अन्वय सावंत

‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ समूहाच्या ‘व्हायकॉम १८’ने पुढील पाच वर्षांसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या मायदेशातील सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क प्राप्त केले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीव्ही आणि डिजिटल या दोन्ही माध्यमांतील प्रसारण हक्कांसाठी वेगवेगळ्या ई-निविदा मागवल्या होत्या. या दोनही माध्यमांसाठी ‘व्हायकॉम १८’ने लावलेली बोली सरस ठरली. त्यामुळे ‘डिस्नी-स्टार’ आणि ‘सोनी’ यांना मागे टाकत ‘व्हायकॉम १८’ने भारतातील क्रिकेट प्रसारण हक्कांवर मक्तेदारी प्रस्थापित केली आहे.

proposals for adarsh nagar and bandra reclamation redevelopment project stuck
पुनर्विकासाचा प्रस्ताव लालफितीत; वांद्रे रेक्लेमेशन, आदर्श नगरच्या विकासाला मंजुरीची प्रतीक्षा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
mumbai 155 police inspectors transferred before assembly elections have returned
पोलीस निरीक्षक मुंबईत परतले, विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई बाहेर झाली होती बदली
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
Neelam Bhardwaj becomes youngest Indian woman Batter to hit List A double hundred
१३७ चेंडूत २०० धावा! भारताच्या लेकीने घडवला इतिहास; सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारी पहिली महिला फलंदाज
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
t Plus zero transaction system
आघाडीच्या ५०० कंपन्यांमध्ये ३१ डिसेंबरपासून ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणाली

भारताचे सामने कोणत्या वाहिनी आणि ॲपवर प्रसारित केले जाणार?

पुढील पाच वर्षांसाठी भारतीय संघाचे मायदेशातील सामने, तसेच देशांतर्गत क्रिकेट सामने ‘जिओ सिनेमा’ ॲप (डिजिटल) आणि ‘स्पोर्ट्स १८’ वाहिनी (टीव्ही) यावर प्रसारित करण्यात येतील. विश्वातील सर्वांत लोकप्रिय ट्वेन्टी-२० लीग असे बिरुद मिरवणाऱ्या ‘आयपीएल’चे डिजिटल माध्यमातील प्रसारण हक्क, तसेच या वर्षीपासून सुरू झालेल्या आणि अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या महिला प्रीमियर लीगचे (डब्ल्यूपीएल) डिजिटल व टीव्ही प्रसारण हक्कही ‘व्हायकॉम १८’कडेच आहेत. त्यामुळे भारतात क्रिकेट प्रसारण हक्कांच्या बाबतीत ‘व्हायकॉम १८’ सर्वच आघाड्यांवर अग्रेसर ठरत आहे. विशेषत: ‘जिओ सिनेमा’वर सामने मोफत पाहायला मिळत असल्याने चाहत्यांचा मोठा प्रतिसाद या ॲपला लाभत आहे.

प्रसारण हक्कांसाठी विजयी बोली किती रकमेची?

‘व्हायकॉम १८’ने पुढील पाच वर्षांसाठीचे डिजिटल प्रसारण हक्क मिळवण्यासाठी साधारण ३१०१ कोटी (सामन्यामागे ३५.२४ कोटी), तर टीव्ही प्रसारण हक्कांसाठी २८६२ कोटी (सामन्यामागे ३२.५२ कोटी) रुपये इतकी रक्कम मोजली आहे. दोन्ही माध्यमांतील प्रसारणाचे हक्क मिळून ‘व्हायकॉम १८’कडून ‘बीसीसीआय’ला साधारण ५९६३ कोटी रुपये देण्यात येतील. पुढील पाच वर्षांत भारतात एकूण ८८ आंतरराष्ट्रीय सामने होणार असून एका सामन्यामागे ‘बीसीसीआय’ला एकूण ६७.७६ कोटी रुपये इतकी रक्कम मिळणार आहे. ई-लिलावात टीव्ही (भारतीय उपखंड) माध्यमातील प्रसारण हक्कांसाठी सामन्यामागे २० कोटी, तर डिजिटल माध्यमासाठी सामन्यामागे २५ कोटी ही मूळ किंमत ठेवण्यात आली होती.

गेल्या करारापेक्षा यंदा रकमेत वाढ झाली का?

गेल्या करारात ‘बीसीसीआय’ला सामन्यामागे ६० कोटी रुपये मिळत होते. आता ही रक्कम ६७.७६ कोटी रुपये इतकी झाली आहे. सामन्यामागे मिळणारी रक्कम वाढली असली, तरी एकूण कराराच्या रकमेत घट झाली आहे. गेल्या पाच वर्षांसाठी प्रसारण हक्काच्या करारातून ‘डिस्नी-स्टार’कडून ‘बीसीसीआय’ला एकूण ६१३८ कोटी इतकी रक्कम मिळाली होती. आता मात्र एकूण करार साधारण ५९६३ कोटी रुपयांचा आहे. याचे कारण म्हणजे गेल्या पाच वर्षांत मायदेशात १०२ आंतरराष्ट्रीय सामने झाले होते, तर पुढील पाच वर्षांत ८८ आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत.

भारतीय संघाचे कोणत्या संघांविरुद्ध सामने होणार आहेत?

२२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपासून ‘बीसीसीआय’ आणि ‘व्हायकॉम १८’ यांच्यातील कराराला सुरुवात होईल, तर ३१ मार्च २०२८मध्ये हा करार संपुष्टात येईल. या कालावधीत भारतीय संघ मायदेशात २५ कसोटी, २७ एकदिवसीय आणि ३६ ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रारूपांत मिळून पुढील पाच वर्षांत भारताचे मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध २१ सामने, तर इंग्लंडविरुद्ध १८ सामने होणार आहेत. तसेच भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध ११, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध प्रत्येकी १०, अफगाणिस्तानविरुद्ध सात, श्रीलंकेविरुद्ध सहा आणि बांगलादेशविरुद्ध पाच सामने खेळेल.

अन्य महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धा कोणत्या वाहिनीकडे?

भारताच्या मायदेशातील क्रिकेट सामन्यांचे, तसेच ‘डब्ल्यूपीएल’चे टीव्ही आणि डिजिटल, ‘आयपीएल’चे डिजिटल प्रसारण हक्क ‘व्हायकॉम १८’कडे आहेत. यापूर्वी ‘डिस्नी-स्टार’ भारतात क्रिकेट प्रसारणात आघाडीवर होते. आता त्यांच्याकडे ‘आयपीएल’चे टीव्ही हक्क, तसेच सध्या सुरू असलेली आशिया चषक स्पर्धा आणि आगामी एकदिवसीय विश्वचषकाच्या प्रसारणाचे हक्क आहेत. त्यांनी ‘डिस्नी हॉटस्टार’ ॲपवर या दोन्ही स्पर्धा मोफत दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

‘आयपीएल’ आणि ‘डब्ल्यूपीएल’ प्रसारण हक्क मिळवण्यासाठी ‘व्हायकॉम १८’ने किती रक्कम मोजली होती?

या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या ई-लिलावातून ‘आयपीएल’च्या २०२३ ते २०२७ या पाच हंगामांसाठीचे प्रसारण हक्क प्राप्त करण्यासाठी चार विभागांमध्ये मिळून ४८ हजार कोटींहून अधिकची बोली लागली होती. यापैकी भारतीय उपखंडासाठी डिजिटल माध्यमांचे हक्क, तसेच ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड संयुक्तरीत्या, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेसाठी टीव्ही आणि डिजिटल या दोन्ही माध्यमांचे प्रसारण हक्क मिळवण्यासाठी ‘व्हायकॉम १८’ने तब्बल २३,७५८ कोटी रुपये इतकी रक्कम मोजली होती. त्यानंतर त्यांनी ‘डब्ल्यूपीएल’चे प्रसारण हक्क ९५१ कोटी रुपयांत मिळवले होते. यासह ‘व्हायकॉम १८’ने भारतातील क्रिकेट प्रसारणात आपले पाय घट्ट रोवले.

Story img Loader