रेश्मा भुजबळ

गेल्या काही दिवसांपासून ‘वारिस पंजाब दे’ हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आहे. कट्टरपंथी नेता अमृतपाल सिंग आणि त्याच्या शेकडो समर्थकांनी गुरुवारी अमृतसरमधील अजनाला पोलीस ठाण्याबाहेर तलवारी आणि बंदुका घेऊन पोलिसांशी झटापट केली. तसेच पोलीस ठाण्यात घुसखोरीही केली. एका अपहरण प्रकरणात अमृपालचा निकटवर्ती तुफानसिंगला पोलिसांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी हा प्रकार करण्यात आला. अमृतपाल सिंग आणि त्याच्या समर्थकांचा उद्रेक पाहून पोलिसांना तुफानसिंगची सुटका करावी लागली.

vidarbh election
विदर्भातील निवडणूक रिंगणात कोण कोणाचे नातेवाईक ?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Russian Modi Industry group company Tata Steel Career
बाजारातली माणसं – पोलाद घडवणारे धारदार व्यक्तित्व : रुसी मोदी
kiran samant
राजापूर विधानसभेसाठी शिंदे गटाचे किरण सामंत आणि ठाकरे गटाचे राजन साळवी यांचा उमदेवारी अर्ज दाखल
The position taken by the Court and Chief Justice Dhananjay Chandrachud
घ्यायला हवी तिथे कणखर भूमिका घेतली नाही, यासाठी सरन्यायाधीशांना लक्षात ठेवायचे का?
Anti farmer ideology of Modi government
लेख : शेतकरीहिताची ‘चित्रफीत’; राष्ट्रहित की मित्रहित?
sc judge Sanjeev Khanna verdict on secularism
अन्वयार्थ : ‘सेक्युलर’विरोधात स्वामी, उपाध्याय…
Nana Patole, rebellion in Congress, Nana Patole news,
नाना पटोलेंच्या गृहजिल्ह्यात काँग्रेसमध्ये बंडखोरीचे वारे, नेमके कारण काय?

अमृतपाल सिंग कोण आहे ?

अमृतपाल सिंग (२९) हा खलिस्तान समर्थक दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रनवालेचा स्वयंधोषित अनुयायी आहे. अमृतपालला सध्या पंजाबमध्ये ‘भिंद्रनवाले २.०’ म्हणून ओळखले जात आहे. अमृतपाल हा दुबईत राहत होता. ‘वारिस पंजाब दे’चा संस्थापक दीप सिद्धू याच्या मृत्यूनंतर संघटनेची धुरा सांभाळण्यासाठी गेल्या वर्षी तो पंजाबमध्ये परत आला.

‘वारिस पंजाब दे’ काय आहे?

पंजाबमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी ३० सप्टेंबर २०२१ रोजी वकील, अभिनेता तसेच कार्यकर्ता दीप सिद्धू याने ‘वारिस पंजाब दे’ नावाची संघटना स्थापन केली. याचा अर्थ ‘पंजाबचा वारस’ असा होतो. पंजाबचे अधिकार, हक्क यांचे संरक्षण आणि सामाजिक समस्यांविरोधात लढा देण्यासाठी या सामाजिक संघटनेची निर्मिती करण्यात आली होती. अनेक तरुण या संघटनेशी जोडले गेले.

दीप सिद्धू कधी प्रसिद्धिझोतात आला?

दीप सिद्धू प्रथम २०२० मध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान प्रसिद्धीझोतात आला. २६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताक दिनादिवशी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारात दीप सिद्धूचे नाव समोर आले. त्यावेळी त्याने लाल किल्ल्यावर शीख ध्वज फडकवला होता. त्यानंतर आठ महिन्यांनी म्हणजेच सप्टेंबर २०२१मध्ये सिद्धूने वारिस पंजाब देची स्थापना केली. या संघटनेच्या स्थापनेमागचा उद्देश सांगताना, सिद्धू म्हणाला होता, “संघटनेचा कोणताही राजकीय अजेंडा नाही. सध्याच्या स्थितीत पंजाबच्या सामाजिक स्थितीवर जे असमाधानी आहेत त्यांसाठी हे व्यासपीठ असेल.आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थक नाही. मात्र, पंजाब आणि त्याच्या हक्कांबद्दल आवाज उठवणाऱ्या राजकीय पक्षाला ही संघटना निवडणुकीत पाठिंबा देईल..”

सिद्धूने सिमरनजीत सिंग मान यांच्या खलिस्तान समर्थक पक्षाला निवडणुकीत पाठिंबा दिला आणि पंजाब निवडणुकीपूर्वी त्यांचा प्रचारही केला. मात्र, १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पंजाबमधील निवडणुकीपूर्वी सिद्धूचा रस्ता अपघातात मृत्यू झाला.

अमृतपाल सिंग ‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख कसा झाला?

भिंद्रनवालेप्रमाणे पेहराव करून दुबईहून परतलेल्या अमृतपालने संस्थेच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली आणि मोगा जिल्ह्यातील रोड येथे ‘दस्तर बंदी’ सोहळ्याचे आयोजन केले, तेव्हा २९ सप्टेंबर २०२२ रोजी ‘वारिस पंजाब दे’ संघटना पुन्हा एकदा चर्चेत आली. मोगा हे जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचे वडिलोपार्जित गाव आहे. या सोहळ्याला हजारो लोक उपस्थित होते. या वेळी खलिस्तान समर्थक घोषणा देण्यात आल्या. अमृतपालने स्वतःला दीप सिद्धूच्या संघटनेचा प्रमुख म्हणून घोषित केले.

अमृतपालबद्दल सिद्धूच्या कुटुंबीयांचे म्हणणे काय?

अमृतपालबद्दल दीप सिद्धूच्या कुटुंबीयांनी सांगितले की, “दीप सिद्धूने अमृतपालला कधीही संस्थेचे प्रमुख म्हणून नियुक्त केले नव्हते. दुबईहून अचानक येणाऱ्या व्यक्तीने अचानक ‘वारिस पंजाब दे’ची सूत्रे कशी हाती घेतली हे त्यांना कळत नाही.”

“आम्ही अमृतपालला यापूर्वी कधीही भेटलो नाही. दीपही त्याला भेटला नव्हता. अमृतपाल काही काळ दीपशी दूरध्वनीद्वारे संपर्कात होता. मात्र, नंतर दीपने त्याला ब्लॉक केले. त्याने स्वतःला माझ्या भावाच्या संघटनेचे प्रमुख कसे घोषित केले हे आम्हाला माहित नाही. तो आमच्या नावाचा गैरवापर करून समाजकंटकांना प्रोत्साहन देत आहे. अमृतपालने माझ्या भावाचे ‘सोशल मीडिया अकाउंट अॅक्सेस’ केले आणि त्यावर पोस्ट करायला सुरुवात केली, ” असे लुधियानास्थित वकील आणि दीप सिद्धूचा भाऊ मनदीप सिंग सिद्धू यांनी सांगितले.

अमृतपाल गटाचा दावा काय?

दुसरीकडे, अमृतपालचे काका हरजीत सिंह यांनी दावा केला की, सिद्धूच्या समर्थकांनीच अमृतपालला संघटनेचे प्रमुख बनवले. सिद्धूचा भाऊ आणि कुटुंबीय अमृतपालला समर्थन का देत नाहीत, हे आम्हाला समजलेले नाही.

दुसरीकडे मनदीप सिंगचे म्हणणे आहे की, सध्या एकाच नावाने दोन समांतर संस्था सुरू आहेत. सिद्धूने बनवलेल्या मूळ ‘वारिस पंजाब दे’चे नेतृत्व हरनेक सिंग उप्पल करत आहेत. तर दुसऱ्या संघटनेचे नेतृत्व अमृतपाल करत असून आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.