अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा आगामी निवडणुकांसाठी सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. याच प्रचाराच्या मध्यात ट्रम्प ‘मॅकडोनाल्ड्स’ येथे पोहोचले. अमेरिकन संस्कृतीचा मुख्य भाग असणारे मॅकडोनाल्ड्स अमेरिकेच्या २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे. डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन अशा दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी त्यांच्या प्रचारात फास्ट-फूड चेनचे प्रतीक म्हणून याचा वापर केला आहे. ट्रम्प यांनी ‘मॅकडोनाल्ड्स’मध्ये जाऊन चक्क नोकरीची मागणी केली आहे. नेमके हे प्रकरण काय? ‘मॅकडोनाल्ड्स’मध्ये जाण्यामागील ट्रम्प यांचा उद्देश काय? मॅकडोनाल्ड्स आणि कमला हॅरिस यांचा संबंध काय? त्याविषयी जाणून घेऊ.

‘मॅकडोनाल्ड्स’वरून सुरू असलेला वाद काय?

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी प्रचारादरम्यान पेनसिल्व्हेनियामधील फेस्टरव्हील-ट्रेव्होस येथील मॅकडोनाल्ड्स येथे जाऊन फास्ट-फूडच्या वादात पुन्हा ठिणगी टाकली. त्यांनी अॅप्रन परिधान करून फ्रेंच फ्राइज तळले आणि ग्राहकांना मोफत वाटपदेखील केले. कमला हॅरिस विद्यार्थी असताना ‘मॅकडोनाल्ड्स’मध्ये काम करायच्या या दाव्यावरून वाद निर्माण झाला होता. आता ट्रम्प यांनी मॅकडोनाल्ड्सला दिलेली ही भेटदेखील त्याच्याशी निगडित असल्याचे सांगितले जात आहे. “मला नेहमीच मॅकडोनाल्ड्समध्ये काम करायचे होते; परंतु मी कधीच केले नाही,” असे ट्रम्प यांनी रेस्टॉरंटचे मालक डेरेक गियाकोमँटोनियो यांना टोला लगावत म्हटले.

Strained US China Relations news in marathi
चीन अमेरिका संबंध आणखी बिघडणार?
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Devendra Fadnavis and PM Narendra Modi
Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “देवाभाऊ” म्हणताच दिलखुलास हसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नेमकं काय घडलं?
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
US China Relations , US China, Xi Jinping ,
चीनवर अमेरिकी निर्बंधांचा राजकीय परिणामही दिसेल…
donald trump s desire to acquire greenland
अन्वयार्थ : ट्रम्प यांचा ग्रीनलँडहट्ट
why donald trump want greenland who owns the island what is the role of the greenlanders
डोनाल्ड ट्रम्प यांना ग्रीनलँड का हवे आहे? बेट कोणाच्या मालकीचे? ग्रीनलँडवासियांची भूमिका काय?
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : सत्ताधाऱ्यांच्या लांगूलचालनाचे उदाहरण
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी प्रचारादरम्यान पेनसिल्व्हेनियामधील फेस्टरव्हील-ट्रेव्होस येथील मॅकडोनाल्ड्स येथे जाऊन फास्ट-फूडच्या वादात पुन्हा ठिणगी टाकली. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : हुकूमशाह किम जोंग उन करणार रशियाची मदत? रशिया-युक्रेन युद्धात उत्तर कोरियाचा सहभाग किती मोठा? त्याचा काय परिणाम होणार?

“मी अशा व्यक्तीच्या विरोधात या निवडणुकीत आहे, की ज्या व्यक्तीने सांगितले की, त्यांनी येथे काम केले आहे; परंतु आता त्या पूर्णपणे खोट्या ठरल्या आहेत,” असेही ट्रम्प म्हणाले. त्यांनी सांगितले की, हॅरिस यांच्या ‘मॅकडोनाल्ड्स’मधील कामाचा इतिहास खोटा आहे. त्यांच्या दाव्याच्या समर्थनार्थ कोणतेही पुरावे सादर केले गेले नाहीत. फास्ट फूडबद्दल ट्रम्प यांची ओढ सर्वश्रुत आहे. त्यांनी एकदा कॉलेज फुटबॉल संघाला व्हाईट हाऊसमध्ये मॅकडोनाल्ड्स बर्गरची पार्टी दिली होती आणि त्यांच्या नियमित मॅकडोनाल्ड्स ऑर्डरमध्ये, एक बिग मॅक, फिलेट-ओ-फिश, फ्राईज व एक व्हॅनिला शेक आदींचा समावेश असतो, असे त्यांचे जावई जेरेड कुशनर सांगतात.

कमला हॅरिस खरंच ‘मॅकडोनाल्ड्स’मध्ये काम करीत होत्या का?

हॅरिसच्या यांच्यानुसार, हॉवर्ड विद्यापीठात शिकत असताना त्यांनी १९८३ च्या उन्हाळ्यात कॅलिफोर्नियातील अल्मेडा येथील मॅकडोनाल्ड्समध्ये काम केले. त्या या नोकरीत फ्रायर सांभाळायच्या आणि कॅश रजिस्टरचे काम करायच्या. त्या अनेकदा हा अनुभव त्यांच्या पार्श्वभूमीशी संबंधित पैलू म्हणून सांगताना दिसतात. कामगारवर्गीय संघर्षाबद्दलची त्यांची समज त्या अधोरेखित करताना दिसतात. त्यांनी आपल्या या अनुभवाचा वारंवार उल्लेख केला आहे. विशेषत: त्यांच्या २०१९ च्या मोहिमेदरम्यान, जेव्हा त्या चांगल्या वेतनाची मागणी करणाऱ्या मॅकडोनाल्ड्स कामगारांबरोबर आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. टेक्सास प्रतिनिधी जस्मिन क्रॉकेट यांनी ‘डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्श’नदरम्यान असे वक्तव्य केले, “एक उमेदवार ‘मॅकडोनाल्ड्स’मध्ये काम करीत होता; तर दुसरा उमेदवार त्याच्या तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आला आहे.”

हॅरिसच्या यांच्यानुसार, हॉवर्ड विद्यापीठात शिकत असताना त्यांनी १९८३ च्या उन्हाळ्यात कॅलिफोर्नियातील अल्मेडा येथील मॅकडोनाल्ड्समध्ये काम केले. (छायाचित्र-रॉयटर्स)

हॅरिस यांना आव्हान देण्यासाठी ट्रम्प यांची रणनीती

हॅरिस यांच्या मॅकडोनाल्ड्समधील नोकरीबाबत ट्रम्प यांनी वारंवार टीका केली आहे. त्यांनी बराक ओबामा यांच्या अमेरिकेतील नागरिकत्वावरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येबद्दल कटाच्या सिद्धांतापासून ते हॅरिस यांचा दावा खोटा ठरविण्यापर्यंत ट्रम्प यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या विश्वासार्हतेवर शंका निर्माण करण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरल्या आहेत. रिपब्लिकन विरोधक निक्की हेलीचा जन्म भारतीय स्थलांतरित पालकांच्या पोटी दक्षिण कॅरोलिनामध्ये झाला होता. मात्र, ती नैसर्गिक वंशाची नागरिक नव्हती, असे ट्रम्प सांगितले. हॅरिस यांच्या मॅकडोनाल्ड्समधील नोकरीबद्दलही त्यांची नकारात्मक भूमिका राहिली आहे.

ट्रम्प यांनी मॅकडोनाल्ड्सला का भेट दिली?

ट्रम्प यांच्या मॅकडोनाल्ड्सच्या भेटीकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. कामगारवर्गीय मतदारांना आवाहन करण्याच्या त्यांच्या व्यापक प्रयत्नांचा हा एक भाग असल्याचे सांगण्यात येते. “हे लोक कठोर परिश्रम करतात,” असे वक्तव्य ट्रम्प यांनी फेस्टरविले मॅकडोनाल्ड्स येथे भेटलेल्या कर्मचाऱ्यांबाबत बोलताना केले. हॅरिस यांचे प्रवक्ते जोसेफ कॉस्टेलो म्हणाले, “ट्रम्प यांच्या भेटीने ट्रम्प निवडून आल्यास त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात आपण नेमके काय पाहणार आहोत हे दाखवून दिले आहे. ते स्वत:च्या वैयक्तिक फायद्यासाठी कष्टकरी लोकांचे शोषण करतात.” कॉस्टेलो यांनी पुढे ट्रम्प यांच्या कामगारवर्गाच्या समस्यांबद्दलच्या समजुतीवर टीका केली.

हेही वाचा : ‘या’ देशात १० वर्षांच्या मुलांना तुरुंगवासाची शिक्षा; कारण काय? यावरून सुरू असलेला वाद काय आहे?

अनेक फास्ट-फूड कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती असलेल्या किमान वेतनातील वाढीला ते समर्थन देतील की नाही या प्रश्नाना उत्तर देणे ट्रम्प यांनी टाळले. त्यांनी मॅकडोनाल्ड्स कामगारांचे कौतुक केले; मात्र त्यांच्या वेतनात सुधारणा करण्यासंबंधीच्या धोरणात्मक प्रश्नांना उत्तर देणे त्यांनी टाळले. ट्रम्प यांची मॅकडोनाल्ड्सची भेट म्हणजे एक प्रचारात्मक कार्यक्रम होता, असेही कॉस्टेलो यांनी सांगितले.

Story img Loader