गौरव मुठे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जपानस्थित हिताचीची उपकंपनी असलेल्या हिताची पेमेंट सव्र्हिसेसने मुंबईतील ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) च्या सहकार्याने भारतातील पहिले ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस एटीएम’ (यूपीआय एटीएम) सादर केले. त्याचा वापर करून ग्राहकांना डेबिट वा क्रेडिट कार्डाविना रोख रक्कम काढता येणार आहे. ‘यूपीआय एटीएम’ कसे वापरले जाते आणि त्याचा भविष्यातील आवाका कसा असेल याबाबत जाणून घेऊ या.
‘यूपीआय एटीएम’ नेमके काय आहे?
‘यूपीआय एटीएम’ आधी ‘यूपीआय’ समजून घ्यायला हवे. ‘यूपीआय’ ही ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)’द्वारे संचालित केली जाणारी प्रणाली आहे. ती मोबाइलच्या माध्यमातून यूपीआय प्रणालीद्वारे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात त्वरित आणि विनामूल्य निधी हस्तांतरित करण्याची सुविधा आहे. आता ‘यूपीआय एटीएम’च्या माध्यमातून बँकेचे डेबिट अथवा क्रेडिट कार्ड नसतानादेखील रोख रक्कम बँकेच्या एटीएममधून मिळविता येणे शक्य आहे. यूपीआयमुळे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डशिवाय सहजरीत्या ऑनलाइन व्यवहार करणे शक्य झाले आहेच. आता डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ग्राहक आता किमान १०० रुपयांची रक्कम या सुविधेतून रोख स्वरूपात मिळवू शकतील. ही सुविधा नि:शुल्क असेल.
मशीनमधून रोख कशी मिळवली जाणार?
यूपीआय एटीएम हे सध्या वापरात असलेल्या सामान्य एटीएमच्या तुलनेत वेगळे उपकरण असेल. ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये प्रदर्शित हिताची मनी स्पॉट एटीएममध्ये कार्ड प्रवेशित करण्यासाठी खाचच उपलब्ध नव्हती. शिवाय ते अँड्रॉइड कार्यप्रणालीद्वारे संचालित असेल. अशा यूपीआय एटीएमची सोय असलेल्या केंद्रावर जाऊन ग्राहकाला रोख रक्कम काढण्यासाठी ‘यूपीआय कॅश व्रिडॉवल’ पर्याय निवडावा लागेल. एटीएम स्क्रीनवर क्यूआर कोड प्रदर्शित होईल. त्यानंतर वापरकर्ते त्यांच्या स्मार्टफोनवरील कोणत्याही ‘यूपीआय’ अॅपवरून स्क्रीनवरील क्यूआर कोड स्कॅन करू शकतात. आपल्याला हवी असलेली रक्कम त्यावर निश्चित केली की, यूपीआय पिन आणि ‘हीट प्रोसीड’ बटणवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर एटीएममधून अपेक्षित रोख प्राप्त होईल. या वैशिष्टय़पूर्ण सुविधेला ‘इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश व्रिडॉवल (आयसीसीडब्ल्यू)’ असे म्हटले जाते.
‘यूपीआय एटीएम’ची वैशिष्टय़े काय?
‘यूपीआय एटीएम’साठी पैसे काढण्याची मर्यादा प्रति व्यवहार कमाल १० हजार रुपये आहे. किंवा ‘यूपीआय एटीएम’ व्यवहारांसाठी परवानगी देणाऱ्या बँकेने निश्चित केलेल्या मर्यादेनुसार रोख रक्कम काढण्याची मर्यादा वेगवेगळी असेल. एटीएम क्यूआर कोड-आधारित रोख पैसे काढण्याच्या या पर्यायामुळे आता बँकांद्वारे दिलेल्या ‘वन टाइम पासवर्ड’ अर्थात ओटीपी आधारित पैसे काढण्याच्या पर्यायापेक्षा लोक त्यांचे ‘यूपीआय अॅप’ वापरून एकाहून अधिक खात्यांमधूनही पैसे काढू शकतात. ‘यूपीआय एटीएम’मुळे ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांचा धोकाही कमी होण्याची शक्यता आहे.
कोणत्या बँकांकडून ही सेवा सुरू?
सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक तसेच एचडीएफसी आणि आणखी इतर काही बँकांच्या ठरावीक एटीएमवर ही सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. उपलब्ध माहितीनुसार, भारत सरकारने अशा ७०० यूपीआय एटीएम सुरू करण्याला मान्यता दिली आहे. लवकरच सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांकडून ही सेवा उपलब्ध केली जाण्याची शक्यता आहे. प्रचलित सामान्य एटीएम हे ‘यूपीआय एटीएम’मध्येदेखील रूपांतरित केली जाण्याची शक्यता आहे. यूपीआयद्वारे रोख काढण्यासाठी गूगल पे, पेटीएम, फोनपे किंवा मान्यताप्राप्त इतर यूपीआय सेवा पुरवणाऱ्या अॅपचा वापर करता येईल.
आणखी कोणत्या नवीन सुविधा शक्य?
नवीन यूपीआय एटीएमशी संलग्न स्मार्टफोनशी साधम्र्य असणारे अँड्रॉइड कार्यप्रणाली व पर्यायाने कनेक्टिव्हिटीच्या वैशिष्टय़ाचा लाभही मिळवून देते. उदाहरणार्थ, रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर, शक्तिकांत दास यांनी गेल्या आठवडय़ात काही नवीन यूपीआय सेवा जसे की, हॅलो! यूपीआय आणि बिलपे कनेक्ट यांची घोषणा केली. या दोन्ही संभाषणात्मक देयक व्यवहार सुविधा आहेत ज्या वापरकर्त्यांना त्यांच्या भाषेतून ध्वनी-सक्षम देयक व्यवहारांच्या पूर्तता सुकर करतात. या सुविधाही भविष्यात, आपल्याला यूपीआय एटीएमच्या आधारे कार्यान्वित झाल्याचे पाहता येईल.
‘यूपीआय’च्या माध्यमातून याशिवाय, यूपीआय क्रेडिट लाइन, यूपीआय टॅप आणि पे आणि यूपीआय लाइट एक्स या नवीन सुविधादेखील खुल्या करण्यात आल्या आहेत ज्यामुळे दरमहा १०० अब्ज यूपीआय व्यवहारांचे उद्दिष्ट राखण्यात आले आहे. सध्या बचत खाते, ओव्हरड्राफ्ट खाते, प्रीपेड वॉलेट आणि क्रेडिट कार्ड यांना यूपीआयशी संलग्न करता येण्याची सोय आहे, त्यात आता पूर्व-मंजूर कर्जाच्या खात्याचीही भर पडेल. परिणामी बँकांना यूपीआयच्या माध्यमातून कर्ज वितरणही शक्य होणार आहे.