यजमान म्हणून ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची संधी मिळविल्यावर दोन विजय मिळवून अमेरिका संघाने आपला ठसा उमटवला. यातही दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळविल्यावर अमेरिका संघ अधिक चर्चेत आला. पहिल्या सामन्यात अ‍ॅरन जोन्सच्या फलंदाजीने भुरळ पाडली, पाकिस्तानविरुद्ध सौरभ नेत्रावळकरच्या गोलंदाजीने अमेरिकाला सनसनाटी विजय मिळवून दिला. आता अव्वल ८ मध्ये प्रवेश करण्याचा त्यांचा मार्ग सोपा झाला आहे. अमेरिकेत क्रिकेट स्थिरावलेले नसले, तरी त्याकडे वाटचाल असलेला अमेरिका संघ आहे तरी कसा…

सौरभ नेत्रावळकर – रक्ता-रक्तात क्रिकेट भिनलेल्या मुंबईच्या क्रिकेट मैदानात तयार झालेला हा गुणी क्रिकेटपटू. डावखुरा मध्यमगती गोलंदाज. कुचबिहार क्रिकेट स्पर्धेत २००८-०९ मध्ये ३० गडी बाद करून सर्वप्रथम आपली छाप पाडली. त्यानंतर भारतीय १९ वर्षांखालील संघातून विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड. या २०१० मधील स्पर्धेत उपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्ध भारताचा पराभव झाला. त्या वेळी बाबर आझम पाकिस्तानचा कर्णधार होता. आज १४ वर्षांनी दोघे पुन्हा समोरासमोर आले, तेव्हा बाबर पाकिस्तानकडूनच खेळतोय, सौरभ मात्र अमेरिकेचे प्रतिनिधीत्व करतोय. संगणकाच्या मास्टर पदवीसाठी क्रिकेट साहित्य मुंबईत सोडून अमेरिकेत आलेला सौरभ पुढे अमेरिकेचा कधी झाला हे त्याचे त्याला कळले नाही. तंदुरुस्तासाठी हलकेसे क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यावर आता तो अमेरिका संघाचा तारणहार ठरला आहे. भारताकडून खेळण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या सौरभने विश्वचषक खेळण्याचे स्वप्न असे अमेरिकेकडून साजरे केले. युवा विश्वचषक स्पर्धेत तेव्हा लोकेश राहुल, मयांक अगरवाल, जयदेव उनाडकट, मनदीप सिंग, हर्षल पटेल हेदेखील भारतीय संघात होते. हे खेळाडू कमी अधिक प्रमाणात भारताकडून खेळत आहेत. सौरभ मात्र आता त्यांचा प्रतिस्पर्धी असणार आहे. अजित आगरकर, झहीर खान, अविष्कार साळवी आणि युवा धवल कुलकर्णी यांच्यामुळे सौरभचे रणजी पदार्पणही लांबले. २०१३ मध्ये सौरभ रणजी स्पर्धेत प्रथम खेळला. पण, नंतर लगेच त्याला सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून पुण्यात संधी आली आणि नंतर दोन वर्षे तो क्रिकेटपासून दूर गेला. दोन वर्षांनी लगेच अमेरिकेत कॉर्नेल विद्यापीठात मास्टर्स पदवीसाठी गेल्यावर सौरभचे क्रिकेट पाठीमागेच राहिले. तेथे त्याने क्रिकेटपटूच्या कामगिरीचे मूल्यांकन करता येईल असे ‘क्रिकडीकोड’ हे अ‍ॅप बनवले. यासाठी त्याला विशेष शिष्यवृत्तीही मिळाली. एका देशात तीन वर्षे वास्तव्य असेल, तर त्या खेळाडूला त्या देशाकडून खेळता येऊ शकेल असा सुधारित नियम आयसीसीने केल्यावर पुन्हा एकदा सौरभमधील क्रिकेटपटूने उचल घेतली. २०१७ मध्ये त्याने अमेरिकेकडून पदार्पण केले आणि तेव्हापासून तो अमेरिका संघाकडून सातत्याने खेळत आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी तो कर्णधारपदाच्याही शर्यतीत होता. कर्णधार झाला नसला, तरी सौरभने पाकिस्तानविरुद्ध आपली भूमिका चोख बजावून आपली निवड सार्थ ठरवलली. आता पुढील आठवड्यात सौरभ आपला मुंबईतील वरिष्ठ सहकारी रोहितविरुद्ध खेळणार आहे. भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नसली, तरी एक चांगला क्रिकेटपटू असल्याचे त्याने सिद्ध केले आहे.

India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Pakistan professor claims India is developing Surya missile
अर्धी पृथ्वी टप्प्यात येईल असे ‘सूर्या’ क्षेपणास्त्र भारताकडे खरेच आहे का? पाकिस्तानी तज्ज्ञाचा दावा काय?
Mohammad Rizwan Says I am only a captain for toss and presentation
Mohammad Rizwan : ‘मी फक्त टॉस आणि प्रेझेंटेशनसाठी कर्णधार…’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर मोहम्मद रिझवानचे मोठे वक्तव्य
Champions Trophy Mohammed Hafeez Big Statement About India wont travel to Pakistan Said Somehow Not Secure for India
Champions Trophy: “भारतीय संघासाठी पाकिस्तान सुरक्षित नाही…”, पाकिस्तानच्या माजी खेळाडूच्या पोस्टने उडाली खळबळ, PCBला दाखवला आरसा
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
Pakistan Surpassed India And Holds Record of Most ODI Wins by Asian Team in Australia After AUS vs PAK match
पाकिस्तानने मोडला भारताचा मोठा विक्रम, ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या विजयासह अशी कामगिरी करणारा पहिला ठरला आशियाई संघ

हेही वाचा…१८० वर्षांपूर्वी अमेरिका खेळली होती पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना! आता वर्ल्डकपमुळे क्रिकेट तेथे पुन्हा लोकप्रिय होईल?

स्टिव्हन टेलर – अमेरिका संघातील सलामीचा आक्रमक फलंदाज. अमेरिका संघाचा अविभाज्य घटक असला, तरी मुळ जमैकाचा. अमेरिका संघाकडून १५ आणि १९ वर्षांखालील संघातून खेळण्याचा अनुभव. १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आयर्लंडविरुद्ध १२० चेंडूंत १४० धावांची खेळी. वरिष्ठ गटातूनही ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकाविण्याचा मान स्टिव्हनलाच जातो. लहान वयातच अमेरिका संघाच्या नेतृ्त्वाची जबाबदारी मिळाली. काळाच्या ओघात बदलत जाताना फ्रँचायझी क्रिकेट खेळणाऱ्या अमेरिकेच्या काही खेळाडूंपैकी एक खेळाडू.

मोनाक पटेल – अमेरिका संघातील एक मूळ भारतीय खेळाडू. गुजरातमध्ये जन्मलेला मोनाक गुजरातकडून १६ आणि १८ वर्षांखालील क्रिकेट खेळला. व्यावसायिक उद्दिष्टाने मोनाक २०१६ मध्ये कायमचा अमेरिकेत स्थायिक झाला. दोनच वर्षांनी अमेरिका संघातून १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी निवड. स्पर्धेत अमेरिकेकडून यष्टिरक्षक फलंदाज म्हणून ६ सामन्यात सर्वाधिक २०८ धावा करून त्याने निवड सार्थ ठरवली.

हेही वाचा…USA vs PAK : १४ वर्षांपूर्वीचा बदला पूर्ण! पाकिस्तानविरुद्धच्या कामगिरीनंतर सौरभवर भारतीय चाहत्यांकडून कौतुकांचा वर्षाव

आंद्रिस गौस – अमेरिका संघातील सर्वांत अननुभवी खेळाडू. मूळ दक्षिण आफ्रिकेचा असलेल्या गौसने सुरुवातीचे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेत खेळले. वरच्या फळीत खेळूनही संयम आणि आक्रमकता ही त्याच्या फलंदाजीची वैशिष्ट्ये.

अ‍ॅरन जोन्स – मूळ अमेरिकन असूनही अॅरन जोन्सचे क्रिकेट वाढले ते कॅरेबियन बेटांवरील बार्बाडोसकडून. आघाडीच्या फळीतील फलंदाज म्हणून त्याची ओळख. कॅरेबियनमध्ये क्रिकेट खेळल्याने त्यांच्यातील राकटपणा त्याच्या फलंदाजीत उतरलेला दिसून येतो. शाई होप आणि जेसन होल्डर या विंडीज संघातील प्रमुख खेळाडूंचा हा सहकारी. बार्बाडोसकडून २०१६ मध्ये खेळायला सुरुवात केल्यावर २०१९ मध्ये अमेरिकेकडून पदार्पण. विश्वचषक स्पर्धेत पहिल्याच सामन्यात १० षटकारांची आतषबाजी करून त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली. गरज भासल्यास उपयुक्त लेगब्रेक गोलंदाजीही करु शकतो.

नितिश कुमार – अमेरिका संघातील एक उपयुक्त अष्टपैलू खेळाडू. मूळ कॅनडाचा. १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये २०१० मध्ये कॅनडाचे प्रतिनिधीत्व. कॅनडाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू. त्यानंतर मात्र अमेरिकेत स्थलांतरित झाला. उजव्या हाताने उपयुक्त फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करणारा नितिश आता विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अमेरिकेचे प्रतिनिधित्व करतोय.

हेही वाचा…USA vs PAK : ‘गोल्डन डक’वर आऊट झाल्यानंतर आझम खान संतापला, चाहत्यांशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल

कोरी अ‍ॅण्डरसन – अमेरिका संघातील सर्वात अनुभवी अष्टपैलू खेळाडू. वेगवान गोलंदाज आणि आक्रमक फलंदाजीने आपली छाप आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर पाडली. न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३६ चेंडूंत शतकी खेळी करण्याचा जागतिक विक्रम कोरेने नोंदवला. न्यूझीलंडकडून १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दोनदा निवड. न्यूझीलंडला २०१५ मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत घेऊन जाण्यात महत्वाचा वाटा. स्पर्धेतील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू. २०२१ पासून मात्र अचानक अमेरिकेत स्थायिक आणि तेव्हापासून तेथेच क्रिकेट खेळतोय. आता विश्वचषक स्पर्धेसाटीही अमेरिका संघातून निवड.

हरमित सिंग – अमेरिका संघातील एक प्रमुख भारतीय. भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईचा हा गुणी खेळाडू. डवखुरा फिरकी गोलंदाज म्हणून भारतीय संघाकडून १९ वर्षांखालील दोन विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळलेल्या हरमीत मुंबई, पश्चिम विभाग, अध्यक्षीय संघ, त्रिपुरा असे भारतात खूप क्रिकेट खेळला. शिवाजी पार्कवर पद्माक शिवलकर आणि प्रवीण अमरे यांनी त्याला घडवले. १६ वर्षांखालील क्रिकेटसाठी पहिल्या रमाकांत आचरेकर शिष्यवृत्तीचा मानकरीही तो ठरला. २०१३ आयपीएल स्पॉट फिक्सिंगमधून क्लिन चिट मिळाल्यावर अमेरिकेत जाण्याचा निर्णय आणि आता विश्वचषक पदार्पण.

हेही वाचा…USA vs PAK : ‘भूख लगी थी इसलिए अंडा बना दिया…’, पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूला भोपळाही फोडता न आल्याने चाहत्यांनी उडवली खिल्ली

जसदीप सिंग – भारतीय वंशाचा असला, तरी जन्माने जसदीप अमेरिकेचाच आहे. पण, तीन वर्षाचा असताना जसदीपचे कुटुंबिय पुन्हा पंजाबमध्ये परतले. मात्र, २०१३ मध्ये जसदीप पुन्हा न्यू जर्सीत परतला. अमेरिकन क्रिकेट महासंघाच्या पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत मध्यमगती गोलंदाज जसदीपने हॅटट्रिक नोंदवून आपली छाप पाडली. अमेरिकेकडून २०१५ मध्ये पदार्पण केल्यानंतरही सुरुवातीची दोन वर्षे त्याचे संघातील स्थान आतबाहेरच होते. त्यात २०१७ मध्ये गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीवर मर्यादा आल्या. त्यावर मात करून २०१८ मध्ये त्याने एकदिवसीय संघात स्थान मिळविले.

नोस्थुश केन्जीगे – अमेरिका संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू. डावखुरा मध्यमगती गोलंदाज आणि फलंदाज. अमेरिकेकडून २०१८ मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यावर अमेरिकेतील विविध स्पर्धेत सहभाग. २०१८-१९ मध्ये झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत सर्वाधिक गडी बाद करण्याची कामगिरी. पण, त्यानंतर सहा वर्षांनी त्याने अमेरिकेकडून २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

हेही वाचा…पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणाऱ्या सौरभ नेत्रावळकरचं लिंक्डइन पेज पाहून चाहते थक्क; म्हणाले, “यार डिलीट कर, माझे..”

अली खान – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःची ओळख निर्माण करून आपला मार्ग निवडणारा अली खान हा अमेरिकेचा गुणी खेळाडू. अलीचे मूळ पाकिस्तानात असले, तरी त्याचे क्रिकेट वाढले आणि बहरले ते वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्येच. वयाच्या १८व्या वर्षी अली अमेरिकेत आला. तेव्हा वेगाच्या चाचणीत वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने त्याला हेरले. त्यांच्याच कडक शिस्तीत तयार झालेला अली आता अमेरिका संघाचा सदस्य असून, ताशी १३५ कि.मी. वेगाने चेंडू टाकण्याची त्याची क्षमता आहे.