जपानमधील प्रसिद्ध माउंट फुजी शिखरावर ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच बर्फ दिसू लागतो. परंतु, नोव्हेंबर जवळ येऊनही जपानच्या या प्रसिद्ध शिखरावर अद्याप बर्फ दिसलेला नाही. देशाच्या हवामान संस्थेच्या म्हणण्यानुसार, १३० वर्षांपूर्वी पर्यावर्णीय हालचालींची नोंद सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच अशी विलक्षण घटना घडली आहे. साधारणपणे ऑक्टोबरच्या सुरुवातीला माउंट फुजीच्या शिखरावर बर्फ दिसण्यास सुरुवात होते. हे उन्हाळी गिर्यारोहणाच्या हंगामानंतर हिवाळा सुरू होण्याचे संकेत देते. परंतु, मंगळवारपर्यंत माउंट फुजीवर बर्फ दिसला नाही, असे कोफू स्थानिक हवामान कार्यालयातील हवामान अंदाज वर्तक युताका कात्सुता यांनी सांगितले. परंतु, या बदलाचे कारण काय? हे नवीन संकटाचे संकेत आहेत का? त्याविषयी जाणून घेऊ.

१८९४ पासून कोफूच्या हवामान कार्यालयाने सामान्यत: फुजी पर्वतावर हंगामातील पहिल्या हिमवर्षावाची नोंद केली आहे. परंतु, यावर्षी वाढत्या तापमानामुळे शिखरावर बर्फ पडलेला नाही. कोफू कार्यालयातील हवामान अधिकारी शिनिची यानागी यांनी ‘सीएनएन’ला सांगितले की, जपानमध्ये उन्हाळ्यापासून तापमानवाढ आणि पाऊस कायम आहे, त्यामुळे बर्फवृष्टी झाली नाही.”

La Nina, The rainy season, climate patterns, global phenomenon
विश्लेषण : ‘ला निना’चा पावसाळी मुहूर्त चुकला! आता कडाक्याच्या थंडीबरोबर गारपिटीचीही शक्यता?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
is Dissatisfaction in North Gadchiroli over Sohle Iron Mine
सोहले लोहखाणीवरून उत्तर गडचिरोलीत असंतोष? खाणीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याला…
Work of second tunnel in Matheran hill of Baroda Mumbai highway completed
बडोदा मुंबई महामार्गाच्या माथेरान डोंगरातील दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण
India Meteorological Department forecasts winter beginning on November 1
थंडीची चाहूल… राज्यात दिवाळीपासून थंडीची तीव्रता वाढणार…
NATO's Response to the CRINK
CRINK:’क्रिंक’ हुकूमशाहाचा नवा अवतार; नाटो विरुद्ध क्रिंक जागतिक राजकारण कोणते वळण घेणार?
bricks in russia narendra modi
BRICS Summit: ब्रिक्स म्हणजे काय? यंदाची शिखर परिषद भारतासाठी महत्त्वाची का आहे?
kim jong un involvement in russia ukraine war
हुकूमशाह किम जोंग उन करणार रशियाची मदत? रशिया-युक्रेन युद्धात उत्तर कोरियाचा सहभाग किती मोठा? त्याचा काय परिणाम होणार?
जपानमधील प्रसिद्ध माउंट फुजी शिखरावर ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच बर्फ दिसू लागतो. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प, कोण अधिक श्रीमंत? कोणाची संपत्ती किती?

विक्रमी उष्णता आणि हवामानातील बदल

हा उन्हाळा जपानमधील सर्वात उष्ण उन्हाळा असल्याचे सांगितले जात आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत सरासरी तापमान नेहमीच्या पातळीपेक्षा १.७६ ° सेल्सियस वाढले होते. सप्टेंबरमध्ये तापमान अपेक्षेपेक्षा जास्त होते, कारण उपोष्णकटिबंधीय प्रवाहात उत्तरेकडील बदलामुळे दक्षिणेकडून गरम हवा जपानच्या दिशेने आली. उन्हाळ्याची तीव्र उष्णता ऑक्टोबरमध्ये चांगलीच वाढली, पहिल्या आठवड्यात ७४ हून अधिक शहरांमध्ये तापमान ३० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त होते. क्लायमेट सेंट्रलने केलेल्या संशोधनाच्या मते, जपानमधील ही असामान्य ऑक्टोबर हीट हवामान बदलामुळे तिप्पट वाढली आहे. हवामान शास्त्रज्ञ युताका कात्सुता यांनी सांगितले की, शिखरांवर हिमकप तयार होण्यास उशीर होतोय, याला हवामानातील बदल अंशतः जबाबदार असू शकतो. “या उन्हाळ्यात तापमान जास्त होते आणि हे उच्च तापमान सप्टेंबरपर्यंत चालू राहिले; ज्यामुळे थंड हवा कमी झाली”, असे त्यांनी ‘एएफपी’ला सांगितले.

एल निनो आणि ग्लोबल वॉर्मिंग

या वर्षीची तीव्र उष्णता नैसर्गिक एल निनो हवामान पद्धतीवर अवलंबून होती. जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे ही उष्णता आणखी वाढली आणि हेच हवामान संकटाचे प्राथमिक कारण असल्याचे वृत्त ‘सीएनएन’ने दिले. शास्त्रज्ञांनी बर्‍याच काळापासून सावधगिरी बाळगली आहे की, जागतिक तापमानवाढ पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा १.५ डिग्री सेल्सियसपर्यंत मर्यादित ठेवणे गंभीर हवामान प्रभाव टाळण्यासाठी महत्त्वाचे आहे. जानेवारीमध्ये नुकत्याच झालेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, हवामान बदलामुळे गेल्या चार दशकांमध्ये उत्तर गोलार्धातील बऱ्याच भागात बर्फ कमी झाला. माउंट फुजीवर अद्याप बर्फ पडलेला नाही; ज्याचा परिणाम पर्यटन, स्थानिक अर्थव्यवस्था, अन्न आणि पाणी पुरवठा आणि अगदी स्थानिकांच्या आरोग्यावरदेखील दिसू शकतो आणि त्यांना एलर्जीसारखे लक्षणं दिसू शकतात.

हा उन्हाळा जपानमधील सर्वात उष्ण उन्हाळा असल्याचे सांगितले जात आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

जपानच्या यामानाशी आणि शिझुओका प्रीफेक्चर्सचा समावेश करणारे, माउंट फुजी हे ३,७७६ मीटरचे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. हा शिखर सामान्यतः वर्षभर बर्फाच्छादित राहतो. गिर्यारोहणाचा हंगाम जुलैमध्ये सुरू होतो, त्यावेळी लाखो लोक शिखर सर करण्यासाठी आणि या शिखरावरून सूर्योदय पाहण्यास उत्सुक असतात. जुलैमध्ये जपानी अधिकाऱ्यांनी गिर्यारोहक/पर्यटकांची संख्या व्यवस्थापित करण्यासाठी नवीन पर्यटन कर आणि नियम लागू केले. गिर्यारोहक आता प्रति व्यक्ती २,००० येन प्रवेश शुल्क भरतात आणि गिर्यारोहकांची कमाल दैनिक मर्यादा आता ४,००० करण्यात आली आहे.

‘ओव्हरटुरिझम’ची चिंता

माउंट फुजी वर्षभर बर्फाच्छादित राहतो. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत हायकिंगचा हंगाम असतो. यादरम्यान २२०,००० हून अधिक पर्यटक या ठिकाणी येतात. गिर्यारोहक सूर्योदय पाहण्यासाठी रात्रीच पर्वत सर करण्यास सुरुवात करतात. काही जण ३,७७६ मीटर म्हणजेच १२,३८८ फूट विश्रांती न घेता चढण्याचा प्रयत्न करतात; ज्यामुळे दुखापत होते आणि आरोग्य समस्या उद्भवतात. या उन्हाळ्यात मोठ्या संख्येने गिर्यारोहक जपानमध्ये आले, ज्यामुळे वाद निर्माण झाला. या गिर्यारोहकांनी गर्दीशी संबंधित आव्हानांना सामोरे जाताना काही स्थानिक नागरिकांशी वाद घातले. याच परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जपानी अधिकाऱ्यांनी गिर्यारोहक प्रवेश शुल्क लागू केले आणि दररोज पर्यटकांची संख्या मर्यादित केली; ज्यामुळे माउंट फुजीवरील गिर्यारोहकांच्या संख्येत किंचित घट झाली.

जुलै ते सप्टेंबर या कालावधीत हायकिंगचा हंगाम असतो. यादरम्यान २२०,००० हून अधिक पर्यटक या ठिकाणी येतात. (छायाचित्र-रॉयटर्स)

पर्यटक आणि स्थानिक वाद

पर्यटकांच्या वर्तनाचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिकाऱ्यांनी उपाययोजना केल्या. पर्यटक रस्त्यावर कचरा टाकत असल्याच्या समस्या स्थानिकांनी नोंदवल्या. मार्च आणि एप्रिलमध्ये जपानने विक्रमी तीस लाख पर्यटकांची नोंद केली. “आम्हाला हे करावे लागले हे खेदजनक आहे, कारण काही पर्यटक नियमांचा आदर करत नाहीत,” असे शहराच्या अधिकाऱ्याने एप्रिलमध्ये ‘एएफपी’ला सांगितले होते. जपानमधील फुजिकावागुचिको या रिसॉर्ट शहरामधून माउंट फुजीचे छायाचित्र घेण्यास लोक उत्सुक असतात. या शहरातील लॉसन कन्व्हिनिएन्स स्टोअर या ठिकाणाहून शिखरावरील जिवंत ज्वालामुखीची छायाचित्रे घेता येतात; ज्याचे पर्यटकांना आकर्षण असते.

कचरा टाकणारे, अतिक्रमण करणारे आणि रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुख्यतः परदेशी पर्यटकांमुळे निराश झालेल्या अधिकाऱ्यांनी त्यांचा निर्णय जाहीर केल्याने गेल्या महिन्यात या योजनेकडे जगाचे लक्ष वेधले गेले. स्थानिक अधिकारी आणि रहिवासी पर्यटकांच्या तक्रारी करत असून सातत्याने बेकायदा रस्ता ओलांडतात, रहदारी सिग्नलकडे दुर्लक्ष करतात, चुकीच्या पद्धतीने वाहने पार्क करतात आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करतात. या उपक्रमाचा उद्देश जवळच्या दंत चिकित्सालयाचे संरक्षण करणेदेखील आहे, जेथे पर्यटक परवानगीशिवाय गाडी पार्क करतात आणि छायाचित्रांसाठी छतावर चढतात.

हेही वाचा : ९५ किलो ड्रग्ज जप्त करीत प्रयोगशाळेचा पर्दाफाश; या प्रकरणात तिहार तुरुंगाची चर्चा का? मेक्सिको कार्टेलशी याचा काय संबंध?

क्योटोमध्ये स्थानिकांनी शहरातील प्रसिद्ध गीशा पर्यटकांना त्रास दिल्याबद्दल तक्रार केली आहे. या उन्हाळ्यात माउंट फुजीच्या सर्वात लोकप्रिय मार्गावरील हायकर्सकडून २,००० येन शुल्क आकारण्यात आले होते आणि ज्यात गर्दी कमी करण्यासाठी दैनंदिन नोंदी ४,००० पर्यंत मर्यादित करण्यात आल्या होत्या. १२,३८८ फूट उंच असणारे माउंट फुजी जपानचे पवित्र प्रतीक आहे, ज्याभोवती असंख्य मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे आहेत. टोकियोच्या नैऋत्येस सुमारे १०० किलोमीटर अंतरावर स्थित हे शिखर राजधानीपासून दिवसाही स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते. युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (UNESCO) माउंट फुजी परिसरात सांस्कृतिक महत्त्व असलेल्या २५ स्थळांना मान्यता देते. इतर अनेक स्थळेही ओव्हरटुरिझमच्या आव्हानांना तोंड देत आहेत. एप्रिलमध्ये व्हेनिसने पर्यटकांची संख्या व्यवस्थापित करण्यासाठी प्रवेश शुल्क लागू केले, तर कॅनरी बेटांमधील हजारो लोकांनी पर्यटकांची वाढती संख्या कमी करण्याची मागणी केली.