फोक्सवागेन या जगातील सर्वांत मोठ्या मोटार उत्पादक कंपन्यांपैकी एका कंपनीने तिच्या जन्मभूमीत म्हणजे जर्मनीतील कारखाना बंद करण्याचा विचार सुरू केला आहे. या वृत्तामुळे जगभर खळबळ उडाली असून, जर्मनी व पर्यायाने युरोपच्या आर्थिक भवितव्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

समस्या काय?

फोक्सवागेन कंपनीचा सर्वांत मोठा कारखाना जर्मनीच्या उत्तरेकडील वुल्फ्सबर्ग शहरात आहे. ‘वुल्फ्सबर्गमध्ये भूकंप’ अशा आशयाचा मथळा तेथील प्रमुख वृत्तपत्रामध्ये रविवारी प्रसिद्ध झाला. याचे कारण तेथील प्रमुख कारखान्यासह आणखी एक कारखाना बंद करण्याची शक्यता फोक्सवागनचे व्यवस्थापन आजमावत आहे. यामुळे कामगार संघटना बिथरल्या आहेत. जर्मनीत कामगारांचे हित जपण्यास प्राधान्य दिले जाते. व्यवस्थापन आणि कामगार संघटनांमध्ये सातत्याने संवाद आणि करारमदार होत असतात. जर्मनीतील कामगाराला हमी संरक्षण असते. पण असे संरक्षण काढून घेण्याविषयी फोक्सवागेनने विचार सुरू केला आहे. त्यामुळे फोक्सवागेन आणि कामगार संघटनांमध्ये संघर्ष उडण्याची चिन्हे आहेत. वुल्फ्सबर्ग कारखाना ज्या राज्यात येतो, त्या लोअर सॅक्सनी राज्याच्या सरकारनेही उघडपणे कामगारांची बाजू घेतली आहे.

overseas debt become expensive due to the depreciating rupee
रुपयाच्या अवमूल्यनामुळे परदेशातून कर्ज उभारणी महाग
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Mahakumbh mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमुळे मिळणार २००० कोटींची आर्थिक चालना; अर्थव्यवस्था काय सांगते?
Industrial production rises to six month high of 5 2 in November print eco news
देशाची कारखानदारी रूळावर येत असल्याची सुचिन्हे!  नोव्हेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन सहा महिन्यांच्या उच्चांकी  ५.२ टक्क्यांवर
Seizure and attachment action against 3000 properties for non-payment of property tax
मालमत्ता कर थकबाकीदारांच्या दारात आता बॅण्डवादन
lokmanas
लोकमानस: उपभोग, गुंतवणूक, निर्यातीत वाढ आवश्यक
Markets uneasy over concerns of GDP slowdown print eco news
‘जीडीपी’ मंदावण्याच्या चिंतेने बाजारात अस्वस्थता
India GDP growth rate
भारताचा जीडीपी विकासदर मंदावण्याचा अंदाज चिंताजनक, पण धक्कादायक नाही! असे का?

हेही वाचा : बेपीकोलंबो मोहिमेमुळे उलगडणार सूर्यमालेतील ‘या’ ग्रहाचे रहस्य; काय आहे या मोहिमेचं महत्त्व?

फोक्सवागेनचे म्हणणे काय?

फोक्सवागेनचे चीफ एग्झेक्युटिव्ह ऑफिसर (सीईओ) ऑलिव्हर ब्लूम यांनी संभाव्य कारखाना बंदीचे समर्थन केले आहे. फोक्सवागेनसमोर तोट्याचा डोंगर उभा असून, कामगार कपात आणि जर्मनीतील काही कारखाने बंद करणे हा एकच पर्याय शिल्लक असल्याचे त्यांनी रविवारी एका मुलाखतीत स्पष्ट केले. त्यांचे म्हणणे खरे ठरले, तर ९० वर्षांमध्ये असे घडून येईल. फोक्सवागेनच्या मोटारींना युरोपात मागणी घसरू लागली आहे. जगभर हेच चित्र दिसून येत असल्याचा ब्लूम यांचा दावा आहे. चीनच्या मोटारींनी जर्मनीच्या बाजारपेठेत शिरकाव केला आहे. इलेक्ट्रिक मोटारींच्या बाजारपेठेत चीनने मोठी मुसंडी मारली असून, चिनी मोटारी आणि टेस्ला या अमेरिकन कंपनीच्या तुलनेत फोक्सवागेन फारच मागे राहिल्याचे चित्र आहे. ‘केक छोटा होतोय आणि टेबलवर पाहुणे वाढले आहेत’ असे ब्लूम यांनी बोलून दाखवले.

जर्मन अर्थव्यवस्थाच घसरणीला?

जर्मन उद्योग क्षेत्राने या घटनेबद्दल जर्मन सरकारला दोषी ठरवले आहे. जर्मन उद्योग संघटनेचे अध्यक्ष सिगफ्रीड रुसवुर्म यांनी म्हटले आहे, की ऊर्जेचे वाढीव दर, चढे कर, नोकरशाही आणि बेभरवशाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि पायाभूत सुविधा असे अनेक घटक जर्मन उद्योग क्षेत्राला मरगळ आणण्यास कारणीभूत ठरत आहेत. या घटकांमुळे केवळ फोक्सवागेन किंवा मोटार कंपन्या नव्हे, तर जर्मनीचीच प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचे रुसवुर्म यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : उंच लोकांना होऊ शकतो तब्बल आठ प्रकारचा कॅन्सर, इतरांच्या तुलनेत धोकाही सर्वाधिक; कारण काय?

कामगार संघटनांचे म्हणणे काय?

उच्च व्यवस्थापनाच्या वेतनासाठी कोटीच्या कोटी उभे करणाऱ्या कंपनीला कामगारांचे वेतन मात्र बोजा वाटते, अशी टीका जर्मन कामगार संघटनांनी केली आहे. ‘फोक्सवागेन आम्ही उभी केली, तुम्ही नाही’ असे फलकच ब्लूम यांना कामगार संघटनांनी दाखवले. चार दिवसांचा आठवडा, कामाचे तास कमी करणे, बोनस वाटपाचे सुसूत्रीकरण अशा उपायांनी विद्यमान संकटावर मात करता येईल, असे संघटनांचे म्हणणे आहे. कंपनीला धोरणे ठरवता आली नाहीत, भागधारक नेहमीच श्रीमंत होणार आणि भोगायचे मात्र कामगारांनी… ते का, असा संतप्त सवाल जर्मनीतील लेफ्ट पार्टी या प्रमुख डाव्या पक्षाच्या अध्यक्ष जेनिन विस्लर यांनी उपस्थित केला. फोक्सवागेन व्यवस्थापन आणि कामगार संघटनांमध्ये झालेल्या करारानुसार, कामगारांना अनेक निर्णयांमध्ये मत मांडण्याचा अधिकार आहे. लोअर सॅक्सनी या राज्याचे फोक्सवागेनमध्ये २० टक्के भागभांडवल आहे. त्यामुळे त्या राज्याच्या सरकारचे मतही महत्त्वाचे ठरते. फोक्सवागेनने इतर विभागांमध्ये खर्चकपात न करता, कामगारांना काढून कारखाना बंद करण्याचा सोपा उपाय निवडला, असे या सरकारला वाटते.

हेही वाचा : हवामान बदलामुळे गाड्यांची विक्री मंदावली?

ईव्ही निर्मितीत पिछाडी, महागड्या मोटारी

२०१५मध्ये डिझेल उत्सर्जनाबाबत खोटी माहिती देणारे सॉफ्टवेअर वापरल्याबद्दल अमेरिकी सरकारने ठपका ठेवल्यानंतर फोक्सवागेन अनेक आघाड्यांवर अपयशी ठरत आहे. आजही मोटार उत्पादनात ही कंपनी जगात टोयोटामागोमाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण इलेक्ट्रिक मोटारींच्या निर्मितीमध्ये योग्य वेळी निर्णय न घेतल्यामुळे या महत्त्वाच्या क्षेत्रात कंपनीला चमकदार कामगिरी करताच आलेली नाही. दुसरीकडे, महागड्या मोटारींना असलेली मागणी कोविड महासाथीनंतर घटल्यानंतरही कंपनीला आपली व्यूहरचना बदलता आलेली नाही. जर्मनीत मोटारनिर्मितीचा खर्च इतर अनेक देशांपेक्षा कितीतरी अधिक आहे. यामुळेच फोक्सवागेन आणि श्कोडा या ब्रँडच्या काही मोटारी भारतात बनवल्या जातात, ज्या अधिक परवडण्याजोग्या ठरल्या आहेत. असे उपाय योजल्याखेरीज वाढता खर्च आणि नफा यांचे गणित जुळवता येणार नाही, असे कंपनीला वाटते. यामुळेच भारत, चीन, इंडोनेशिया, मेक्सिको या देशांमध्ये किफायती दरात कारखाने उभे करण्याचे धोरण फोक्सवागेन व्यवस्थापन आखत आहे.

Story img Loader