बॉक्सिंग म्हणजेच मुष्टियुद्ध हा खेळ खऱ्या अर्थाने जीवनमरणाचा असतो. कारण हा खेळ खेळत असताना खेळाडूचा मृत्यूही होऊ शकतो. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील एका छात्राचा नुकताच बॉक्सिंग लढतीत दुखापत झाल्याने मृत्यू झाला. प्रथम महाले (वय २१) असे या छात्राचे नाव होते. त्यामुळे या खेळातील धोके आणि त्यामुळे होणारे मृत्यू याबाबत चर्चा सुरू झाली आहे. बॉक्सिंग रिंगमध्ये आतापर्यंत जगभरात हजारो बॉक्सरचा मृत्यू झाला आहे. खरेच हा खेळ जीवघेणा आहे का?

बॉक्सिंग धोकादायक का?

बॉक्सिंग हा खेळ आक्रमण आणि बचावाचा असतो. त्यात तुम्हाला प्रतिस्पर्ध्याला ठोसे मारून जिंकावे लागते. त्यात खेळाडू नॉकआऊट म्हणजेच खाली कोसळल्यानंतर अथवा गुणांवर विजय ठरवण्यात येतो. बॉक्सिंगमधील एक राऊंड तीन मिनिटांच्या असतो. प्रत्येक राऊंडच्या मध्ये एक मिनिटांचा खंड असतो. त्यावेळी बॉक्सरला प्रशिक्षकाकडून मार्गदर्शन केले जाते आणि वैद्यकीय उपचारही केले जातात. इतर खेळांपेक्षा या खेळात डोक्याला दुखापत होण्याची शक्यता अधिक असते. डोक्याला दुखापत म्हणजेच मेंदूला इजा आणि त्यातून मृत्यू होतात. बॉक्सिंगमध्ये पहिल्यांदा खेळाडूचा मृत्यू झाल्याची नोंद अमेरिकेत १८९४ मध्ये झाली. त्यावेळी अँडी बोवेन या बॉक्सरचा मृत्यू झाला होता. प्रतिस्पर्ध्याने जमिनीवर पाडल्यानंतर खाली लाकडी फळीवर डोके आपटून त्याचा मृत्यू झाला होता.

Makar Sankranti motorcyclist died after nylon manja got stuck in his neck
नाशिकमध्ये नायलाॅन मांजामुळे युवकाचा मृत्यू
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Shocking video lion and leopard clashed on a tree thrilling fight video went viral
VIDEO: बापरे! सिंहीण करत होती बिबट्याची शिकार, पण तेवढ्यात…तुम्ही कल्पनाही केली नसेल असा झाला शेवट
Kho-Kho World Cup Delhi, Kho-Kho ,
विश्लेषण : दिल्लीत चक्क खो-खो विश्वचषक? किती संघ सहभागी? स्पर्धेमुळे या मराठमोळ्या खेळाला संजीवनी मिळेल?
youth of Nashik came to Aheri and raped minor girl after friendship through online gaming called Free Fire
गडचिरोली : धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार…
accident on flyover in Nashik, Four people died accident Nashik,
नाशिकमध्ये उड्डाणपुलावरील अपघातात पाच जण मृत्युमुखी, १३ जखमी
bjp and ajit pawar ncp political conflict over allegations against dhananjay munde
धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपचे सुरेश धस, चित्रा वाघ यांचा बोलविता धनी कोण ?
Murder of young journalist Mukesh Chandrakar
सत्तेला प्रश्न विचारणाऱ्यांचा जीव…

हेही वाचा : विश्लेषण: शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘अपार क्रमांक’ कशाला?

मृत्यू कशामुळे होतो?

लढतीत जोरदार ठोसा डोक्याला बसल्यानंतर बॉक्सर खाली कोसळत असल्याचे अनेक वेळा दिसते. परंतु, त्या बॉक्सरच्या कारकिर्दीत त्याने अनेकवेळा डोक्यावर ठोशांचे प्रहार सहन केलेले असतात. त्याचा परिणाम कायमस्वरुपी होत असतो. त्यातून तातडीची काही लक्षणे दिसून येत नाहीत मात्र, दीर्घकालीन परिणाम होतात. बॉक्सिंगमध्ये मृत्यू होण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. त्यात सबड्युरल हिमॅटोमा म्हणजे मेंदू व कवटी यांच्यातील शिरा फुटणे आणि सेरेब्रल एडेमा म्हणजे मेंदूवर सूज येणे यांचा समावेश आहे.

नेमकी स्थिती काय?

बॉक्सिंगच्या लढतीत इजा झाल्याने १८९० ते २०११ या कालावधीत १६०४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. सध्या वर्षाला सरासरी १३ बॉक्सरचा मृत्यू होत असल्याची नोंद आहे. सुरूवातीला हे प्रमाण जास्त होते. नंतर त्यात घट होऊ लागली. जर्नल ऑफ कॉम्बॅटिव्ह स्पोर्ट्समधील संशोधनानुसार, १९२० मध्ये बॉक्सिंगमध्ये २३३ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर हे प्रमाण कमी होत जाऊन २००० मध्ये १०३ जणांचा मृत्यू झाला. अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या २००९ मधील अहवालानुसार, बॉक्सिंगमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येकी एक हजार स्पर्धकांमधील ०.१३ जणांचा मृत्यू होतो.

हेही वाचा : कॅप्टगॉन गोळ्यांचे सेवन करून हमासच्या दहशतवाद्यांकडून इस्रायलवर हल्ला? या गोळ्यांमुळे काय होते? जाणून घ्या…

प्रमाण कशामुळे कमी झाले?

लास वेगासमध्ये १९८२ मध्ये बॉक्सर बूम बूम मॅन्सिनीकडून नॉकआऊट झाल्यानंतर दक्षिण कोरियातील बॉक्सर किम डूक-कू याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बॉक्सिंग नियमावलीत बदल करण्यात आले. व्यावसायिक बॉक्सिंगसाठी १५ राऊंडऐवजी १२ राऊंड करण्यात आले. त्यातून दमछाक झाल्यानंतर प्रतिस्पर्ध्याकडून डोक्याला होणारी दीर्घकालीन दुखापत कमी करण्यात आली. बॉक्सिंगच्या नियमावलीत झालेल्या बदलांमुळे हे मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे. व्यावसायिक बॉक्सिंगपेक्षा हौशी बॉक्सिंगमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

इतर खेळात धोका नाही का?

अमेरिकेतील कॉलेज फुटबॉल, मोटारसायकल रेसिंग, स्कूबा डायव्हिंग, गिर्यारोहण, स्काय डायव्हिंग आणि अश्वशर्यती या खेळातही अधिक धोका आहे. यात सर्वाधिक धोकादायक गिर्यारोहण आहे. एनएफएल, फुटबॉल, रग्बी, सायकलिंग यामध्येही डोक्याला दुखापत होते. मात्र, बॉक्सिंगमध्ये प्रतिस्पर्ध्यांला नॉकआऊट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून डोक्याच्या भागात जोरदार ठोसा बसून गंभीर दुखापत होऊ शकते. याचवेळी डोक्याला संरक्षक आवऱण घालणेही बॉक्सिंगमध्ये बंद करण्यात आले. यासाठी खेळाडूच्या डोक्याला झालेली दुखापत पंचांना दिसून ते तातडीने निर्णय घेऊ शकतात, असा युक्तिवाद करण्यात आला. मात्र, काही जणांनी याबाबत प्रश्नही उपस्थित केले आहेत. एकंदरीतच या खेळातील धोक्याबाबत अधिक चर्चा होते.

हेही वाचा : इस्रायलच्या हल्ल्यात गाझा शहरातील सर्वांत जुन्या चर्चची नासधूस, ‘चर्च ऑफ सेंट पोर्फेरियस’चे महत्त्व काय? जाणून घ्या…

तज्ज्ञांचे मत काय?

याबाबत न्यूरोसर्जन डॉ.जयदेव पंचवाघ म्हणाले की, बॉक्सिंगमध्ये प्रामुख्याने दोन दुखापतींमुळे मृत्यू होण्याचा धोका असतो. पहिला प्रकार म्हणजे पोटात दुखापत झाल्यास यकृतात रक्तस्राव होऊन मृत्यू होतो. दुसरा प्रकार म्हणजे मेंदूला दुखापत होऊन मृत्यू होतो. मेदूंतील श्वसन व हृदयाशी निगडित भागाला इजा झाल्यास मृत्यू होऊ शकतो. याचवेळी डोक्यावर गंभीर आघात होऊन मेंदूत रक्तस्राव होतो आणि मृत्यू होतो. मानेला आणि मेंदूला दुखापत होण्यामुळेही खेळाडू दगावू शकतात. याचबरोबर काही दीर्घकालीन समस्याही निर्माण होतात. प्रसिद्ध बॉक्सर महम्मद अली यांना नंतरच्या काळात पार्किसन्सचा आजार झाला होता. डोक्यावर वारंवार आघात होऊन त्यांना हा आजार झाला होता. आता खेळाडूच्या संरक्षणाची पुरेशी खबरदारी घेतली जात असल्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
sanjay.jadhav@expressindia.com

Story img Loader