UPSC: स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लेखांची मालिका सुरू करत आहोत. यामध्ये नावाजलेले विद्वान विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. इतिहास, राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, कला संस्कृती व वारसा, पर्यावरण, भूगोल, विज्ञान व तंत्रज्ञान असे अनेक विषय आपण समजून घेणार आहोत. या तज्ज्ञांच्या विद्वत्तेचा लाभ घ्या आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हा. या लेखात, पौराणिक कथा आणि संस्कृती या विषयात पारंगत असलेले प्रख्यात लेखक देवदत्त पट्टनायक यांनी या लेखात भारतातील विविधतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाश्चात्त्य देशांपेक्षा कसा वेगळा आहे हे स्पष्ट केले आहे.)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आजच्या काळात ‘विविधतेत एकता’ या विषयावर चर्चा करणारे लोक भारतीय संस्कृतीतील अद्वितीय सखोलता समजून घेत नाहीत. भारतात भाषांमधील भिन्नता, सांस्कृतिक, धार्मिक आणि भौगोलिक भिन्नता यांची विपुलता अधिक आहे. जागतिक समुदायाशी संवाद साधताना भारतीयांना अनेकदा या विविधतेचं स्पष्टीकरण देण्याची किंवा त्याचं संरक्षण करण्याची गरज वाटते. हे जरी खरं असलं तरी भारत या भिन्नतांना सामावून घेत प्रगती करायला शिकला आहे आणि हीच भारताची खासियत आहे.
भारताच्या विविधतेचं सोप्या शब्दांत स्पष्टीकरण द्यायचं झालं तर चलनी नोटांच उदाहरण उत्तम ठरू शकतं. या नोटांवर अनेक लिपी दिसतात. या लिपी देशातील भाषिक विविधतेचं प्रतिनिधित्त्व करतात. ही वैशिष्ट्य चीनच्या युआन, अमेरिकन डॉलर किंवा युरोपियन युनियनच्या युरोमध्ये दिसत नाहीत. म्हणूनच भारतासारख्या इतक्या विविधतेने नटलेल्या देशासाठी एक प्रभावी भाषा किंवा प्रणाली निवडण्याचा प्रश्न नाही तर या प्रचंड गुंतागुंतीला सन्मान देण्याचे आणि सामावून घेण्याचे मार्ग शोधण्याचा आहे. भारत इतर देशांपेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही, तर तो फक्त वेगळा आहे. भारताची जडणघडण इतिहास, भौगोलिक स्थिती आणि असंख्य संस्कृतींच्या परस्पर संबंधांमुळे झाली आहे. भारताची विविधता ही अडचण नसून ती त्याची ताकद आहे आणि भारताला समजून घेण्यासाठी त्याच्या अद्वितीय संरचनेचा आणि ओळखीचा आदर करणे आवश्यक आहे, हे जगाने ओळखले पाहिजे.
भारताची विविधता ही जीवनशैली आहे
भारताची विविधता दाखवण्याचा आणखी एक साधा मार्ग म्हणजे गूगल इमेज सर्चचा उपयोग. ‘God’ असा शोध घेतल्यास तुम्हाला प्रामुख्याने येशू किंवा यहोवाच्या प्रतिमा दिसतील. मात्र, ‘Hindu God’ असे शोधल्यास तुमच्यासमोर रंगांची उधळण होते. पुरुष व स्त्री देवता, गजमुखी किंवा अनेक हात असलेले देव प्रामुख्याने प्राण्यांसह (वाहनासह) दिसतात. ही दृश्यं भारताच्या विविधतेचं अनोखं प्रतिबिंब आहेत. हिंदूंना विचारलं, तुमचे किती देव आहेत तर त्यांचं उत्तर ‘अनेक पण एकच’ असंच असेल. ‘अनेक पण एकच’ ही संकल्पना कशी समजावून सांगावी? भारतात मशिदी, दरगाह, चर्च, सिनेगॉग, बौद्ध स्तूप आणि जैन देरासर आहेत. जातीय संघर्ष आणि दंगली होत असल्या तरी ऐतिहासिकदृष्ट्या भारताने नेहमीच विविध धर्मांचं स्वागत केलं आहे आणि ज्यू समाजासारख्या समुदायांना आसरा दिला आहे.
भारताच्या विविधतेचं आणखी एक उदाहरण म्हणजे न शिवलेलं कापड. एखाद्याला एक न शिवलेल्या कापडाचा तुकडा द्या आणि विचारलं की ते कसं वापरतील, तर बहुतेक लोक म्हणतील की ते शाल, ओढणी किंवा सरोंग (लुंगी) म्हणून वापरू शकतात. पण भारतात त्याच कापडाचा तुकडा पगडी, दुपट्टा, विविध प्रकारे नेसलेलं धोतर किंवा अनेक शैलींमध्ये साडी नेसण्यासाठी होऊ शकतो. या परंपरा ३००० वर्षांमध्ये विकसित झाल्या आहेत.
भाषा असो किंवा अन्न, भारताची पद्धत विविधता आणि वैयक्तिकतेवर आधारित आहे
बहुतेक भारतीय मंडळी जगण्यासाठी अनेक भाषा बोलतात. त्यांच्या मातृभाषेबरोबरच राज्यभाषा आणि केंद्र सरकारशी संवाद साधताना हिंदी किंवा इंग्रजी तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संवादासाठी इंग्रजी वापरतात. भारताची ही बहुभाषिक वास्तविकता अमेरिकेसारख्या, फ्रान्स किंवा इस्राएलसारख्या देशांपेक्षा वेगळी आहे. या देशांमध्ये एकाच भाषेच्या आधारे जगता येतं. भारताच्या संदर्भात अनेक भाषांचा संपर्क, वेगवेगळे शब्द, संकल्पना आणि व्याकरण यामुळे मानसिक लवचिकता आणि विविधतेबद्दल आदर निर्माण होतो. भारतात एकसंधता, समता आणि कार्यक्षमता निर्माण करण्यासाठी एकच भाषा लादण्याचे प्रयत्न झाले, पण त्याला तीव्र विरोध झाला आहे. कारण एकसंधतेमुळे व्यक्तिगत आणि प्रांतीय ओळखी नष्ट होण्याचा धोका असतो.
भारताच्या पाककला परंपरा त्याच्या विविधतेचं आणखी एक उदाहरण देतात. मास्टरशेफ या कुकिंग शोला भारतात तितकं यश का मिळत नाही याचं एक कारण म्हणजे अन्नाकडे पाहण्याची भारतीय पद्धत. अनेक पाश्चात्य पाककला परंपरांमध्ये एखादा पदार्थ स्वतंत्र म्हणून सादर केला जातो. शेफने जसं बनवलं आहे तसंच ते ग्रहण करावं असा नियम आहे. पण थाळीचे उदाहरण दिल्यानुसार भारतीय खाद्यसंस्कृती पूर्णपणे वेगळी आहे. थाळी ही वैयक्तिक आवडीनिवडींच्या भोवती फिरते. थाळीत ठराविक पदार्थ असले तरी प्रत्येक व्यक्ती आपल्या चवीनुसार त्या थाळीचा आस्वाद घेते. थाळीतील डाळ, भाजी, लोणचं आणि पापड एकत्र करून वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ले जातात. पाश्चात्त्य भोजन पद्धतीत अन्न क्रमशः (सूप, सॅलड, मुख्य जेवण, डेझर्ट) दिलं दिलं जातं. त्याच्या उलट भारतात हे सर्व पदार्थ एकाच वेळी दिले जातात. हीच भारतीय पद्धत आहे. भोजनाकडे पाहण्याची ही लवचिक आणि अत्यंत वैयक्तिक पद्धत पाश्चात्त्य फाईन डायनिंगच्या कठोर संरचनेच्या विरोधात आहे. भारतातील भोजन पद्धती त्याच्या व्यापक तत्त्वज्ञानाचं प्रतिबिंब आहे. काहीही करण्याचा एकच योग्य मार्ग असतो असं भारत मानत नाही. जसं थाळी व्यक्तिगत आवडीनिवडींना सामावून घेते. तसंच भारताची संस्कृती विविधता आणि विचारस्वातंत्र्याला प्रोत्साहन देते. प्रमाणबद्धता आणि अनुकूलता यामधील हा विरोधाभास भारताच्या व्यापक सांस्कृतिक वेगळेपणाचं प्रतीक आहे. त्यामुळे मास्टरशेफसारख्या पाश्चात्त्य पाककला कार्यक्रमांसाठी भारताच्या अन्नसंस्कृतीत ताळमेळ घालणं आव्हानात्मक ठरतं.
समतेचा विरोधाभास म्हणजे विविधता
भारतासारख्या विविधतेने भरलेल्या देशातील समाजांची प्रवृत्ती साहजिकच एकसंधतेपेक्षा भिन्नतेकडे असते. विविधता ही जटिलताही आणते. श्रेणीभेद हे त्याच उत्तम उदाहरण आहे. विविध समाजांमध्ये कधीच समता नसते. कारण समतेसाठी कठोर नियम, काटेकोर नियंत्रण आणि एकसारखेपणा आवश्यक असतो. विविध समाज स्वाभाविकपणे समावेशक असतात. समावेशकता लादली जाऊ शकत नाही. ती टिकण्यासाठी आवश्यक असते ती जीवनशैली, वैविध्य असलेला समाज नेहमीच समतेसारख्या संकल्पनांशी विसंवादात असतो. कारण विविधता ही नैसर्गिक असते. श्रेणीभेदसुद्धा नैसर्गिक असतो. परंतु नैसर्गिक श्रेणीभेद तात्पुरता असतो आणि कालांतराने बदलतो. समता ही एक सांस्कृतिक संकल्पना आहे. जातिप्रथे सारखे कठोर श्रेणीभेद हे सांस्कृतिक आहेत. समतेचा विरोधाभास असमानता नाही. ती विविधता आहे. ही एक वादग्रस्त परंतु विचार करायला लावणारी गैर-पाश्चात्त्य कल्पना आहे. जी भारतीय संस्कृतीत दिसून येते.
विषयाशी संबंधित प्रश्न:
१. भारताची सांस्कृतिक आणि राष्ट्रीय ओळख विविधतेत एकता हे आव्हान न ठरता ताकद का मानली जाते?
२. भारताची अद्वितीय विविधता दाखवण्याचे वेगळे कोणते मार्ग आहेत?
३. अमेरिकेसारखे, फ्रान्स किंवा इस्रायलसारखे देश जिथे भाषिक एकरूपता आहे, त्यामानाने भारताच्या बहुभाषिकतेचे फायदे आणि आव्हाने कोणती आहेत?
४. थाळी भारताच्या पाककला विविधतेचं आणि वैयक्तिक निवडीला दिलेल्या महत्त्वाचं उदाहरण कसं ठरतं?
५. समतेचा विरोधाभास असमानता नाही ती विविधता आहे हे विधान पाश्चात्त्य समतेच्या संकल्पनांना कशा प्रकारे आव्हान देतं?