भक्ती बिसुरे

अनंत चतुर्दशीच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये अनुक्रमे १२० आणि १०५ डेसिबल आवाजाची पातळी ओलांडली गेली. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्याच दिवशी कानतज्ज्ञांकडे रुग्ण येण्यास सुरुवातही झाली. आवाजाच्या आघातांचे दुष्परिणाम नेमके काय होतात?

Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
Borivali air, Air pollution Mumbai, Air pollution Borivali,
बोरिवलीची हवा ‘अतिवाईट’, मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच
170 countries conference held in busan on issue of eliminating plastic pollution
जगात किती प्लास्टिक कचरा जमा होतो? कोणत्या प्रकारचे प्लास्टिक सर्वाधिक आढळते? प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्याचे प्रयत्न जगभर विफल का?
pune wagholi accidents loksatta news
पुण्यात ‘या’ रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त वाहनांचा प्रवास, प्रवाशांसाठी का ठरतोय जीवघेणा?
Mumbai citizens suffer from cold and cough due to polluted air
प्रदुषित हवेमुळे मुंबईकर सर्दी, खोकल्याने त्रस्त

किती डेसिबल आवाज सुरक्षित?

आवाज मोजण्याचे परिमाण म्हणजे डेसिबल. आपले कान किती डेसिबलपर्यंत आवाज सहन करू शकतात याला काही मर्यादा आहेत. तज्ज्ञ मंडळी सांगतात त्यानुसार, कुजबुजण्याचा आवाज हा ३० डेसिबल एवढा असतो. साध्या संभाषणासाठी आपला आवाज साधारण ६० डेसिबलपर्यंत नोंदवला जातो. धावत्या दुचाकीच्या इंजिनाचा आवाज हा साधारण ९५ डेसिबलपर्यंत नोंदवला जातो. ध्वनिपातळी ७० डेसिबलच्या वर गेली असता ते धोकादायक असते. ७० डेसिबलवरील आवाजाच्या सातत्याने संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला बहिरेपणाचा धोका असतो. त्यावरील आवाज हा केव्हाही तुमच्या कानांच्या आरोग्यासाठी धोकादायकच ठरतो. १०० डेसिबलच्या वर आवाज हा गोंगाट या प्रकारात मोडतो. कानांची शक्ती क्षीण करण्यासाठी तो आवाज पुरेसा ठरतो. १२० डेसिबल आणि त्यावरील पट्टीतील आवाज हा आपले कान संपूर्ण निकामी करण्यास कारणीभूत ठरू शकतो. कानावर पडणारा आवाज ७० डेसिबलपेक्षा कमी राखणे शक्य असल्यास तुम्हाला श्रवणयंत्राची गरज भासण्याची शक्यता ९५ टक्के कमी होते, असे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

डॉक्टरांकडे कसल्या तक्रारी येतात?

कानांवर आदळणारे आवाज हे वरवर पाहता किती क्षुल्लक गोष्ट आहे, असा समज नागरिकांमध्ये असला तरी, विशिष्ट पट्टीच्या वरील प्रत्येक आवाज हा कानांच्या आरोग्यावर परिणाम करत असतो असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसारख्या काळात कानावर सतत २४ तास किंवा त्याहून अधिक काळ आदळणारा १०० किंवा त्याहून अधिक डेसिबल आवाज केवळ कान आणि श्रवणशक्तीवरच नव्हे तर आपल्या तब्येतीवर, अगदी मानसिक आरोग्यावरही दूरगामी परिणाम करू शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कान, नाक, घसातज्ज्ञ डॉ. राजीव यंदे सांगतात की, तीव्र आवाजांपासून बाहेर पडल्यानंतरही कानात शिट्टी वाजल्यासारखा आवाज येणे, कान दुखणे, ढोलताशा किंवा ध्वनिक्षेपकांचे आवाज कानात घुमत आहेत असे वाटणे, या विसर्जन मिरवणुकीनंतर तातडीने दिसणाऱ्या तक्रारी आहेत. काही व्यक्तींमध्ये त्यामुळे तात्पुरता बहिरेपणा येतो. काही व्यक्तींमध्ये हा बहिरेपणा काही काळापर्यंत राहतो. एका विशिष्ट वयानंतर तो कायमस्वरूपी राहण्याचा धोकाही असतो. मळमळणे, उलटय़ा होणे, रक्तदाब वाढणे असे शरीरावर दिसणारे परिणामही उच्च डेसिबल कानावर आदळल्याने दिसतात, असे डॉ. यंदे स्पष्ट करतात. चिडचिड होणे, नैराश्य, भीती, असुरक्षितता अशी मानसिक अनारोग्याची लक्षणेही दिसतात अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञ  देतात. मिरवणुकीसारख्या काळातील अतिउच्च ध्वनिपातळीच्या आवाजांचे आघात रोखण्यासाठी त्या आवाजांपासून शक्य तेवढे दूर राहणे हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे डॉक्टर सांगतात. मध्यम डेसिबल आवाजांपासून रक्षणासाठी कानात कापसाचे बोळे घालणे वगैरे पर्याय उपयुक्त ठरतात. मात्र, १०५ किंवा १२० डेसिबलसाठी ते पुरेसे नसल्याचे डॉक्टर सांगतात.

वाढते डेसिबल प्राण्यांच्याही जिवावर?

विसर्जन मिरवणुकीतील आवाजांमुळे घरोघरी पाळीव प्राणी घाबरले किंवा बिथरल्याचे नागरिक आणि पशुवैद्यकांकडून सांगण्यात येते. मानवी शरीरावर होतात तसेच दुष्परिणाम प्राण्यांच्या शरीरावरही होत असल्याने ध्वनिप्रदूषणामुळे प्राण्यांचे कान आणि आरोग्यालाही सारखाच धोका असतो. पुणे शहरात गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत काही मंडळांनी रथाला जुंपलेल्या बैलजोडय़ा फटाके, ध्वनिक्षेपक, ढोलताशा अशा आवाजांनी बुजून गेल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत बैल उधळण्याचा धोका असतो. त्यामुळेच बैलांच्या मालकांना काळजी घ्यावी लागली. माणूस असो की प्राणी, अतिउच्च आवाजामुळे होणारे ध्वनिप्रदूषण कोणाच्याच हिताचे नाही हे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Story img Loader