सध्या परदेशात क्रायोजेनिक फ्रिजिंगची चर्चा आहे. असे सांगितले जात आहे की, भारतातही याच्या लॅब तयार केल्या जात आहेत. या लॅबमध्ये मृत शरीरांना ठेवण्यात येणार आहे. अमेरिकेतील अब्जाधीशांनी या लॅबमध्ये आपले शरीर ठेवण्याकरिता नोंदणीही सुरू केली आहे. या लॅबमध्ये त्यांचे शरीर अत्यंत कमी तापमानात गोठवले जाणार आहे. एक दिवस विज्ञानाच्या मदतीने त्यांना पुन्हा जिवंत केले जाईल, अशी त्यांना आशा आहे. ‘PayPal’चे सह-संस्थापक पीटर थील यांनीही आपल्या नावाची नोंदणी केली आहे. काय आहे हा प्रकार? क्रायोजेनिक फ्रिजिंग म्हणजे नक्की काय? खरेच भविष्यात मृत शरीराला जिवंत करणे शक्य होणार का? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

क्रायोजेनिक फ्रिजिंग म्हणजे काय?

क्रायोनिक्स म्हणजे मृत शरीराला गोठविण्याची एक पद्धत. भविष्यात एखाद्या मृत व्यक्तीला विज्ञानाद्वारे पुन्हा जिवंत करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. क्रायोनिक्सला बर्फाची थंडी, असेही म्हटले जाते. बीबीसीच्या मते, सायन्स क्रायोजेनिक्सचा शोध १९४० च्या दशकात फ्रेंच जीवशास्त्रज्ञ जीन रोस्टॅण्ड यांनी लावला होता. क्रायोजेनिक फ्रिजिंगची संकल्पना सर्वप्रथम रॉबर्ट एटिंगर यांनी १९६२ मध्ये ‘The Prospect Of Immortality’ त्यांच्या एका अहवालात मांडली होती. एटिंगर, एक भौतिकशास्त्र शिक्षक व पशुवैद्य होते. १९६७ मध्ये प्राध्यापक जेम्स हिराम बेडफोर्ड यांचे मृत शरीर सर्वांत पहिल्यांदा गोठविण्यात आले होते. ‘QZ’नुसार, बेडफोर्ड हे कॅलिफोर्निया-बर्कले विद्यापीठात मानसशास्त्राचे माजी प्राध्यापक होते. बेडफोर्ड यांचे जानेवारी १९६७ मध्ये मूत्रपिंडाच्या कर्करोगाने निधन झाले.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?

हेही वाचा : जपानमध्ये चक्क हसण्यासाठी कायदा? काय आहे कारण?

सर्वप्रथम गोठवले डोके

‘सायन्स फोकस’नुसार, १९८० मध्ये कंपनीने सुरुवातीला लोकांचे डोके गोठवण्यास सुरुवात केली. यामागची संकल्पना अशी होती की मृत व्यक्तींचे मेंदू संगणकाशी जोडले जाऊ शकतात आणि अशा प्रकारे भविष्यात व्यक्तीला पुन्हा जिवंत केले जाऊ शकते. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, १९९१ मध्ये बेडफोर्डचा मृतदेह स्टोरेजमधून बाहेर काढण्यात आला होता. मूल्यमापनात मृतदेह जतन केलेला आढळला असला तरी त्वचेचा रंग खराब झाला होता. तोंडातून आणि नाकातून गोठलेले रक्त बाहेर पडत होते. शास्त्रज्ञांनी पुढील काही दशकांमध्ये यात प्रगती केली. ‘सायन्स फोकस’नुसार, गोठवलेल्या अंड्यामधून पहिले बाळ १९९९ मध्ये जन्माला आले. नॅशनल पोस्टनुसार, शास्त्रज्ञांनी सायबेरियन पर्माफ्रॉस्टमधून ४६ हजार वर्षांपूर्वीचे जुने ‘राउंडवर्म्स’ पुन्हा जिवंत केले.

ही पद्धत नेमकी कशी काम करते?

फ्रिजिंग हे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे नाव आहे. ‘QZ’नुसार, १९७० च्या दशकात बेडफोर्ड यांच्या शरीरात प्रथम ‘सॉल्व्हेंट डायमिथाइल सल्फोक्साईड’चे इंजेक्शन देण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे शरीर कोरड्या बर्फाच्या स्टायरोफोम बॉक्समध्ये ठेवण्यात आले. अखेर त्यांचे शरीर द्रव नायट्रोजनमध्ये ठेवले गेले; पण आता शरीर जतन करून ठेवण्याची पद्धत बदलली आहे. एखाद्या व्यक्तीला कायदेशीररीत्या मृत घोषित केल्यानंतर ही प्रक्रिया सुरू होते. ब्रिटानिकाच्या म्हणण्यानुसार, शरीर प्रथम बर्फात पॅक केले जाते आणि नंतर क्रायोनिक्स लॅबकडे पाठवले जाते. त्यावेळी शरीरात रक्त राहत नाही. त्यानंतर अँटीफ्रिज आणि रसायने शरीरात सोडले जातात. अँटीफ्रिज आणि रसायने महत्त्वाच्या अवयवांचे रक्षण करतात आणि बर्फाचे स्फटिक तयार होण्यापासून रोखतात. त्यानंतर शरीराला द्रव नायट्रोजनने भरलेल्या चेंबरमध्ये -१९६ अंश सेल्सिअस तापमानात ठेवले जाते. या कंपनीकडे फक्त मेंदू जतन करण्याचाही पर्याय आहे. मेंदू जतन करणे सर्वांत स्वस्त आहे. त्यासाठी ८० हजार डॉलर्स इतका खर्च येतो.

अब्जाधीश नक्की काय करीत आहेत?

ब्लूमबर्गच्या मते, यासाठी सुमारे ५०० लोकांनी आधीच नोंदणी केली आहे. आणखी ५,५०० लोकांना यात सहभागी होण्याची इच्छा आहे. अब्जाधीश व गर्भश्रीमंत लोकांना हा खर्च सहज परवडणारा आहे. ‘द नॅशनल’नुसार, डेट्रॉईटजवळील क्रायोनिक्स इन्स्टिट्यूट या प्रक्रियेसाठी २८ हजार डॉलर्स शुल्क आकारते. १९७६ मध्येही या प्रक्रियेसाठी इतकेच पैसे आकारले जायचे. अल्कोर लाइफ एक्स्टेंशन फाऊंडेशन संपूर्ण शरीराच्या क्रायोप्रिझर्वेशनसाठी सुमारे दोन लाख डॉलर्स इतके शुल्क आकारते. त्यांना ‘रिव्हायव्हल ट्रस्ट’ म्हणूनही ओळखले जाते. पुनरुज्जीवन म्हणजे काय याबद्दल वादविवाददेखील आहेत.

हेही वाचा : भारतात शिक्षणापेक्षा लग्नावर दुप्पट खर्च; भारतीय विवाहसोहळ्यांमुळे देशाची अर्थव्यवस्था कशी सशक्त होते?

लोक खोट्या आशेवर

परंतु, काही शास्त्रज्ञ उद्योगांना दिलेल्या आश्वासनांबाबत साशंक आहेत. मॅकगिल युनिव्हर्सिटीचे न्यूरोसायंटिस्ट मायकेल हेंड्रिक्स यांनी ‘एमआयटी टेक्नॉलॉजी रिव्ह्यू’मध्ये लिहिले. “पुन्हा जिवंत करणे, ही खोटी आशा लोकांना देण्यात आली आहे. हे तंत्रज्ञानाच्याही पलीकडे आहे. ‘क्रायोनिक्स’ उद्योगाद्वारे ऑफर केल्या जाणार्‍या गोठलेल्या मृत शरीराला जिवंत करणे अशक्य आहे. बायोएथिकिस्ट आर्थर कॅप्लान यांनी ‘नॅशनल पोस्ट’ला सांगितले, “विज्ञान कितीही प्रगत होत जात असले तरीही अशक्यप्राय गोष्टी शक्य होऊ शकत नाहीत.