तुर्कस्तानातील पुरातत्त्वीय स्थळावर ८.७ दशलक्ष-वर्ष जुने नवीन एपचे जीवाश्म सापडले आहे. हे नव्याने सापडलेले जीवाश्म मानवी उत्पत्तीच्या दीर्घ-स्वीकृत कल्पनांना सध्या आव्हान देत आहे. या नवीन सापडलेल्या अवशेषांमुळे पारंपरिकरित्या मानल्या जाणाऱ्या सिद्धांताला आव्हान मिळाले आहे. मूलतः मानवाचे एपच्या स्वरूपातील पूर्वज आफ्रिकेत उत्क्रांत झाले आणि नंतर इतरत्र ठिकाणी पसरले असे मानले जाते. परंतु या नवीन संशोधनामुळे सुमारे नऊ ते सात दशलक्ष वर्षांदरम्यान मानवाचे पूर्वज आफ्रिकेत स्थलांतरित होण्यापूर्वी युरोपामध्ये उत्क्रांत झाले या सिद्धांताला महत्त्व प्राप्त झाले आहे.

नव्याने सापडलेल्या एपचे नाव अ‍ॅनाडोलुव्हियस टर्की असे ठेवण्यात आले आहे. हे जीवाश्म कॅन्किरीजवळ असलेल्या जीवाश्म परिसरातून संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने गोळा करण्यात आले. यामुळे भूमध्यसागरीय भागातील एपचे जीवाश्म वैविध्यपूर्ण आहेत हे लक्षात येते आणि सुरुवातीच्या होमिनिन्सच्या पहिल्या ज्ञात किरणोत्सर्गाचा भाग असल्याचे दर्शविते; ज्यामध्ये आफ्रिकन वानर (चिंपांझी, बोनोबोस आणि गोरिल्ला), मानव आणि त्यांचे जीवाश्मिभूत झालेले पूर्वज समाविष्ट आहेत.

nuclear energy production information in marathi
कुतूहल : अणुऊर्जा – एक अपरिहार्य पर्याय
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ancient Egyptian Screaming Mummy
Egyptian Screaming Mummy: ३५०० वर्षे प्राचीन किंचाळणाऱ्या बाईचे रहस्य उलगडले; इजिप्तमधील नवे संशोधन नेमके काय सांगते?
mhada documents eaten by rats loksatta
म्हाडाच्या संक्रमण शिबिरार्थींची हजारो कागदपत्रे वाळवी, उंदरांनी केली फस्त
concepts of logos dialectic socrates philosophy
तत्त्व-विवेक : पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील ‘सॉक्रेटिक वळण’
history of Prayagraj
Maha Kumbh Mela 2025: २५०० वर्षांहून प्राचीन असलेल्या ‘प्रयागराज’चा पुरातत्त्वीय इतिहास नेमकं काय सांगतो?
Loksatta kutuhal story of the discovery of dinosaurs
कुतूहल: डायनोसॉरच्या शोधाची कथा
Bhandara District, Sarpewada , Tiger, citizens crowd,
VIDEO : नरभक्षक वाघ दिसताच नागरिकांचा गोंधळ, सुरक्षा उपायांची…

अधिक वाचा : विश्लेषण: मानवी उत्क्रांतीचा नवीन सिद्धांत – कोण होते मानवाचे पूर्वज?

टोरोन्टो विद्यापीठ (U of T) येथील प्राध्यापक डेव्हिड बेगन आणि अंकारा विद्यापीठातील प्राध्यापक आयला सेविम एरोल यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने सह-लेखन केलेल्या शोधप्रबंधाचे प्रकाशन ‘कम्युनिकेशन्स बायोलॉजी’मध्ये करण्यात आलेले आहे. याच संशोधनात त्यांच्या निष्कर्षाचे वर्णन करण्यात आलेले आहे.

“आमचे निष्कर्ष पुढे सूचित करतात की, होमिनीन्स केवळ पश्चिम आणि मध्य युरोपमध्येच विकसित झाले असे नाही तर आफ्रिकेत विखुरण्यापूर्वी त्यांनी विकसित होण्यासाठी आणि पूर्व भूमध्यसागरात पसरण्यासाठी जवळपास ५ दशलक्ष वर्षे घेतली,” असे बेगन यांनी स्पष्ट केले आहे, बेगन हे टोरोन्टो विद्यापीठातील कला आणि विज्ञान शाखेच्या
मानववंशशास्त्र विभागातील प्राध्यापक आहेत. या संशोधनातील निष्कर्ष हा २०१५ साली उघडकीस आलेल्या संरक्षित केलेल्या आंशिक क्रॅनियमच्या (कवटीचा भाग) अस्तित्त्वावर अवलंबून आहे. ज्यामध्ये बहुतेक चेहऱ्याची रचना आणि मेंदूचा पुढील भाग समाविष्ट आहे व त्या मिळालेल्या भागावरून हे संशोधन मांडण्यात आले आहे. “या नव्याने मिळालेल्या जीवाश्माने आम्हाला उत्क्रांती संबंधीची भाकीते नव्याने मांडण्यासाठी वाव दिला आहे. तसेच या नवीन अवशेषांचे वर्ण आणि गुणधर्म वापरून विस्तृत आणि अधिक तपशीलवार विश्लेषण करण्याची संधी मिळाली आहे” असे बेगन म्हणाले.

“मिरर इमेजिंग या तंत्रज्ञानाने या एपचा चेहरा बहुतेक पूर्ण झाला आहे. नव्याने सापडलेला भाग कपाळाचा आहे, याआधी मिळालेला भाग हा टाळूचा होता. पूर्वी मिळालेल्या जीवाश्मांमध्ये मेंदूचा इतक्या मोठ्या प्रमाणात भाग असण्याची नोंद नाही. संशोधकांचे म्हणणे आहे की, अ‍ॅनाडोलुव्हियस मोठ्या नर चिंपांझीच्या (५०-६० किलो) आकाराइतका मोठा होता – किंबहुना चिंपाझीपेक्षाही खूप मोठा आणि मादी गोरिलाच्या सरासरी आकाराच्या (७५-८० किलो) जवळ जाणारा होता – तो कोरड्या जंगलात राहत होता आणि कदाचित त्याने जमिनीवर बराच वेळ घालवला असण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा : विश्लेषण : एक लाख वर्षापूर्वी मानवी संस्कृतीत अंत्यसंस्कारांचा विधी करणारे ‘होमो नालेडी’ कोण होते?

“आमच्याकडे सध्या त्यांच्या शरीराची इतर हाडे नाहीत. पण त्याचा जबडा आणि दात यांचे अवशेष आहेत, तसेच त्याच्या शेजारी आढळणारे इतर प्राणी आणि पर्यावरणाची भूगर्भीय स्थिती पाहता, अ‍ॅनाडोलुव्हियस कदाचित मोकळ्या वातावरणात राहत होता, हे इतर मोठ्या वानरांच्या जंगलातील वास्तव्याच्या तुलनेत विपरीत आहे” असे सेविम एरोल म्हणाले. या शिवाय “आफ्रिकेतील सुरुवातीच्या मानवांचे आणि तेथील मानवाच्या पूर्वजांचे शक्तिशाली जबडे आणि मोठे जाड मुलामा चढवलेले दात सारखेच होते. त्याचप्रमाणे या नवीन संशोधनातून समोर आलेल्या एपचे दातही तसेच आहेत, त्यामुळे या एपच्या आहारात कठीण अन्नपदार्थांचा समावेश होता, हे लक्षात येते.

अ‍ॅनाडोलुव्हियस सोबत राहणारे प्राणी आज सामान्यतः आफ्रिकन गवताळ प्रदेश आणि कोरड्या जंगलांशी संबंधित आहेत, यात जिराफ, गेंडा, विविध प्रकारची काळवीटे, झेब्रा, हत्ती, पोर्क्युपाइन्स, हायना आणि सिंहासारखे मांसाहारी प्राणी यांचा समावेश होतो हे संशोधनातून दिसून आले आहे. म्हणजेच सुमारे आठ दशलक्ष वर्षांपूर्वी सजीव समुदाय पूर्व भूमध्य समुद्रातून आफ्रिकेत पसरलेला दिसतो.

आधुनिक आफ्रिकेतील सजीवांचे पूर्वज भूमध्य समुद्राच्या परिसरातून येथे स्थायिक झाल्याचे ज्ञात होते. आता या नवीन संशोधनामुळे आफ्रिकेतील प्राचीन वानर, मानवाचे पूर्वज याच यादीत मोडतात, असे नमूद केले तरी चुकीचे ठरणार नाही, असे सेविम एरोल सांगतात. अ‍ॅनाडोलुव्हियस टर्की याचा शोध उत्क्रांतीच्या अनेक शाखांपैकी एक महत्त्वाची शाखा आहे. ज्याने चिंपांझी, बोनोबोस, गोरिल्ला आणि मानवांना जन्म दिला. आज मानवाचे पूर्वज आफ्रिकेत जन्माला आले, तेथेच उत्क्रांत झाले असे मानले जात असले तरी, या प्रस्तुत संशोधनाचे अभ्यासक मानवाचे पूर्वज युरोप आणि पूर्व भूमध्य येथून आफ्रिकेत पसरल्याचा निष्कर्ष काढतात.

जवळच असलेल्या ग्रीस (ओरानोपिथेकस) आणि बल्गेरिया (ग्रेकोपिथेकस) येथेही याच एपच्या म्हणजेच अ‍ॅनाडोलुव्हियस आणि इतर जीवाश्म वानरांचा एक गट शरीरशास्त्र आणि पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने होमिनिन्स किंवा मानवांच्या जवळ जाणारा आहे, असे लक्षात आले आहे. नवीन जीवाश्म हे सुरुवातीच्या होमिनिनच्या या गटाचे सर्वोत्तम-जतन केलेले नमुने आहेत आणि आजपर्यंतचा सर्वात मजबूत पुरावा देतात की, या गटाचा उगम युरोपमध्ये झाला आणि नंतर हा गट आफ्रिकेत पसरला.
अभ्यासाच्या तपशीलवार विश्लेषणातून हे देखील दिसून येते की बाल्कन आणि अॅनाटोलियन वानर पश्चिम आणि मध्य युरोपमधील पूर्वजांपासून उत्क्रांत झाले. त्याच्या अधिक व्यापक माहितीसह, प्रस्तुत संशोधन असे पुरावे प्रदान करते की हे इतर वानर देखील होमिनिन होते आणि याचाच अर्थ संपूर्ण गट युरोपमध्ये विकसित झाल्याची शक्यता आहे.

मानवाचे पूर्वज युरोपात उत्क्रांत झाले हा सिद्धांत फारसा स्वीकारला जात नाही, असे बेगन सांगतात. “हा निष्कर्ष आफ्रिकन वानर आणि मानव केवळ आफ्रिकेतच उत्क्रांत झाले या प्रदीर्घ दृष्टिकोनाशी विरोधाभास दर्शवतो. युरोप आणि अनातोलियामध्ये सुरुवातीच्या होमिनिनचे अवशेष मुबलक असले तरी, सुमारे सात दशलक्ष वर्षांपूर्वी पहिले होमिनिन अस्तित्त्वात येईपर्यंत आफ्रिकेत ते पूर्णतः नामशेष झालेले होते.

“हा नवा पुरावा या गृहितकाला समर्थन देतो की, होमिनीनची उत्पत्ती युरोपमध्ये झाली आणि नऊ ते सात दशलक्ष वर्षांपूर्वी इतर अनेक सस्तन प्राण्यांसह ते आफ्रिकेत पसरले. हे सध्या तरी निश्चितपणे सिद्ध करता येत नसले तरी त्यासाठी, आम्हाला युरोप आणि आफ्रिकेतील आणखी जीवाश्म शोधण्याची आवश्यकता आहे; जे आठ ते सात दशलक्ष वर्षांपूर्वी दोन गटांमध्ये निश्चित संबंध प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक आहेत.”, असे बेगन सांगतात.

Story img Loader