गोळीबाराच्या घटना रोजच आपल्या वाचनात येत असतात. माध्यमांमधून त्यासंदर्भात वृत्तांकन होत असतं. पण सामान्य माणसाच्या विचारातही नसलेली शस्त्र हल्लेखोरांना अगदी सहज उपलब्ध कशी आणि कुठून होतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. ही सगळी शस्त्र बेकायदा पद्धतीनेच हस्तगत केलेली असतात हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. पण अधिकृतपणे, कायदेशीररीत्या आणि कागदोपत्री परवानगीने एखाद्या व्यक्तीला स्वत:जवळ शस्त्र बाळगणं शक्य आहे. नियमात ठरवून दिलेल्या प्रसंगी ते वापरण्याचीही परवानगी असते. पण असे शस्त्र बाळगण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टींची पूर्तता करावी लागते? शस्त्र परवान्यासाठी नेमके काय आहेत नियम?

काही दिवसांपूर्वी शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान गोळीबार केल्याची घटना घडली. त्यांनी जमिनीवर गोळीबार केल्याचं नंतर पोलीस तपासात पुढे आलं. मात्र, पोलिसांनी नियमाचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करत पिस्तुल जप्त केलं. त्यांचा बंदूक परवाना देखील रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अभिनेता सलमान खान याला बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी आल्यापासून त्यानंही शस्त्र परवाना मिळावा, यासाठी विनंती अर्ज केला आहे. दोन आठवड्यांपूर्वी लखनऊमधील आमदार अब्बास अन्सारी यांच्यावर शस्त्रपरवाना नियमावलीचं वारंवार उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली. त्यामुळे शस्त्र बाळगण्याच्या परवानगीसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे.

Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Nagpur bench of Bombay High Court grants bail to one accused in four-year-old boy kidnapping case
न्यायालय म्हणाले,‘आरोपीच्या हक्कांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य’…
Should a divorced wife receive maintenance under any circumstances
घटस्फोटीत पत्नीला कोणत्याही परिस्थितीत निर्वाहनिधी मिळालाच पाहिजे का?
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
11 thousand crores to BEST in the last decade Mumbai Municipal Corporation administration rejects allegations of treating the initiative with contempt Mumbai print news
गेल्या दशकात ‘बेस्ट’ला ११ हजार कोटी; उपक्रमाला सापत्न वागणूक दिल्याचा आरोप मुंबई महानगरपालिका प्रशासनाला अमान्य

कुणाला मिळू शकतो शस्त्र परवाना?

अधिकृतरीत्या शस्त्र बाळगण्याची सुविधा उपलब्ध असली, तरी कुणालाही ती परवानगी मिळत नाही. शस्त्र परवाना मिळवण्याच्या नियमावलीमध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. एखाद्या नागरिकाला त्याच्या जीविताला धोका आहे असं वाटत असेल, तर ती व्यक्ती शस्त्र परवान्यासाठी अर्ज करू शकते.अशा व्यक्तींना स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळू शकतो. याशिवाय, सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित कर्मचारी, अधिकाऱ्यांनाही शस्त्र बाळगण्याचा परवाना नियमावलीची पूर्तता केल्यानंतर दिला जातो.

विश्लेषण : फेडररपर्व संपणार… टेनिसविश्वात तो का ठरला सर्वोत्तम?

काय आहे शस्त्र परवाना मिळवण्याची प्रक्रिया?

शस्त्र परवाना मिळण्याची प्रक्रिया अनेक टप्प्यांची आहे. कोणत्याही नागरिकाला शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळण्याची तरतूद आर्म्स अॅक्ट २०१६मध्ये कऱण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीला त्याच्या जीविताला धोका आहे असं वाटत असल्यास त्या व्यक्तीला त्यासंदर्भात आधी पोलिसांत FIR दाखल करावा लागतो. त्यानंतर त्या व्यक्तीला संबंधित जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांकडे ऑनलाईन पोर्टलवरून शस्त्र परवाना मिळण्यासंदर्भात अर्ज दाखल करावा लागतो.

ऑनलाईन अर्ज आल्यानंतर त्या व्यक्तीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी केली जाते. संबंधित व्यक्तीविरोधात गंभीर गुन्हा दाखल असल्यास त्याला परवाना मिळत नाही. पोलीस अधिक्षक त्यानुसार निर्णय गेतात. ज्या व्यक्तीला परवाना हवा आहे, त्याच्याबाबतची सखोल चौकशी केली जाते. त्या व्यक्तीची पूर्ण माहिती घेतली जाते.

विश्लेषण : चित्त्यांच्या आगमनाची उत्सुकता… आणि काही अनुत्तरित प्रश्नही!

ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर संबंधित व्यक्तीला पोलीस अधिक्षक मुलाखतीसाठी बोलावतात. यावेळी संबंधित व्यक्तीची पूर्ण चौकशी केली जाते. तसेच, या व्यक्तीच्या मानसिक आरोग्याची देखील तपासणी केली जाते. यानंतर हा अहवाल एनसीआरबीला आणि गुन्हे शाखेला पाठवला जातो. त्यावर संबंधित यंत्रणांकडून ग्रीन सिग्नल आल्यावर सदर व्यक्तीला शस्त्र परवाना दिला जातो.

परवाना मिळाल्यानंतर संबंधित व्यक्ती शस्त्र निर्मिती करणाऱ्या अधिकृत कंपन्यांकडून शस्त्र खरेदी करू शकते. खरेदीनंतर या शस्त्राची रीतसर नोंदणीही करणं बंधनकारक असतं.

Story img Loader