२०५० पर्यंत अर्ध्या जगाला पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तिसरे युद्ध होईल तर पाण्यासाठीच असे अनेकदा बोलले जाते. खुद्द तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एका भाषणादरम्यान बोलून दाखवले होते की, लोकांना वेळीच पाण्याचे महत्त्व कळाले नाही, तर पुढील महायुद्ध पाण्यासाठी होईल. अशीच काहीशी परिस्थिती आता अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये पाण्यामुळे वाद निर्माण झाला आहे. हा वाद युद्धाचे स्वरूप घेऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मेक्सिकोतील कोलोरॅडो नदी आणि रिओ ग्रांडेचे पाणी ८० वर्षांच्या जुन्या करारानुसार दोन्ही राष्ट्रे वाटून घेतात. परंतु, मेक्सिकोला भीषण उष्णतेच्या लाटेमुळे तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मेक्सिकोतील राजकारण्यांचे म्हणणे आहे की, हा देश करारातील अटींनुसार जगू शकणार नाही. मेक्सिकोतील जलसंकट काय आहे? या जलसंकटामुळे देशाला कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे? खरंच या दोन राष्ट्रांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणार का? याविषयी जाणून घेऊ या.

shinde shiv sena door open to bjp rebels in navi mumbai
भाजपविरोधी बंडखोरांना शिंदे गटाचे दार खुले? पालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी व्यूहरचना
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
Mother strangled her child shocking video viral on social media
आई की वैरीण? चिमुकल्या मुलाला जमिनीवर झोपवलं, गळा आवळला अन्… VIDEO पाहून होईल काळजाचं पाणी पाणी
pune water planning delayed due to absence of Guardian Minister
Pune Water planning : पालकमंत्री नसल्याने पाणी नियोजन लांबणीवर
Pune Water Supply, Water Resources Department,
पुण्याच्या पाण्याचे नियंत्रण जाणार जलसंपदा विभागाच्या ताब्यात? नक्की काय आहे कारण !
मेक्सिकोतील कोलोरॅडो नदी आणि रिओ ग्रांडेचे पाणी ८० वर्षांच्या जुन्या करारानुसार दोन्ही राष्ट्रे वाटून घेतात. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : ‘या’ आशियाई देशातही समलैंगिक विवाहास मान्यता; आतापर्यंत कोणकोणत्या देशांनी दिली समलैंगिक विवाहाला मान्यता?

नेमका हा विषय काय?

१९४४ साली दोन्ही देशांनी एका करारावर स्वाक्षरी केली होती. या करारात असे नमूद केले आहे की, मेक्सिकोने टेक्सास सीमेवर देशांच्या दोन धरणांमधून दर पाच वर्षांनी अमेरिकेला पाणी हस्तांतरित करणे आवश्यक आहे. मेक्सिकोला दर पाच वर्षांनी रिओ ग्रांडेमधून १.७५ दशलक्ष एकर-फूट पाणी अमेरिकेला पाठवणे आवश्यक आहे. या करारात दिल्याप्रमाणे अमेरिकेनेही दरवर्षी कोलोरॅडो नदीतून मेक्सिकोला १.५ दशलक्ष एकर-फूट पाणी पाठवणे आवश्यक आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’नुसार, मेक्सिकोला दरवर्षी एक दशलक्ष घरांची पाण्याची गरज भागवण्यासाठी पुरेसे पाणी अमेरिकेला पाठवावे लागते.

‘सीएनएन’नुसार, मेक्सिकोने पाठवलेले पाणी फाल्कन आणि ॲमिस्टॅड जलाशयांमध्ये जमा केले जाते. हे दोन जलाशय देशांच्या सीमेवरील घरे आणि शेतात पाणी पोहोचवतात. जूनच्या मध्यात दोन्ही जलाशयांतील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात खाली गेला. इतिहासात पहिल्यांदाच असे काही घडले. या काळात मेक्सिकोने अमेरिकेला केवळ ३० टक्के पाणी पुरवले, जे अपेक्षेपेक्षा कमी होते. आंतरराष्ट्रीय सीमा आणि जल आयोगच्या डेटानुसार, १९९२ पासून पहिल्यांदाच इतके कमी पाणी अमेरिकेला पाठवण्यात आले. मेक्सिकोमध्ये पाण्याची समस्या भीषण आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि वाढत्या तापमानामुळे देश ‘डे झिरो’च्या दिशेने जात आहे.

पिण्याच्या पाण्याअभावी आजूबाजूच्या काही रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. “उत्तर मेक्सिकोमधील अनेक धरणांच्या अत्यंत कमी पातळीत आणि भूजल पातळीतही याचा परिणाम दिसून येतो,” असे मेक्सिकोच्या नॅशनल ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीचे हवामान शास्त्रज्ञ व्हिक्टर मॅगाना रुएडा यांनी ‘सीएनएन’ला सांगितले. चिहुआहुआ राज्यात फेब्रुवारीपासून दुष्काळी परिस्थिती आहे. “आठ महिन्यांपेक्षा जास्त काळात पावसाचा एक थेंबही पडला नाही,” असे चिहुआहुआमधील साल्वाडोर अल्कंटर यांनी ‘सीएनएन’ला सांगितले. मेक्सिकोच्या राष्ट्रीय जल प्राधिकरण, कोनागुआने म्हटले आहे की, तीव्र दुष्काळ अधिक गंभीर झाला आहे आणि देश २०११ पासून सर्वात वाईट दुष्काळी परिस्थितीचा सामना करत आहे.

रिओ ग्रांडे नदी धोक्यात

मेक्सिकोसाठी आणखी एक समस्या म्हणजे रिओ ग्रांडे नदीतील अपुरे पाणी. रिओ ग्रांडेचा स्पॅनिशमध्ये अर्थ होतो, ‘मोठी नदी’. ही उत्तर अमेरिकेतील सर्वात लांब नदी आहे, जिथून लाखो लोकांना पिण्याचे पाणी आणि हजारो शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी पुरवले जाते. पण, आता या नदीला अमेरिका खंडातील सर्वात धोक्यात असलेली नदी असे नाव देण्यात आले आहे. ‘द कॉन्व्हर्सेशन’नुसार, अमेरिका आणि मेक्सिको हे दोन्ही देश नदीचे पाणी वळवण्याबद्दल दोषी आहेत. आंतरराष्ट्रीय सीमा आणि जल आयोगाच्या मेक्सिकन विभागाचे सचिव मॅन्युएल मोरालेस म्हणाले की, मेक्सिको आपल्या वचनबद्धतेचे पालन करण्यासाठी काम करत आहे, परंतु पाण्याची कमतरता हवामान बदलामुळे निर्माण झाली आहे. तर सीमेपलीकडील शेतकरी म्हणतात की, ते देखील मोठ्या संकटात आहेत. टेक्सासच्या शेतकरी गटाने शेती संकटाचा इशारा दिला आहे.

मेक्सिकोतील कोलोरॅडो नदी आणि रिओ ग्रांडेचे पाणी ८० वर्षांच्या जुन्या करारानुसार दोन्ही राष्ट्रे वाटून घेतात. (छायाचित्र-रॉयटर्स)

टेक्सासचा संपूर्ण लिंबूवर्गीय उद्योग मेक्सिकोच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. विशेषत: या प्रदेशात दुष्काळी परिस्थिती अधिक गंभीर होत आहे, असे टेक्सास सायट्रस म्युच्युअल उद्योग समूहाचे अध्यक्ष डेल मर्डेन यांनी सांगितले. टेक्सास हे कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडा नंतर तिसरे मोठे लिंबूवर्गीय राज्य आहे. टेक्सासमधील शेवटची साखर मिल पाण्याच्या कमतरतेमुळे बंद झाली आहे. “साखर उद्योग टेक्सासने गमावला आहे,” असे टेक्सास फार्म ब्युरोचे सदस्य शेतकरी ब्रायन जोन्स यांनी सीएनएनला सांगितले.

टेक्सासमधील यूएस प्रतिनिधी मोनिका डे ला क्रूझ यांनी रॉयटर्सला सांगितले की, “या पाण्याचा परिणाम केवळ शेतकऱ्यांवरच होत नाही, तर आपल्या समाजातील नागरिकांच्या रोजगारावरही होत आहे.” त्या पुढे म्हणाल्या की, “मेक्सिकोला माहीत आहे की हा केवळ आमच्या जिल्ह्यासाठीच नाही तर संपूर्ण अमेरिकेसाठी एक महत्त्वाचा विषय आहे, याची खात्री करण्यासाठी ते शक्य तितका प्रयत्न करत आहेत.”

“टेक्सास ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा हंगाम अत्यंत निराशाजनक आहे,” असे रिओ ग्रॅन्डे व्हॅली शुगर ग्रोअर्सचे अध्यक्ष आणि सीईओ शॉन ब्राशियर म्हणाले. मेक्सिकोच्या पाण्याच्या कमतरतेमुळे ५१ वर्षांनंतर या समूहाने फेब्रुवारीमध्ये सांता रोसा, टेक्सासमधील साखर कारखाना बंद केला. अमेरिकेतील आयबीडब्ल्यूसीचे प्रवक्ते फ्रँक फिशर म्हणाले की, विश्वासार्हता वाढवण्याच्या आशेने कराराच्या पैलूंवर फेरनिविदा करण्यासाठी २०२३ पासून दोन्ही देशांतील आयोगाचे अधिकारी अनेकदा भेटले आहेत. फिशर म्हणाले की, दोन्ही देशांना अलीकडच्या दशकांमध्ये शेतीसाठी पाण्याची कमतरता भासत आहे.

हेही वाचा : आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या जोशीमठचे नामांतर; कारण काय? या जागेचे धार्मिक महत्त्व काय?

तज्ज्ञ काय सांगतात?

ऍरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या केवायएल सेंटर फॉर वॉटर पॉलिसीच्या संचालक सारा पोर्टर यांनी सीएनएनला सांगितले की, लोकांना ठराविक प्रमाणात पाण्याची सवय झाली आहे. लोकांची ही सवय बदलणे अत्यंत कठीण असते. आंतरराष्ट्रीय सीमा आणि जल आयोगाच्या अमेरिकन आयुक्त मारिया एलेना गिनर यांनी आउटलेटला सांगितले, “आम्ही मेक्सिकोला त्यांची तूट आत्ता कशी भरून काढणार आहे याबद्दलच्या योजनेसाठी विचारले आहे. परंतु, त्यांनी सांगितले की वितरण करण्यासाठी पाणी नसल्यास, आम्ही काहीही करू शकत नाही.” मेक्सिकोचे नेते म्हणतात की, त्यांच्या हातात काहीही नाही. जर पाणीच नसेल, तर आपण काय अपेक्षा करू शकतो? कोणाकडेही जे नाही ते देण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, ” असे ते म्हणाले.

Story img Loader