अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाण्याची कित्येक भारतीय विद्यार्थ्यांना इच्छा असते. मात्र, यंदाच्या वर्षात अमेरिकेने भारतीय विद्यार्थ्यांना दिलेल्या एफ वन विद्यार्थी व्हिसांची संख्या ३८ टक्क्यांनी घटल्याचे वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिले आहे. अमेरिकेतील विद्यार्थी व्हिसामध्ये एफ वन व्हिसाचे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक असल्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने एफ वन व्हिसासंदर्भात विश्लेषण केले. एकीकडे अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याच्या अहवालानंतर आता भारतीय विद्यार्थ्यांच्या व्हिसामध्ये होत असलेली घट हा काय विरोधाभास आहे, याबाबतचा घेतलेला आढावा…

यंदा व्हिसाचे प्रमाण किती कमी झाले?

करोना महासाथीनंतर अमेरिकेतील उच्च शिक्षण संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. मात्र, आता त्यात घट झाल्याचे दिसून येत आहे. २०२४ च्या नऊ महिन्यांत भारतीय विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या एफ वन विद्यार्थी व्हिसांची संख्या ३८ टक्क्यांनी घटल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. अमेरिकन कौन्सुलर अफेअर्स ब्युरोच्या संकेतस्थळावरील मासिक नॉन इमिग्रंट व्हिसाच्या आकडेवारीनुसार भारतीय विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या एफ वन व्हिसांची संख्या करोना महासाथीनंतरच्या काळातील सर्वांत कमी आहे. यंदा जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत ६४ हजार ८ व्हिसा देण्यात आले. तर २०२३ मध्ये याच कालावधीत १ लाख ३ हजार ४९५ व्हिसा देण्यात आले होते. २०२१ मध्ये याच दरम्यान ६५ हजार २३५, २०२२ मध्ये ९३ हजार १८१ व्हिसा देण्यात आले होते. २०२०मध्ये करोना महासाथीच्या काळात ६ हजार ६४६ भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा मिळाला होता. एफ वन हा अमेरिकेतील शिक्षण संस्थांत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॉन इमिग्रंट प्रकारचा व्हिसा आहे. तर एम वन व्हिसा व्यावसायिक आणि अशैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी दिला जातो.

Canada
Indian students in Canada : भारतातून कॅनडात गेलेल्या २० हजार विद्यार्थांची महाविद्यालयांना दांडी, आकडेवारी आली समोर
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
foreign universities loksatta news
दूरदेशीच्या ज्ञानवाटा: देशोदेशीच्या प्रवेश परीक्षा
Scheduled Caste students scholarships,
अकोला : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती धोक्यात: महाविद्यालयांची टाळाटाळ अन्…
sbi education loan Study abroad
परदेशात शिक्षण घ्यायचे; पण पैशांची अडचण येतेय? मग SBI च्या शैक्षणिक कर्जाचा ‘हा’ पर्याय एकदा घ्या जाणून
wardha school students attendance biometric
प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवर लगाम!; शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी नसल्यास…
OBC Hostels, OBC , OBC Monthly Allowance ,
‘लाडक्या बहिणी’ तुपाशी, ओबीसी विद्यार्थी उपाशी, चार महिन्यांपासून…
Nashik Municipal Schools Face Teacher Shortage,
शिक्षणमंत्र्यांच्या नाशिकमध्ये शिक्षकांची वानवा; मनपा प्राथमिक शिक्षकांची माध्यमिकमध्ये नियुक्तीची वेळ

हेही वाचा >>>मराठ्यांना प्राधान्य… सातारा जिल्ह्यास सर्वाधिक मंत्रिपदे… मुंबई, नाशिकची बोळवण… मंत्रिमंडळ विस्ताराला नाराजीची किनार?

केवळ भारतीय विद्यार्थ्यांच्याच बाबतीत?

व्हिसा मिळण्याचे प्रमाण कमी होणे हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांबाबत घडत आहे असे नाहे, तर अन्य देशांतील विद्यार्थ्यांच्या बाबतही घडत आहे. मात्र, भारतीय विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ, अमेरिकेतील उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांखालोखाल चीनमधील विद्यार्थ्यांचा क्रमांक लागतो. चीनमधील विद्यार्थ्यांना व्हिसा मिळण्याचे प्रमाण ८ टक्क्यांनी कमी झाले. जानेवारी २०२४ मध्ये चीनमधील ७३ हजार ७८१ विद्यार्थ्यांना देण्यात आला. तर २०२३ मध्ये ८० हजार ६०३ विद्यार्थ्यांना व्हिसा देण्यात आला होता. मात्र, २०२२ मध्ये ५२ हजार ३४ विद्यार्थ्यांच्या तुलनेत यंदा देण्यात आलेल्या व्हिसांची संख्या वाढल्याचे दिसून येते.

व्हिसा मिळण्याचे प्रमाण का घटले?

एफ वन व्हिसा देण्यात घट का झाली, याचे कारण अस्पष्ट आहे. यंदाच्या सर्वाधिक मागणीच्या काळात (मे, जून, जुलै) भारतीय नागरिकांसाठी २० हजार विद्यार्थी व्हिसा अपॉइंटमेंट उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र, त्या वापरल्या गेल्या नसल्याची माहिती आहे. भारतीय विद्यार्थ्यांना एफ वन व्हिसा देण्याची कमी झालेली संख्या कमी अर्जांमुळे आहे, की अर्ज नाकारल्यामुळे आहे, याबाबत अमेरिकेच्या राज्य विभागाच्या प्रवक्त्याकडे विचारणा केली असता त्यांनी विशिष्ट माहिती देण्यास नकार दिला. ‘प्रत्येक महिन्याचे प्रसिद्ध केलेले अहवाल आर्थिक वर्षाच्या एकूण आकडेवारीचे अचूक चित्र दाखवत नाहीत, असे त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. मात्र, गेल्या आर्थिक वर्षातील व्हिसाची आकडेवारी आणि त्याच कालावधीतील मासिक अहवाल यात फार फरक नाही. उदाहणार्थ, २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी (१ ऑक्टोबर २०२१ ते ३० सप्टेंबर २०२२) अमेरिकेच्या राज्य विभागाच्या संकेतस्थळावरील नॉन इमिग्रंट व्हिसाबाबत प्रसिद्ध सविस्तर आकडेवारीनुसार एकूण १ लाख १५ हजार ११५ भारतीय विद्यार्थ्यांना एफ वन व्हिसा देण्यात आला होता. तर मासिक अहवालानुसार १ लाख १५ हजार २०४ विद्यार्थ्यांना व्हिसा देण्यात आला होता. तसेच २०२२-२३ या आर्थिक वर्षातील (१ ऑक्टोबर २०२२ ते ३० सप्टेंबर २०२३) आकडेवारीनुसार १ लाख ३० हजार ७३० विद्यार्थ्यांना, तर मासिक आकडेवारीनुसार १ लाख ३० हजार ८३९ विद्यार्थ्यांना व्हिसा देण्यात आला होता.

हेही वाचा >>>Intermittent Fasting : इंटरमिटंट फास्टिंगमुळे केस गळण्याचं प्रमाण का वाढतंय?

ओपन डोअरचा अहवाल काय सांगतो?

अमेरिकेतील उच्च शिक्षण संस्थांतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे ‘ओपन डोअर्स’ने २०२४ च्या अहवालात म्हटले आहे. या अनुषंगाने भारतीय विद्यार्थ्यांसाठी एफ वन व्हिसा देण्यात झालेली घट दोन महत्त्वपूर्ण टप्प्यांवर विचारात घेण्यासारखी आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात (१ ऑक्टोबर २०२२ ते ३० सप्टेंबर २०२३) भारताने प्रथमच नवीन विद्यार्थी व्हिसा देण्यात चीनला मागे टाकले. त्या वर्षी अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये चीनमधील विद्यार्थी सर्वाधिक होते. मात्र, २०२३-२४ मध्ये अमेरिकेतील उच्च शिक्षण संस्थांतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थी सर्वाधिक झाले. २०२३-२४ मध्ये अमेरिकेतील उच्च शिक्षण संस्थांतील १.१ दशलक्ष आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी सुमारे २९.४ टक्के, म्हणजे ३ लाख ३१ हजार विद्यार्थी भारतीय होते, तर सुमारे २४.६ टक्के म्हणजे २ लाख ७७ हजार विद्यार्थी चीनमधील होते.

तज्ज्ञांचे म्हणणे काय?

भारतामध्ये परदेशी शिक्षण सल्लागारांच्या म्हणण्यानुसार व्हिसा प्रक्रिया, विशेषतः मुलाखतीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागत असल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत. ‘भारतीय विद्यार्थ्यांसाठी अमेरिका हे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण असले, तरी बरेच विद्यार्थी कॅनडा, युनायटेड किंग्डम आणि जर्मनीसारखे पर्याय शोधत आहेत,’ असे रीचआयव्ही.कॉमचे सीईओ विभा कागजी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. ‘गुणवत्तापूर्ण आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यावर अमेरिकी स्थलांतर धोरणाचा अधिक भर आहे. त्यामुळे योग्य न ठरणाऱ्या संस्थांमध्ये अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंजूर व्हिसांमध्ये घट दिसून येऊ शकते,’ असे आयडीपी एज्युकेशनचे दक्षिण आशियाचे प्रादेशिक संचालक पीयूष कुमार यांनी नमूद केले. व्हिसा प्रक्रियेला होणाऱ्या विलंबाबाबत अमेरिकी राज्य विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले, ‘भारतातील प्रतीक्षा वेळ कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण साधनसुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच कर्मचाऱ्यांना आवश्यक सहकार्य मिळण्याचा प्रयत्न आहे. प्रतीक्षा करावी लागणे म्हणजे व्हिसा न मिळणे असा अर्थ नाही तर अमेरिकी व्हिसासाठी मोठी मागणी आहे. भारताचा समावेश असलेल्या आमच्या व्हिसा देणाऱ्या केंद्रांनी गेल्या काही वर्षांत व्हिसा देण्याचे नवे विक्रम नोंदवले आहेत. तंत्रज्ञानाचा वापर, प्रक्रिया सुधारणा, मुलाखतीसाठी प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी कर्मचारी संख्येत वाढ देण्यात येत आहे. तसेच विविध व्हिसा श्रेणींसाठी मुलाखतींच्या अपॉइंटमेंट्स वाढवण्यात येत आहेत.’

Story img Loader