-राखी चव्हाण

जागतिक स्तरावर वाघांची संख्या कमी असली तरीही भारतात मात्र व्याघ्रसंवर्धन मोहिमेला यश येत आहे. गेल्या दशकात पहिल्यांदा वाघांची संख्या दुप्पट झाली आहे. व्याघ्रप्रकल्प त्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. नुकतेच केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री भूपेंदर यादव यांनी उत्तर प्रदेशातील राणीपूरची व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषणा केली. या नवीन व्याघ्रप्रकल्पामुळे व्याघ्रसंवर्धनाला अधिक बळकटी मिळणार आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

राणीपूर व्याघ्रप्रकल्पाचे वैशिष्ट्य काय?

उत्तर प्रदेशमधील राणीपूर हा चौथा व्याघ्रप्रकल्प असून तो ५२९.८९ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला आहे. त्याचे बफर क्षेत्र २९९.०५ तर गाभा क्षेत्र २३०.३२ चौरस किलोमीटर आहे. चित्रकूट जिल्ह्यातील राणीपूरला आता व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा देण्यात आला असला, तरीही त्याठिकाणी एकही वाघ नाही. मात्र, याठिकाणी अनेकदा वाघांच्या पाऊलखुणा पाहण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथे वाघांचे कृत्रिम स्थलांतरण करण्यात येणार आहे.

वाघांची संख्या वाढवण्यासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत?

भारतातील वाघांची सातत्याने कमी होत चाललेली संख्या वाचविण्याच्या उद्देशाने भारत सरकारने ‘प्रोजेक्ट टायगर’ची सुरुवात केली. वाघांचा अधिवास कमी होण्यासाठी कारणीभूत ठरलेले घटक कमी करणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे हा यामागील उद्देश होता. इंदिरा गांधी सरकारने १९७३मध्ये उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाची घोषणा केली. सुरुवातीच्या काळात भारतात १४ हजार चौरस किलोमीटरपेक्षा अधिक जागेवर नऊ व्याघ्रप्रकल्प होते. सध्या, भारतात ५३ व्याघ्रप्रकल्प आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण ही त्यांची प्रशासकीय संस्था आहे. जगातील वाघांपैकी ८० टक्के वाघ भारतात असून त्यांची संख्या वाढवण्याची जबाबदारी ‘प्रोजेक्ट टायगर’ वर आहे.

वाघ नामशेष होण्याचा धोका का?

वाघांची संख्या एकीकडे वाढत असतानाच दुसरीकडे शिकार, अधिवासात येणारे प्रकल्प, मानव-वन्यजीव संघर्ष यामुळे वाघांच्या संरक्षणावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. जागतिक स्तरावर आढळणाऱ्या सर्व प्रजातींपैकी ४० टक्के प्रजाती भारतात आहेत. दुर्दैवाने नऊ प्रजाती धोक्यात आहेत. गेल्या १५० वर्षात जगभरातील वाघांच्या संख्येत ९५ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. जुलै २०२२मध्ये ‘आययूसीएन’ने कंबोडिया, लाओस आणि व्हिएतनाममधून वाघ नामशेष झाल्याचे घोषित केले. दरम्यान, २००६च्या तुलनेत वाघांच्या लोकसंख्या वाढीचा दर वार्षिक सहा टक्के आहे.

भारतातील ५३ व्याघ्रप्रकल्पांचे क्षेत्रफळ किती?

भारतात ५३ व्याघ्रप्रकल्प असून त्यांचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ७४ हजार चौरस किलोमीटर इतके आहे. त्यातील सर्वाधिक मोठा व्याघ्रप्रकल्प हा आंधप्रदेशमधील नागार्जुनसागर-श्रीशैलम असून तो ३ हजार ७२८ चौरस किलोमीटरवर पसरला आहे. तर सर्वाधिक लहान महाराष्ट्रातील बोर व्याघ्रप्रकल्प असून तो १३८ चौरस किलोमीटरमध्ये आहे. सर्वाधिक प्रत्येकी ६ व्याघ्रप्रकल्प महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात आहे.

भारतातील सर्वाधिक मोठे दहा व्याघ्र प्रकल्प कोणते?

नागार्जूनसागर-श्रीशैलम (३२९६.३१ चौरस किलोमीटर), मानस राष्ट्रीय उद्यान (३१५०.९२ चौरस किलोमीटर), मेळघाट व्याघ्र प्रकल्प (२७६८.५२ चौरस किलोमीटर), सिमिलीपाल राष्ट्रीय उद्यान (२७५० चौरस किलोमीटर), अम्राबाद व्याघ्रप्रकल्प (२६११.३९ चौरस किलोमीटर), सुंदरबन व्याघ्रप्रकल्प (२५८४.८९ चौरस किलोमीटर), दुधवा व्याघ्रप्रकल्प (२२०१.७७४८ चौरस किलोमीटर), सातपुडा व्याघ्रप्रकल्प (२१३३.३० चौरस किलोमीटर),  नामडफा व्याघ्रप्रकल्प (२०५२.८२ चौरस किलोमीटर), कान्हा व्याघ्रप्रकल्प (२०५१.७९ चौरस किलोमीटर) हे दहा सर्वांत मोठे व्याघ्रप्रकल्प ठरतात.

सर्वाधिक व्याघ्रसंख्या असणारी पहिली पाच राज्ये कोणती?

जगभरात सुमारे ४ हजार ५०० वाघ आहेत. तर २०१८-१९च्या व्याघ्रगणनेनुसार भारतात २ हजार ९६७ वाघ आहेत. त्यातील मध्य प्रदेश हे वाघांचे राज्य म्हणून ओळखले जाते. या राज्यात ५२६ वाघ आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक (५२४), उत्तराखंड (४४२), महाराष्ट्र (३१२) आणि तामीळनाडू (२६४) आहेत.

Story img Loader