Vijayadashami 2024 Gold in ancient India दसरा असो किंवा इतर कुठलाही महत्त्वाचा भारतीय सण, त्या दिवशी भारतात आवर्जून सोन्याची खरेदी केली जाते. पिवळ्या चमकदार सोन्याची भुरळ भारतीयांना प्राचीन काळापासूनच आहे, ती आजतागायत अबाधित आहे. भारतात स्त्री-पुरुष दोघेही सोन्याच्या दागिन्यांचे चाहते आहेत. आज साजऱ्या होणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने सोन्याचा इतिहास समजून घेणे महत्त्वाचे ठरावे.

प्राचीन भारतातील सोन्याचा वापर (Ancient India Gold)

एकूणच सोनं आणि त्यापासून तयार करण्यात आलेले दागिने आणि इतर वस्तू हा भारतीयांचा आवडीचा विषय होता. प्राचीन भारतात सोन्याचा वापर हा केवळ दागिन्यांपुरताच मर्यादित नव्हता तर राजे-रजवाडे यांकडे सोन्याच्या भांड्याकुंड्यांपासून ते इतर सजावटीच्या वस्तूंसाठीही सोन्याचा वापर होत असे. प्राचीन भारतात रोजच्या वापरातील नाणी ही देखील सोन्याची होती, त्यावरूनच त्या राज्याची, प्रांताची आर्थिक सुबत्ता लक्षात येत असे. प्राचीन भारतात सोनारांना- सोन्याच्या वस्तू घडवणाऱ्या कारागिरांना राजाश्रय असे. याच कारणामुळे भारतावर अनेकदा या सोन्याच्या शोधात आक्रमण झाल्याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत.

monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Gold and silver ornaments worth 15 lakhs on idol of goddess were robbed
देवीच्या मूर्तीवरील १५ लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास
Loksatta kutuhal How minerals got their names
कुतूहल: खनिजांना नावे कशी मिळाली?
Technology and Urbanization Human Progress
तंत्रकारण: तंत्रज्ञान आणि नागरीकरण
Seven lakh farmers deprived of loan waiver
सात लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित
Threat to bar owner Chikhli , Chikhli bar Loot ,
बुलढाणा : रात्रीची वेळ; बार मालकाच्या गळ्याला चाकू लावला अन…
rajesh rokde
राजेश रोकडे ‘जीजेसी’चे अध्यक्ष, उपाध्यक्षपदी अविनाश गुप्ता

आणखी वाचा: चीन आणि तालिबान यांच्या मधुर संबंधांमागे आहे तरी काय? चीनची नजर अफगाणिस्तानवर कशासाठी? 

भारतातील सोन्याच्या वापराचे प्राचीन पुरावे कुठे सापडतात? (Evidence of ancient gold)

भारतीय संस्कृती आणि सोने यांचा ऋणानुबंध अतूट आहे. भारतात सोन्याच्या वापराचे प्राचीन दाखले सिंधू संस्कृतीच्या काळातील आहेत. गेल्या काही दशकांमध्ये, हडप्पा आणि मोहेंजोदारो येथील उत्खननात सोन्यापासून बनवलेल्या वस्तूंचा खजिना सापडला आहे. यात प्रामुख्याने दागिन्यांचा समावेश होतो. यावरूनच भारतीय हे प्राचीन काळापासून सोन्याचा वापर मोठ्या प्रमाणात करत होते हे सिद्ध होते.

रोम ते चीन (Rome to China)

पृथ्वीच्या गर्भातून सोन्याचा जन्म झाला. या चकाकणाऱ्या धातूने अनेक युद्धांना जन्म दिला, अनेक आक्रमणकर्त्यांना आकर्षित केले. यामुळे अनेक संस्कृतींचा उदय आणि पतनही झाले. प्राचीन इजिप्त ते रोमन अगदी चीन पर्यंत, सर्वच संस्कृतींमध्ये सोनं अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. परंतु भारतीय संस्कृतीत त्याला प्राप्त झालेले महत्त्व काही निराळेच आहे.

भारतात सोन्याला का महत्त्व प्राप्त झाले? (Value of Gold in India)

एकूणच भारताच्या इतिहासात अगदी आदिम काळापासून सोन्याचा वापर होत होता याचे पुरातत्त्वीय पुरावे सापडतात. भारतातील काही नवाश्मयुगीन पुरातत्त्वीय स्थळांवर सोन्याच्या वापराचे पुरावे सापडलेले आहेत. त्यामुळे फार आधीपासूनच भारतीयांना सोन्याची ओळख असल्याचे सिद्ध होते. असे असले तरी सोन्याच्या इतिहासात भारताचा रोम बरोबर असलेला संबंध मोलाचा ठरतो. प्राचीन इंडो-रोमन व्यापारात भारताचे वर्चस्व होते, त्यामुळेच रोमकडून भारताकडे येणारी सुबत्ता ही सोन्याच्या रूपात होती. रोममध्ये भारतीय उत्पादनांना विशेष मागणी होती. प्लिनी द एल्डर, या रोमन लेखक आणि तत्त्ववेत्त्याने, भारतीय चैनीच्या उत्पादनांच्या रोमन व्यसनाविषयी आपल्या दस्तऐवजांमध्ये सविस्तर नमूद केलेले आहे. प्लिनी भारताबरोबर होणाऱ्या व्यापाराविषयी खेद व्यक्त करतो. त्याच्यानुसार भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंच्या तुलनेत रोमकडून भारताकडे जाणारे सोने अधिक होते.

आणखी वाचा: इस्रायल-हमास युद्ध: आजच्या जगण्यासाठी बॉम्ब शेल्टर्स का महत्त्वाचे ठरत आहेत?

तामिळ साहित्यात प्राचीन उल्लेख (Gold in Tamil litt.)

प्राचीन तामिळ साहित्यात म्हणजेच संगम काव्यातही या व्यापाराचा उल्लेख सापडतो, या उल्लेखानुसार, “यवनांची सुंदर बांधलेली जहाजे सोने घेऊन आली आणि मिरी घेऊन परतली. साहजिकच हा उल्लेख केरळच्या मुझिरीस या बंदराचा आहे. इंडो रोमन व्यापारात दक्षिण-पश्चिम भारतातील बार्बारिकम , भरूच (गुजरात), मुझिरिस आणि अरिकामेडू ही बंदरे व्यापाराची मुख्य केंद्रे म्हणून वापरली जात होती, जिथे रोमन सोन्याची रेलचेल असल्याचे पुरावे पुरातत्त्वीय उत्खननातून समोर आले आहेत. म्हणूनच भारतीय संस्कृतीत सोन्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याच्या बाबतीत चीनने भारताला मागे टाकले तरी ऐतिहासिकदृष्ट्या, भारत हा सोन्याचा आतापर्यंतचा सर्वात मोठा ग्राहक ठरलेला आहे.

सोन्याचे दार्शनिक पुरावे (Gold in politics)

भारताला हजारो वर्षांचा इतिहास आहे. या भूमीत अनेक राजवंश जन्माला आले आणि नष्टही झाले. या प्रत्येक वंशानी आपापल्या कारकिर्दीत नाणी पाडली. कुषाणांच्या काळात भारतातील सर्वाधिक जुनी सोन्याची नाणी पाडल्याचे अभ्यासक सांगतात. कुषाणांचे साम्राज्य उत्तर भारत (सध्याचे उत्तर प्रदेश) ते अफगाणिस्तानपर्यंत पसरलेले होते. याशिवाय गुप्त राजवंशाचा कालखंड भारताच्या इतिहासातील सुवर्ण युग मानले जाते. या कालखंडात गुप्त राजांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची नाणी पाडली होती.

देवत्वाचे प्रतीक (Gold and God)

सोनं हा एकमात्र गंज-प्रतिरोधक धातू आहे. ही गुणवत्ता सोन्याला कालातीत बनवते. सोन हे शुद्धतेशी संबंधित आहे. भारत ही अध्यात्मिक आणि समृद्ध धार्मिक परंपरांची भूमी आहे, सर्वात शुद्ध असलेले जे जे आहे ते नेहमीच देवासाठी राखीव असते. ऐतिहासिकदृष्ट्या, भारतातील मंदिरे धार्मिक आणि सांस्कृतिक क्रियाकलापांची केंद्रे आहेत. देवतांची आणि लोकांची मर्जी जिंकण्यासाठी राज्यकर्त्यांद्वारे याचा प्रचार केला गेला. त्यांच्या पाठिंब्याने सोन्याने मोठ्या देणग्यांचे रूप धारण केले. ज्याने देवतांच्या दागिन्यांमध्ये तसेच स्वतः मंदिरे सुशोभित करण्याचा मार्ग शोधला. एका सर्वेक्षणानुसार भारतीय मंदिरांमधील सोन्याचा साठा अंदाजे २,०००० टन इतका आहे.

सांस्कृतिक परंपरा (Cultural value of Gold)

सांस्कृतिकदृष्ट्या, सोने भारतीय परंपरांच्या अगदी नसानसात भिनलेले आहे. विवाह, देवधर्माचे कार्य सोन्याशिवाय पूर्ण होवू शकत नाही. जन्मापासूनच, सोन्याची भेट नवजात मुलासाठी शुभ चिन्ह मानली जाते. मनुष्याच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर जन्मापासून ते विवाहापर्यंत सोन्याची भेट ही सर्वात मौल्यवान, आणि लाक्षणिक समजली जाते. सोनं हे पवित्रता आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.

Story img Loader