मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर हुसेन राणा याचा भारतात प्रत्यर्पणाचा मार्ग सुकर झाला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याची प्रत्यर्पणाला विरोध करणारी याचिका फेटाळून लावली. पण मूळचा पाकिस्तानी नागरिक असलेल्या राणाचा मुंबई हल्ल्यातील नेमका काय सहभाग आहे, याबाबत घेतलेला आढावा…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
राणाबाबत अमेरिकेत कोणत्या घडामोडी?
पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’ने मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यातील आरोपी आणि पाकिस्तानमधील व्यावसायिक तहव्वूर हुसेन राणाला भारताच्या ताब्यात देण्याबाबत अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने अनुकूल असा निकाल दिला होता. तहव्वूर राणाचे आता अमेरिकेतून भारतात प्रत्यर्पण करण्यात येईल, असे सांगितले जात आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अमेरिकेच्या ‘यूएस कोर्ट ऑफ अपील्स फॉर द नाइन्थ सर्किट’ न्यायालयाने प्रत्यर्पण करारानुसार तहव्वूर राणाला भारताच्या स्वाधीन केले जाऊ शकते, असे सांगितले होते. त्यानंतर राणाने या निर्णयाला अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. राणाला ही शेवटची संधी होती. यापूर्वी त्याने अमेरिकेच्या विविध न्यायालयांमध्ये केलेले अपील फेटाळण्यात आले होते. आता सर्वोच्च न्यायालयानेही त्याची याचिका फेटाळून त्याचे प्रत्यर्पण करण्यास हिरवा कंदिल दाखवला आहे.
डेव्हिड हेडलीचा काय संबंध?
मुंबईवरील हल्ल्यापूर्वी येथील संभाव्य लक्ष्यांची टेहेळणी (रेकी) करण्याची जबाबदारी डेव्हिड कोलमन हेडली ऊर्फ दाऊद सैयद गिलानीवर सोपवण्यात आली होती. कोणाला संशय येऊ नये त्यासाठी डेव्हिड हेडलीचा मुंबई दौरा व्यावसायिक कामासाठी दाखवण्यात आला होता. त्यात राणाचा मोठा सहभाग आहे. राणाचा ‘इमिग्रेशन’ व्यवसाय होता. त्याचाच आधार घेऊन त्याच्या कंपनीची एक शाखा मुंबईतील ताडदेव परिसरात सुरू होत असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. त्यासाठी मुंबईत एक इमिग्रेशन सेंटर उभे करण्यात आले. त्याच्याच कामासाठी हेडली मुंबईत यायचा. यावेळी त्याने अनेक संवेदनशील ठिकाणांची रेकी केल्याचा आरोप आहे. हेडलीने याच इमिग्रेशन सेंटरचा कर्मचारी म्हणून व्हिजिटिंग कार्डे छापली होती. पण सुरक्षा यंत्रणांच्या तपासात या इमिग्रेशन सेंटरमध्ये इमिग्रेशन, व्हिजा अथवा इतर कोणतेही काम झाल्याचे आढळले नाही. एनआयएने या प्रकरणी २५ डिसेंबर २०११ रोजी आरोपपत्र दाखल केले होते. त्यातून अनेक खळबळजनक माहिती उघड झाली होती.
डेव्हिड हेडली आणि राणा यांचा संबंध काय?
तहव्वूर राणा आणि डेव्हिड हेडली बालपणीचे मित्र आहेत. राणा पाकिस्तानात स्थायिक असताना तेथील लष्करामध्ये वैद्यकीय विभागात कार्यरत होता. त्याने १९९० मध्ये पाकिस्तानी लष्करातील नोकरी सोडली. त्यानंतर राणाने कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारले. नंतर तेथून तो अमेरिकेत स्थायिक झाला. डेव्हिड हेडलीने भारतात रेकी केल्यानंतर थेट पाकिस्तानात दूरध्वनी करणे टाळले. त्याऐवजी हेडली राणाशी संपर्क साधून त्याला सर्व माहिती द्यायचा. ही माहिती पुढे राणाकडून पाकिस्तानातील हस्तकांना पुरवली जायची.
मुंबई हल्ल्यात राणाचा नेमका सहभाग काय?
मुंबईवरील हल्ल्यातील प्रमुख आरोपी डेव्हिड हेडली २००६ ते २००८ या काळात आठ वेळा मंबईत आला होता. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्लातील ठिकाणांची त्याने त्यावेळीच पाहणी केल्याचा आरोप आहे. हल्ल्यापूर्वी हेडलीऐवजी राणा मुंबईत आला होता. राणा अमेरिकेहून प्रथम दुबईला गेला. तेथून १२ नोव्हेंबर २००८ रोजी तो विमानाने मुंबईत आला. तो पवईतील एका आलिशान हॉटेलमध्ये वास्तव्याला होता. या पाच दिवसांत राणाने काय केले हे त्याच्या चौकशीतून स्पष्ट होईल. हल्ला होण्यापूर्वी पाच दिवस आधी म्हणजे २१ नोव्हेंबर रोजी त्याने मुंबई सोडली. मुंबईतून तो दुबईला गेला. तेथून २४ नोंब्हेबर रोजी तो चीनमध्ये गेला. तेथे दोन दिवस राहिल्यानंतर प्रत्यक्ष हल्ल्याच्या दिवशीच म्हणजे २६ नोव्हेंबर, २००८ रोजी त्याने अमेरिकेतील शिकागो गाठले. राणा शिकागोला पोहोचेपर्यंत २६ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला. त्यात १६४ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला. भारतीय यंत्रणांनी केलेल्या कारवाईत नऊ दहशतवादी ठार झाले. मुंबईवर हल्ला करणाऱ्यांपैकी एक दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडण्यात आले. त्याच्यावर न्यायालयीन प्रक्रिया राबवण्यात आली. त्यात त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्याला नोव्हेंबर २०१२ मध्ये फाशी देण्यात आली. या संपूर्ण हल्ल्याची माहिती राणाला होती. तसेच पाकिस्तानातील कोणत्या व्यक्तींच्या तो संपर्कात होता हेही त्याच्या चौकशीतून भारतीय यंत्रणांना समजेल. त्यामुळे या प्रकरणात राणाचा ताबा भारतीय यंत्रणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
राणाविरोधातील नेमके कोणते पुरावे?
मुंबईवर दहशवादी हल्ला होण्यापूर्वी १५ दिवस आधी राणा स्वतः मुंबईत होता. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडलीचे ई-मेल व हेडलीसोबत राणाने केलेला प्रवास याचे पुरावे मुंबई पोलिसांच्या हाती लागले होते. परिणामी, मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीच राणाला त्याची पूर्ण कल्पना असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. गुन्हे शाखेला हेडलीचे दोन ई-मेल प्राप्त झाले होते. कथित राजकीय नेत्याचे काय करायचे याबाबत त्यात ते चर्चा करीत आहेत. त्यातील एका ई-मेलमध्ये हेडलीने पाकिस्तानातील मेजर इक्बालचा उल्लेख केला होता. याशिवाय हेडली व राणा परदेशात एकत्र फिरल्याचे पुरावेही गुन्हे शाखेला प्राप्त झाले आहेत. तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यर्पण करण्यात यावे यासाठी मुंबई पोलिसांसह सर्वच यंत्रणा प्रयत्न करीत होत्या. राणाविरोधात भक्कम पुरावा उभा करता यावा म्हणून २०२३ मध्ये गुन्हे शाखेने त्याच्याविरोधात ४०५ पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले होते. मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल झालेला राणा हा पाचवा आरोपी आहे. यापूर्वी चार आरोपींविरोधात गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी मुंबईत बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (यूएपीए) गुन्हा दाखल आहे.