एखादी गर्भवती महिला आंतरराष्ट्रीय विमानातून प्रवास करत असेल आणि त्या प्रवासातच तिने बाळाला जन्म दिला तर त्या बाळाचं नागरिकत्व कोणत्या देशाचं असतं, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? किंवा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय का. आम्ही या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलाय. पाहुयात काय आहे नियम…
भारतीय नियमांनुसार, ७ महिने किंवा त्याहून अधिक महिने गर्भवती महिलेला विमानात प्रवास करण्याची परवानगी नाही. परंतु तरीही, विशेष कारणांमुळे प्रवासास परवानगी दिली जाते. अशातच, समजा भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या विमानात एखाद्या महिलेने बाळाला जन्म दिल्यास त्या मुलाच्या नागरिकत्वाबाबत मोठा गोंधळ निर्माण होतो. बाळाचं नागरिकत्व जाणून घेण्यासाठी संबंधित विमान कोणत्या देशातून उड्डाण करत आहे, हे जाणून घेणं आवश्यक असतं. कारण त्यानंतर लँडिंग करताना जन्म प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्रे विमानतळ प्राधिकरणाकडून मिळवणं सोपं जातं.
अनेक देशांमध्ये दुहेरी नागरिकत्वाची तरतूद नाही, त्यामध्ये भारताचाही समावेश आहे. एखादं विमान जर पाकिस्तानमधून अमेरिकेला जातंय, पण यादरम्यान ते भारताच्या हवाई हद्दीत असताना त्या विमानात बाळाचा जन्म झाला तर त्या बाळाला भारतीय नागरिकत्व मिळू शकतं. याशिवाय तो त्याच्या आईवडिलांच्या देशाचं नागरिकत्व देखील मानू शकतो. भारतात दुहेरी नागरिकत्वाबद्दल कोणतीही तरतूद नाही.
दरम्यान, प्रत्येक देशाचे विमानात जन्मलेल्या मुलांच्या नागरिकत्वाबाबत वेगवेगळे नियम आहेत. त्यामुळे कोणत्या देशाच्या एअरलाईन्सच्या विमानात कोणत्या देशाच्या हद्दीत बाळाचा जन्म झालाय, त्यावर त्या बाळाचं नागरिकत्व कोणत्या देशाचं असेल हे ठरतं.
काही महत्वाच्या गोष्टी –
सामान्यतः पालकांचं नागरिकत्व बाळाला मिळतं, अशात बाळाचा जन्म कुठे होतो, याचा विचार केला जात नाही. तसेच काही देश त्यांच्या हवाई हद्दीत जन्माला आल्यास नागरिकत्व देतात. द पॉइंट्स गायच्या मते, युनायटेड स्टेट्स त्याच्या सीमेच्या १२ एनएमआयच्या आत जन्मलेल्यांना आपल्या देशाचं नागरिकत्व देते. विमानात झालेल्या प्रसूती देखील या कायद्यांतर्गत येतात.
Simpleflying नं दिलेल्या वृत्तानुसार, बरीच प्रकरणं अशी देखील घडली जिथे मुलांना त्या देशाचं नागरिकत्व मिळावं, म्हणून पालक पर्यटनासाठी जायचे. अशा वाढत्या प्रकरणांमुळे अनेक देशांना त्यांच्या कायद्यात सुधारणा करावी लागली. दरम्यान, कोणतेही युरोपियन राष्ट्र सध्या बिनशर्त जन्मसिद्ध नागरिकत्व देत नाही. कतार सारखी इतर राष्ट्रे देखील समान विशेषाधिकार देत नाहीत. अशा परिस्थिती विमानात जन्मलेल्या मुलांचे राष्ट्रीयत्व सहसा त्यांच्या पालकांच्या कागदपत्रांवर आधारित असते.
द टेलीग्राफच्या मते, जर बाळाचा जन्म ज्या फ्लाइटमध्ये झाला असेल ते कन्व्हेन्शन ऑन द स्टेटलेसनेस करारावर स्वाक्षरी केलेल्या देशातून असेल, तर विमान ज्या देशात नोंदणीकृत असेल त्या देशाचं नागरिकत्व बाळाला मिळतं.