मनिषा देवणे
हृदयविकार होण्यामागील अनेक कारणांपैकी एक प्रमुख कारण म्हणजे रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉलचे प्रमाण. शिवाय कोलेस्टेरॉल वाढणे ते हृदयविकाराचा झटका येणे यांच्या दरम्यान कोणती विशेष लक्षणे आढळत नसल्याने डायस्लीपीडेमिया म्हणजेच कोलेस्टेरॉल वाढण्याला सायलेंट किलर म्हणतात. हे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी लोकांना फायदेशीर ठरतील, अशी मार्गदर्शक तत्त्वे भारताने जारी केली आहेत. भारताने पहिल्यांदाच अशा प्रकारे मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

आतापर्यंत भारतासह जगभरातील हृदयरोगतज्ज्ञ २०१९ची मार्गदर्शक तत्त्वे पाळत होते. ही २०१९ ची मार्गदर्शक तत्त्वे युरोपीयन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीने जारी केली होती. पण आता कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडियाने पुढाकार घेत कोलेस्टेरॉल नियंत्रणाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. २२ सदस्य असलेल्या या समितीने ४ जुलै रोजी भारतीयांसाठी ही पहिलीवहिली मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
I don’t believe in work-life balance Narayana Murthy stands firm on 70-hour workweek
“माझा वर्क-लाइफ बॅलन्सवर विश्वास नाही”; आठवड्यातील ७० तास काम करण्याच्या मतावर नारायण मूर्ती अजूनही ठाम
kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
Health Special Unsafe Environment and Mental Health Hldc
Health Special: असुरक्षित वातावरण आणि मानसिक स्वास्थ्य
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा

हेही वाचा >>>‘या’ गुजराती तांडेलाने ‘वास्को द गामा’ला भारतात आणले; इतिहास नेमके काय सांगतो?

कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे कोणते परिणाम?

डायस्लीपीडेमिया म्हणजेच उच्च कोलेस्टेरॉलचे व्यवस्थापन करण्यासाठी या मार्गदर्शक तत्त्वांची मदत होणार आहे. डायस्लीपीडेमिया ही अशी वैद्यकीय स्थिती असते ज्यात रक्तातील चरबीचे म्हणजेच लिपीडच्या स्तराचे प्रमाण बिघडलेले असते. ट्रायग्लिसराइड्स किंवा उच्च कोलेस्टेरॉल सारख्या घटकांचा लिपीडमध्ये समावेश होतो. या घटकांच्या असमतोलामुळे हृदयिवकार, हृदयविकाराचा झटका आणि अन्य आरोग्य समस्या विशेषतः धमन्यांसंदर्भातील आजार निर्माण होण्याचा धोका वाढतो. योग्य, संतुलित आहार, व्यायाम आणि औषधांनी हा असमतोल नियंत्रणात आणता येतो.

लिपीड प्रोफाइल कशी ओळखावी?

रक्ताची चाचणी केल्यास एकूण कोलेस्टेरॉलचे प्रमाण कळते. यालाच लिपीड प्रोफाइल म्हणतात.  कोलेस्टेरॉलमध्ये लो डेन्सीटी लायपोप्रोटीन (एलडीएल), हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन (एचडीएल) आणि ट्रायग्लिसराइड्स या घटकांचा समावेश असतो. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोलेस्टेरॉलचे किमान प्रमाण १०० मिलीग्रॅम / प्रति डेसीलीटर पेक्षा कमी असावे. शहरी भागातील लोकांना तुलनेने या समस्येचा अधिक सामना करावा लागतो.

भारताने मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे कारण?

भारतात हृदयविकारासंबंधित विकारांनी अकाली मृत्यू होण्याचे प्रमाण जगाच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे देशातील डॉक्टरांनी लिपीड मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. डायस्लीपीडेमियाला सायलेंट किलर असे म्हटले जाते. कारण रक्तातील कोलेस्टेरॉल वाढलेले असले तरी त्याची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. परिणाम मात्र हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आदि हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित जीवघेणे आजार असतात.
कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाने केलेल्या अभ्यासानुसार, राजस्थान, गुजरात, तेलंगणा आणि मणिपूर वगळता अन्य सर्व राज्यांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये एचडीएल म्हणजेच चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी कमी असल्याचे आढळून आले, तर गोवा, केरळ आणि उत्तर भारतात एलडीएल म्हणजेच वाईट कोलेस्टेरॉलची पातळी अधिक असल्याचे आढळून आले.

हेही वाचा >>>विश्लेषण: तापमान वाढ, अवकाळीमुळे टोमॅटो उत्पादन घटले?

मार्गदर्शक तत्त्वे कोणती?

पारंपरिक पद्धतीत उपाशीपोटी लिपीड चाचणी केली जात होती, मात्र नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये उपास न करता लिपीड चाचणीची शिफारस करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या अभ्यासानुसार, माफक प्रमाणात चरबीच्या वापराच्या तुलनेत उच्च साखर आणि कर्बोदकांच्या पातळीचा समावेश असलेल्या आहारामुळे प्रामुख्याने रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात.

– ज्यांना दोन वर्षांत रक्तवाहिन्यांसंबंधी आजाराचे निदान झाले आहे अशा व्यक्तींना हृदयविकाराचा धोका अधिक असतो.

– २० वर्षांहून अधिक काळ मधुमेह आणि आनुवंशिकता यामुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो.

– व्यक्तींमध्ये एफएच जनुक लवकर शोधून काढल्यास अकाली हृदयविकार टाळण्यासाठी उपचार करण्यात मदत होऊ शकते.

– भारताच्या २५ टक्के लोकांवर परिणाम करणारे एलिव्हेटेड लायपोप्रोटीन (ए) 50mg/DL  पेक्षा कमी असावे.

– उच्च ट्रायग्लिसराइड्स (150 mg/dl पेक्षा जास्त) आणि एचडीएल-कोलेस्टेरॉल प्रमाणात नसलेल्या व्यक्तींनी ताबडतोब त्यांच्या जीवनशैलीत बदल करावा आणि विशिष्ट उपचार करावेत.

– हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असलेल्या किंवा रक्तातील कोलेस्टेरॉलची उच्च पातळी (हायपरकोलेस्टेरोलेमिया) असलेल्या लोकांनी त्यांचे प्रथम लिपिड प्रोफाइल १८ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयात केले पाहिजे.

– डायस्लीपीडेमिया या स्थितीला सायलेंट किलर म्हटले जाते. त्यामुळे उच्च जोखीम असलेल्या व्यक्तींनी ७० mg/dl LDL-कोलेस्टेरॉल (खराब कोलेस्ट्रॉल) पेक्षा कमी लिपिड प्रोफाइल राखले पाहिजे.