इस्रायलच्या हेझबोलाविरोधी कारवाईस निषेधात्मक प्रत्युत्तर म्हणून इराणने १ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर १८० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला. या माऱ्याने इस्रायलचे फारसे नुकसान झालेले नसले, तरी एप्रिल महिन्यात इराणकडून झालेल्या अग्निबाण आणि ड्रोन वर्षावापेक्षा हा हल्ला अधिक सुनियोजित आणि गंभीर होता. या हल्ल्यास प्रत्युत्तर देण्याचा इरादा इस्रायलने जाहीर केला आहे. त्यामुळे येथून पुढे इराण आणि इस्रायल या कट्टर शत्रूंमध्ये थेट संघर्षाची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याचा पश्चिम आशियावर आणि भारतावर काय परिणाम होईल, आणखी एक युद्ध भडकल्यास त्याचे कोणते भीषण दुष्परिणाम भोगावे लागतील याचा आढावा…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
इराणकडून थेट हल्ला…
इराण आणि इस्रायल हे परस्परांचे कट्टर शत्रू आहेत. तरीदेखील दोन्ही देशांनी बरीच वर्षे परस्परांवर थेट हल्ला करण्याचे टाळले होते. ती परिस्थिती या वर्षी एप्रिल महिन्यात बदलली. इराणने इस्रायलवर असंख्य छोटे अग्निबाण आणि ड्रोनचा मारा केला. इस्रायलनेही प्रत्युत्तरादाखल इराणच्या मोक्याच्या शहरावर क्षेपणास्त्र हल्ला केला. यात मनुष्यहानी झाली नाही आणि दोन्ही हल्ल्यांचे स्वरूप बरेचसे प्रतीकात्मक होते. यावेळी मात्र तशी परिस्थिती नाही. इराणने जवळपास १८० छोट्या ते मध्यम क्षमतेच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा इस्रायलवर केला. इमाद आणि घदर या क्षेपणास्त्रांबरोबरच यावेळी इराणने फत्ते – २ या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचाही वापर केला. इराणच्या हल्ल्यामागील एक कारण इस्रायलने हेझबोला नेता हसन नसरल्लाची हत्या केल्याबद्दल बदला घेण्याचे आहे. पण त्या हल्ल्यात इराणचा लष्करी उपप्रमुख पदावरील जनरल अधिकारी मारला गेला होता. शिवाय काही आठवड्यांपूर्वी इराणची राजधानी तेहरान येथे हमास नेता इस्मायल हानियेची हत्या इस्रायलने घडवून आणली होती. त्याबद्दलही इराणकडून प्रत्युत्तर अपेक्षित होते.
हे ही वाचा… युद्ध इराण-इस्रायलचं, पण भुर्दंड जगाला! कच्च्या तेलाचे भाव वाढले, भारतावर नेमका काय परिणाम होणार?
इस्रायलकडून प्रतिसाद कसा असेल?
इस्रायलच्या पश्चिम आशिया धोरणाबाबत अमेरिकेसारख्या जुन्या-जाणत्या मित्रदेशाचे सल्ले पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी अलीकडे वारंवार दुर्लक्षित केले आहेत. हमासचा निःपात करण्यासाठी इस्रायलने गाझा पट्टीवर अंदाधुंद हल्ले केले, ज्यात जवळपास ४० हजारांहून अधिक नागरिक ठार झाले आहेत. पण हमासच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वफळीतील अनेक जणही यात ठार झाले, याकडे इस्रायल लक्ष वेधतो. इस्रायलच्या उत्तरेकडे लेबनॉनमध्ये हेझबोला या आणखी एका संघटनेच्या बिमोडासाठी इस्रायलने हल्ले तीव्र केले आहेत. हसन नसरल्ला आणि हेझबोलाच्या डझनभर कमांडरांना ठार करूनही इस्रायलने आता हेझबोलाच्या सर्वनाशासाठी लेबनॉनमध्ये सैन्य घुसवले आहे. येमेनमध्ये सक्रिय असलेल्या हुथी बंडखोरांविरोधात त्या देशात इस्रायलचे हवाई हल्ले सुरू आहेत. अशा परिस्थितीत इराणविरुद्ध तितक्यात तीव्रतेचे हल्ले सुरू करण्याची इस्रायलची क्षमता आहे का, याविषयी मतभेद आहेत. पण एप्रिलमध्ये इस्रायलच्या मर्यादित प्रत्युत्तरातही इराणची हवाई हल्लेविरोधी यंत्रणा खिळखिळी करण्यात इस्रायलला यश आले होते. शिवाय एप्रिलमध्ये इराणच्या गणितानुसार, इस्रायलकडून हल्ला झाल्यास लेबनॉनमधून हेझबोला सैन्य इस्रायलमध्ये घुसवण्याची योजना होती. आता हेझबोलाच खिळखिळी झाल्यामुळे ती योजना बारगळली. इराणमध्ये मर्यादित क्षेपणास्त्र हल्ले करण्याविषयी नेतान्याहू कित्येक वर्षे आग्रही होते. या हल्ल्याच्या निमित्ताने ती संधी चालून आल्याचे ते सांगू शकतात.
इस्रायलची सक्षम क्षेपणास्त्र बचाव यंत्रणा
इस्रायल हा क्षेपणास्त्र बचाव प्रणालीच्या बाबतीत जगात अमेरिका, रशिया, चीनपाठोपाठ सक्षम देश मानला जातो. दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे भेदण्यासाठी इस्रायलने अमेरिकेच्या बरोबरीने अॅरो-थ्री प्रणाली विकसित केली आहे. मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांपासून बचाव करण्यासाठी डेव्हिड्स स्लिंग आणि अॅरो-टू प्रणाली आहे. तर कमी क्षमतेच्या आणि लघू पल्ल्याच्या क्षेपणास्त्र व ड्रोनपासून बचावासाठी आयर्न डोम ही सुपरिचित प्रणाली इस्रायल वापरते.
इराणकडील क्षेपणास्त्रे
दोन वर्षांपूर्वी अमेरिकेच्या एका अंदाजानुसार, इराणकडे ३००० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत. दरम्यानच्या काळात त्यात वाढ झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. ताज्या घटनेत इस्रायलवर त्यांनी १८० क्षेपणास्त्रे डागली, पण यातून अपेक्षित परिणाम साधलेला नाही. त्यामुळे अशा प्रकारे आणखी किती काळ इराण क्षेपणास्त्रे व्यतीत करणार हा प्रश्न आहे. दुसरीकडे, इस्रायली क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा सक्षम असली, तरी महागडी आहे. क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेसाठी मुख्य घटक क्षेपणास्त्रे हाच असतो. इस्रायलच्या दिशेने इराणमे डागलेली काही क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या युद्धनौकांनी हवेत नष्ट केली. तसेच इराणकडून असा हल्ला होणार, असा इशारा अमेरिकेने दिला होता. असा इशारा दरवेळी मिळेलच असे नाही. पण प्रत्येक वेळी इराण, हुथी आणि हेझबोला यांच्याकडून क्षेपणास्त्र हल्ले रोखण्याचे धोरण इस्रायललाही परवडण्यासारखे नाही. इराणने त्यांच्याकडील काही क्षेपणास्त्रे रशियाच्या मदतीसाठी धाडली आहेत. याचा अर्थ त्या देशाकडे क्षेपणास्त्रांचा साठा बऱ्यापैकी असू शकतो आणि तो इस्रायलसाठी विध्वंसक ठरू शकतो अशी शक्यता काही विश्लेषक व्यक्त करतात.
हे ही वाचा… इराण विरुद्ध इस्रायल : कोणाचं सैन्य अधिक शक्तिशाली? कोण ठरणार वरचढ?
इराण वि. इस्रायल
इराण आणि इस्रायल या दोन्ही पश्चिम आशियातील सर्वांत मोठ्या लष्करी सत्ता आहेत. इराणमध्ये मध्यंतरी मसूद पेझेश्कियान हे मवाळ गृहस्थ अध्यक्षपदी विराजमान झाले. पण याचा कोणताही परिणाम त्या देशाच्या इस्रायल-विषयक आक्रमक धोरणांमध्ये झालेला दिसून येत नाही. इस्रायल ज्या दहशतवादी आणि बंडखोर गटांविरुद्ध लढत आहे – हमास, हेझबोला, हुथी – त्यांचा प्रणेता इराण आहे. एके काळी इस्रायलचे अरब देशांशी हाडवैर होते. त्या बहुतेक देशांशी इस्रायलने जुळवून घेतले आहे. याउलट शियाबहुल इराणला शत्रू मानणाऱ्या सौदी अरेबिया आणि इतर सुन्नीबहुल अरब देशांनी पॅलेस्टिनी मुद्द्यावर इस्रायलला तितक्या तीव्रतेने घेरलेले नाही हे लक्षणीय आहे. इराण आणि इस्रायल या दोन देशांमध्ये थेट युद्धाचा भडका उडण्याची शक्यता धूसर आहे. कारण तेलनिर्मिती केंद्रे आणि जागतिक व्यापारी मार्ग, तसेच दुबईसारखे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र या टापूत असल्यामुळे जागतिक स्थैर्य आणि अर्थव्यवस्थेसाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे अमेरिका आणि चीन हे या टापूत मोठी गुंंतवणूक असलेले देश मध्यस्थी करणार हे नक्की. तरीदेखील दोन्ही देशांच्या लष्करांची तुलना करायची झाल्यास, इस्रायलकडे १,७०,००० खडे सैन्य, ४,६५,००० राखीव सैन्य आणि ३५००० निमलष्करी सैनिक आहेत. त्या तुलनेत इराणकडे अधिक म्हणजे ६,१०,००० खडे सैन्य, ३,५०,००० राखीव सैन्य आणि २,२०,००० निमलष्करी सैनिक आहेत. पण दोन्ही देश परस्परांपासून खूप दूर असल्यामुळे त्यांची सैन्ये थेट भिडण्याची शक्यता जवळपास शून्य आहे. याउलट दूरस्थ युद्धामध्ये इस्रायलचा वरचष्मा दिसून येतो. इस्रायलकडे २४१ लढाऊ विमाने आणि ४८ लढाऊ हेलिकॉप्टर आहेत. याउलट इराणकडे अनुक्रमे १८६ आणि १२९ लढाऊ विमाने आणि लढाऊ हेलिकॉप्टर आहेत. इस्रायलकडे अमेरिकी बनावटीची विमाने प्राधान्याने आहेत. तुलनेने इराणकडे जुनी सोव्हिएत बनावटीची लढाऊ विमाने आहेत. इस्रायलच्या तुलनेत इराणचे नौदल संख्यात्मकदृष्ट्या मोठे आहे. पण क्षेपणास्त्रे आणि क्षेपणास्त्र बजाव प्रणालीच्या बाबतीत इस्रायलचे वर्चस्व दिसून येते.
भारताची भूमिका काय राहील?
इस्रायलशी भारताची गेल्या काही वर्षांची घनिष्ठ मैत्री आहे. पण इराणकडून पूर्वी भारताला स्वस्त खनिज तेल मिळायचे. निर्बंध हटल्यास ते पुन्हा मिळू शकते. शिवाय इराणचा चाबहार बंदर विकास प्रकल्प भारताकडून राबवला जात आहे. शिवाय या दोन देशांमध्ये अतिशय जुने सांस्कृतिक संबंध आहेत. त्यामुळे युद्ध भडकल्यास कोणा एका देशाची बाजू भारत घेण्याची शक्यता नाही. तटस्थ परराष्ट्र धोरण आणि युद्धाऐवजी चर्चेने प्रश्न सोडवण्याची भूमिका यात बदल होण्याची शक्यता नाही.