संदीप कदम

चेक प्रजासत्ताकच्या बिगरमानांकित मार्केटा वोन्ड्रोउसोवाने नुकतेच विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील महिला एकेरी गटाचे जेतेपद मिळवले. या जेतेपदानंतर ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या महिला एकेरीतील चेक प्रजासत्ताकचे वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. यापूर्वी कोणत्या चेक महिला खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली, तसेच या देशातून सर्वोत्तम महिला टेनिस खेळाडू घडण्याचे कारण काय, याचा घेतलेला हा आढावा.

novak djokovic breaks roger federer record
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोविचचे ऐतिहासिक यश ; फेडररला मागे टाकत सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामन्यांत सहभाग
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Adam Gilchrist says Sir Don Bradman would have troubled ahead Jasprit Bumrah in batting
Jasprit Bumrah : ‘….बुमराह असता तर ब्रॅडमनची सरासरी ९९ नसती’, आस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचं मोठं विधान
Anuj Rawat leave Delhi Team and join Gujarat Titans camp ahead IPL 2025 season
Anuj Rawat : आयपीएलला प्राधान्य देणे ‘या’ खेळाडूला पडणार महागात, गुजरात टायटन्ससाठी रणजी संघाची सोडली साथ
Kho-Kho World Cup Delhi, Kho-Kho ,
विश्लेषण : दिल्लीत चक्क खो-खो विश्वचषक? किती संघ सहभागी? स्पर्धेमुळे या मराठमोळ्या खेळाला संजीवनी मिळेल?
australian open 2025 novak djokovic defeats indian origin teen sensation nishesh basavareddy
तारांकितांची अपेक्षित सुरुवात; जोकोविचची भारतीय वंशाच्या निशेषवर मात; सिन्नेर, अल्कराझचेही यश
Sabalenka Zverev progress
सबालेन्का, झ्वेरेवची विजयी सलामी
IND W vs IRE W Jemimah Rodrigues century helps Indian womens team register highest ODI score against Ireland
IND W vs IRE W : जेमिमा रॉड्रिग्जच्या पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, केला ‘हा’ खास पराक्रम

वोन्ड्रोउसोवाची विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील वाटचाल कशी होती?

वोन्ड्रोउसोवाने आपल्या विम्बल्डन मोहिमेची सुरुवात अमेरिकेच्या पेटॉन स्टर्न्सला ६-२, ७-५ असे नमवत केली. दुसऱ्या फेरीत तिने व्हेराॅनिका कुदेरमेतोव्हाला ६-३, ६-३ अशा फरकाने पराभूत केले. तिसऱ्या फेरीमध्ये वोन्ड्रोउसोवाने क्रोएशियाच्या डोना वेकिचवर ६-१, ७-५ असा विजय साकारत उपउपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. या फेरीत तिने आपल्याच देशाच्या मारी बुझकोव्हाला चुरशीच्या लढतीत २-६, ६-४, ६-३ असे पराभूत केले. मग वोन्ड्रोउसोवाने उपांत्यपूर्व लढतीत अमेरिकेच्या चौथ्या मानांकित जेसिका पेगुलाला ६-४, २-६, ६-४ अशा फरकाने नमवले. अग्रमानांकित पोलंडच्या इगा श्वीऑनटेकला पराभूत करणाऱ्या एलिना स्विटोलिनाला उपांत्य फेरीत ६-३, ६-३ असे सरळ सेटमध्ये नमवताना वोन्ड्रोउसोवाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. अंतिम सामन्यात सहाव्या मानांकित आणि गतउपविजेत्या ट्युनिशियाच्या ओन्स जाबेऊरवर ६-४, ६-४ असा विजय साकारात वोन्ड्रोउसोवाने ऐतिहासिक जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे दोन्ही सेटमध्ये वोन्ड्रोउसोवा पिछाडीवर होती.

वोन्ड्रोउसोवाचे महिला एकेरीचे जेतेपद विशेष का?

वोन्ड्रोउसोवाने महिला एकेरीचे जेतेपद मिळवताना अनेक विक्रम मोडीत काढले. विम्बल्डनचे विजेतेपद पटकावणारी ती पहिली बिगरमानांकित आणि क्रमवारीत सर्वांत खालच्या क्रमावरील खेळाडू ठरली. व्हिनस विल्यम्सने २००७ मध्ये महिला एकेरीचे जेतेपद मिळवले होते, तेव्हा ती क्रमवारीत ३१व्या स्थानी होती. स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी वोन्ड्रोउसोवाची ‘डब्ल्यूटीए’ क्रमवारी ४२ होती. या जेतेपदानंतर ती प्रथमच क्रमवारीत अव्वल १० खेळाडूंमध्ये पोहोचेल. दुखापतीमुळे वोन्ड्रोउसोवाने गेल्या विम्बल्डन स्पर्धेत सहभाग नोंदवला नाही. गेल्या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत दुखापतीमुळे तिला टेनिस कोर्टच्या बाहेर राहावे लागल्याने तिची जागतिक क्रमवारी ९९व्या स्थानी पोहोचली होती. वोन्ड्रोउसोवाचे हे पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. यापूर्वी, २०१९ मध्ये फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तिला पराभवाचा सामना करावा लागला होता.

यापूर्वी चेक प्रजासत्ताकच्या कोणत्या महिला टेनिसपटूंनी जेतेपद मिळवले आहे?

वोन्ड्रोउसोवाने जेतेपद मिळताना चेक प्रजासत्ताकच्या टेनिस इतिहासात आपले नाव नोंदवले. चेक प्रजासत्ताकची नामांकित टेनिसपटू मार्टिना नवरातिलोव्हाने १८ ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावली आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ९ जेतेपदे ही विम्बल्डनची आहेत. यासह ३१ महिला दुहेरी आणि १० मिश्र दुहेरीची जेतेपदेही तिच्या नावावर आहेत. चेक प्रजासत्ताकची ती आजवरची सर्वांत यशस्वी टेनिसपटू म्हणून ओळखली जाते. यासह हॅना मांडिलकोव्हाने चार जेतेपदांवर (दोन ऑस्ट्रेलियन, एक फ्रेंच व एक अमेरिकन) नाव कोरले आहे. पेट्रा क्विटोवाच्या नावे दोन ग्रँडस्लॅम (दोन्ही विम्बल्डन) विजेतेपदे आहेत, तर याना नोवोत्ना (विम्बल्डन), बार्बरा क्रेजिकोव्हा (फ्रेंच) यांच्यासह ग्रँडस्लॅम विजेत्या चेक प्रजासत्ताकच्या महिला टेनिसपटूंमध्ये आता वोन्ड्रोउसोवाचे नावही जोडले गेले आहे.

चेक प्रजासत्ताकमधून आघाडीचे टेनिसपटू नावारूपाला येण्याचे कारण काय?

चेक प्रजासत्ताकची टेनिसमधील चढत्या आलेखामागे तेथील व्यवस्था कारणीभूत आहे. तेथील स्थानिक क्लब पद्धतीनुसार कनिष्ठ खेळाडूंची काळजी प्रशिक्षकांकडून घेतली जाते. आजवरचे सर्वच आघाडीचे खेळाडू याच प्रणालीमधून पुढे आले आहेत. प्रत्येक छोट्या शहराला स्वत:चा एक क्लब आहे, तर संघ तेथील स्थानिक स्पर्धेत सहभागी होतात. ग्रीष्म ऋतूमध्ये होणाऱ्या स्पर्धांना येथे चांगला प्रतिसाद मिळतो. प्रत्येक स्पर्धेच्या दर्जानुसार खेळाडूंना त्यांचे गुण मिळतात. या स्पर्धेत मिनी गट (१० वर्षांपर्यंत), युवा गट (१० ते १२ वयोगट) आणि कनिष्ठ गटाच्या (१४ ते १८ वयोगट) स्पर्धा पार पडतात. युुवा गटातून या खेळाडूंना गुण मिळण्यास सुुरुवात होते, जेणेकरून त्यांना पुढच्या फेरीत आगेकूच करण्यास मदत होते. ‘एलटीसी पारडुबिस’ हा क्लब तेथील कनिष्ठ स्पर्धेच्या आयोजनासाठी ओळखला जातो. या क्लबमधून नवरातिलोवा आणि क्विटोवा यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली.

वोन्ड्रोउसोवाच्या कारकीर्दीची सुरुवात कशी झाली?

वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी वोन्ड्रोउसोवाच्या वडिलांनी तिचा टेनिसशी परिचय करून दिला. वोन्ड्रोउसोवाची आईही व्हॉलीबॉल खेळाडू होती. वोन्ड्रोउसोवाने लहानपणापासून अनेक खेळांत सहभाग नोंदवला. तिने स्कीईंग, फुटबॉल, टेबल टेनिस आणि फ्लोरबॉल हे क्रीडा प्रकार खेळले. मात्र, पुढे तिने टेनिसवर लक्ष केंद्रित केले. तिने २००६ मध्ये प्रागमध्ये एका मिनी टेनिस स्पर्धेत सहभाग नोंदवला. या स्पर्धेत ती तिसऱ्या स्थानी राहिली. त्यामुळे तिने क्रोएशियाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पात्रता मिळवली. वयाच्या १५व्या वर्षी वोन्ड्रोउसोवाने प्राग येथे राहण्याचा निर्णय घेतला. वयाच्या १२व्या वर्षी तिने अमेरिकेतील कनिष्ठ आंतरराष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेत जेतेपद मिळवले.

माजी खेळाडू रेनी स्टब्स चेक प्रजासत्ताकच्या महिला खेळाडूंबाबत काय म्हणाली?

‘‘चेक प्रजासत्ताकमधून सर्वाधिक चांगल्या महिला खेळाडू समोर आल्या आहेत. देशाची लोकसंख्या आणि त्याची लांबी पाहता या देशातून अनेक दिग्गज टेनिसपटू तयार झाल्या आहेत. मार्टिना, हॅना, हेलेना, याना, पेट्रा, कॅरोलिना, बार्बोरा, मुचोव्हा, मार्केटा आणि स्ट्रायकोव्हा… आणि हे पुढेही असे सुरूच राहील,’’ असे स्टब्सने ट्वीट केले.

Story img Loader