वरुण धवन आणि जान्हवी कपूर अभिनीत आणि नितेश तिवारी दिग्दर्शित चित्रपट ‘बवाल’ सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून जगभरातील ज्यू नागरिक आणि काही संघटनांनी हा चित्रपट ओटीटीवरून हटविण्याची मागणी केली आहे. ज्यूंचे वंशसंहार आणि हिटलर हे विषय विनोद किंवा थट्टा-मस्करीचे नाहीत, अशी टीका या निमित्ताने होत आहे. ज्यू समुदायातील उजव्या विचारसरणीची संघटना ‘सिमॉन विसेन्थल सेंटर’ने (Simon Wiesenthal Center – SWC) अ‍ॅमेझॉन प्राइमला पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आहे. बवाल चित्रपटात ‘ऑश्वित्झ’ येथील ज्यूंच्या वंशसंहाराचे (Holocaust) असंवेदनशील चित्रण असून लाखो ज्यू लोकांना ज्या वेदना आणि दुःख सहन करावे लागले, त्याची किंमत अतिशय क्षुल्लक असल्याचे चित्रपटातून दिसते. त्यामुळे या चित्रपटाला ओटीटीवरून काढून टाकावे, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“चित्रपटात दाखविण्यात आलेले ऑश्वित्झ हे इतके साधे सरळ नाही. माणसातील रानटी प्रवृत्तीचे ते अतिशय चपखल उदाहरण आहे”, अशी प्रतिक्रिया एसडब्लूसीच्या आंतरराष्ट्रीय सामाजिक क्रिया विभागाचे संचालक रब्बी अब्राहम कूपर यांनी व्यक्त केली आहे. “हिटलरच्या नृशंस राजवटीत ६० लाख ज्यूंचा वंशसंहारझाले आणि इतर लाखो ज्यूंना दुःख आणि वेदनांचा सामना करावा लागला. नितेश तिवारी यांनी त्यांच्या चित्रपटातून या सर्व कटू आठवणींना अतिशय क्षुल्लक असल्याचे दाखविले आहे”, असा आरोप कूपर यांनी पत्राद्वारे केला.

हे वाचा >> ज्यूंच्या मृत्यूच्या तांडवातला सृजन-सोहळा

फक्त ज्यू संघटनाच नाही, तर काही चित्रपट समीक्षकांनीही चित्रपटावर कडाडून टीका केली. “मागच्या काही वर्षांमधील सर्वात असंवेदनशील चित्रपट”, अशी टीका एका वर्तमानपत्रात लिहिलेल्या समीक्षकेत करण्यात आली आहे. बवाल चित्रपटावरून ‘बवाल’ (मराठीत गदारोळ) होत असताना ज्यूंच्या वंशसंहाराचा नेमका इतिहास काय? बवाल चित्रपटाने या दुर्दैवी घटनेचे असंवेदनशील चित्रण केले आहे का? याबद्दल घेतलेला हा आढावा.

ज्यूंचा वंशसंहार (Holocaust)

इंग्रजीमध्ये वापरण्यात येणारा होलोकास्ट हा शब्द ग्रीकमधील holokauston या शब्दापासून पुढे आला. याचा अर्थ होतो, “आगीमध्ये भस्मसात करणे.” १९३३ सालादरम्यान संपूर्ण युरोपमधील विविध देशांमध्ये नऊ दशलक्ष ज्यू नागरिक राहत होते. युरोपमधील काही देश ‘ज्यू’ नागरिकांना समान अधिकार देत होते, तर काही पूर्वेकडील युरोपियन देशांमध्ये ज्यूंचे जीवन इतरांपेक्षा वेगळे होते. १९३३ साली जर्मनीमध्ये लोकशाही प्रक्रियेतून ॲडॉल्फ हिटलर जर्मनीच्या संसदेत पोहोचला. अनेक शतकांपासून दबक्या आवाजात सुरू असलेल्या ज्यूंविरोधाला (anti-Semitism) हिटलरने नरसंहाराचे स्वरूप दिले. सत्तेत आल्यानंतर नाझींनी जर्मनीतून ज्यूंना बेदखल करण्यासाठी विविध कायदे लागू केले.

ज्यू आणि नाझींना जी लोकं अनिष्ट वाटत आहेत त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. ज्यूंच्या हजारो इमारती आणि सिनेगॉग (ज्यूंचे प्रार्थना स्थळ) उद्ध्वस्त करण्यात आले. नऊ महिन्यांमध्ये आइन्झाट्सग्रुपेन (Einsatzgruppen) या ठिकाणी पाच लाखांहून अधिक ज्यू लोकांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. तरीही हिटलर आणि त्याच्या नाझी अधिकाऱ्यांसाठी हे पुरेसे नव्हते. त्यांनी १९४२ च्या आसपास युरोपमधील सर्व ज्यूंचे अस्तित्व मिटवण्याचा अंतिम उपाय शोधला. जर्मनी आणि आसपासच्या ज्यूंना पूर्वेकडे असलेल्या छळछावण्यांमध्ये धाडण्यात आले. तिथे त्यांना बळजबरीने मजुरी करण्यासाठी भाग पाडले जात होते. त्यानंतर तिथे त्यांची हत्या केली जायची.

१९४२ साली छळछावण्यांमध्ये फक्त ज्यूंची हत्या झाली असे नाही, ज्यूंसह देशातील इतर नको असलेल्या लोकांनाही मजूर शिबिरात नेऊन काम करायला भाग पाडले आणि त्यांची हत्या केली. जसे की, रोमा (जिप्सी), अपंग लोक आणि समलैंगिकांनाही छळछावण्यात ठार करण्यात आले. जर्मनी सरकारने ६० लाख ज्यूंचे छळछावण्यांमध्ये हत्याकांड घडवून आणले. ज्यूंसह जर्मनी आणि त्यांच्या अमलाखाली असलेल्या प्रदेशातून दोन ते पाच लाखांदरम्यान रोमा आणि सिंती लोकांचीही हत्या करण्यात आली.

हे ही वाचा >> विश्लेषण : जर्मनीमध्ये पुन्हा ‘हिटलरशाही’चा उदय? कशामुळे वाढली युरोपची चिंता?

१९४१ ते १९४५ या दरम्यान ज्यूंचा नरसंहार झाला; त्याला ज्यू लोक ‘शोह’ (Shoah) म्हणतात, हिब्रू भाषेत त्याचा उल्लेख Catastrophe (मोठी आपत्ती) असा केला जातो.

मजूर शिबिरातील छळ

नाझी छळछावण्यांमध्ये अनन्वित अत्याचार केले जात असत. १९३३ साली म्युनिकनजीक दकाऊ (Dachau) येथे पहिली छळछावणी उभारण्यात आली होती. त्यानंतर ऑश्वित्झ (Auschwitz-Birkenau), चेल्मनो (Chelmno), बेल्झेक (Belzec), सोबिबोर (Sobibor) आणि ट्रेब्लिंका (Treblinka) अशा पाच छळछावण्या आणखी उभारण्यात आल्या. या छळछावण्यांमध्ये गॅस चेम्बर निर्माण केले गेले, ज्यामध्ये अनेक ज्यू लोक मृत्यूच्या दाढेत ढकलले गेले.

पोलंड येथे असलेल्या ऑश्वित्झमधील छळछावण्यांमध्ये सर्वाधिक लोक मारले गेल्याचे सांगण्यात येते. ऑश्वित्झमध्ये जवळपास ४० बंदिगृहे (कुंपण लावलेली जागा, जिथे ज्यूंना बंदिस्त करून ठेवण्यात येत होते) आणि काही संहारगृहे होती. ऑश्वित्झच्या छळछावणीतून जे लोक बचावले, ते या जागेला पृथ्वीवरील नरक असे संबोधित करत असत. एका अभ्यासानुसार, नाझींनी या ठिकाणी १३ लाख कैदी आणल्याचे आणि त्यापैकी ११ लाख कैदी मारले गेल्याचे सांगण्यात आले. उपासमार, गॅस चेम्बर, विविध रोग आणि काही लोक मारहाण आणि अनन्वित छळातून मारले गेले. जे लोक मारले गेले, त्यात एक दशलक्षच्या आसपास ज्यू नागरिक होते, ७० हजार पॉलिश वंशाचे (पोलंड) नागरिक, २० हजार रोमा आणि १५ हजार सोव्हिएत युद्धकैदी असल्याचे सांगितले जाते.

छळछावण्यांमध्ये कैद्यांचा छळ करण्यात नाझींना अघोरी आनंद मिळत होता. या छावण्यांमध्ये विकृतपणाचा कळस गाठला गेल्याचे आम्ही पाहिले, अशी प्रतिक्रिया छावण्यांतून जिवंत वाचलेल्या लोकांनी दिली.

ऑश्वित्झच्या छळछावण्यांमध्ये कुणालाही नावाने ओळख नव्हती. येथे प्रत्येकाला नंबर दिला होता. नाझी अधिकारी ज्यूंना एका ओळीत उभे करून गोळी झाडत असत. ज्यू आणि इतर नको असलेल्या लोकांची लिंग, वय आणि प्रकृतीनुसार विभागणी करून त्यांना ट्रेनच्या डब्यात कोंबण्यात येत असे. जे लोक धडधाकट नाहीत, त्यांना गॅस चेम्बरमध्ये ढकलले जात असे. इतरांना बळजबरीने मजुरीसाठी जुंपण्यात येत असे. शारीरिकदृष्ट्या अतिशय अवघड आणि मेहनतीचे काम करायला लावूनही कैद्यांना पुरेसे अन्न दिले जात नसे, स्वच्छता तर दूरदूरवर नव्हती. त्यातही ज्यू मजूरांवर अधूनमधून अत्याचार केले जात असत. आधी श्रम करून घ्यायचे आणि शरीर थकल्यानंतर कैद्यांची हत्या करायची अशी एक रणनीती या छळछावण्यात पाहायला मिळत होती.

ज्यू किंवा इतरांना मारण्याआधी त्यांचा संशोधनासाठी वापर होऊ शकतो, याचीही जाणीव नाझींना झाली होती. यासाठी कैद्यांना मारण्याआधी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन करण्यात आले. नसबंदी करणे किंवा महिलांमधील अंडाशय काढून टाकणे यांसारखे प्रयोग मोठ्या प्रमाणात करण्यात आले.

ऑश्वित्झ छळछावण्यांतून बचावलेले प्रिमो लेव्ही यांनी १९४७ साली आपल्या अनुभवांना शब्दबद्ध केले. “आमच्याबरोबर जे झाले, त्यापेक्षा आणखी वाईट या जगात काहीच असू शकत नाही. यापेक्षा वाईट होण्याची आणखी काहीही कल्पना करता येणार नाही”, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. छळछावण्यांतील गॅस चेम्बरला जर आज भेट दिली, तर तिथल्या भिंतींवर नखांचे ओरखडे तुम्हाला दिसतील. जगण्यासाठी धडपडणाऱ्या हताश कैद्यांची हतबलता त्यातून दिसून येते.

आणखी वाचा >> विश्लेषण: स्वस्तिक: मांगल्य ते रक्तरंजित इतिहास व्हाया अ‍ॅडॉल्फ हिटलर

वंशसंहाराचा शेवट कसा झाला

१९४४ आणि १९४५ च्या दरम्यान दुसरे महायुद्ध संपण्याच्या वाटेवर होते. ब्रिटन, अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि मित्र राष्ट्रांनी नाझींच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागांमध्ये शिरकाव करून छळछावण्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. आपला पराभव होत आला आहे, याची जाणीव नाझींना झाली होती, त्यामुळे त्यांनी छळछावण्या स्वतःच उद्ध्वस्त करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. १९४४ साली मुक्त झालेली मजदानेक (Majdanek) ही पहिली छावणी होती. त्यानंतर २७ जानेवारी १९४५ साली सोव्हिएत सैन्यांनी ऑश्वित्झ छावणीलाही मुक्त केले.

जे लोक छळछावण्यांमधून वाचले त्यांचे दुर्दैव अद्याप संपलेले नव्हते. छावण्यांतून मुक्त झाल्यानंतर त्यांच्यासमोर जगण्याचा मोठा प्रश्न उभा होता. घर गमावलेले हजारो नागरिक आश्रितांचे जीवन जगत होते. या वंशसंहाराला (Holocaust) मानवजातीच्या इतिहासातील सर्वांत विकृत काळ समजण्यात येतो. द्वेष, वांशिक शुद्धता आणि श्रेष्ठतेच्या विचारसरणीने प्रेरित होऊन सदर वंशसंहार घडविण्यात आला.

Live Updates