संदीप नलावडे

पश्चिम आशियातील तुर्कस्तान आणि सीरिया या देशांत झालेल्या भीषण भूकंपात पाच हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा बळी गेला. कित्येक शहरे आणि गावे बेचिराख झाली. या भूकंपाची कारणे, तुर्कस्तान पट्टय़ात वारंवार भूकंप का होतात, सीरिया भागांत मदत पोहोचण्यास येत असलेल्या अडचणी याबाबतचा आढावा..

syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
drought-prone villages Pune, works in drought-prone villages pune, drought-prone villages fund,
पुणे : दरडप्रवण गावातील कामांना गती, २०० कोटींचा निधी मंजूर
house damaged by falling tree branch in goregaon
गोरेगावमधील झाडाची फांदी पडून घराचे नुकसान
Syria Civil War
Syria Crisis: “सीरीया शुद्ध होत आहे”; असद यांची राजवट उलथवल्यानंतर बंडखोरांचा नेता अबू जोलानीची मोठं वक्तव्य
Bashar al-Assad And Vladimir Putin.
Syrian Civil War : सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचं विमान खरंच क्रॅश झालं का? असद कुटुंबीयांसाठी पुतीन यांचे मोठे पाऊल
President Bashar al Assad forces defeated in parts of Syria
सीरियावर बंडखोरांचा ताबा… अध्यक्ष बशर अल असद परागंदा… नेमके काय घडले? अमेरिका, रशिया, इराण, तुर्कीयेचा काय संबंध?

भूकंपग्रस्त देशांमध्ये किती हानी झाली?

तुर्कस्तान आणि त्याच्या शेजारी असलेल्या सीरियामध्ये सोमवारी पहाटे झालेल्या शक्तिशाली धरणीकंपातील मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. तुर्कस्तानातील गाझियानटेप, हताय, मालत्या, कहरामनमारा या शहरांना, तर सीरियामधील अलेप्पो, हमा, टार्टस, लताकिया या शहरांना आणि कित्येक गावांस भूकंपाचा फटका बसला असून अनेक इमारती अक्षरश: पत्त्यासारख्या कोसळल्या.

तुर्कस्तानात वारंवार भूकंप का होतात?

तुर्कस्तानमधील आपत्ती आणि आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणानुसार २०२० मध्येच या देशात जवळपास ३३ हजार भूकंपांची नोंद झाली आहे. त्यापैकी ३३२ भूकंप ४.० आणि त्याहून अधिक तीव्रतेचे होते. हा प्रदेश भूकंपप्रवण भूस्तरांच्या मोठय़ा प्रभंग रेषांच्या वर (फॉल्ट लाइन्स) वसलेला आहे. त्यामुळे येथे वारंवार भूकंप होतात. तुर्कस्तान, सीरिया अगदी इराणपर्यंतच्या प्रदेशात दरवर्षी कमी-जास्त तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसतात. तुर्कस्तानची भूकंपप्रवण स्थिती त्याच्या टेक्टोनिक स्थानावरून समजते. पृथ्वीच्या सर्वात बाहेरील थरामध्ये सुमारे १५ प्रमुख स्लॅब असतात. ज्यांना टेक्टोनिक प्लेट्स म्हणतात. या प्लेट्समधील सीमांमध्ये अचानक झालेल्या कोणत्याही हालचालींमुळे भूकंप होऊ शकतो. तुर्कस्तान अनाटोलियन टोक्टोनिक प्लेटवर स्थित आहे. तुर्कस्तानच्या उत्तरेला युरेशियन प्लेट आहे. युरेशियन आणि अ‍ॅनाटोलियन टेक्टोनिक प्लेट्स मीलनिबदू हा विशेषत: विनाशकारी म्हणून ओळखला जातो. या प्लेट्समध्ये वारंवर घर्षण होत असल्याने येथे भूकंप होतात. ही जगातील सर्वात कमकुवत फॉल्ट लाइन्स असल्याने हा प्रदेश भूकंपप्रवण आहे. काही भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते तुर्कस्तानमधील जवळपास ९५ टक्के भूभागाला भूकंपाचा धोका आहे, तर इस्तंबूल आणि इझमीर या प्रमुख शहरांच्या आसपासचा भाग आणि पूर्व अनातोलियाच्या प्रदेशासह देशाच्या सुमारे एकतृतीयांश भागाला जास्त धोका आहे.

तुर्कस्तानात आधी असे भूकंप झालेत का?

तुर्कस्तान, सीरिया या प्रदेशांत दरवर्षी अनेकदा भूकंपाचे धक्के बसतात. १९७० नंतर तुर्कस्तानात ६ रिश्टर स्केलपेक्षा अधिक तीव्रतेचे अनेक भूकंप झाले. १९३९ मध्ये ८.० तीव्रेतचा भूकंप झाला होता, त्यात ३३ हजार नागरिकांचा बळी गेला. १९७६ मध्ये ७.५ तीव्रतेच्या भूकंपात चार हजार जणांना मृत्यूला सामोरे जावे लागले, तर १९९९ मध्ये ७.६ तीव्रतेच्या भूकंपात १८ हजार जणांचा मृत्यू झाला. २०२० मध्ये चार वेगवेगळय़ा भूकंपांत १७० पेक्षा नागरिकांचा मृत्यू झाला. म्हणजेच १९३९ ते २०२३ या काळांत तुर्कस्तानने सहा मोठे भूकंप अनुभवले. १९०० पासून आतापर्यंत तब्बल ७६ भूकंपांमध्ये जवळपास एक लाखापर्यंत नागरिक भूकंपाचे बळी ठरले आहेत. त्यापैकी निम्म्या नागरिकांचा मृत्यू १९३९ आणि १९९९ मध्ये झालेल्या भूकंपात झाला. तुर्कस्तानचे भूकंपामुळे गेल्या शतकात २५ अब्जाहून अधिक अमेरिकी डॉलरचे नुकसान झाले आहे.

इराण, अफगाणिस्तानचा काय संबंध?

२०१७ मध्ये इराण-इराकच्या सीमेवर ७.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता, त्यात ७५० नागरिकांचा बळी गेला. २००३ आणि १९९० मध्येही इराणमध्ये शक्तिशाली भूकंप झाले. गेल्या वर्षी अफगाणिस्तानमध्ये ६.० तीव्रतेच्या भूकंपात १,१०० पेक्षा अधिक नागरिक मारले गेले. तुर्कस्तान अ‍ॅनाटोलियन टेक्टोनिक प्लेटवर स्थित आहे, तर इराण, अफगाणिस्तान अरेबियन प्लेटवर स्थित आहे. तुर्कस्तानच्या दक्षिणेला अरेबियन प्लेट आहे, तर उत्तरेला युरेशियन प्लेट. अ‍ॅनाटोलियन प्लेट अरेबियन प्लेटला धक्का देते, तेव्हा ती युरेशियन प्लेटला धडकते. त्यामुळे भूकंपाचे धक्के बसतात. अ‍ॅनाटोलियन प्लेट ही युरेशियन प्लेटपासून वेगळी झाली आहे. या प्लेटवर अरेबियन प्लेटचा दबाव वाढू लागला असून युरेशियन प्लेट हा दबाव रोखत आहे.

युद्धामुळे मदतकार्यात अडचणी?

सीरियामध्ये एक दशकाहून अधिक काळ सुरू असलेल्या गृहयुद्धामुळे भूकंपाचा सर्वाधिक फटका बसलेल्या भागात मदतकार्याला अडथळा येत आहे. संघर्ष, अन्नटंचाई, आर्थिक दारिदय़्र, अलीकडेच कॉलराच्या उद्रेकामुळे बिघडलेली आरोग्य व्यवस्था आणि जीर्ण झालेली पायाभूत सुविधा यांचा परिणाम या देशावर झाला आहे. वायव्य सीरियातील इडिलब प्रांताचा काही भाग रशियन आणि सरकारी हवाई हल्ल्यांनी अनेक वर्षांपासून ग्रस्त आहे. अन्नधान्य आणि वैद्यकीय सुविधेसाठी हा भाग लगतच्या तुर्कस्तानवर अवलंबून आहे. मात्र भूकंपामुळे या प्रदेशात मदत पोहोचण्यास अडथळे येत आहेत. सीरियातील अनेक भागांत अराजक असून  रस्त्यांची हानी, इंधनाचा तुटवडा आणि कडाक्याच्या थंडीमुळे मदतकार्यात अडचणी येऊ शकतात, असे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे.

Story img Loader