-संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काँग्रेसने दुसरा उमेदवार मागे घेण्यास नकार दिल्याने विधान परिषदेची निवडणूक (Vidhan Parishad election 2022) बिनविरोध करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. परिणामी अवघ्या दहा दिवसांत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा चुरशीची लढत होणार आहे. दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने ‘अकरावा’ म्हणजेच पराभूत कोण होणार याचीच आता उत्सुकता असेल.

विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात पण राज्यसभेप्रमाणेच एक अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवून भाजपने निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. पाचही जागा निवडून येतील, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यसभेच्या पराभवानंतर महाविकास आघाडीत तेवढा समन्वयही राहिलेला नाही. यामुळेच राज्यसभेप्रमाणे भाजप एक जागा अतिरिक्त जिंकण्याची पुनरावृत्ती विधान परिषदेत करणार का, याकडे लक्ष लागले आहे.

राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत फरक काय आहे?

राज्यसभेसाठी राजकीय पक्षांच्या आमदारांना पक्षाने नेमलेल्या प्रतिनिधीला मतपत्रिका दाखवून मतदान करावे लागते. पक्षादेशाचा भंग केल्यास आमदारावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. अपक्ष आमदारांना मतपत्रिका कोणालाही दाखविता येत नाही. विधान परिषदेसाठी मात्र गुप्त मतदान पद्धतीने मतदान होते. राजकीय पक्ष तसेच अपक्ष आमदारांना गुुप्तपणे मतदान करावे लागते. राज्यसभेत राजकीय पक्षांची मते फुटण्याची शक्यता कमी असते. (राजस्थानात भाजपच्या एका महिला आमदाराचे मत तरीही फुटलेच). विधान परिषदेत गुुप्त मतदान असल्याने राजकीय पक्षांची मते फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विधान परिषद निवडणुकीत यंदा उमेदवार कोण?

यंदा खालील उमेदवार रिंगणात आहेत :

सभापती  रामराजे नाईक निंबाळकर (राष्ट्रवादी)

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (भाजप)

एकनाथ खडसे ( राष्ट्रवादी)

श्रीकांत भारतीय (भाजप)

उमा खापरे (भाजप)

राम शिंदे (भाजप)

प्रसाद लाड (भाजप)

सचिन अहिर (शिवसेना)

आमशा पाडवी (शिवसेना)

चंद्रकांत हंडोरे (काँग्रेस)

भाई जगताप (काँग्रेस) 

भाजप पुरस्कृत रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली.

विधान परिषद निवडणुकीत राज्यात धक्कादायक निकालाची परंपरा आहे का?

२००८ आणि २०१० मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट होऊन धक्कादायक निकाल लागले होते. २००८मध्ये काँग्रेसकडे पुरेशी मते असतानाही पक्षाचे उमेदवार सुधाकर गणगणे यांचा पराभ‌व झाला होता. गणगणे यांचा पराभव हा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मोठा धक्का होता. २०१०मध्ये ८३ आमदार असलेल्या काँग्रेसचे तीन उमेदवार निवडून येऊ शकत होते. पण तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी धोका पत्करून चौथा उमेदवार उभा केला होता. विजयासाठी तेव्हा २६१९ पहिल्या पसंतीच्या मतांची आवश्यकता होती. काँग्रेसचे चौथे उमेदवार विजय सावंत यांना पहिल्या पसंतीची अवघी १३०० मते मिळाली होती. काँगेसचे तीन व राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांच्या दुसऱ्या पसंतीच्या आधारे पुरेश मते नसतानाही काँग्रेसचा चौथा उमेदवार निवडून आला होता. त्या निवडणुकीत विद्यमान परिवहन व संसदीय कार्यमंत्री अनिल परब आणि भाजपच्या शोभाताई फडणवीस यांच्यात चुरशीची लढत झाली होती. शेवटी २४१५ मते मिळविणारे अनिल परब विजयी झाले तर २२९१ मि‌ळालेल्या भाजपच्या शोभाताई फडणवीस या पराभूत झाल्या होत्या. अपक्ष, मनसे व छोट्या पक्षांच्या पाठिंब्यावरच अशोक चव्हाण यांनी  अवघी पाच मते अतिरिक्त असताना चौथी जागा निवडून आणली होती.

यंदाही धक्कादायक निकालाची परंपरा कायम राहील का?

राज्यसभेत पुरेशी मते नसतानाही भाजपने तीन जागा जिंकल्या. भाजपचे १०६ आमदार आहेत. काही अपक्ष आमदार भाजपबरोबर आहेत. भाजपच्या तीन उमेदवारांना पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली. यावरून भाजपने दहा अपक्ष किंवा छोट्या पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा संपादन केला होता. राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीत अनिल देशमुख व नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार मिळाला नाही तर २८५ मतदार असतील. त्या आधारे २५.९१ मतांचा कोटा असेल. ५५ आमदार असलेल्या शिवसेनेचे दोन, ५३ आमदार असलेल्या राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. १०६ आमदार असलेल्या भाजपचे चार उमेदवार सहजपणे निवडून येतील. ४४ आमदार असलेल्या काँग्रेसला दुसरी जागा निवडून आणण्याकरिता ११ मतांची आवश्यकता भासेल. भाजपचा पाचवा उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेसचा दुसरा उमेदवार भाई जगताप यांच्यात लढत होईल असे चित्र आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे हे भाजपचे मुख्य लक्ष्य असेल. या साऱ्या गोंधळात कोण पडेल याचा अंदाज आताच वर्तविता येणार नाही. राज्यसभेत भाजपला १२३ आमदारांचे पाठबळ मिळाले. पाचव्या जागेसाठी भाजपला १२८ ते १३० मते लागतील. हे आव्हान भाजपला पार पाडावे लागणार आहे. दुसरीकडे, राज्यसभेतील पराभवामुळे महाविकास आघाडीचे नेते अधिक सावध झाले आहेत. त्यामुळे अकरावा कोण ठरणार किंवा पराभूत कोण होणार याविषयी उत्सुकता आहे.