प्रत्येकालाच आपली त्वचा तजेलदार राहावी, अशी इच्छा असते. त्यासाठी नानाविध प्रकारही करून पाहिले जातात. सोशल मीडियावर त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी ट्रेंडही सुरूच असतात. मात्र, सध्या हॉलीवूडच्या अभिनेत्रींमध्ये फेशियलचा विचित्र प्रकार लोकप्रिय होताना दिसत आहे. त्या फेशियलचे नाव आहे ‘सॅल्मन स्पर्म फेशियल’. गेल्या वर्षी ‘F.R.I.E.N.D.S’ या मालिकेतील अभिनेत्री जेनिफर ॲनिस्टनने ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत उघड केले होते की, ती अँटी एजिंगसाठी दर आठवड्यात पेप्टाइडची इंजेक्शन्स घेते. जेनिफर ॲनिस्टनने या ट्रीटमेंटचा वापर केल्याचे सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अगदी अलीकडे किम कार्डिशियननेदेखील ही ट्रीटमेंट घेतल्याचे सांगितले. तिने सॅल्मन स्पर्म फेशियल केल्याची माहिती दिली. मोठमोठ्या अभिनेत्रींनी हा खुलासा केल्यानंतर आता हा विलक्षण सौंदर्य ट्रेंड लोकप्रिय होत आहे आणि जगभरातील सौंदर्यप्रेमींना तो आकर्षित करत आहे. ‘सॅल्मन स्पर्म फेशियल’ नक्की काय आहे? त्याची लोकप्रियता का वाढत आहे? त्याविषयी जाणून घेऊ.
हेही वाचा : नोबेल पारितोषिक विजेत्यांची निवड कशी केली जाते? कोणत्या क्षेत्रांसाठी दिले जातात पुरस्कार?
सॅल्मन स्पर्म फेशियल म्हणजे काय?
सॅल्मन स्पर्म फेशियलला तांत्रिकदृष्ट्या पॉलीन्यूक्लिओटाईड थेरपी म्हणून ओळखले जाते. त्यात पॉलीन्यूक्लिओटाइड्स-डीएनए म्हणजेच माशाच्या वीर्यापासून तयार करण्यात आलेला डीएनए आणि आरएनएचे छोटे तुकडे वापरले जातात. न्यूयॉर्क शहरातील चेहर्याचे प्लास्टिक सर्जन डॉ. रिचर्ड वेस्ट्रीच यांनी ‘द गार्डियन’कडे स्पष्ट केले की, हे तुकडे नवीन रक्तवाहिन्या, कोलेजन आणि केराटिनोसाइट्सचे उत्पादन उत्तेजित करू शकतात, जे त्वचेच्या नवीन पेशी निर्माण करण्यासाठी आवश्यक असतात. “हे घटक मुळात संपूर्ण त्वचेला चालना देतात,” असे डॉ. वेस्ट्रीच म्हणाले. पॉलिन्यूक्लिओटाईड उपचार युरोप आणि कोरियामध्ये बर्याच काळापासून उपलब्ध आहेत. युरोप आणि कोरियामध्ये हे घटक सामान्यत: थेट त्वचेमध्ये इंजेक्ट केले जातात. भारतात मुंबईतील एजलेस क्लिनिक आणि माया मेडी स्पा यांसारख्या क्लिनिकमध्ये सात महिन्यांहून अधिक काळापासून हा उपचार उपलब्ध आहे, असे ‘लाइव्ह मिंट’च्या वृत्तात म्हटले आहे.
ही उपचारपद्धती खिशाला परवडणारी नाही. या उपचाराच्या प्रत्येक सत्राची किंमत आठ हजार ११ हजारांपर्यंत असू शकते. अधिक प्रगत साधने आणि अतिरिक्त घटकांच्या वापराच्या आधारे किमती वाढू शकतात. वैयक्तिक त्वचेच्या स्थितीनुसार डॉक्टर सामान्यत: किमान तीन ते चार सत्रांची शिफारस करतात. सॅल्मन डीएनए माणसांच्या डीएनएसारखे दिसते. त्यामुळे त्वचेत जळजळ होत नाही आणि ते त्वचेसाठी अनेक प्रकारे फायद्याचे ठरू शकते. “नियमित फिलर्सच्याऐवजी हा उपचार फायदेशीर ठरतो.
माणसांच्या डीएनएच्या ९६-९८ टक्के हा सारखा असतो. तो पेशींच्या नूतनीकरणास उत्तेजित करण्यास मदत करतो, ज्या पेशी नवीन त्वचेच्या पेशींच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. हा डीएनए त्वचेच्या सूक्ष्म रेषांवर, कोरड्या त्वचेवर कार्य करतो आणि त्वचेच्या छिद्रांचा आकार कमी करते,” असे ‘माया मेडी स्पा’चे संस्थापक चैतन्य केंचम्मनाहोस्कोटे यांनी ‘लाइव्ह मिंट’ला सांगितले.
या फेशियलमुळे त्वचेत नक्की कोणते बदल होतात?
पॉलीन्यूक्लिओटाईड थेरपी अनेक प्रकारे फायद्याची आहे. त्याचा परिणाम चेहरा आणि शरीर अशा दोघांवरही होतो. ‘ग्लोडे’च्या मते, हे उपचार मान, डोळ्यांभोवती, हाताच्या मागील बाजूस, ओटीपोटात, मांड्या, गुडघे, हात आणि अगदी स्ट्रेच मार्क्सवरदेखील प्रभावी ठरू शकतात. त्यामुळे त्वचेचे हायड्रेशन सुधारते, लवचिकता येते आणि त्वचेवर एक पकड येते. पॉलीन्यूक्लिओटाइड्समुळे चट्टे, मुरमांचे डाग कमी करण्यास आणि हायपर पिग्मेंटेशन, मेलास्मा व रोसेसिया यांसारख्या त्वचेच्या समस्या सोडवण्यास मदत होते. पॉलीन्यूक्लिओटाइड्स चेहर्यावरील वृद्धत्वाची सामान्य चिन्हे कमी करण्यासाठी आणि भुवया व टाळूवरील केस गळतीसाठीदेखील ओळखले जातात. परंतु, हा उपचार प्रत्येकासाठी नाही. शाकाहारी व्यक्ती किंवा फिश अॅलर्जी असलेल्या व्यक्ती हा उपचार घेऊ शकत नाही.
ही उपचारपद्धती खरोखर प्रभावी आहे का?
सॅल्मन स्पर्म फेशियलने काहींसाठी आशादायक परिणाम दर्शविले आहेत; परंतु याचा परिणाम प्रत्येकावरच होईल, असे नाही. डॉ. वेस्ट्रीच स्पष्ट करतात की, वैयक्तिक प्रतिक्रिया बदलू शकतात. “लोकांच्या शरीराची प्रतिक्रिया कशी असते या संदर्भात परिवर्तनशीलता असते,” असे ते म्हणाले.
हेही वाचा : भारताच्या ‘RuPay’ कार्डची सेवा आता मालदीवमध्येही; इतर कोणकोणत्या देशांत चालतं रुपे कार्ड? त्याचा फायदा काय?
या उपचारपद्धतीत सॅल्मन शुक्राणूचाच उपयोग का होतो?
सॅल्मन डीएनए व माणसांचा डीएनए यांच्यात समानता असल्यामुळे हे घटक आपल्या त्वचेशी सुसंगती साधतात, असे डॉ. रिचर्ड वेस्ट्रिच म्हणतात. या थेरपीतील पॉलीन्यूक्लिओटाइड्स सुरुवातीला सॅल्मन किंवा ट्राउटच्या शुक्राणूपासून तयार केले जातात. या प्रक्रियेत ट्राउट शुक्राणूमधून न्यूक्लियस काढला जातो आणि काढलेला डीएनए पॉलीन्यूक्लिओटाइड्स तयार करण्यासाठी वापरला जातो. या उपचाराचे परिणाम साधारणपणे सहा ते नऊ महिने टिकतात. या उपचाराच्या संभाव्य जोखमी कमी असतात. परंतु, कोणत्याही इंजेक्शनप्रमाणेच जखम आणि जळजळ होण्याचा धोका असतो. काहींना त्वचेवर तात्पुरता लालसरपणा आणि सूजही येऊ शकते. नॉर्थवेस्टर्न रिजनल मेडिकल ग्रुपचे वैद्यकीय संचालक व त्वचाशास्त्रज्ञ डॉ. लॉरेन टॅगलिया सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतात. ‘द गार्डियन’शी बोलताना त्या म्हणाल्या, “त्यासाठी आणखी अभ्यासाची गरज आहे, असे मला वाटते.”