अमेरिकेचे विशेष वकील जॅक स्मिथ यांनी नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील दोन फौजदारी खटले मागे घेतले आहेत. हे खटले फेडरल सरकारने सुरू केले होते. विविध राज्यांनी त्यांच्याविरोधात यापूर्वी चालवलेले खटले अजूनही निकाली निघालेले नाहीत आणि यापुढे ते आणखी काही वर्षे लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ट्रम्प यांच्याविरोधातील खटल्यांची स्थिती

डोनाल्ड ट्रम्प २० जानेवारीला अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन विशेष सरकारी वकिलांनी त्यांच्याविरोधातील दोन फौजदारी खटल्यासंबंधी आरोप मागे घेतले. त्याला  न्यायालयाने मान्यता दिली आहे. या महत्त्वाच्या आणि जगभर गाजलेल्या खटल्यांच्या जोडीला त्यांच्यावर ‘हश मनी’ प्रकरणातही पैशांच्या देवाणघेवाणविषयीच्या अधिकृत नोंदींमध्ये फेरफार करण्याचा आरोप आहे. हश मनी प्रकरणी न्यू यॉर्क न्यायालयातील आरोप कायम आहेत. मात्र, ते अध्यक्ष असेपर्यंत त्यांना त्या खटल्यातही शिक्षा होणार नाही. त्याशिवाय न्यायाधीश जुआन मर्चन हे हा खटला निकाली काढण्याच्या, म्हणजेच ट्रम्प यांना निर्दोष ठरवण्याच्या विचारात आहेत.

In Devendra Fadnavis meeting Mukesh Shahane absconding from the police on the platform
देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत पोलिसांच्या लेखी फरार मुकेश शहाणे व्यासपीठावर
Amit Shah and Vinod Tawde meeting
Vinod Tawde Meeting with Amit Shah: “मराठा मुख्यमंत्री…
Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Prakash Ambedkar, Vanchit Bahujan Aghadi Candidate pune, Vanchit Bahujan Aghadi,
“भाजपचा आरक्षण संपविण्याचा मोठा डाव”, कोणी केला हा गंभीर आरोप ?
Video Story Of Ravindra Dhangekar And Devendra Fadnavis.
Ravindra Dhangekar: “निवडणूक हरत असल्याचे लक्षात येताच…” फडणवीसांच्या ‘ॲक्सिडेंटल आमदार’ टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; पाहा व्हिडिओ
nana patole replied to devendra fadnavis
“आरएसएससुद्धा धार्मिक संघटना, मग त्यांनी…”; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला नाना पटोले यांचे प्रत्युत्तर!
Karoline Leavitt named White House press secretary.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका, २७ वर्षीय तरुणी होणार व्हाईट हॉऊसची प्रेस सेक्रेटरी; कोण आहेत कॅरोलिन लेविट?

हेही वाचा >>>अस्थम्याच्या रुग्णांसाठी मोठी बातमी; गेमचेंजर ट्रीटमेंटचा शोध, ५० वर्षांतील सर्वांत मोठे यश, कसा होणार फायदा?

अध्यक्षपदाची निवडणूक गैरप्रकार खटला

ट्रम्प यांच्यावर २०२०च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल बदलण्यासाठी गैरप्रकार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. निकालानंतर ट्रम्प यांच्या समर्थकानी ६ जानेवारी २०२१ रोजी वॉशिंग्टनमधील कॅपिटल हिलवर दंगल घडवून आणली होती. अमेरिकेचे सरकार कॅपिटल हिलवरून चालते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तेथे अमेरिकेचे सर्वोच्च कायदेमंडळ म्हणजेच काँग्रेस आहे. त्याशिवाय अनेक महत्त्वाच्या सरकारी इमारती आणि सर्वोच्च न्यायालयासाठी हा भाग ओळखला जातो. कॅपिटल हिल ताब्यात घेऊन अध्यक्षपदाच्या निकाल स्वतःला हवा तसा लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर ऑगस्ट २०२३मध्ये ठेवण्यात आला.

खटल्याचा इतिहास आणि वर्तमान

निवडणूक गैरप्रकार खटला मार्च २०२४मध्ये सुरू होणार होता. मात्र, माजी राष्ट्राध्यक्ष म्हणून आपल्याविरोधातील आरोप मागे घेतले पाहिजेत आणि खटल्यातून संरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतली. या युक्तिवादानंतर खटल्याचे कामकाज काही काळ थांबले होते. त्यानंतर जुलै २०२४मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांची मागणी अंशतः मान्य केली. त्यानंतर अभियोक्त्यांनी आरोपपत्रामध्ये काही बदल केले. निवडणूक निकालांनंतर मात्र पुढे काय हा प्रश्न होता. अखेर त्यांनी नव्याने आरोपपत्र दाखल केले आणि ट्रम्प यांच्याविरोधातील आरोप पूर्णपणे मागे घेतले. निवडणुकीचा निकाल आणि विद्यमान अध्यक्षांवर खटला न चालवण्याच्या न्याय मंत्रालयाचे धोरण याचे कारण त्यांनी नमूद केले. न्यायाधीश तान्या चुटकन यांनी हा युक्तिवाद मान्य केला आणि खटला औपचारिकपणे निकाली काढला.

हेही वाचा >>>Chewing Gum Waste: च्युइंगम ठरतंय पर्यावरणासाठी घातक!; चघळलेल्या च्युइंगमचं नंतर काय होतं?

सरकारी कागदपत्रांसंबंधी खटला

आपल्याविरोधात सुरू असलेल्या खटल्यासंबंधी सरकारी तपासात अडथळे आणण्यासाठी ट्रम्प यांनी काही सरकारी व गोपनीय कागदपत्रे स्वतःकडे राखली असा आणखी एक गंभीर ट्रम्प यांच्यावर होता. हा खटला यूएस डिस्ट्रिक्ट जज आयलिन कॅनन यांच्यासमोर चालवला जात होता. या न्यायाधीशांची नियुक्ती ट्रम्प यांनीच केली होती आणि ते ट्रम्प यांच्या बाजूकडे झुकलेले म्हणून ओळखले जात. त्यांच्यासमोर हा खटला मे २०२४मध्ये सुरू होणार होता. मात्र, त्यादरम्यान ट्रम्प यांनी अनेक अर्ज दाखल करून खटला सुरू होण्यात विलंब कसा होईल याची खबरदारी घेतली. अध्यक्षपदाची निवडणूक दुसऱ्यांदा जिंकल्यावर जॅक स्मिथ यांनी आधी खटला स्थगित करण्याची विनंती केली आणि त्यानंतर आरोप पूर्णपणे मागे घेत असल्याचे न्यायालयाला कळवले. त्याला न्यायालयाने मान्यता दिली.

ट्रम्प यांची रणनीती

आपल्याविरोधातील खटले शक्य तितके लांबवायचे अशी ट्रम्प यांची रणनीती राहिली आहे. खटला सुरू झाल्यानंतर वेगवेगळी खुसपटे काढणे, विविध अर्ज दाखल करणे अशा खेळी करून खटल्याचे कामकाज जास्तीत जास्त वेळ रेंगाळेल याची खबरदारी ट्रम्प यांनी घेतली आहे. त्या मार्गाने त्यांना बहुसंख्य फौजदारी आरोपांचा सामना करावाच लागलेला नाही आणि आता त्याची शक्यता अधिकच धूसर झाली आहे. जॉर्जिया खटल्यातील मुख्य वकील नाथन वेड यांचे डिस्ट्रिक्ट अभियोक्त्यांशी असलेल्या कथित प्रेमप्रकरणाचा मुद्दा उपस्थित करून ट्रम्प यांनी अभियोक्ते फनी विलिस यांना हटवण्याची मागणी केली. ती न्यायालयाने अमान्य केली, मात्र नाथन यांना राजीनामा द्यायला लागला.

ट्रम्प यांच्याविरोधातील अन्य खटले

हश मनी प्रकरणात न्यू यॉर्क न्यायालयाने ट्रम्प यांना व्यावसायिक नोंदींमध्ये अफरातफर केल्याच्या आरोपांखाली दोषी ठरवले आहे. या खटल्याचा निकाल जुलैमध्ये लागणार होता. पण राजकीय निष्पक्षपातीपणाचा मुद्दा उपस्थित करून तो लांबणीवर टाकण्यात ट्रम्प यांना यश आले. न्यायाधीश मर्चन यांनी या खटल्याचा निकाल सप्टेंबर २०२५मध्ये देण्याचे मान्य केले आहे. आता ट्रम्प अध्यक्षपदी असेपर्यंत त्यांना कोणतीही शिक्षा सुनावली जाणार नाही. २०२०च्या निवडणुकीचा निकाल बदलण्याच्या आरोपाखाली जॉर्जिया न्यायालयामध्येही आरोप दाखल करण्यात आले आहे. मात्र त्याचा खटला अजून सुरूच झालेला नाही. तोही आता पुढील चार वर्षे लांबणीवर पडणार आहे.

दिवाणी खटले

ट्रम्प यांच्याविरोधात दिवाणी खटलेही सुरू आहेत. लेखक ई जीन कॅरोल यांनी ट्रम्प यांच्याविरोधात मानहानीचे दोन खटले दाखल केले आहेत. त्याशिवाय ट्रम्प आणि त्यांच्या व्यवसाय सहकाऱ्यांविरोधात दिवाणी घोटाळ्याचेही आरोप आहेत. अमेरिकेच्या नियमांनुसार, विद्यमान अध्यक्षांविरोधात दिवाणी खटले चालवले जाऊ शकतात. त्यामुळे या खटल्यांवर निवडणूक निकालाचा काहीही परिणाम होणार नाही. हे दोन्ही खटले त्यांच्याविरोधात गेले तर त्यांना कॅरोल यांना नुकसानभरपाईपोटी ९ कोटी डॉलरपेक्षा जास्त रक्कम द्यावी लागेल. तर दिवाळी घोटाळा प्रकरणात किमान ४७ कोटी डॉलरचा दंड ठोठावला जाऊ शकतो. हा खटला अजूनही सुरू असल्याने ही रक्कम वाढवलीही जाऊ शकते. २०२०च्या निवडणूक निकाल गैरप्रकार प्रकरणात डेमोक्रॅटिक पक्षाचे काही लोकप्रतिनिधी आणि कॅपिटल हिलचे अधिकारी यांनी त्यांच्याविरोधात दिवाणी खटलेही दाखल केले आहेत. ट्रम्प यांना या खटल्यांपासून संरक्षण मिळणार नाही असे न्यायाधीशांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

nima.patil@expressindia.com