू करा आणि त्यांचे दूरध्वनी क्रमांक सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केले जावे जेणेकरुन होम आयसोलेशनमध्ये असलेले लोक कोणत्याही परिस्थितीत रुग्णाला घरातून रुग्णालयात सहज घेऊन जाऊ शकतील. कंट्रोल रूम होम आयसोलेशन अंतर्गत, ते रुग्णांना त्यांच्या स्थितीचे निरीक्षण करण्यासाठी कॉल करतील.

राज्य आरोग्य प्राधिकरणाच्या देखरेखीखाली होम आयसोलेशनमध्ये रुग्णावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा प्रशासनाची असेल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, खालीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास, रुग्ण किंवा त्याची काळजी घेत असलेल्या व्यक्तीने ताबडतोब रूग्णालयाशी संपर्क साधावा.

१. ताप (३ दिवसांपेक्षा जास्त काळ १०० अंश फॅरेनहाइटपेक्षा जास्त)
२. श्वास घेण्यास त्रास होणे.
३. कमी झालेले ऑक्सिजन सॅचुरेशन (SpO2 93% खोलीच्या हवेत १ तासाच्या आत किमान ३ रीडिंग) किंवा
श्वसन प्रति मिनिट २४ पेक्षा कमी असल्यास.
४. सतत छातीत दुखणे/दबाव जाणवत असल्यास.
५. तीव्र थकवा आणि हाडे दुखणे (मायल्जिया) झाल्यास, डॉक्टरांशी संपर्क साधा किंवा रुग्णालयात जावे.
६. मानसिकदृष्ट्या गोंधळलेले किंवा सावध नसणे.

होम आयसोलेशनसाठी केंद्राची नवीन मार्गदर्शक तत्त्वे: –

१. डॉक्टरांच्या सल्ल्याने वृद्ध रुग्णांसाठी होम आयसोलेशनला परवानगी आहे.
२.सौम्य लक्षणे असलेले रुग्ण घरीच राहतील.
३. होम क्वारंटाईनमध्ये राहणाऱ्यांसाठी योग्य वेंटिलेशन आवश्यक आहे.
४. रुग्णांना ट्रिपल लेयर मास्क घालण्याचा सल्ला दिला जातो.
५. रुग्णाला अधिकाधिक द्रवपदार्थ घेण्याचा सल्ला द्या.
६.अशा रुग्णांना ज्यांना एचआयव्ही झाला आहे, ज्यांचे प्रत्यारोपण झाले आहे आणि कर्करोगाचे रुग्ण आहेत, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच होम आयसोलेशन करावे.
७.जे सौम्य आणि लक्षणे नसलेले रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असतील त्यांना जिल्हा स्तरावरील नियंत्रण कक्षाच्या सतत संपर्कात राहावे लागेल.
८. रुग्णाला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टिरॉइड्स, सीटी स्कॅन आणि छातीचा एक्स-रे घेण्यास मनाई आहे.

Story img Loader