अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक राज्यांमध्ये मुसंडी मारली आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा सहज पराभव केला. पेनसिल्वेनिया, जॉर्जिया, व्हिस्कॉन्सिन ही मोक्याची राज्ये (स्विंग स्टेट्स) रिपब्लिकन पक्षाने डेमोक्रॅट्सकडून खेचून आणली. तेथील ४५ इलेक्टोरल मते अंतिम आकडेवारीत निर्णायक ठरली. व्हिस्कॉन्सिन जिंकून ट्रम्प २७७ जागांवर पोहोचले आणि विजयासाठी आवश्यक २७० हा आकडा त्यांनी सहज ओलांडला. नॉर्थ कॅरोलिना या आणखी एका निर्णायक राज्यात ट्रम्प यांनी विजय मिळवला. तेथे डेमोक्रॅट्सना विजयाची आशा होती. अलीकडच्या राजकीय इतिहासातील सर्वांत लक्षवेधी ‘कमबॅक’ असे ट्रम्प यांच्या विजयाचे वर्णन करता येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
महिला अध्यक्ष अजूनही अमान्य?
२०१६मध्ये डेमोक्रॅटिक पक्षातर्फे हिलरी क्लिंटन यांनी निवडणूक लढवली. त्यांना प्रत्यक्ष मतेही अधिक मिळाली. परंतु इलेक्टोरल किंवा प्रातिनिधिक मतांच्या गणितात त्या मागे पडल्या होत्या. अमेरिकेतील पारंपरिक व रूढीवादी मतदार अजूनही त्या देशाच्या अध्यक्षपदावर महिलेची निवड करण्यास फारसा उत्सुक नाही, असे अनुमान त्यावेळी काढले गेले. यंदा उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना ऐनवेळी म्हणजे जूनमध्ये उमेदवारी दिली गेली. त्यानंतर त्यांनी प्रचारातही झंझावात आणला. मात्र रूढीवादी मतदारांची मानसिकता त्याही बदलू शकल्या नाहीत, असेच म्हणावे लागेल.
हेही वाचा : सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
स्थलांतरितांचा मुद्दा
ट्रम्प यांनी स्थलांतरितांच्या मुद्द्यावर वातावरण तापवले होते. तशात हॅरिस स्वतःही स्थलांतरित व गौरेतर असणे हे ट्रम्प यांच्या पथ्यावर पडले. बाहेरून येणारे अमेरिका असुरक्षित बनवत आहेत, ते तुमचे रोजगार घेणार, तुमच्या पाळीव प्राण्यांना खाणार, ते कर भरत नाहीत, बेकायदेशीर राहूनही सगळ्या सुविधा घेतात असे अनेक मुद्दे ट्रम्प आणि त्यांच्या प्रचारयंत्रणेने आक्रमकपणे मांडले. डेमोक्रॅटिक सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास भूमिपुत्रांची गळचेपी होईल, हे ठासवले गेले. या मुद्द्यावर पारपंरिक रिपब्लिकन मतदारच नव्हे, तर तरुण मतदारही प्रभावित झाला असे दिसून आले.
ट्रम्प यांच्यावरील जीवघेणा हल्ला
जुलै महिन्यात पेनसिल्वेनियामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका प्रचारसभेदरम्यात प्राणघातक हल्ला झाला. यातून ट्रम्प थोडक्यात बचावले. बायडेन यांच्या सरकारने ट्रम्प यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली असा संदेश यातून पसरवला गेला. ट्रम्प यांच्यावर फ्लोरिडातही हल्ल्याचा प्रयत्न होणार होता. पेनसिल्वेनियात रक्तबंबाळ ट्रम्प यांनी मूठ उगारून दिलेला ‘फाइट’ म्हणजे लढा हा संदेश त्यांच्या समर्थकांना एकवटण्यास कारणीभूत ठरला. हे समर्थक अखेरपर्यंत ट्रम्प यांच्या पाठीशी उभ राहिले.
लोकशाही, गर्भपाताचा प्रभाव नाही
ट्रम्प हे हुकूमशाही प्रवृत्तीचे आणि एककल्ली स्वभावाचे गृहस्थ आहेत. पराभव दिसू लागताच त्यांनी निवडणूक निकालच उधळून लावण्याचा प्रयत्न केला वगैरे डेमोक्रॅटिक पक्षाकडून झालेला प्रचार अनेक राज्यांतील मतदारांना प्रभावित करू शकला नाही, हे उघड आहे. आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर मतदारांनी डेमोक्रॅट्सना अपेक्षित दाद दिली नाही. गर्भपाताच्या मुद्द्यावर ट्रम्प यांच्या राजवटीत महिलांना न्याय मिळणार नाही, असे हॅरिस प्रचारसभांमध्ये मांडत होत्या. त्यांना अनेक राज्यांतील प्राधान्याने शहरी महिला मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. पण ग्रामीण भागांमध्ये तो तितकासा जाणवलाच नाही. अनेक राज्यांमध्ये डेमोक्रॅट्सचे गणित बिघडवण्यास हा घटक कारणीभूत ठरला.
अर्थव्यवस्थेविषयी रोष…
अमेरिकी अर्थव्यवस्था इतर अनेक प्रगत अर्थव्यवस्थांच्या तुलनेत प्रगती करताना दिसत आहे. महागाई आणि रोजगारवृद्धी या दोन आव्हानांचा सामना जो बायडेन प्रशासनाने सक्षमपणे केला. त्यामुळे तेथील फेडरल रिझर्व्हने अलीकडेच अमेरिकेतील व्याजदर घटवले होते. पण निम्न आर्थिक वर्गाला, बेरोजगारांना, छोटे उद्योजक व नोकरदारांना आजही महागाईचा सामना करावा लागत आहे. दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये मध्यंतरी चक्रीवादळांनी विध्वंस घडवला. तेथील मतदारांचा रोष बायडेन प्रशासनावर मोठ्या प्रमाणात होता. कोविडनंतर अमेरिकेची अर्थव्यवस्था सावरली, पण तरीही मोठा वर्ग स्थैर्यापासून वंचित राहिला.
हेही वाचा : विमान कंपन्यांना १०० हून अधिक धमक्या पाठविणारा जगदीश उईके कोण?
डेमोक्रॅट्सचा उद्धटपणा
हिलरी क्लिंटन यांनी मागे ट्रम्पसमर्थकांना डिप्लोरेबल्स म्हणजे शिसारी आणणारे असे संबोधले होते. यंदा बायडेन यांनी एका भाषणात त्यांना गार्बेज म्हणजे कचरा असे संबोधले. डेमोक्रॅटिक पक्षाचे उच्चशिक्षित, शहरी नेते तुमच्याकडे सहानुभूतीने नव्हे, तुच्छतेने बघतात असा संदेश यातून पदवी नसलेला युवा वर्ग, ग्रामीण शेतकरी वर्ग, धार्मिक आणि श्रद्धाळू मतदारांपर्यंत पोहोचवण्यात रिपब्लिकन प्रचारयंत्रणा यशस्वी ठरली.