वक्फ बोर्डाला दहा कोटींचा निधी मंजूर केल्यामुळे विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. यावर विश्व हिंदू परिषदेनेही नाराजी व्यक्त केली आहे. भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना असे दोन हिंदुत्ववादी पक्ष एकत्रित सत्तेत असताना हे कसे घडू शकते? त्यांना हिंदुत्वाचे वारस म्हणावे की नको, अशाप्रकारचे प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केले जात आहेत. याआधीही वक्फ बोर्डावरून कित्येकदा वाद झालेला आहे. वक्फ बोर्डाच्या अखत्यारित असणाऱ्या संपत्ती आणि तिच्या हस्तांतरणावरून बरेचदा वाद झालेले आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर वक्फ बोर्ड म्हणजे काय आणि त्याची स्थापना कधी झाली; अशाप्रकारच्या प्रश्नांची उत्तरे शोधणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा : मंदिरातून चोरीला गेलेल्या ५०० वर्षे जुन्या मूर्तीची घरवापसी; कोण होते हे जातीभेद न मानणारे हिंदू संत?

diwali crackers, air pollution, sound pollution
विश्लेषण : पर्यावरणपूरक फटाके म्हणजे काय? ते ठरवण्यासाठी कोणत्या चाचण्या घेतल्या जातात?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरेंकडून तीन जिल्हाप्रमुखांची हकालपट्टी; कारवाईचं कारण काय?
Panipat war Prisoners,पानिपतचे युद्ध
कथा.. पानिपतच्या मराठा युद्धकैद्यांची!
RBI 100 tonnes gold moved to india
RBI चं १०० टन सोनं लंडनमधून भारतात दाखल; का? कुठून? आणि कशी झाली वाहतूक? दिलं ‘हे’ कारण!
kolhapur lok sabha seat, Sanjay Mandlik, Clarifies Controversial, against shahu maharaj, opponents deliberately distorted statement, shahu maharaj adopted statement, kolhapur shahu maharaj, shivsena, congress,
माफी मागायचा प्रश्नच नाही; दत्तक वारस विरोधातील उग्र जनआंदोलनाचा इतिहास जाणून घ्यावा – संजय मंडलिक
marathi laungague, abhijat bhasha, classical language status, Politics
विश्लेषण : अखेर मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा… इतकी प्रतीक्षा का? निर्णयामागे राजकारण? पुढे काय होणार?
Ladki Bahin Yojana Suspend
Ladki Bahin Yojana : निवडणूक आयोगाचे लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारला महत्त्वाचे निर्देश!

वक्फ म्हणजे काय?

अल्लाह आणि इस्लामच्या नावावर धर्मादाय हेतूने दान केलेली संपत्ती म्हणजे ‘वक्फ’ होय. कायदेशीर भाषेत सांगायचे झाल्यास, इस्लामचे पालन करणाऱ्या व्यक्तीकडून कायमस्वरूपी दान केलेली मालमत्ता म्हणजे वक्फ होय. मग ही मालमत्ता स्थावर आणि जंगम अशा दोन्ही स्वरुपाची असू शकते. मुस्लिमांसाठी पवित्र, धार्मिक किंवा धर्मादाय ठरत असलेल्या कोणत्याही परोपकारी कारणासाठी ही संपत्ती दान केलेली असू शकते. ही मालमत्ता चांगल्या कामासाठी समाजाची मालमत्ता म्हणून ओळखली जाते आणि अल्लाहशिवाय कुणीही त्या मालमत्तेचे मालक असत नाही आणि होऊही शकत नाही, असे मानले जाते.

एखाद्या मालमत्तेचा दीर्घ कालावधीसाठी धार्मिक किंवा धर्मादाय हेतूंसाठी वापर केला जात असल्यास ती वक्फ मानली जाऊ शकते. या मालमत्तेचा वापर सामान्यत: शैक्षणिक संस्था, स्मशानभूमी, मशिदी आणि निवारा गृहे चालवण्यासाठी केला जातो. वक्फसाठी मालमत्ता देणाऱ्या व्यक्तीला आपली मालमत्ता परत घेता येत नाही. कायद्याने त्या मालमत्तेला कायम वक्फची मालमत्ता म्हणूनच संरक्षण मिळते. बिगरमुस्लीम व्यक्तीदेखील वक्फची मालमत्ता तयार करू शकतो. मात्र, त्या व्यक्तीने इस्लामचा पुरस्कार केला पाहिजे आणि वक्फ तयार करण्याचे तिचे उद्दिष्ट हे इस्लामिक मूल्यांशी संलग्न असले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी १९९८ मध्ये दिलेल्या आपल्या एका निर्णयामध्ये असे म्हटले होते की, “एकदा वक्फला दान केलेली मालमत्ता ही कायमस्वरुपी वक्फच्याच ताब्यात राहते.”

वक्फचा कारभार कसा चालतो?

भारतात वक्फ कायदा, १९९५ अन्वये वक्फचा कारभार चालवला जातो. या कायद्यांतर्गत सर्वेक्षण आयुक्त स्थानिक तपास करून, साक्षीदारांना बोलावून आणि सार्वजनिक कागदपत्रांची छाननी करून वक्फ म्हणून घोषित केलेल्या सर्व मालमत्तांची यादी करतात. ‘मुतवल्लीं’कडून वक्फच्या मालमत्तेचे व्यवस्थापन केले जाते. मुतवल्ली म्हणजे ‘व्यवस्थापन करणारा व्यक्ती’ होय. थोडक्यात, जो व्यक्ती वक्फच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करतो, त्याला मुतवल्ली म्हटले जाते. भारतीय विश्वस्त कायदा, १९८२ नुसार स्थापन केलेल्या ट्रस्टप्रमाणेच वक्फचीही स्थापना होते. मात्र, ट्रस्टचा हेतू हा धार्मिक आणि धर्मादाय हेतूंहून अधिक व्यापक असतो. शिवाय, तो विसर्जितही केला जाऊ शकतो. मात्र, वक्फ बोर्ड विसर्जित होत नाही.

हेही वाचा : केंद्रीय मंत्रिमंडळात किती मंत्री असावेत? तरतुदी काय आहेत?

वक्फ बोर्ड म्हणजे काय?

वक्फ बोर्डला कायद्याने मालमत्ता संपादन करण्याचा आणि आपल्याकडे ठेवण्याचा आणि अशी कोणतीही मालमत्ता हस्तांतरित करण्याचा अधिकार आहे. कायदेशीर संस्था अथवा व्यक्ती म्हणून वक्फला मान्यता असल्याने त्यांना एखाद्या वादावरून न्यायालयात खेचताही येऊ शकते तसेच ते देखील न्यायालयीन खटले दाखल करू शकतात. प्रत्येक राज्यामध्ये वक्फ बोर्ड अस्तित्वात असतो. त्याला एक अध्यक्षही असतो. वक्फ बोर्डामध्ये राज्य सरकारचे एक-दोन प्रतिनिधी, मुस्लीम आमदार, संसद सदस्य आणि राज्य बार कौन्सिलचे सदस्य यांचा समावेश असतो. तसेच यामध्ये इस्लामिक धर्मशास्त्राचे विद्वान आणि वक्फचे मुत्तवाली यांचादेखील समावेश असतो. वक्फ बोर्डाला कायद्यानुसार मालमत्तेचे प्रशासन करण्याचे अधिकार आहेत. कोणतीही गमावलेली मालमत्ता पुन्हा प्राप्त करण्यासाठी ते उपाययोजनाही करू शकते. तसेच वक्फ बोर्ड मालमत्तेची विक्री, भेट, गहाण, देवाणघेवाण किंवा भाडेपट्टीने वक्फच्या स्थावर मालमत्तेचे कोणतेही हस्तांतरण मंजूर करू शकते. मात्र, वक्फ बोर्डाच्या किमान दोन तृतीयांश सदस्यांनी अशा व्यवहाराच्या बाजूने मत दिल्याशिवाय त्याला मंजुरी दिली जात नाही.