सध्याचं युग हे डिजिटल युग आहे. या डिजिटल युगात डेटिंग ॲप्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काहींना या डेटिंग ॲप्सवर आपला जोडीदार मिळत आहे; तर काहींना या डेटिंग ॲप्सवर तासन् तास घालवूनदेखील निराशा हाती येत आहे. कित्येक व्यक्ती या डेटिंग ॲप्समधील लाइक, स्वाईप, टॅपिंगच्या चक्रामध्ये अडकतात. योग्य जोडीदार मिळेपर्यंत हेच चक्र सुरू असते. योग्य कनेक्शन आणि नातेसंबंधांच्या शोधात लोक या ऑनलाइन ॲप्समध्ये सामील होतात; मात्र त्यांचा अनुभव नेहमीच सकारात्मक नसतो. डेटिंग ॲप्सचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो, असा प्रश्न अनेक दिवसांपासून उपस्थित केला जात आहे. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणे हे ॲप्सही व्यक्तीला व्यसनाधीन करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. डेटिंग ॲप्स कसे हानिकारक असू शकतात? याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो? हे ॲप्स वापरताना नक्की काय काळजी घ्यावी? त्याविषयी जाणून घेऊ.

डेटिंग ॲप्सचे विश्व

डेटिंग ॲप्सवर लोक प्रेम, जोडीदार शोधण्यासाठी येतात. एखाद्याच्या प्रोफाइलवर उजवीकडे स्वाइप करणे म्हणजे ती व्यक्ती तुम्हाला आवडली, असा अर्थ होतो आणि त्याही व्यक्तीला तुम्ही आवडलात, तर तुम्हाला आपापसांत संवाद साधता येतो. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती न आवडल्यास त्याला लेफ्ट स्वाइप केले जाते. २०१५ च्या प्यु रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणानुसार ५९ टक्के अमेरिकन वापरकर्त्यांनी सांगितले की, डेटिंग ॲप्स आणि वेबसाइट्स हा लोकांना भेटण्याचा एक चांगला मार्ग आहे. भारतातही डेटिंग ॲप्सचे प्रमाण वाढले आहे. २०२३ मध्ये तब्बल ८२.४ दशलक्ष (आठ कोटींहून अधिक) लोकांनी या ॲप्सचा वापर केला; जो पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत २९३ टक्क्यांनी जास्त आहे.

Young girl harassed foreign tourist for a reel dancing in public place video viral on social media
रीलसाठी ओलांडली मर्यादा! तरुणीने डान्स करता करता परदेशी व्यक्तीबरोबर केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकरी संतापले
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
shani vakri 2024 saturn retrograde
शनिदेव ३० वर्षांनंतर मीन राशीत होणार वक्री, २०२५ पासून उजळणार ‘या’ राशींचे भाग्य; मिळेल भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
Emotional Video of father went viral on social media shows dads hardwork
एका बापाची मजबुरी! कोणत्याच मुलावर ‘हे’ बघायची वेळ येऊ नये; VIDEO पाहून व्हाल निशब्द
डेटिंग ॲप्सवर लोक प्रेम, जोडीदार शोधण्यासाठी येतात. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : पंतप्रधान मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या भेटीदरम्यान नक्की काय घडले? भारत-कॅनडातील तणावाचे कारण काय?

डेटिंग ॲप्सचा मानसिक आरोग्यावर परिणाम

डेटिंग ॲप्सवर योग्य जोडीदार मिळेपर्यंत लाइक, स्वाइप, टॅपिंग या अंतहीन चक्रात लोक अडकतात. अनेक लोकांना त्यामुळे थकवा, निराशा व एकटेपणाचा सामना करावा लागतो. डेटिंग ॲप वापरण्याची उत्सुकता संपल्यानंतर, एक वेळ अशी येते की, त्या व्यक्तीला योग्य जोडीदार मिळत नसल्यामुळे नैराश्य येते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ एन्व्हायर्न्मेंटल रिसर्च अॅण्ड पब्लिक हेल्थच्या २०२० च्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, डेटिंग ॲप्सवरील लोकांमध्ये मानसिक तणाव, चिंता व नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. २०१६ च्या अभ्यासानुसार, ॲप वापरत नसलेल्या लोकांपेक्षा टिंडर वापरकर्त्यांना कमी आत्मसन्मान आणि अधिक शारीरिक समस्या असल्याचे आढळून आले. डेटिंग ॲप्सवर लोक फिल्टर केलेल्या प्रोफाइल प्रतिमांपासून ते बायोसपर्यंत स्वतःची एक वेगळी प्रतिमा तयार करतात. ऑनलाइन तयार केलेली प्रतिमा व्यक्तीच्या वास्तविक जीवनाशी जुळत नाही, तेव्हा निराशा येऊ शकते. एखाद्याच्या शारीरिक स्वरूपावर तीव्र लक्ष केंद्रित करणेदेखील वस्तुनिष्ठ आणि अमानवीय असू शकते.

ऑनलाइन डेटिंग ॲप्सचे विश्व मोठे असल्यामुळे बर्‍याच लोकांशी झालेले बोलणे व्यक्तीला गोंधळात टाकू शकते आणि त्यामुळे त्या व्यक्तीची निर्णयक्षमता कमकुवत होते. “लोक संपूर्ण डेटिंग प्रक्रियेनेच थकतात,” असे डेटिंग ॲप Match.com च्या मुख्य विज्ञान सल्लागार हेलन फिशर यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला सांगितले. परिपूर्ण जोडीदार शोधण्यासाठी लोक दिवसभरातील बराच वेळ ॲप्सवर घालवतात. त्यामुळे या ॲप्सचे व्यसन लागण्याची शक्यता असते. या वर्षी फेब्रुवारीमध्ये अमेरिकेतील सहा लोकांनी क्लास ॲक्शन खटला दाखल केला आणि लोकप्रिय डेटिंग ॲप्सचे व्यसन लागत असल्याची तक्रार केली. हे ॲप्स गेम्ससारखे असल्याचा आणि वारंवार येणारी नोटिफिकेशन्स वापरकर्त्यांना ॲप्सवर परत येण्यास भाग पाडतात, असाही आरोप करण्यात आला.

डेटिंग ॲप्सवर योग्य जोडीदार मिळेपर्यंत लाइक, स्वाइप, टॅपिंग या अंतहीन चक्रात लोक अडकतात. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

मुंबईतील समुपदेशन मानसशास्त्रज्ञ ॲब्सी सॅम यांनी ‘इंडियन टुडे’ला सांगितले, “मी डेटिंग ॲप्सच्या व्यसनाशी झुंजणारे लोक बघितले आहेत. या लोकांमध्ये असलेली असंतोषाची तीव्र भावना आणि त्यांच्यामधील योग्य जोडीदार मिळण्याबाबतची तळमळ जाणवते.” या व्यसनाच्या लक्षणांमध्ये डेटिंग ॲप्स वारंवार तपासणे, डेटिंग ॲप्स वापरण्यासाठी वास्तविक जगापासून दूर जाणे आणि ते वापरत नसल्यास चिंता वाटणे आदींचा समावेश आहे. डेटिंग म्हटले की, त्यात नकारही आलाच. हे ऑनलाइन आणि वास्तविक दोन्ही जगातील वास्तव आहे. परंतु, व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मसह डेटिंगचे प्रमाणही वाढले आहे आणि त्याचप्रमाणे नाकारण्याची वारंवारतादेखील वाढली आहे. सतत नकार दिल्याने व्यक्तीच्या आत्मसन्मानावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि स्वतःविषयी त्या व्यक्तीला शंका येऊ लागते.

डेटिंग ॲप्स वापरताना आपले मानसिक आरोग्य कसे जपावे?

तुम्ही समोरील व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवू शकत नाही; परंतु एखादी विशिष्ट परिस्थिती उद्भवल्यास त्यास कसे सामोरे जावे, हे नक्कीच तुमच्या हातात आहे. कोणी नकार दिल्यास आपणच कुठेतरी चुकतोय वा आपल्यातच काहीतरी कमतरता आहे, असे समजू नका. त्याऐवजी पुढे जा आणि वास्तविक जीवनात आपल्या प्रियजनांबरोबर वेळ घालवा. एक व्यक्ती बर्‍याच डेटिंग ॲप्सवर असल्याने नाकारले जाण्याची शक्यता आणखी वाढते. एका वेळी एक डेटिंग ॲप वापरणे आणि मोजक्या काही लोकांशी बोलणे योग्य ठरू शकते.

हेही वाचा : संयुक्त राष्ट्र संघटना शांतता सेना काय आहे? इस्रायल-लेबनॉन सीमेवर तैनात संयुक्त राष्ट्रांच्या सैनिकांवर हल्ला का करण्यात आला?

इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणे, तुम्ही दिवसभरात अनेकदा डेटिंग ॲप्स वापरत असाल, तर वेळ कमी करणे अत्यावश्यक आहे. डेटिंग ॲप्सवर तासन् तास घालवल्याने नैराश्य येण्याची शक्यता वाढते; ज्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. डेटिंग ॲप्सवर तुम्ही ज्या व्यक्तीशी चॅट करीत आहात, त्यावर तुमचा विश्वास असल्यास, त्यांना वास्तविक जीवनात (सार्वजनिक ठिकाणी) भेटणे उत्तम असू शकते. आपण एखाद्या व्यक्तीला वैयक्तिकरीत्या भेटल्याशिवाय आपण कधीही त्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखू शकत नाही. तसेच वैयक्तिकरीत्या भेटल्यावर ऑनलाइन संभाषणांमुळे येणारा ताण आणि चिंता कमी होऊ शकते.