IIT Mumbai Graduate Working As A Driver: IIT या देशातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थेत निवड होणे आणि त्यानंतर सर्वोत्तम शिक्षणानंतर घडणारे करिअर ही कुणासाठीही निश्चितच अभिमानास्पद बाब असते. त्यामुळेच तांत्रिक आणि अभियांत्रिकी विषयांमध्ये करिअर घडवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचे IIT हे स्वप्न असते. IIT प्रवेशासाठी घेतली जाणारी JEE (Joint Entrance Examination) ही जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. या प्रक्रियेतून निवडले गेलेले विद्यार्थी अतिशय़ हुशार असतात. Paytm, Flipkart, Ola यासारख्या कंपन्यांचे संस्थापक IIT चेच विद्यार्थी होते. तर Google, Microsoft, NASA आणि इतर मोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदांवर IIT उत्तीर्ण तंत्रज्ञच कार्यरत आहेत. एकुणातच आंतराराष्ट्रीय कंपन्यांमध्ये होणाऱ्या प्लेसमेंट्ससाठी आयआयटी प्रसिद्ध आहेत. असे असताना कॉमेडियन आणि अभिनेता वीर दासने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे अनेकांच्या माथ्यावर चिंतेची रेघ उमटली आहे. त्याच विषयी घेतलेला हा सविस्तर आढावा.

अधिक वाचा: एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यांगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला? 

PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Sunetra Pawar Speaker List of Rajyasabha
खासदार सुनेत्रा पवार यांच्यावर राज्यसभेत महत्त्वाची जबाबदारी; पहिल्याच टर्ममध्ये ‘या’ पदावर निवड!
What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : राहुल गांधींचं वक्तव्य, “मेक इन इंडिया चांगली योजना, पंतप्रधानांनी प्रयत्नही केले पण…”
anjay Raut on Varsha Bungalow Devendra Fadnavi
“वर्षा बंगला पाडून नवा बंगला बांधण्याचा घाट”, संजय राऊतांचा दावा; म्हणाले, “फडणवीसांना नेमकी कशाची भिती?”
Prithviraj Patil asserted that protection of democracy and freedom is a salute to Gandhiji
लोकशाही रक्षण हेच गांधीजींना अभिवादन- पृथ्वीराज पाटील
Us president donald trump immigration orders impact on Indian
आपण सारेच ‘भय्ये’?
Mumbai Cop’s Soulful Flute Cover On Ae Watan
‘ऐ वतन – वतन मेरे आबाद रहे तू’…. मुंबई पोलिसाने सादर केले बासरी वादन; Viral Videoने जिंकले भारतीयांचे मन

वीर दास यांची भावनिक पोस्ट

कॉमेडियन वीर दासने एका पोस्टमध्ये अमेरिकेत भेटलेल्या भारतीय शास्त्रज्ञाचा उल्लेख केला आहे. जो सध्या ड्राइव्हर अर्थात चालक म्हणून काम करतोय. इंस्टाग्रामवर पोस्ट करताना, दास यांनी ही भावनिक आठवण शेअर केली. दास यांनी सांगितले की, सॅन जोसे विमानतळावर ते एका ब्लॅक-लेन चालकाच्या गाडीत बसले, तो चालक गाडी चालवताना थोडासा अस्वस्थ दिसत होता. त्याच्या अस्वस्थतेची जाणीव झाल्यावर, दास यांनी हिंदीत संवाद सुरू केला. मायभूमीशी नाळ जोडणारा हा संवाद लवकरच सखोल आणि हृदयस्पर्शी संभाषणात परिवर्तित झाला.

पोस्ट मध्ये नेमकं काय म्हटलं आहे?

“सॅन जोसेच्या बॅगेज क्लेमवरून मला ब्लॅक लेनचा ड्रायव्हर घेऊन गेला. तो चांगला माणूस होता, पण फारसा चांगला चालक नव्हता. त्याच्या गाडी चालवण्यात एका प्रकारची अस्वस्थता स्पष्ट जाणवत होती किंवा कदाचित नव्या वाहनामुळे असेल ते. तो भारतीय होता,” वीर दास यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितले. पुढे त्यांनी लिहिले आहे, “आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली. मला परदेशात भेटणाऱ्या भारतीयांशी हिंदीत बोलायला आवडते. ही जणू दोघांसाठी घरची आठवण दूर करण्यासाठी एक छोटीशी औषधोपचार पद्धत होती.”

आयआयटीचा पदवीधर व डॉक्टरेटही

गप्पांच्या दरम्यान, त्या चालकाने खुलासा केला की, तो आयआयटी मुंबईचा पदवीधर आहे आणि त्याने पीएचडी केलेली आहे. तो पूर्वी शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होता. मात्र, वर्षभरापूर्वी त्याची नोकरी गेली, आणि सध्या अमेरिकेत उदरनिर्वाहासाठी चालक म्हणून काम करत आहे. त्यानंतर आम्ही अमेरिकेबद्दल बोललो. मी म्हणालो, इथे खूप मेहनत करावी लागते, त्यावर तो हसला आणि त्याने मान डोलावली… आणि म्हणाला पण तसल्ली नाही म्हणजेच आपण कधीच पूर्णपणे निश्चिंत होऊ शकत नाही. मला ते ऐकून वाईट वाटलं, वीर दास म्हणाले.

भारतातील घरवापसीला कारुण्याची झालर

दास हे ऐकून थक्क झाले की, त्यांचा चालक केवळ पीएचडी धारक आणि आयआयटी मुंबईचा माजी विद्यार्थीच नाही, तर एकेकाळी शास्त्रज्ञ होता. मात्र, एका वर्षापूर्वी त्याची नोकरी गेली होती. “हेच त्याच्या गाडी चालवण्याचं कारण आहे. तो आपल्या कुटुंबासाठी हे करतो. मी त्याला विचारलं, ‘कधी भारतात परत जाण्याचा विचार करता का?’ तो हसून म्हणतो, ‘दररोज.’ त्या हास्याला एका प्रकारच्या कारुण्याची झालर होती, जणू त्याला माहीत आहे की, हा विचार कधीही प्रत्यक्षात येणार नाही,” दास यांनी सांगितले.

पीएचडीधारक टॅक्सीचालक

दास यांनी अनुमान केले की, तो कदाचित गृहकर्ज, विमा भरणे आणि मुलांच्या शिक्षणामध्ये अडकलेला असावा, ज्यामुळे त्याला उपजीविकेसाठी टॅक्सी चालवावी लागत आहे. त्यांच्या प्रवासाच्या शेवटी, दास यांनी त्याला शुभेच्छा देत त्याचा हात हाती घेतला आणि म्हणाले, “सगळ्या गोष्टींसाठी शुभेच्छा.” आपल्या पोस्टमध्ये दास यांनी लिहिलं की, “मला आशा आहे की तुम्हाला तुमच्या अफाट बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग करण्याची संधी लवकरच मिळेल. मी जाणतो की, आपण जे करत आहोत त्याहून अधिक असल्याची भावना किती वेदनादायक असते आणि मला आशा आहे की तुम्हाला लवकरच थोडा दिलासा मिळेल. तसल्ली.”

कमेंट्सचा पूर

ही हृदयस्पर्शी पोस्ट अशा अनेक स्थलांतरितांच्या बलिदान आणि संघर्षांवर प्रकाश टाकणारी आहे, जे मोठ्या स्वप्नांसह आपल्या मातृभूमीपासून दूर जातात आणि चांगल्या आयुष्याच्या शोधात कठोर वास्तवांचा सामना करतात. यानंतर मात्र नेटकऱ्यांकडून वीर दास यांच्या पोस्टवर कमेंट्सचा पूर आणला आहे.

भारतीय नोकऱ्या का गमावत आहेत?

भारतीय विविध कारणांमुळे अमेरिकेत नोकऱ्या गमावत आहेत. त्यापैकी आर्थिक मंदी आणि उद्योगातील नोकरकपात हे एक महत्त्वाचे कारण आहे.

आर्थिक मंदी आणि उद्योगातील नोकरकपात

आर्थिक मंदीत ग्राहक खर्च कमी होतो, व्यवसायांचे उत्पन्न घटते, आणि बेरोजगारी वाढते. अशा परिस्थितीत, कंपन्या खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कपात करतात. भारतीय व्यावसायिकांवर त्याचा परिणाम पुढील कारणांमुळे जास्त प्रमाणावर होतो:
१. मंदीमुळे कंपन्या नवीन प्रकल्प आणि विस्तार योजनांवर खर्च करणे थांबवतात, ज्यामुळे विशेषतः तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकऱ्यांवर परिणाम होतो.
२. भारतीय व्यावसायिक बहुतांश H-1B व्हिसावर काम करतात, नियुक्ती करणाऱ्या कंपनीवर ते सर्वस्वी अवलंबून असतात. नोकरी गेल्यास व्हिसाशी संबंधित कडक अटींमुळे नव्या नोकरीसाठी कमी वेळ मिळतो.
३. आयटी, तंत्रज्ञान, आणि उत्पादन क्षेत्रे आर्थिक मंदीमुळे सर्वाधिक प्रभावित होतात, जिथे भारतीय व्यावसायिकांची संख्या मोठी आहे.
४.अनेक कंपन्या कमी खर्चासाठी भारतात किंवा इतर देशांमध्ये काम आऊटसोर्स करतात, ज्याचा परिणाम अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांवर होतो.

अधिक वाचा: Sandy Irvine remains found:एव्हरेस्ट १९२४ सालीच सर झाला होता का? अर्विनचे सापडलेले अवशेष नेमकं काय सांगतात? 

भारतीय व्यावसायिकांसमोर असणारी आव्हाने

यानिमित्ताने एकूणच अमेरिकेतली किंवा विदेशात असणाऱ्या भारतीय व्यावसायिकांसमोर असणाऱ्या आव्हानांवरही नेटकऱ्यांनी चर्चा केली आहे. ती याप्रमाणे-

१) कौशल्य अद्ययावत ठेवण्याची गरज: तंत्रज्ञान आणि बाजारपेठेतील झपाट्याने बदलणाऱ्या मागण्यांशी जुळवून घेण्यासाठी कौशल्ये अद्ययावत ठेवावी लागतात. ती भारतीयांनी करायला हवीत.
२) कर्ज आणि खर्चाचा ताण: गृहकर्ज, विमा, आणि कुटुंबाचा खर्च यामुळे आर्थिक दबाव वाढतो.
३) नोकरीच्या संधींचा अभाव: मंदीमुळे स्थानिक नागरिकांना प्राधान्य देणाऱ्या धोरणांमुळे परदेशी कामगारांना कमी संधी मिळतात.
४) आर्थिक मंदी आणि नोकरकपात ही जागतिक अर्थव्यवस्थेतील अपरिहार्य प्रक्रिया आहे, परंतु भारतीय व्यावसायिकांसाठी ती अधिक आव्हानात्मक ठरते.

वीर दास यांनी केलेल्या पोस्टच्या निमित्ताने विदेशस्थ भारतीयांसाठी सारे काही ‘खूप छान’ या समजाला तडा गेलेला दिसतो आहे.

Story img Loader