Winter Char Dham Yatra Uttarakhand : उत्तराखंडमधील ‘हिवाळी चारधाम यात्रा’ सध्या भाविकांमध्ये आकर्षणाचं केंद्र झाली आहे. गेल्यावर्षी ८ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते यात्रेचं उद्घाटन करण्यात आलं होतं. यानंतर चारधाम यात्रेला सुरुवात करण्यात आली. विशेष बाब म्हणजे, अत्यंत कडाक्याच्या थंडीतही मोठ्या संख्येने भाविक चार धामच्या दर्शनासाठी येत आहेत. उत्तराखंडमध्ये साधारणत: चारधाम यात्रेला उन्हाळ्यात सुरुवात होते. मात्र, यंदा प्रथमच यात्रा हिवाळ्यात सुरू करण्यात आली आहे. यावर पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, सरकारने लवकर यात्रा सुरू का केली? यामागचे कारण काय? सविस्तर जाणून घेऊया…

हेही वाचा : Hijab ban in Switzerland : स्वित्झर्लंडमध्ये हिजाब आणि बुरख्यावर का बंदी घालण्यात आली आहे?

director Anurag Kashyap leave Mumbai financial pressures
विश्लेषण : प्रयोगशील दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुंबई सोडण्याचा निर्णय का घेतला? त्याचे ‘दाक्षिणायन’ बॉलिवुडला जागे करणार का?
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Manikrao Kokate On Chhagan Bhujbal
Manikrao Kokate : “ज्यांना जिथे जायचं ते तिथे जाऊ शकतात”, अजित पवार गटाच्या नेत्याचं भुजबळांच्या नाराजीबाबत मोठं विधान
pakistan in unsc
भारताची चिंता वाढली? दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य; याचा अर्थ काय?
Bajrang Sonawane On Amol Mitkari
Bajrang Sonawane : “अमोल मिटकरींना हे खूप महागात पडेल”, खासदार बजरंग सोनवणेंचा थेट इशारा
Sharad Pawar On Dhananjay Munde
Sharad Pawar : “राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्यांमध्ये तीन लोक प्रामुख्याने होते”, शरद पवारांचा रोख कुणाकडे? चर्चांना उधाण
विमानात हजारो फूट उंचीवर इंटरनेट कसं वापरता येणार? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
Air India Flight Wifi : विमानात हजारो फूट उंचीवर इंटरनेट कनेक्टिव्हिटी कशी मिळणार?
new orleans attack isis again Active
विश्लेषण : ‘आयसिस’ पुन्हा सक्रिय झाली आहे का? अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स हल्ला कशाचे निदर्शक? धोका किती गंभीर?

चारधाम यात्रेत आतापर्यंत किती भाविक आले?

उत्तराखंडमधील गढवाल हिमालयात हिंदू धर्माचे चार तीर्थक्षेत्र आहेत. गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या तीर्थक्षेत्रांना चारधाम म्हणून ओळखले जाते. साधारणत: चारधाम यात्रेला एप्रिल-मे ते ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत सुरुवात होते. दरवर्षी लाखो भाविक यात्रेत सहभागी होऊन तीर्थक्षेत्रांना भेट देतात. उत्तराखंड सरकारच्या आकडेवारीनुसार, या वर्षी ४८ लाखांहून अधिक भाविक आणि ५ लाख ४० हजार वाहने चारधाम यात्रेला भेट दिली आहेत. ही संख्या उत्तराखंडच्या वार्षिक पर्यटकांच्या संख्येच्या ८.४ टक्के इतकी आहे.

चारधाम यात्रेत कोणत्या देवी-देवतांचं दर्शन होते?

चारधाम यात्रेमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते. परंतु हिवाळ्याच्या महिन्यांत यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ येथे प्रचंड बर्फवृष्टी होते. त्यामुळे भाविकांना यात्रेदरम्यान मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. खराब हवामानामुळे त्यांना मंदिरात प्रवेश करणे जवळजवळ अशक्य होते. त्यामुळे हिवाळ्यात या मंदिरांत असलेल्या मुख्य देवतांना खालच्या भागात असलेल्या मंदिरांमध्ये आणले जाते. उत्तरकाशीतील मुखबा हे गंगोत्री धामचे हिवाळी निवासस्थान आहे; उत्तरकाशीतील खरसाळी हे यमुनोत्री धामचे हिवाळी निवासस्थान आहे. तर केदारनाथचे हिवाळी निवासस्थान रुद्रप्रयागमधील उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिर आहे. बद्रीनाथचे हिवाळी निवासस्थान चमोलीतील पांडुकेश्वर आहे.

हिवाळी चारधाम यात्रेचं मुख्य उद्दिष्ट काय?

भाविकांना देवस्थानांकडे आकर्षित करणे, हंगाम नसतानाही त्यांना पर्यटनस्थळांकडे आकर्षित करणे हे चारधाम यात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे. सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, ३० डिसेंबरपर्यंत उत्तराखंडमधील तीर्थक्षेत्रांना १५ हजार ३१४ भाविकांनी भेटी दिल्या आहेत. सर्वाधिक ६ हजार ४८२ भाविक ओंकारेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आले होते. तर पांडुकेश्वरमध्ये ५ हजार १०४ भाविकांची नोंद करण्यात आली. याशिवायमुखबा येथे ३ हजार ११४ आणि खरसाळी येथे ६१४ भाविक येऊन गेले आहेत.

चारधाम यात्रेतून सरकारला किती उत्पन्न मिळतं?

उत्तराखंडच्या पर्यटन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चार धाम यात्रेतून राज्याला दररोज २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळतं आहे. मात्र, या वर्षी पर्यटकांची संख्या वाढल्याने या उत्पन्नात आणखीच वाढ होणार आहे. थंडीच्या हंगामातही तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी पर्यटकांचा ओघ सुरूच असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. राज्याचे पर्यटन सचिव सचिन कुर्वे म्हणाले की, “हिवाळी चारधाम यात्रेमुळे उत्तराखंडची उन्हाळी पर्यटन स्थळ म्हणून निर्माण झालेली प्रतिमा बदलण्यास मदत होईल.”

हिवाळ्यात चारधाम यात्रा का सुरू करण्यात आली?

“राज्यातील पर्यटन क्षमतेत चार धाम यात्रा आघाडीवर आहे. परंतु, हिवाळ्यातील बर्फवृष्टीमुळे तीर्थक्षेत्रे दर्शनासाठी बंद करण्यात येतात. त्यामुळे सहसा अनेक पर्यटक हिवाळ्यात उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी येत नाही. याचा मोठा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवरही होत आहे. त्यामुळेच आम्ही हिवाळ्यात चारधाम यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जेंव्हा संपूर्ण उत्तर भारत हिवाळ्यात धुक्याने व्यापलेला असतो, तेव्हा आम्हाला या गर्दीचा फायदा घ्यायचा आहे, ज्याला आपण ‘सन टुरिझम’ म्हणतो. हिवाळी चारधाम यात्रा नक्कीच उत्तराखंडच्या पर्यटनाला नवसंजीवणी देण्याचं काम करेन”, असंही सचिन कुर्वे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : Koregaon Bhima Shaurya Din: महार रेजिमेंट आणि कोरेगाव विजय स्तंभ नेमके नाते काय? महार रेजिमेंटची स्थापना कशी झाली? 

पर्यावरणप्रेमींनी कोणती चिंता व्यक्त केली?

उत्तराखंड सरकारने सुरू केलेल्या हिवाळी चारधाम यात्रेवर पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. डेहराडूनचे पर्यावरणप्रेमी अनूप नौटियाल म्हणाले की, “पर्यटकांची विक्रमी संख्या आणि पर्यटनस्थळांवर होणाऱ्या अनावश्यक गर्दीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास आणि पवित्र स्थळांचे व्यापारीकरण होत आहे. वाढत्या गर्दीमुळे स्थानिक पायाभूत सुविधांवरील दबाव वाढत आहे. त्याचबरोबर परिसंस्थेला हानी पोहचत असून तीर्थस्थळांची पवित्रता धुळीला मिळत आहे.”

द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना नौटियाल म्हणाले की, “हिवाळी चार धाम यात्रा सुरू करण्याचा उत्तराखंड सरकारचा निर्णय हे एक महत्त्वाची आणि सकारात्मक योजना आहे. परंतु, या निर्णयामुळे अनेक संकटे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर काळजीपूर्वक आणि दूरदृष्टीने विचार करणे गरजेचं आहे. उत्तराखंडच्या डोंगराळ भागातील प्रदेश तसेच हवामान पाहता सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्याची चिंता निर्माण होऊ शकते”, असंही नोटियाल यांनी म्हटलं आहे.

हिम प्राण्यांना त्रास होण्याची भीती

चार धाम प्रकल्पावर सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या उच्चाधिकार समितीचे माजी अध्यक्ष रवी चोप्रा म्हणाले की, “उंच डोंगर उतारावर आणि शिखरांवर राहणारे दुर्मिळ प्राणी हिवाळ्यात अन्न आणि पाण्यासाठी खाली येत असतात. हिवाळ्यातील वाहतुकीमुळे हिम बिबट्या आणि पर्वतीय मेढ्यांसारख्या वन्यजीवांना त्रास होऊ शकतो. कारण, हे प्राणी अत्यंत लाजाळू असतात. सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या एचपीसीच्या अंतिम अहवालात आम्ही तसे नमूद केले आहे.”

दरम्यान, गेल्या वर्षी जुलैमध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने राज्य सरकारला चार धाम यात्रेची वाहतूक क्षमता निश्चित करण्यास सांगितले होते. तसेच उत्तराखंड प्रदूषण नियंत्रण मंडळाने भारतीय वन्यजीव संस्थेला त्याचे मूल्यांकन करून वर्षभरात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Story img Loader