Viral Black Cat-Golden Retriever Dating Theory: ती अनाकलनीय आणि थोडीशी स्टँडऑफिश आहे. तो मस्तीखोर, आउटगोइंग आणि सोशल आहे. साहजिकच, हे वर्णन काळी मांजर आणि गोल्डन रिट्रिव्हर यांच्या संबंधी आहे, गेल्या काही महिन्यांपासून हे दोन्ही प्राणी टिकटॉकवर ट्रेण्ड होत आहेत. परंतु, त्यांचं ट्रेण्ड होणं हे मानवी संबंधांचं निदर्शक आहे. नातेसंबंधातील एक जोडीदार बहुतेक वेळा एकलकोंडा, अलिप्त आणि अंतर्मुख असतो, काळ्या मांजरीसारखा. तर दुसरा जोडीदार बहिर्मुखी, लोकांत मिसळणारा आणि उत्साही असतो- गोल्डन रिट्रीव्हर सारखा हा या ट्रेण्डचा मूळ सारांश आहे.

या नव्या सोशल मीडिया ट्रेण्डच्या केंद्रस्थानी काय आहे?

‘ब्लॅक कॅट गर्लफ्रेंड’ थिअरी ही संकल्पना टिकटॉकवर एका विशिष्ट प्रकारच्या मैत्रिणीचे (किंवा जोडीदाराचे) वर्णन करण्याचा एक पर्यायी मार्ग म्हणून निर्माण झाली. या संकल्पनेत काळ्या मांजरीशी संबंधित वैशिष्ट्यांची तुलना मानवी व्यक्तिमत्त्वाशी केली आहे. ती स्वतंत्र, अनाकलनीय, थोडीशी अलिप्त आणि कदाचित काही प्रमाणात घाबरवणारी आहे, जशी काळी मांजर असते. परंतु, एकदा का तुम्ही तिचा विश्वास संपादन केला की, ती एकनिष्ठ, संरक्षण करणारी आणि प्रेमळ असते, जसे की काळी मांजर तिने निवडलेल्या व्यक्तीसोबतच राहते. यातूनच तुमचा जोडीदार कसा आहे हे मांजर आणि कुत्रा यांच्या प्रतिकातून सांगण्याचा ट्रेण्ड व्हायरल होत आहे.

Maharashtra assembly election 2024 BJP releases third list of 25 candidates
BJP 3rd Candidate List: भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; ३ विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
samosa caucus
समोसा कॉकस म्हणजे काय? अमेरिकेच्या निवडणुकीत का चर्चेत?
Vasu Baras 2024
Vasu Baras 2024:धेनुगळ म्हणजे काय?
devendra fadnavis marathi news (1)
“आता तर अशीही चर्चा होईल की मी डोनाल्ड ट्रम्प यांना भेटलो आणि…”, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
taliban rules against afghan women
अफगाणिस्तानातील महिलांना एकमेकींचा आवाज ऐकण्यावर बंदी, कुराण पठणासही मनाई; तालिबानच्या नव्या फतव्यात काय?
nawab malik son in law sameer khan passed away
नवाब मलिक यांच्या जावयाचे निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता गंभीर अपघात, निवडणूक काळात कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

ब्लॅक कॅट गर्लफ्रेंड म्हणजे काय? What is a ‘black cat’ girlfriend?

काळी मांजर म्हटलं की, आपल्या डोक्यात शकुन- अपशकुनाच्या गोष्टी डोक्यात येतात. काळाच्या ओघात या कल्पना मागे पडत असल्या तरी काळ्या मांजरीच्या बाबतीत अनेकांच्या मनात थोडी साशंकता असतेच. इतर मांजरींप्रमाणे, काळ्या मांजरी काहीवेळा मितभाषी, अंतर्मुखी, सलगी करण्यास अनिच्छुक आणि कधीकधी गूढ असू शकतात. त्यामुळे अशा प्रकारचे काही स्वभाव गुण एखाद्या व्यक्तीत आढळले की, त्याची तुलना काळ्या मांजरीशी करण्यात येते.

अधिक वाचा: ‘तो येईल आणि मला वाचवेल’ हे सांगणारा ‘Cinderella Complex’ म्हणजे नक्की काय?

गोल्डन रिट्रिव्हरच्या विरुद्ध काळी मांजर ही घाबरवणारी किंवा अशा व्यक्तीचे प्रतिनिधित्व करते जी सामान्यतः खूप स्वत:मध्येच रमणारी आणि कदाचित लाजाळूही असते, असे कॅथरीन स्मरलिंग यांनी (फॅमिली थेरपिस्ट) टुडे डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. “अशा व्यक्तीला एकट्याने वेळ घालवणे आवडते परंतु ती खूप निष्ठावान, अतिशय प्रेमळ आणि दयाळू असते आणि ती इतरांचं म्हणणं ऐकून घेते,” असं स्मरलिंग सांगतात. काळ्या मांजरीसारखा स्वभाव असणारी व्यक्ती खूप सोशल असू शकते, परंतु, ‘पार्टी पर्सन’ असेलच असं नाही असही त्या म्हणाल्या.

काळ्या मांजरीच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये

रिलेशनशिप थेरपिस्ट आणि “MANifesting” या पुस्तकाच्या लेखिका Jaime Bronstein सांगतात की, काळी मांजर म्हणजे अशी व्यक्ती जी इतरांच्या मागे जात नाही. अशा व्यक्तीला तिची किंमत माहीत असते. तिला कोणत्याही मुलाच्या मागे जाण्याची आवश्यकता नसते. ती त्या माणसाला तिच्या मागे येऊ देते, आणि म्हणूनच काळी मांजर होण्याचे श्रेय बहुतेकदा स्त्रियांना दिले जाते. काळ्या-मांजरीच्या व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांमध्ये स्वातंत्र्याची इच्छा, सावध स्वभाव, गूढता, एकट्याने वेळ घालवणे , विचारशील, निष्ठावंत इत्यादींचा समावेश होतो. गूढता ही नेहमीच रोमांचक असते. परंतु नात्यात भावनिक सहभाग महत्त्वाचा असतो, त्यामुळे या स्वभावामुळे समोरच्या व्यक्तीत नाराजी वाढण्याचा धोकाही असतो असे न्यूयॉर्क शहरातील ट्रिबेका थेरपीचे मानसोपचारतज्ज्ञ मॅट लुंडक्विस्ट म्हणतात.

“काळ्या मांजरी”/Black Cats आणि “गोल्डन रिट्रीव्हर्स”/Golden Retrievers मधील भागीदारी समजून घेणे गरजेचे आहे.

काळ्या मांजराच्या एकलकोंड्या स्वभावाच्या तुलनेत, गोल्डन रिट्रीव्हर अधिक बहिर्मुख, लोकांत चटकन मिसळणारा, आणि नवीन गोष्टी करण्यास न घाबरणारा असतो. “जर एक व्यक्ती खूपच बहिर्मुख असेल आणि दुसरी नाही, तर बहुतेक वेळा हे नातं खूप चांगलं जुळून येतं. परंतु जर दोन व्यक्तीं स्पर्धात्मक किंवा एकाच प्रकारच्या असतील तर ते नातं जुळून येत नाही असे ब्रॉन्स्टीन म्हणतात. त्याऐवजी, त्या सांगतात की, एक गोल्डन रिट्रिव्हर आणि काळी मांजर यांच एकत्र चांगलं जुळू शकतं कारण रिट्रिव्हर, म्हणजेच बहिर्मुख व्यक्ती, अधिक अंतर्मुख असणाऱ्या काळ्या मांजरीला त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काहीतरी करण्यास प्रोत्साहित करते. त्याचवेळी, काळी मांजर गोल्डन रिट्रीव्हरला नियंत्रणात राहण्यास मदत करते. “ज्या व्यक्तीला आपण काळी मांजर म्हणू शकतो, ती अधिक अंतर्मुख असते, ती व्यक्ती गोल्डन रिट्रीव्हरसारख्या व्यक्तीबरोबर जोडली गेल्यावर अधिक आनंदी होऊ शकते,” असे स्मर्लिंग म्हणतात.

अधिक वाचा: Bigg Boss 18: भारतात गाढव पाळणे हा गुन्हा आहे का?

परंतु, दोन्ही जोडीदार एकाच पातळीवर असतात तेव्हाच हे घडू शकते. “त्यांना एकमेकांच्या ताकदीचा आदर करावा लागतो. तसेच काय सोयीचं आहे आणि काय नाही, याबद्दल तुम्ही आपल्या जोडीदाराशी स्पष्ट बोलायला हवं,” असे स्मर्लिंग म्हणतात. तुम्ही स्वतःला किंवा तुमच्या जोडीदाराला काळी मांजर किंवा गोल्डन रिट्रिव्हर मानत असलात तरी, स्मर्लिंग म्हणतात की, लोकांचे व्यक्तिमत्त्व जटिल असते. “बहुतेक सोशल मीडिया हा कोणत्याही गोष्टीचं अतिरंजित किंवा रूढीबद्ध वर्णन करत असतो, त्यात कोणताही बारकावा नसतो”. “जीवन असं नसतं – ते अनेक बारकाव्यांनी भरलेलं असतं. ”काळी मांजर किंवा गोल्डन रिट्रिव्हर या लेबलांवर फार जोर देण्याऐवजी, लुंडक्विस्ट सुचवतात की, लेबल्सचा उपयोग नात्यात संवाद आणि नातं जोडण्यासाठीचा आरंभबिंदू म्हणून करावा, त्यामध्ये अडकून पडू नये.

Story img Loader