राखी चव्हाण

भारतातील शेवटचा चित्ता १९४७ मध्ये मरण पावला आणि १९५२ साली भारतातून ही प्रजात पूर्णपणे नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर बराच काळ चित्ता भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील होते. तब्बल सात दशकानंतर हे प्रयत्न सफल झाले. १७ सप्टेंबर २०२२ रोजी भारतात नामिबिया येथून पाच मादी व तीन नर असे एकूण आठ चित्ते आणण्यात आले. आणखी १२ चित्त्यांची दुसरी तुकडी १८ फेब्रुवारीला भारतात येणार आहे. चित्त्यांच्या आगमनाविषयी पाच महिन्यांपूर्वी जी उत्सुकता होती, तीच यावेळीदेखील कायम आहे.

Dead body girl drain Govandi, Dead body of a girl, Govandi,
मुंबई : गोवंडीतील नाल्यात सापडला दीड वर्षांच्या मुलीचा मृतदेह
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Sanjay Rathod case, death of young woman,
संजय राठोड प्रकरण : तरुणीचा मृत्यू अपघात किंवा आत्महत्या असल्याचा निष्कर्ष कशाच्या आधारे ? उच्च न्यायालयाचा सवाल
Old man died in school bus hit, Old man died in school bus hit Borivali, Borivali latest news,
बोरिवलीमध्ये बसच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
walmart indian girl death
कॅनडात वॉलमार्टमधील वॉक इन ओव्हनमध्ये आढळला शीख तरुणीचा मृतदेह
rangoli artist gunvant Manjrekar
रांगोळी सम्राट गुणवंत मांजरेकर यांचे निधन
scientists discovered the worlds oldest cheese
चीज हा मूळचा चिनी पदार्थ? साडेतीन हजार वर्षांपूर्वीच्या ‘ममी’जवळ सापडले आजवरचे सर्वांत जुने अवशेष!
iit delhi student suicide news marathi
IIT विद्यार्थ्याचा हॉस्टेलमध्ये मृत्यू, आत्महत्येचा संशय; हत्येची शक्यता पोलिसांनी फेटाळली!

आगमनासाठी कोणत्या स्वरूपाची तयारी केली जात आहे?

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आठ चित्त्यांची पहिली तुकडी येण्यापूर्वी त्या वनक्षेत्रात दोन बिबटय़ांनी शिरकाव केला होता. त्यामुळे त्यांना बाहेर काढता काढता मध्यप्रदेश वनखात्याच्या नाकीनऊ आले होते. येत्या १८ फेब्रुवारीला येणाऱ्या १२ चित्त्यांच्या आगमनापूर्वी त्या वनक्षेत्राची विशेष तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी त्या वनक्षेत्राच्या बाजूबाजूला कठोर सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. ड्रोन कॅमेऱ्याने या संपूर्ण परिसरावर नजर ठेवण्यात येत आहे. तसेच श्वान पथकालादेखील या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे. हे १२ चित्ते विशेष कार्गो विमानाने आधी ग्वाल्हेर येथे पोहोचतील. त्यानंतर त्यांना विमानानेच कुनो राष्ट्रीय उद्यानात आणले जाईल.

चित्त्यांच्या स्वागतासाठी कोण कोण हजर राहणार ?

येत्या १८ फेब्रुवारीला आगमन होणाऱ्या १२ चित्त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू आहे. त्यांना एक महिना विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय पर्यावरण, वने व हवामानबदल मंत्री भूपेंद्र यादव उपस्थित राहतील. याशिवाय मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, वनमंत्री विजय शाह यांच्यासह इतरही मान्यवर चित्त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत.

नव्याने येणाऱ्या चित्त्यांच्या आरोग्याबाबत शंका का?

चित्ता आणण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास विविध कारणांमुळे उशीर झाला. त्यामुळे चित्त्यांच्या दुसऱ्या तुकडीच्या आगमनावरून बरेच तर्कवितर्क सुरू होते. मात्र, जानेवारी २०२३ च्या अखेरीस सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या चित्त्यांसाठी वेगळे कक्ष तयार करण्यात आले आहेत. हे बाराही चित्ते गेल्या सात महिन्यांपासून दक्षिण आफ्रिकेत विलगीकरणात ठेवण्यात आले होते. जंगलात असणाऱ्या प्राण्यांचे स्थलांतर करण्यापूर्वी त्यांना काही काळ विलगीकरणात ठेवण्यात येते. त्यानंतर जिथे स्थलांतर होते तिथेही काही काळ विलगीकरणात ठेवतात. वन्यप्राणी बराच काळ बंदीवासात असतील तर त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. या चित्त्यांबाबतही हीच शक्यता संभवते, असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला होता.

तयारीचे सादरीकरण कुठे झाले?

कर्नाटकातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पातील राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या विसाव्या बैठकीत कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी सात नर आणि पाच मादी अशा १२ चित्त्यांना भारतात आणण्यासंदर्भातील सादरीकरण केले. देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेने चित्त्यांच्या भारतातील आगमनासाठी पुनरुज्जीवन आराखडा तयार केला आहे. त्याद्वारे भारतात चित्त्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

करारात नेमके काय म्हटले आहे?

नामिबियानंतर आता दक्षिण आफ्रिकेतून १०० चित्ते भारतात आणण्यात येणार आहेत. याबाबत भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन देशांमध्ये सामंजस्य करार झाला आहे. या करारानुसार दरवर्षी दहा ते बारा चित्ते भारतात पाठवण्यात येतील. दर पाच वर्षांनी या करारातील अटींचा आढावा घेण्यात येईल. १२ चित्त्यांची एक तुकडी येत्या १८ फेब्रुवारीला भारतात येणार आहे. यात सात नर आणि पाच मादी चित्त्यांचा समावेश आहे.

आधी आलेल्या आठ चित्त्यांची स्थिती काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी म्हणजे १७ सप्टेंबर २०२२ ला भारतात नामिबिया येथून आठ चित्ते आणण्यात आले. यात पाच मादी आणि तीन नर चित्त्यांचा समावेश होता. सुरुवातीला एक ते दीड महिना विलगीकरणात ठेवल्यानंतर त्यांना मोठय़ा खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात आले. हे सर्व चित्ते शिकार करू लागले असले तरी त्यांना अद्याप जंगलात सोडण्यात आलेले नाही. मात्र, यातील एका मादी चित्त्यांची (साशा) प्रकृती बिघडली आहे. या चित्त्याच्या मूत्रिपडात संसर्ग झाला आहे. नियमित तपासणीदरम्यान ‘साशा’ला थकवा आणि अशक्तपणा जाणवत असल्याचे स्पष्ट झाल्याने तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.