बर्फाळ प्रदेशातल्या आईसलँडमध्ये बुधवारी (२९ मे) ज्वालामुखीचा उद्रेक झाला, ज्यामुळे आसपासची लहान गावे खाली करण्यात आली आणि नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. राजधानी रेकजाविकच्या दक्षिणेला असलेल्या ज्वालामुखीत गेल्या वर्षीच्या डिसेंबरपासून पाचवेळा उद्रेक झाले आहेत. या परिसरात जवळपासच्या गावांमध्येही जमिनीला तडे गेले आहेत. जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींमध्ये आइसलँडमधील ज्वालामुखीचाही समावेश आहे. दर चार ते पाच वर्षांनी या ज्वालामुखीत भयंकर स्फोट होतात आणि लावा बाहेर वाहू लागतो. परंतु, २०२१ पासून ज्वालामुखीमध्ये होणार्या स्फोटाचे प्रमाण वाढले आहे. ज्वालामुखी म्हणजे काय? त्याचे प्रकार कोणते आणि उद्रेकाची कारणं काय? यावर एक नजर टाकू या.
हेही वाचा : पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील रत्नभांडारातील चावीचे गूढ; रत्नभांडारात दडलंय तरी काय?
ज्वालामुखी म्हणजे काय?
अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, ज्वालामुखी ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारी नैसर्गिक विवरे आहेत. त्यात स्फोट झाल्यास त्यातून खडक, शिलारस, राख, वायू बाहेर पडतात. ज्वालामुखी जमिनीसह समुद्रातही असतात. भूकवचातील भेगेतून किंवा छिद्राद्वारे पृथ्वीच्या अंतरंगातून खडक, शिलारस, राख, वायू आदींच्या पृष्ठभागावर येण्याच्या मार्गालाच ज्वालामुखी (Volcano) म्हणतात.
नासाच्या म्हणण्यानुसार, शिलारस (Magma) तीन वेगवेगळ्या कारणांमुळे स्फोटकरीत्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतो. पहिले कारण म्हणजे टेक्टोनिक प्लेट्सची (भूपट्ट) हालचाल. जिथे दोन भूपट्ट एकत्र येतात तिथे जास्त घनता असलेला भूपट्ट दुसर्या भूपट्टाखाली आल्यास वितळतो आणि त्याचे रूपांतर शिलारसात होते. अशा स्थितीत शिलारस पृष्ठभागाकडे येण्याचा प्रयत्न करतो. परिणामी स्फोट होऊन शिलारस पृष्ठभागावर येतो. अशावेळी पाण्याखाली ज्वालामुखी तयार होऊ शकतात.
दुसरे कारण म्हणजे जेव्हा भूपट्ट एकमेकांपासून दूर जातात, तेव्हा शिलारस त्यांच्या भेगेतून वर येण्याचा प्रयत्न करतो. त्यापासून नवीन खडक तयार होतात, त्याला खचदरीय ज्वालामुखी म्हणतात. आइसलँडमधील ज्वालामुखी त्याचे एक उदाहरण आहे. तिसरे कारण भूपट्ट प्रक्रियेशी संबंधित नाही. पृथ्वीच्या खोलवर तयार होणार्या शिलारसात वाढ होत जाते. शिलारस थेट पृष्ठभागापर्यंत पोहोचल्यावर उद्रेक होतात.
ज्वालामुखीचे विविध प्रकार कोणते?
ब्रिटीश भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, ज्वालामुखीचे प्रकार शिलारसातील चिकटपणा, शिलारसामधील वायूचे प्रमाण, त्याची रचना आणि शिलारस पृष्ठभागावर पोहोचण्याचा मार्ग यावर अवलंबून असतात.ज्वालामुखीच्या प्रकारांमध्ये केंद्रीय ज्वालामुखी, भेगीय ज्वालामुखी, जागृत आणि मृत ज्वालामुखी व सुप्त ज्वालामुखीचा समावेश आहे. हे प्रकार ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या स्वरूपावरुन आणि त्यांच्या कालावधीवरून पडतात.
हेही वाचा : ‘अग्निबाण’ची झेप यशस्वी; रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण भारतासाठी किती महत्त्वाचे?
आइसलँड ज्वालामुखी इतका सक्रिय का?
आइसलँड उत्तर अटलांटिक महासागराच्या मध्य-अटलांटिक रिजवर (जगातील सर्वात लांब पर्वतश्रेणीचा भाग) वर वसला आहे, जेथे युरेशियन आणि उत्तर अमेरिकन भूपट्टे दरवर्षी काही सेंटीमीटर अंतराने सरकत आहेत. ब्रिटनच्या हवामानशास्त्र कार्यालयाने म्हटले, “यामुळे जमिनीला भेगा तयार होत आहेत आणि वितळलेले खडक किंवा शिलारस पृष्ठभागावर येत आहेत आणि उद्रेक झाल्यामुळे लाव्हा आणि राख बाहेर पडत आहे. आइसलँड खचदरीय ज्वालामुखी क्षेत्रात येते. हे ज्वालामुखीचे हॉटस्पॉट आहे.