दत्ता जाधव
मे महिन्याच्या अखेपर्यंत किरकोळ बाजारात १० रुपये किलो दराने मिळणारे टोमॅटो जूनअखेरीस १०० रुपयांवर आणि जुलैच्या पहिल्या आठवडय़ात १५० रुपयांपर्यंत कसे गेले? इतकी दरवाढ का झाली? याविषयी..

मे महिन्याने घात केला..

दरवर्षी मे-जूनदरम्यान टोमॅटोचे दर चढे असतात. याचा फायदा घेण्यासाठी देशभरातील शेतकरी टोमॅटोची लागवड करतात, मात्र यंदाच्या मे महिन्यात शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराने टोमॅटो विकावे लागले. जुन्नर परिसरातील टोमॅटोची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या नारायणगावमध्ये टोमॅटोला मागणीच नसल्यामुळे विक्री होत नव्हती. शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकून देऊन माघारी जात होते. दर पडल्यामुळे आणि पिकाची निगा न राखल्यामुळे, कडक उन्हाळय़ामुळे टोमॅटोचे नुकसान झाले. परिणामी जूनच्या दुसऱ्याच आठवडय़ापासून टोमॅटोच्या दरांत वाढ होऊ लागली.

india recorded highest cultivation of wheat rabi crop sowing exceeds 632 lakh hectares
यंदा गहू मुबलक; देशात उच्चांकी लागवड; रब्बी पेरण्या ६३२ लाख हेक्टरवर; पोषक वातावरणाचा परिणाम
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
india struggles to meet soybean procurement goals
विश्लेषण : सोयाबीन खरेदीची उद्दिष्टपूर्ती का नाही?
Soybean purchase , Soybean rate,
सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळूनही दर घसरणीला…
tur dal cost decrease by rs 50 per kg other pulses price drop
तूरडाळ किलोमागे ५० रुपयांनी स्वस्त
Wholesale Price Inflation Climbs to 2.37 percent in December 2024
घाऊक महागाई वाढली; अन्नधान्यांच्या किमतीमुळे नव्हे तर…; महागाई दर डिसेंबरमध्ये वाढून ….
strawberry navi Mumbai marathi news
नवी मुंबई : एपीएमसीत लालचुटूक स्ट्रॉबेरींचा बहर, दरातही घसरण
Nashik, Kumbh Mela , meeting ,
नाशिक : कुंभमेळा तयारीसाठी लवकरच स्थानिक पातळीवर बैठक, संशयास्पद भूसंपादनाची चौकशी

टोमॅटोच्या दरात दिलासा कधी?

दीडशे रुपयांवर गेलेला टोमॅटो आवाक्यात येण्यासाठी ऑगस्टअखेरची वाट पहावी लागणार आहे. जूनच्या पहिल्या आठवडय़ात टोमॅटोचे भाव वाढत असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर साधारण १५ जूननंतर शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली. हा टोमॅटो बाजारात येण्यास २० ऑगस्ट उजाडेल. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्यात टोमॅटो येण्यासाठी ऑगस्टअखेरची वाट पहावी लागणार आहे.

नारायणगाव मार्केट का महत्त्वाचे?

देशात सर्वत्र टंचाई असतानाही दररोज सरासरी २० किलोचे सुमारे ५० हजार कॅरेट नारायणगाव बाजार समितीत येत आहेत. नारायणगाव बाजार समितीत टोमॅटोची साधारणत: चार ते पाच हजार टन दैनंदिन आवक होत आहे. ही आजच्या टंचाईच्या काळातील देशातील सर्वाधिक आवक असल्याचा दावा नारायणगाव बाजार समितीतील जाणकारांकडून केला जात आहे. नारायणगावातून टोमॅटो पुणे, मुंबईसह दिल्लीपर्यंत जातात. हंगामाच्या काळात नारायणगावमधून थेट आखाती, अरब देशांना टोमॅटोची निर्यात होते.

टोमॅटोची आवक किती घटली?

पुणे बाजार समितीत दररोज सरासरी १०-१२ हजार टन टोमॅटोची आवक होत होती. आता ती चार ते पाच हजार टनांवर आली आहे. नाशिक, नारायणगाव, सातारा, सांगली, सोलापूर येथील नदीकाठावर भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून टोमॅटोची लागवड केली जाते. टोमॅटोची लागवड राज्यात सर्वत्र होते. स्थानिक गरज भागल्यानंतर जास्तीचा टोमॅटो मुंबई, पुण्याकडे किंवा देशभरात पाठवला जातो. याशिवाय कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून टोमॅटोची आवक होते. यापैकी कर्नाटकमधील आवक नियमित असते. अशीच अवस्था मुंबईच्या वाशी मार्केटमध्येसुद्धा दिसते.

सरकारची भूमिका काय?

बाजारात टोमॅटो दीडशे रुपयांवर गेला असला तरी शेतकऱ्यांना साधारण ७० ते ९० रुपये मिळतात. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी येत्या १५ दिवसांत दिलासा मिळेल आणि महिन्याभरात दर सामान्य पातळीवर येतील, असा दावा केला होता. हिमाचल प्रदेशातील सोलन आणि सिरमौर जिल्ह्यांमधून चांगला पुरवठा झाल्यामुळे दिल्लीत टोमॅटोच्या किरकोळ किमती तात्काळ खाली येतील, असेही त्यांचे म्हणणे होते, मात्र हे सर्व दावे चुकीचे ठरले आहेत. केंद्र सरकार टोमॅटो नाशवंत आहेत, जून-ऑगस्ट आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दरवर्षीच दरवाढ होते, अशी सारवासारव करत आहे. तमिळनाडू सरकारने राज्यातील रेशन दुकानांवर टोमॅटो विक्रीची व्यवस्था केली आहे. या दुकानांत टोमॅटो सरासरी ६० रुपये किलोने मिळत आहेत. राज्यातील एकूण ८० रेशन दुकानांमध्ये टोमॅटोची विक्री केली जात आहे. टोमॅटोच्या वाढलेल्या भावाचा फटका आता ‘मॅक्डोनाल्ड्स’ या फास्ट फूड जॉइंटलाही बसला आहे. त्यांनी आपल्या खाद्यपदार्थात तात्पुरत्या स्वरूपात टोमॅटोचा समावेश बंद केला आहे.

भाजीमधील आणीबाणी टाळता येईल?

देशाची लोकसंख्या आणि तापमानवाढीचा विचार करता अन्नसुरक्षेच्या दृष्टीने शीतगृहांची साखळी उभारण्याची गरज आहे. बाजार समित्यांच्या आवारात शीतगृहांची उभारणी करण्याची गरज आहे. युरोपमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातून भाजीपाल्याची तोडणी केल्यापासून ते ग्राहकांच्या घरातील फ्रिजपर्यंत भाजीपाला हा शीत साखळीतून प्रवास करतो. भारतात अशी साखळी तयार झाल्याशिवाय देशातील सर्वसामान्य ग्राहकांची भाजीपाल्याबाबतची अन्नसुरक्षा निश्चित करता येणार नाही. बदलते वातावरण, वाढते तापमान, मोसमी पावसातील अनियमितता, दरवर्षी होणाऱ्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे भाजीपाल्याच्या पुरवठय़ावर परिणाम होत आहे. त्याचा ग्राहक आणि शेतकऱ्यांवरील परिणाम टाळून दोघांचेही हित सांभाळायचे असेल, तर शीतगृहांची साखळी उभारणे आणि ती व्यावसायिक दृष्टिकोनातून चालविणे हाच पर्याय आहे, त्याशिवाय भाजीपाल्याची अशी टोकाची, अतिरेकी दरवाढ टाळता येणार नाही.

Story img Loader