विनायक डिगे

भारतीय कंपनीने बनविलेल्या खोकल्याच्या औषधाने गांबियामध्ये ६६ बालकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील औषधांचा अहवाल प्रकाशित होऊन गांबिया सरकारने या मृत्यूशी भारतीय औषध कंपनीचा काहीच संबंध नसल्याचे नुकतेच जाहीर केले. याला काही दिवस उलटत नाहीत, तर आता उझबेकीस्तानमध्ये भारतीय कंपनीच्या खोकल्याचा औषधाने १८ बालकांचा मृत्यू झाला, असे वृत्त आहे. त्यामुळे पुन्हा भारतीय औषध कंपन्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
man dies after falling into hole dug in Chembur by mumbai municipality
चेंबूरमध्ये पालिकेने खोदलेल्या खड्यात पडून इसमाचा मृत्यू, कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
Union Health Minister confirms sudden deaths in India are not caused by COVID-19 vaccines, addressing public concerns about vaccine safety.
Deaths Due To Corona Vaccine : “करोना लशीमुळे झाले नाहीत लोकांचे मृत्यू”, मोदी सरकारने संसदेत सांगितली अचानक मृत्यूंमागील कारणे
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
number of ST bus accidents increased in Nashik division
नाशिक विभागात एसटी अपघातांचा उंचावता आलेख; नऊ महिन्यांत बसचे १२० अपघात, २२ जणांचा मृत्यू
Atul Suhas Suicide
“न्याय प्रलंबित आहे”, गळ्यात फलक लटकावून तरुणाची आत्महत्या; २४ पानी नोटमुळे पोलिसांसमोर आव्हान वाढले!

उझबेकीस्तानमध्ये काय घडले?

नोएडास्थित मेरियन बायोटेक या औषध कंपनीचे ‘डॉक-१ मॅक्स’ हे खोकल्याचे औषध प्राशन केल्यानंतर १८ बालकांना मळमळ, उलट्या झाल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. या बालकांना डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय त्यांच्या पालकांनी दोन ते सात दिवस दिवसातून तीन ते चार वेळा २.५ मिली ते ५ मिली इतके औषध दिले होते. औषध देण्याचे हे मानक प्रमाणित आहे. त्यामुळे या १८ बालकांचा मृत्यू भारतातील डॉक-१ मॅक्स औषधामुळे झाला असल्याचा आरोप उझबेकीस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने केल्यानंतर या कंपनीने औषधाचे उत्पादन तात्पुरते थांबविले आहे.

भारताकडून काय प्रतिसाद?

भारताच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात चौकशीला सुरुवात केली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने उझबेकीस्तानच्या घटनेसंबंधी चौकशी सुरू केली असून याप्रकरणी कंपनी संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे कंपनीच्या कायदेशीर प्रतिनिधीकडून सांगण्यात आले आहे. तसेच या प्रकरणानंतर भारताने देशातील सर्व औषध निर्माण कंपन्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला असून तसे आदेशही दिले आहेत.

विश्लेषण : भीषण अपघातानंतर ऋषभ पंतची कार क्षणात पेटली; जाणून घ्या, अशावेळी का लागू शकते कारला आग?

या घटकामुळे झाला मृत्यू…?

डॉक-१ मॅक्स या खोकल्याच्या औषधामध्ये डायइथिलिन ग्लायकॉल या घटकाचे प्रमाण अधिक असल्याने हा मृत्यू झाल्याचा दावा उझबेकीस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे. बांगलादेश, इंडोनेशिया, पनामा, चीन तसेच काही दिवसांपूर्वी गांबिया येथे तर आता उझबेकीस्तानमध्ये खोकल्यात वापरलेल्या डायइथिलिन ग्लायकॉल या घटकामुळे बालकांना प्राण गमवावे लागले आहेत. हा घटक विषारी असल्याने विकसनशील देशात याच्या वापरामुळे अनेक दुर्घटना घडल्याचे समोर आल्या आहेत. डायइथिलिन ग्लायकॉलकच्या अतिवापराचे दुष्परिणाम मुलांना भोगावे लागतात. या अतिवापरामुळे लहान मुलांचे अनेक अवयव निकामी होऊन त्यांचा मृत्यू ओढवण्याचा धोका अधिक असतो.

Uzbekistan Cough Syrup Death : भारतीय कंपनीचं कफ सिरप प्यायल्यामुळे उझबेकिस्तानमध्ये १८ मुलांचा मृत्यू? स्थानिक प्रशासनाचा दावा

कशासाठी होतो वापर?

खोकल्याच्या औषधामध्ये साधारणपणे ग्लिसरीनचा वापर केला जातो. मात्र ग्लिसरीन पर्यायी आणि तुलनेने स्वस्त असल्याने औषध कंपन्यांकडून डायइथिलिन ग्लायकॉलचा वापर केला जातो. डायइथिलिन ग्लायकॉल याला रंग नसून याची चव गोड असते. त्यामुळे औषधांमध्ये गोडवा आणण्यासाठी याचा वापर केला जातो. तसेच ग्लिसरीनमध्येही याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र हा घटक धोकादायक असून त्याच्या वापरामुळे अनेक बालकांना आपले प्राण गमवावे लागले असल्याचे स्पष्ट असूनही याचा वापर केला जातो. डायइथिलिन ग्लायकॉल हे दोन प्रकारचे असते. एक औषध बनविण्यासाठी वापरले जाते तर दुसरे हे औद्योगिक कारणासाठी वापरले जाते. मात्र औद्योगिक कारणासाठी वापरण्यात येणारे डायइथिलिन ग्लायकॉल हे औषधांसाठी वापरल्या जाणाऱ्या डायइथिलिन ग्लायकॉलपेक्षा स्वस्त असते. त्यामुळे आपल्या औषधांची किंमत कमी करण्यासाठी कंपन्या औद्योगिक कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या डायइथिलिन ग्लायकॉलचा वापर करत आहेत का, हे तपासणे आवश्यक आहे.

खोकल्याच्या औषधांसाठी डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक आहे का?

सर्व औषधे ही शेड्युल्ड एच अंतर्गत येतात. त्यामुळे कोणतेही औषध घेण्यासाठी डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक असते. मात्र काही औषधे ही ओव्हर द काऊंटर विकता येतात म्हणजे ती औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय थेट औषध विक्रेत्यांच्या दुकानात जाऊन घेता येतात. त्यांना डॉक्टरांच्या चिठ्ठीची आवश्यकता भासत नाही. या प्रकारामध्ये खोकल्याच्या काही औषधांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे खोकल्यावरील काही औषधे ही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळतात.

Story img Loader