रशियातील निवडणुकीचा निकाल लागला आणि व्लादिमीर पुतिन हे पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले. तीन दिवसांच्या निवडणुकीनंतर, देशाच्या एक्झिट पोलनुसार, पुतिन यांनी ८७ टक्के मतांनी विजय मिळवला. सध्या सुरु असलेल्या युद्धाला विरोध करणाऱ्या उमेदवारांना निवडणुकीत बंदी घातल्याने, रशियन राष्ट्राध्यक्षांना कोणतेही गंभीर आव्हान नव्हते. यामुळे पुढील सहा वर्षांसाठी २०३० पर्यंत पुतिन सत्तेत असणार आहेत. या पुढील सहा वर्षांच्या कालखंडात ते नेमके काय करणार आहेत हे पाहण्यासारखे आहे. त्याच पार्श्वभूमीवर रशिया-युक्रेन युद्ध आणि जगासाठी पुतिन यांच्या या विजयाचा अर्थ नेमका काय आहे हे पाहणे गरजेचे ठरते.

रशियन निवडणुकीत काय झाले?

रशियन निवडणुकीचा निकाल काय लागणार याचा अंदाज सगळ्यानांच होता, तरी काहीतरी नाट्यपूर्ण परिस्थिती समोर येईल अशी अपेक्षा होती. शेवटच्या दिवशी रविवारी, विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी यांच्या विधवा पत्नी यूलिया नवलनाया यांनी आवाहन केल्यानंतर पुतिन आणि युद्धाविरुद्ध नाराजी दर्शवण्यासाठी दुपारच्या वेळी रशियन दूतावासाबाहेर मतदार मोठ्या संख्येने जमले. सीएनएनचे माजी मॉस्को ब्यूरो चीफ जिल डोहर्टी यांनी सांगितले की, “रशियन सरकारला असे होऊ द्यायचे नव्हते. या नाराजी दर्शवणाऱ्या लांब रांगा महत्त्वपूर्ण होत्या. रशियामधील दडपशाहीमुळे हा निषेध कायमस्वरूपी चळवळीत बदलू शकेल अशी शक्यता नाही. मतदानाच्या शेवटच्या दिवशी किमान ८० आंदोलकांना अटक करण्यात आली. फेब्रुवारीमध्ये देखील रशियन सरकारने नवलनी यांच्या शोकसभेसाठी बाहेर पडलेल्यांवर कडक कारवाई केली होती.

ukraine nuclear bomb
रशिया-युक्रेन संघर्ष अणुयुद्धात बदलणार? युक्रेनची अणुबॉम्बची तयारी? काय होणार जगावर परिणाम?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
rbi governor shaktikanta das on inflation risks and slowing growth
चलनवाढीसह विकासवेग मंदावण्याचा धोका ; शक्तिकांत दास
reality about donald trump and vladimir putin friendship
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन खरोखर एकमेकांचे मित्र आहेत का? दोघांच्या मैत्रीत युक्रेनचा ‘बकरा’?
butter theft in russia amid ukrain war
युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे रशियात बटरची चोरी; नेमकं प्रकरण काय?
ukraine israel war increase carbon emissions
युक्रेन, इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ
Maharashtra assembly elections 2024 independent candidate getting support from mahayuti maha vikas aghadi Unsatisfied leader in bhandara Vidhan sabha
भंडारा विधानसभेत अपक्ष उमेदवारांचा बोलबाला? युती-आघाडीतील असंतुष्ट अपक्षांच्या पाठिशी!
sex ministry in russia
‘या’ देशात स्थापन होणार सेक्स मंत्रालय? डेटिंग अन् लग्नासाठीही सरकार पुरवणार आर्थिक साह्य? कारण काय?

निवडणुकीत पुतिन यांना तीन उमेदवारांचा सामना करावा लागला. ८७ टक्क्यांहून अधिक मते मिळाल्यावर त्यांनी रशियाची लोकशाही पश्चिमेकडील अनेकांपेक्षा अधिक पारदर्शक असल्याचे नमूद केले. रशियाव्याप्त युक्रेनच्या भागातही मतदान झाले, परंतु त्यावर रशियाला पूर्ण नियंत्रण ठेवता आले नाही. काही प्रकरणांमध्ये निवडणूक कर्मचारी सैनिकांसह लोकांच्या घरी मतपेट्या घेऊन गेले आणि त्यांना मतदान करण्यास भाग पाडले, असे वृत्त आहे.

पुतिन यांच्यासाठी निवडणूक जिंकणे महत्त्वाचे का होते?

निवडणुकीचे निकाल अपेक्षित होता. तरीही पुतिन यांच्यासाठी हे मतदान महत्त्वाचे होते. या विजयाने त्यांना रशियाचे अध्यक्ष म्हणून पूर्ण तीन दशके नेतृत्व करता येणार आहे. या निवडणुकीत जिंकणे पुतिन यांच्यासाठी महत्त्वाचे होते कारण या विजयातून रशियन राजकीय व्यवस्थेचे निष्णात खेळाडू म्हणून त्यांना आपली प्रतिमा सिद्ध करायची होती, असे मत परराष्ट्र धोरणविषयक तज्ज्ञाने निवडणुकीपूर्वी व्यक्त केले होते. रशियन राष्ट्राध्यक्षांनी या विजयाने नेमके तेच साध्य केले आहे. युक्रेनच्या आक्रमणानंतरच्या पहिल्या निवडणुकीचा निकाल पुतिन यांच्या युद्ध प्रयत्नांमागील यश म्हणून पहिला जाईल. या विजयाने जनतेचे युद्धाला सार्वजनिक समर्थन असल्याचा दावा करणे पुतिन सरकारला शक्य होणार आहे. दरम्यान युरोपियन देशांकडून करण्यात आलेली कोंडी आणि त्यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला बसलेला फटका कायम आहे.

या विजयाचा युद्धावर काय परिणाम होईल?

पुतिन यांनी रशियातील निवडणुकीत मिळवलेला विजय म्हणजे युक्रेनमधील युद्धात आगेकूच करण्याचा जनादेश म्हणून पाहिले जात आहे. त्यांनी पश्चिमीदेशांना थेट इशाराच दिला आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो लष्करी युती आणि रशिया यांच्यातील संघर्षाचा अर्थ म्हणजे जग तिसऱ्या महायुद्धापासून एक पाऊल दूर आहे, असा इशाराच पुतिन यांनी दिला आहे. पुतिन यांनी देशाच्या सशस्त्र दलांना बळकट करण्याचे आणि युक्रेनमधील रशियाच्या “विशेष लष्करी ऑपरेशन” ला प्राधान्य देण्याचे वचन दिले आहे. “या निवडणुका पुतिन यांच्यासाठी युक्रेनमध्ये युद्ध करण्याच्या निर्णयाला वैध ठरवण्याचे एक साधन आहे,” मॉस्को येथील कार्नेगी रशिया युरेशिया सेंटरचे वरिष्ठ सहकारी आंद्रेई कोलेस्निकोव्ह यांनी मतदानापूर्वी ‘गार्डियन’ला सांगितले.
रँड कॉर्पोरेशन थिंक टँकचे वरिष्ठ सल्लागार ब्रायन मायकेल जेनकिन्स यांनी असोसिएटेड प्रेस (एपी) ला सांगितले की,
‘राष्ट्राध्यक्ष पुतिन युक्रेनमध्ये लढण्यासाठी दुसऱ्या सैन्याची जमवाजमव करण्याचे आदेश देऊ शकतात. असा पहिला आदेश २०२२ साली सप्टेंबरमध्ये देण्यात आला होता. रशियन नेते आता संपूर्ण रशियन समाजाला संरक्षण गरजांनुसार एकत्रित करण्याविषयी बोलत आहेत,”

पुतिन यांच्या सहाव्या कार्यकाळाचा मथितार्थ आहे?

राष्ट्राध्यक्षांनी रशियावर आपली घट्ट पकड कायम ठेवली आहे. त्यांनी मतभिन्नता नष्ट केली आहे, रशियन अर्थव्यवस्था निर्बंधांपासून वाचली आहे. युक्रेनचा सर्वात मोठा लष्करी पाठीराखा असलेल्या अमेरिकेची दमछाक होत आहे. नोव्हेंबरच्या निवडणुकांमुळे कीवचा पाठिंबा आणखी खंडित होऊ शकतो. दरम्यान, रशियाने आपल्या मित्र राष्ट्रांशी, विशेषत: चीनशी आपले संबंध मजबूत करणे सुरू ठेवले आहे. आपल्या विजयी भाषणात पुतिन यांनी आगामी काळात दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील, असे मत व्यक्त केले. वॉशिंग्टन आणि बीजिंगमधील तणाव वाढत असताना, शी जिनपिंग पुतिन यांना एक महत्त्वाचा सहयोगी म्हणून पाहतात. चीनने तटस्थ भूमिका घेतलेली असली तरी रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचा निषेध करण्यास चीनने नकार दिला आहे. याशिवाय उत्तर कोरियाचा नेता किम जोंग उन यांचीही पुतिन यांच्याशी जवळीक वाढत आहे. नुकतीच त्यांनी रशियात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेतली.

भारतानेही रशिया-युक्रेन युद्धात तटस्थता राखली आहे. भारत अमेरिकेशी संबंध मजबूत करत आहे परंतु रशियापासून दूर गेलेला नाही आणि भारत रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पुतिन यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तर पश्चिमेने रशियन राष्ट्राध्यक्षांना खलनायक म्हणून चित्रित केले असले तरी, अनेक देशांमध्ये, विशेषत: विकसनशील अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये असे चित्रण नाही. आर्थिक कारणांसाठी अनेक देश तटस्थ भूमिका घेत आहेत.