धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे, असे सगळेच सांगतात. धूम्रपानाच्या पाकिटांवरही यामुळे कर्करोग होऊ शकतो, असे सांगितलेले असते. धूम्रपान सोडण्यासाठी अनेक उपाय सांगितले जातात. बऱ्याच जणांना धूम्रपान सोडायचेदेखील असते; परंतु ते एवढे सहजसाध्य नसते. औषधोपचार, समुपदेशन, शारीरिक व मानसिक पातळीवरील प्रयत्न यासाठी केले जातात. परंतु, विज्ञान धूम्रपान सोडण्यासंदर्भात काय सांगते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. धूम्रपान सोडत असताना होणारे शारीरिक व मानसिक त्रास आणि त्यातून मार्ग कसा काढायचा? वैज्ञानिकदृष्ट्या धूम्रपान बंद करताना काय करावे, हे प्रत्येकाला माहीत असले पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धूम्रपानाचा होणारा मोह

सिगारेट सोडणे आरोग्यासाठी चांगले आहे. परंतु, धूम्रपान कसे सोडावे. अनेक वेळा बीअर घेतल्यावर वा कामातून थोडा विरंगुळा म्हणून किंवा ‘ऑफर’ केलेली सिगारेट ओढण्याचा मोह अशा अनेक गोष्टींमुळे धूम्रपान केले जाते. धूम्रपान टाळण्याचा प्रयत्न केला तरी काही कारणांनी धूम्रपानाचा मोह होतोच. एका संशोधनानुसार, ६० ते ७५ टक्के लोक धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करताना पहिल्या सहा महिन्यांत आजारी पडतात. सिगारेट सोडणे ही खरी मानसिक लढाई आहे. आजूबाजूच्या लोकांचे धूम्रपान करणे, काही खास कार्यक्रमांच्या वेळी केले जाणारे धूम्रपान आणि नैराश्यापासून क्षणिक सुटका करण्यासाठी धूम्रपान करावेसे वाटते. परंतु, धूम्रपान पूर्णपणे सोडले, तर त्याचे शारीरिक फायदे अधिक आहेत.

हेही वाचा : देशामध्ये ५४३ खासदार, मग संसदेमध्ये ‘४२०’ क्रमांकाचे आसन का नसते ?

स्ट्रोक, हृदयरोग, कर्करोग आणि एकंदरीत आजार ध्रूमपान सोडल्यावर लाक्षणिकरीत्या कमी होतात. २०१९ मधील जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरातील मृत्यूंपैकी सुमारे १४ टक्के मृत्यू धूम्रपानाशी संबंधित आजारांमुळे झाले. धूम्रपान हे मृत्यूस कारण आहे. यापैकी अनेक मृत्यू हे कमी आणि मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये धूम्रपानाच्या वाढत्या दरामुळे झाले. धूम्रपान ही एक सवय झालेली दिसते.
”धूम्रपान ही जागतिक समस्या झालेली आहे. धूम्रपान जर कमी केले नाही, तर या शतकात धूम्रपानाशी संबंधित आजारांमुळे जागतिक स्तरावर एक अब्ज मृत्यू होतील,” असे हेझेल चीझमन, ॲक्शन ऑन स्मोकिंग अँड हेल्थ (एएसएच), यूकेआधारित सार्वजनिक आरोग्य धर्मादाय संस्थेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले.

हेही वाचा : चंद्रावर पोहोचण्याच्या कालावधीत ‘नासा’ आणि ‘इस्रो’मध्ये फरक का आहे ? ‘नासा’ ४ दिवसात तर ‘इस्रो’ला ४० दिवस का ?

धूम्रपानाचे व्यसन का आहे?

जेव्हा तुम्ही धूम्रपान करता तेव्हा जळणाऱ्या तंबाखूतून निकोटिन बाहेर पडते; जे फुप्फुसातून रक्तात प्रवेश करते.
निकोटिन मेंदूकडे पाठवले जाते. ते न्यूरॉन्सच्या पृष्ठभागावरील रिसेप्टर्स सक्रिय करते; ज्याला निकोटिनिक एसिटाइलकोलीन रिसेप्टर्स (Nicotinic acetylcholine receptors) म्हणतात. हे रिसेप्टर्स सक्रिय झाल्यामुळे मेंदूतील न्यूरोट्रान्समीटर या स्रावाला (Neurotransmitters) डोपामाइन (Dopamine) स्राव प्रसारित होण्यास चालना मिळते.

डोपामाइन (Dopamine)च्या प्रसारणामुळे व्यसन लागण्याची शक्यता असते. डोपामाइन मेंदूच्या विशिष्ट भागावर कार्य करते. तिथे मेंदूला उत्तेजना देणारी एक प्रणाली असते. या उत्तेजनेमुळे क्षणिक आनंद, चालना मिळते. मेंदूच्या या भागाला मेसोकॉर्टिकोलिंबिक सर्किट म्हणतात. निकोटिन डोपामाइन द्रवण्यास चालना देते. त्यामुळे व्यसन लागू शकते. डोपामाइनच्या प्रसारणामुळे मेंदूला क्षणिक बरे वाटते. या क्षणिक आनंदाच्या भावनेमुळे लोकांना धूम्रपान करावेसे वाटते.
म्हणून जेव्हा आपण धूम्रपान थांबवू इच्छितो, तेव्हा आपल्याला सिगारेट आणि त्यामुळे मेंदूला मिळणारा क्षणिक आनंद यांच्यातील संबंध तोडावा लागतो. मेंदूला त्या क्षणिक आनंदातून बरे वाटत असते. धूम्रपान सोडताना मेंदूला वाटणारा हा तात्पुरता आनंद कायमचा थांबतो. त्यामुळे चलबिचलता जाणवू शकते.

धूम्रपान थांबवतानाचे टप्पे

धूम्रपान सोडताना शारीरिक आणि मानसिक संघर्ष होत असतो. मानसिक गोष्टींमध्ये स्वयंशिस्त आणि इच्छाशक्ती या गोष्टींची आवश्यकता असते. धूम्रपान सोडताना तीन उपचारपद्धती आहेत. प्रथम, निकोटिन रिप्लेसमेंट थेरपी आहेत; ज्यामध्ये हिरड्या, हिरड्या आणि ओठांच्या मध्ये असणाऱ्या ग्रंथी हळूहळू धूम्रपानाची इच्छा कमी करतात. त्यानंतर व्हॅरेनिकलाइन व बुप्रोपियन यांसारखी औषधे आहेत. व्हॅरेनिकलाइन हे असे औषध आहे; जे डोपामाइन स्रवण्यास कारण ठरते. त्यामुळे धूम्रपानामुळे होणारे फायदे धूम्रपान न करताच मिळू लागतात. त्यामुळे धूम्रपान कमी होण्याची शक्यता असते. बुप्रोपियन त्याच प्रकारे कार्य करते. परंतु GABA म्हणून ओळखल्या जाणार्‍या वेगळ्या न्यूरोट्रान्समीटर प्रणालीद्वारे मुख्य न्यूरोट्रान्समीटर ते मेंदूच्या क्रियाकलापांना कमी करते. औषधोपचार हे अधिक महागडे उपचार असले तरी धूम्रपानाचे आरोग्यावर होणारे योग्य परिणाम पाहता, ते योग्यच वाटतात,” असे चीझमन म्हणाले.

ई-सिगारेट – चांगली की वाईट?

“धूम्रपान करताना ई-सिगारेट हाही उपाय आपल्याला दिसतो. ई-सिगारेट ही काही प्रमाणात सुरक्षित समजली जाते. ई-सिगारेट तुम्हाला धूम्रपान थांबवण्यास मदत करू शकते. याबाबत चांगला पुरावा आहे; परंतु ते वैद्यकीयदृष्ट्या त्याला परवानगी नाही. त्यामुळे त्याला औषधोपचार म्हणता येणार नाही,” असे चीझमन म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ”ई-सिगारेट अल्प कालावधीसाठी सुरक्षित आहे. परंतु, तो कायमस्वरूपी उपाय होत नाही. पारंपरिक सिगारेट ओढण्यापेक्षा ई-सिगारेट तुलनेने सुरक्षित आहे. ई-सिगारेटमुळे होणारे दुष्परिणाम हे कमी आहेत. परंतु, चिंतेची बाब अशी की, यामुळे ई-सिगारेटचे व्यसन निर्माण होऊ शकते. तंबाखूचे व्यसन लागण्यास ई-सिगारेट कारण ठरू शकते.

धूम्रपान सोडण्यासाठी कोणते उपाय करावेत?

संशोधकांच्या मते, धूम्रपान सोडण्यासाठी एकाच वेळी अनेक प्रयत्न करावेत. ७०० पेक्षा जास्त अभ्यासांच्या २०२० मेटा-विश्लेषणात असे आढळून आले की, एकाच वेळी अनेक पद्धती वापरल्यामुळे धूम्रपानाची सवय कमी होण्यास मदत होते. त्यासाठी उच्च इच्छाशक्ती अत्यंत आवश्यक आहे. स्वयंशिस्त पाहिजे. समुपदेशन, औषधोपचार या सर्वांची आवश्यकता असते.
धूम्रपान सोडण्याचा प्रत्येकाचा मार्ग वेगळा म्हणजे टर्कीमध्ये जाऊन राहणे. तेथील थंड वातावरणामुळे धूम्रपानाची इच्छा कमी होते. काही जण थंड टर्कीमध्ये जाऊ शकतात आणि धूम्रपान सोडू शकतात. इतरांना वर्षानुवर्षे धूम्रपान सोडण्यास लागतात. आता प्रश्न आहे की, धूम्रपान सोडण्याची तुमची किती इच्छाशक्ती आहे ?

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Want to quit smoking heres what the science says vvk
Show comments