Viral Trend Chastity Belts: अलीकडे सोशल मीडियावर काही फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. हे फोटो मुख्यतः योनी शुचिता पट्ट्याचे आहेत. योनी शुचिता पट्टा म्हणजे धातूपासून तयार केलेले अंतर्वस्त्र. हा पट्टा स्त्रीच्या कंबरेभोवती व कटीप्रदेशाभोवती लॉक करण्यात येत होता. त्यामुळे लैंगिक संबंधांवर प्रतिबंध घालता येत असे. मध्ययुगीन कालखंडात युद्धावर जाणारे योध्ये आपल्या स्त्रियांना या पट्ट्याच्या माध्यमातून बंदीस्त करत अशी समजूत होती आणि आहे. परंतु या पट्ट्यामागे सांगण्यात येणारे हे कथानक मिथ्या असल्याचे मत आधुनिक संशोधक मांडतात. त्याच अनुषंगाने ऐतिहासिक संदर्भ या ‘Chastity Belts’ म्हणजेच शुचिता पट्ट्याविषयी नेमकं काय सांगतात? याचाच घेतलेला हा आढावा.

उत्पत्ती आणि मिथक/ Origins and Myths of Chastity Belts (Popular Narrative)

चॅस्टिटी बेल्टला युरोपच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये एक आगळे- वेगळे महत्त्व आहे. या पट्ट्याच्या वापराचा थेट संबंध लैंगिकता, नैतिकता आणि सामाजिक अपेक्षा यांच्याशी आहे. चॅस्टिटी बेल्टसंबंधीच्या लोकप्रिय वदंतेत या पट्ट्याचा उगम मध्ययुगीन युरोपमध्ये झाल्याचे सांगितले जाते. मध्ययुगीन कालखंडात विशेषतः धर्मयुद्धाच्या काळात (११व्या ते १३व्या शतकांदरम्यान) योध्ये त्यांच्या दीर्घकालीन अनुपस्थितीत हा बेल्ट किंवा पट्टा आपल्या स्त्रियांकरिता वापरत असत असे मानले जाते. परंतु, हा समज वादग्रस्त ठरला आहे.

Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
india bangladesh fenching
भारत-बांगलादेश संबंध आणखी ताणले; सीमेवर कुंपण बांधण्यावरून सुरू झालेला वाद काय?
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नागपूर : जीवावर बेतले, नाकावर निभावले; नॉयलान मांजाने महिला पोलीस कर्मचाऱ्याचे…
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव कसा असतो?
Wife can file case of molestation against husband
पत्नी पतिविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करू शकते
Maharashtra kesari woman wrestling marathi news
महाराष्ट्र केसरी महिला कुस्तीचा रंगणार फड, येणार नामवंत मल्ल
Firewall , Wife, Children Property Rights, MWPA,
जिम्मा न् विमा : पत्नी, मुलांच्या मालमत्ताधिकाराचा फायरवॉल – एमडब्ल्यूपीए
The Bellifortis sketch (c. 1405)
The Bellifortis sketch (c. 1405) (विकिपीडिया)

ऐतिहासिक तथ्य

चॅस्टिटी बेल्टचे पहिले ज्ञात चित्रण बेलिफोर्टिस (१४०५) मध्ये आढळते. बेलिफोर्टिस (Bellifortis) हा एक लष्करी ग्रंथ आहे, ज्याची रचना जर्मन अभियंता कॉनराड केसर (Konrad Kyeser) यांनी केली होती. या ग्रंथातील चित्रात लॉकसह बेल्टसारख्या साधनाचे चित्र आहे. परंतु, चित्राबरोबरचा तपशील हा विनोदी आहे. केसरचे हे चित्रण व्यंगात्मक होते, जे समाजातील अत्याधिक नियंत्रणाची थट्टा करण्यासाठी काढण्यात आले होते. प्रत्यक्ष या पट्ट्याच्या वापराचे कोणतेही दस्तऐवजीकरण उपलब्ध नाही, असे मत अभ्यासक व्यक्त करतात. मध्ययुगाच्या आरंभी कार्यक्षम चॅस्टिटी बेल्ट अस्तित्वात असल्याचा कोणताही पुरावा नाही. अशा उपकरणांचा संदर्भ प्रामुख्याने पुनरुज्जीवन आणि प्रबोधन काळातील (Renaissance and Enlightenment Era) व्यंगचित्रांमध्ये आढळतो. त्यामुळे हा बेल्ट भौतिक साधनांपेक्षा सामाजिक नियंत्रणाचा प्रतीक होता हे सूचित होते.

अधिक वाचा: Gen Beta (2025-2039):आजपासून दहा दिवसांनी होणार ‘Gen Beta’ चा जन्म; पिढ्यांचे वर्गीकरण कोणी आणि का केले?

पुरातत्त्वीय पुरावे/ Archaeological Evidence- Artifacts in Museums

ब्रिटिश म्युझियम आणि व्हिएन्नाच्या कुंस्टहिस्टोरिसचेस म्युझियम यांसारख्या अनेक संग्रहालयांनी कधीकाळी चॅस्टिटी बेल्ट प्रदर्शित केले होते. इतकंच नाही तर हे बेल्ट मध्ययुगीन असल्याचा दावादेखील करण्यात आला होता. या प्रदर्शनात धातूचे बेल्ट समाविष्ट होते, ज्याला लॉक आणि छिद्र होते; तसेच ते लोककथांमध्ये वर्णन केलेल्या उपकरणांसारखे दिसत होते.

१. ब्रिटिश म्युझियममधील बेल्ट

ब्रिटिश म्युझियममध्ये प्रदर्शित केलेला चॅस्टिटी बेल्ट अनेक वर्षांपासून मध्ययुगीन अवशेष मानला जात होता. परंतु, आधुनिक न्यायवैद्यक विश्लेषणात (Forensic Analysis) हा बेल्ट १८ व्या किंवा १९ व्या शतकातील असल्याचे निदर्शनास आले. हा बेल्ट मध्ययुगीन नाही, प्रत्यक्ष उपयोगासाठी नाही तर केवळ प्रदर्शन किंवा कुतूहल निर्माण करण्यासाठी तो तयार करण्यात आला होता, असे मानले जात आहे.

२. व्हिएन्नाच्या कुंस्टहिस्टोरिसचेस म्युझियम

या संग्रहालयात एक धातूचा चॅस्टिटी बेल्ट होता, तो पुनरुज्जीवनाच्या कालखंडातील असल्याचे मानले गेले होते. परंतु सखोल तपासणीत तो १९व्या शतकात तयार करण्यात आला होता, हे स्पष्ट झाले. हा बेल्ट मुख्यतः प्रदर्शनासाठी किंवा व्हिक्टोरियन काळातील प्रेक्षकांचे कुतूहल शमविण्यासाठी तयार करण्यात आला होता.

साहित्य आणि व्यावहारिक विचार

या साधनांची अव्यवहार्यता, मध्ययुगीन काळातील त्यांचा व्यापक वापर असल्याच्या कथेला खोडून काढते. धातूपासून तयार करण्यात आलेले हे साधन दीर्घकाळ वापरल्याने स्वच्छतेचे प्रश्न, संसर्ग आणि तीव्र अस्वस्थता निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्यांचा व्यावहारिक वापर अशक्य ठरतो. डॉ. अल्ब्रेख्ट क्लासेन (जर्मन आणि मध्ययुगीन साहित्य, संस्कृती, आणि इतिहासाचे प्रख्यात विद्वान) त्यांच्या ‘The Chastity Belt: Myth or Reality?’ या शोध निबंधात म्हणतात की, चॅस्टिटी बेल्ट प्रामुख्याने मिथक आणि व्यंगात्मक साधन होते. प्रत्यक्षात वापरले जाणारे साधन नव्हते. हे साधन मध्ययुगीन काळातील तथाकथित अमानवीपणाबद्दलच्या व्हिक्टोरियन आकर्षणासाठी तयार केले गेले होते, असेही मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी चॅस्टिटी बेल्टला लैंगिकता आणि निष्ठेबद्दलच्या सामाजिक चिंतेचे प्रतीक मानले आहे.

स्त्री शरीरावरील सामाजिक नियंत्रण

क्लासेन यांचे संशोधन मध्ययुगीन काळातील लिंगसंबंध, कुटुंब व्यवस्था आणि समाजाच्या नैतिक मूल्यांवर भर देते. त्यांनी मध्ययुगीन साहित्यामध्ये व्यक्त झालेल्या मानवी भावना आणि त्यावेळच्या जीवनशैलीवर प्रकाश टाकला आहे. त्यांनी मध्ययुगीन इतिहासातील अनेक मिथकांना तर्कसंगत पुराव्यांच्या आधारे खोडून काढले आहे. सारा बेंडॉल पोशाख आणि सांस्कृतिक साहित्याच्या तज्ज्ञ असून त्यांनी चॅस्टिटी बेल्टवर संशोधन केले आहे. त्या या साधनाच्या प्रतिकात्मकतेवर भर देतात. बेंडॉल यांनी विवाह व्यवस्थेत स्त्रियांच्या शरीरावर सामाजिक नियंत्रणाचे प्रतीक म्हणून चॅस्टिटी बेल्टचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

ऐतिहासिक संदर्भ आणि प्रतिकात्मकता

मध्ययुगीन साहित्यात शुद्धता आणि निष्ठेच्या विषयांना मोठे महत्त्व देण्यात आले होते. परंतु शारीरिक चॅस्टिटी बेल्टचा उल्लेख फारसा आढळत नाही. त्याऐवजी बंद बाग (Enclosed Garden) किंवा सीलबंद दरवाजांसारख्या प्रतिकात्मक रूपकं कथा मांडणीत प्रबळ दिसतात. द रोमांस ऑफ द रोझ १३व्या शतकातील हा रूपकात्मक काव्यग्रंथ शुद्धता आणि सद्गुण यांच्या विषयांवर भर देतो. परंतु शारीरिक साधनांचा उल्लेख करत नाही. याआधी नमूद केल्याप्रमाणे केसरच्या बेलिफोर्टिस या लष्करी ग्रंथामध्ये चॅस्टिटी बेल्टचे पहिले दृश्यचित्रण सापडते. मात्र या रेखाटनाचा संदर्भ इतर व्यंगात्मक शोधांमध्ये आहे.

अधिक वाचा: ‘Sapiosexuality’ म्हणजे काय? बुद्धिमत्तेच्या आकर्षणाचं विज्ञान आणि वाद नेमका काय आहे?

पुनरुज्जीवन आणि प्रबोधन काळातील व्यंग

पुनरुज्जीवन काळात चॅस्टिटी बेल्ट वारंवार व्यंगात्मक साहित्यामध्ये दिसून येतात; ते मानवी स्वभावावर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांची मूर्खपणाने थट्टा करतात. प्रबोधन काळातील विचारवंतांनी नंतर या संकल्पनेचा वापर मध्ययुगीन प्रथांचे टीकास्वरूप परीक्षण करण्यासाठी केला. १६ व्या शतकातील जर्मन व्यंगचित्रकार जोहान फिशार्ट यांनी सामाजिक आणि वैवाहिक नियमांवरील आपल्या टीकांमध्ये चॅस्टिटी बेल्टचा संदर्भ दिला. त्यांनी हे बेल्ट कठोर नियंत्रण आणि अविश्वासाचे प्रतीक म्हणून सादर केले आहेत.

व्हिक्टोरियन पुनरुज्जीवन आणि चुकीचे समज

व्हिक्टोरियन काळात गोथिक वास्तुकला, साहित्य आणि प्रदर्शनांच्या प्रभावामुळे मध्ययुगीन अवशेषांबद्दलचा रस पुन्हा वाढला होता. चॅस्टिटी बेल्ट हे आकर्षणाचा भाग झाले आणि त्यांना अनेकदा संग्रहालयांमध्ये किंवा खाजगी संग्रहांमध्ये भूतकाळातील कथित क्रूरतेचे अवशेष म्हणून प्रदर्शित करण्यात आले. या कालावधीतील अनेक चॅस्टिटी बेल्ट बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. व्हिक्टोरियन लोकांसाठी चॅस्टिटी बेल्ट मध्ययुगीन काळातील नैतिक संयम आणि शिस्तीचे प्रतीक होते असे मानले जात असे. हे वस्त्र मुख्यतः सावधतेचे कथानक किंवा विनोदी कुतूहल म्हणून काम करत होते. त्यात ऐतिहासिक वास्तवतेचा भाग नव्हता.

आधुनिक अर्थ आणि सांस्कृतिक वारसा

आधुनिक काळात चॅस्टिटी बेल्टचे पुन्हा नव्याने कल्पनारंजन करण्यात आले आहे. चित्रपट, पुस्तकं आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांमध्ये त्यांचे अतिशयोक्त किंवा विनोदी पद्धतीने चित्रण केले जाते. त्यामुळे त्यांचे अस्तित्त्व ऐतिहासिक संदर्भांपासून अधिक लांब जात आहे. आधुनिक उपसंस्कृतींमध्ये चॅस्टिटी बेल्ट काही वेळा लैंगिक नातेसंबंधांमध्ये सहमतीने वापरण्यात येणाऱ्या साधनांमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या सांस्कृतिक महत्त्वाला नवीन आणि गुंतागुंतीचे स्तर जोडले गेले आहेत.

अधिक वाचा: Black Peter gold discovery: या ‘काळ्या’ मराठी माणसाने न्यूझीलंडमध्ये शोधली होती सोन्याची खाण; काय आहे इतिहास?

चॅस्टिटी बेल्ट हे मध्ययुगीन नसून सांस्कृतिक कल्पना आणि व्हिक्टोरियन काळातील मिथकनिर्मितीचा परिणाम आहेत. ते लैंगिक नियंत्रणाचे प्रतीक मानले जात असले तरी त्याचा प्रत्यक्ष वापर कोणत्याही विश्वासार्ह पुराव्याने सिद्ध झालेला नाही. बहुतेक चॅस्टिटी बेल्ट बनावट किंवा व्यंगात्मक स्वरूपाचे आहेत; जे समाजातील नियमांवर टीका करण्यासाठी तयार करण्यात आले. म्हणूनच चॅस्टिटी बेल्टला केवळ दडपशाहीचे प्रतीक न मानता शतकानुशतकांपासूनच्या लैंगिकता, लिंगभेद आणि नैतिकतेच्या बदलत्या विचारसरणीचा अभ्यास करण्यासाठी एक साधन म्हणून पाहू शकतो, असे मत अभ्यासक व्यक्त करतात.

संदर्भ/References

  1. Classen, A. (2007). “The Chastity Belt: Myth or Reality?” Journal of Medieval History, 33(1), 23–36. [DOI: 10.1080/03044180601084301]
  2. Bendall, S. (2020). Dress, Masculinity, and the Construction of Authority in the Early Modern World.

Story img Loader