रशियाने युक्रेन लष्कराच्या ताब्यातील दारुगोळ्याचं जमिनीखालील गोदाम नुकतच उद्धवस्त केलं. किन्झल क्षेपणास्त्रांच्या मदतीने रशियाने थेट जमिनीखाली असणारा हा दारुगोळ्याचा साठा उद्धवस्त केला. रशियन लष्कराचे मेजर जनरल इगोर कोनाशेव्हन्को यांनी दिलेल्या माहितीनुसार किन्झल क्षेपणास्त्र हे हायपरसॉनिक अरोब्लास्टिक क्षेपणास्त्र आहे. शुक्रवारी याच क्षेपणास्त्रांच्या मदतीने युक्रेनमधील इव्हांको फ्रॅन्कीव्हिस्क प्रांतामधील दारुगोळ्याचा साठा उद्धवस्त करण्यात आल्याचं रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याच दरम्यान रशियन हवाईदलाने युक्रेनच्या ६९ लष्करी तळांवर हल्ले केले. यापैकी चार कमांड पोस्ट म्हणजेच मुख्य कार्यलये होती. तर चार ठिकाणी क्षेपणास्त्रविरोधी तंत्रज्ञान तैनात करण्यात आलेलं, असं रशियन अधिकाऱ्यांनी सांगितलं. रशियन हवाईदलाने युक्रेनकडून वापरलं जाणारं एक रडार स्टेशनही उद्धवस्त केलंय. तीन मल्टीपल रॉकेट लॉचर्स १२ क्षेपणास्त्र प्रक्षेपित करणाऱ्या यंत्रणा, हत्यारे अशा अनेक गोष्टींना आम्ही लक्ष्य करुन त्या उद्धवस्त केल्याचा दावा रशियाने केलाय. एकूण ४३ ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं रशियाचं म्हणणं आहे.

हायपरसॉनिक क्षेपणास्त्र म्हणजे काय?
केएच-४७एम२ क्षेपणास्त्राला डँगर असंही म्हटलं जातं. हे रशियाकडे असणाऱ्या अणवस्त्र वाहक क्षेपणास्त्रांपैकी एक हायपरसॉनिक एअरोब्लास्टीक प्रकारातील हवेतून जमिनीवर मारा करणारं क्षेणपास्त्र आहे. दोन हजार किलोमीरहून अधिक दूरपर्यंत या क्षेपणास्त्राने हल्ला करता येतो. टीयू-२२एम३ किंवा मीग ३१ के या प्रणालीच्या सहाय्याने हे क्षेपणास्त्र डागता येतं. डिसेंबर २०१७ पासून किन्झल क्षेपणास्त्राचा वापर केला जातोय. पुतीन यांनी मागील महिन्यामध्ये ज्या सहा नवीन क्षेपणास्त्रांच्या वापरासाठी परवानगी दिली त्यामध्ये किन्झलचाही समावेश आहे.

सध्या उपलब्ध असणाऱ्या अणवस्त्र क्षेपणास्त्रांपेक्षा हे क्षेणास्त्र अधिक वेगवान आहे. कमी उंचीवरुन हे क्षेपणास्त्र दूरपर्यंत लक्ष्यभेद करु शकतं.
या क्षेपणास्त्रामध्ये फ्रिक्शनल ऑर्बीटल बॉम्बार्डमेंट सिस्टीम म्हणजेच एफक्यूबीएस तंत्रज्ञान वापरण्यात आलंय. या तंत्रज्ञानाच्या मदतीने इंटर कॉन्टीनेंटर ब्लास्टीक मिसाइलचा (एसीबीएम) वापर सहज शक्य होतं. एसीबीएमच्या मदतीने जमीनीपासून काही अंतरावर क्षेपणास्त्र पृथ्वीच्या कक्षेत सोडलं जातं. ज्यावेळेस हे क्षेपणास्त्र लक्ष्यभेद करण्यासाठी लक्ष्याच्या जवळ पोहचतं तेव्हा त्याचा पुढील भाग जेथे दारुगोळा भरलेला असतो तोच लॉच करतं आणि उर्वरित भाग पुन्हा पृथ्वीवर येतो. हायपरसॉनिक क्षेपणास्तत्र ही दोन प्रकारांमध्ये येतात. हायपर सॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आणि हायपर सॉनिक ग्लाइड व्हेइकल्स.

हायपर सॉनिक क्रूझ मिझाइल
ही क्षेपणास्त्र हायस्पीड जेट इंजिनच्या मदतीने त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोहचतात. त्यामुळेच ही अधिक वेगवान असता. पारंपारिक आयसीबीएम क्षेपणास्त्रांसारखी ही नसतात. म्हणजेच ही क्षेपणास्त्र आयसीबीएमप्रमाणे गुरुत्वाकर्षाणाचा वापर करुन लक्ष्यापर्यंत न पोहचता इंजिनच्या मदतीने लक्ष्यापर्यंत पोहचून त्याला उद्धवस्त करतात.

हायपर सॉनिक ग्लाइड व्हेइकल्स
या पद्धतीची क्षेपणास्त्र ही वाहक असतात. ही क्षेपणास्त्र ज्या ठिकाणी हल्ला करायचा आहे तेथील आकाशामध्ये सोडली जातात आणि मग तिथून ती वेगाने निश्चित केलेल्या प्रदेशावर पडतात. आयसीबीएमप्रमाणे गुरुत्वाकर्षणाच्या विश्वासावर प्लेलोड म्हणजेच दारुगोळा असणारा भाग मुक्तपणे पडण्यासाठी सोडून न देता ही क्षेपणास्त्र एका मर्यादेपर्यंत पृथ्वीच्या कक्षेत पुन्हा प्रवेश करतात आणि लक्ष्यभेद करण्यास मदत करतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are hypersonic missiles russia used to destroy ammunition warehouse in ukraine scsg
Show comments