इंडियन एक्स्प्रेस डॉटकॉमला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, अभिनेत्री सैयामी खेरने तिच्या दिसण्यावरून लोकांनी केलेल्या टिपण्यांविषयीचे तिचे अनुभव सांगितले. यामध्ये तिच्या किशोरवयात तसेच ज्या वेळेस तिने मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला त्यावेळेस तिच्या चेहऱ्याविषयी, शरीर आणि केस यांवरून टीका टिप्पणी करण्यात आली. ती म्हणते, तिला अजूनही तिच्या कुरळ्या केसांविषयी प्रतिक्रिया येतात … परंतु तिच्या नैसर्गिक केसांबद्दल ज्या काही विरोधाभासी प्रतिक्रिया येतात त्याकडे ती दुर्लक्ष करते.
केस कोणत्याही व्यक्तीच्या बाह्यरूपाचा अविभाज्य घटक आहेत आणि केस एखाद्याची ओळखही असू शकतात. ऐतिहासिकदृष्ट्या, आफ्रिकन-अमेरिकन लोकांचे केस पाश्चात्य समाजातील शक्तिशाली वांशिक गटांद्वारे “कुरूप, अनियंत्रित आणि अव्यावसायिक” ठरविले गेले, कारण ते सौंदर्याच्या युरोसेंट्रिक मानकांची पूर्तता करत नाहीत. सरळ नसलेले केस समाजात “वेगळ्या पद्धतीने” पाहिले आणि हाताळले जातात. भारतातही, कुरळे केस “वेगळे” असण्याचा हा समज कायम आहे, परंतु त्याचे प्रमाण कमी असले तरी वेगळेपणाचा समज कायम आहे. असे का, हे जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
केसांचे प्रकार?
अमेरिकन स्टायलिस्ट आंद्रे वॉकरने केसांच्या प्रकारांचे लोकप्रिय वर्गीकरण दिले आहे, त्यांनी केसांचे वर्गीकरण चार प्रकारात केले आहे: १) सरळ, २) सरळ परंतु थोडीशी वळण असलेले, ३) कुरळे आणि ४) किंकी (किंकी म्हणजे “घट्ट कॉइल” सारखे केस). केसाच्या प्रत्येक प्रकारचे काही उपप्रकार आहेत. वॉकर यांनी केलेले वर्गीकरण लोकांना त्यांचे केस कोणत्या प्रकारात मोडतात हे कळण्यासाठी होते. या वर्गीकरणासाठी वॉकरचा तर्क लोकांना त्यांचे केस कोणत्या श्रेणीत बसतात हे ओळखण्यासाठी होता आणि त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या केसांची काळजी घेण्याचे वेगवेगळे मार्ग सुचवले.
आणखी वाचा: विश्लेषण: चर्चने लिपस्टिकच्या वापरावर बंदी का घातली होती? जाणून घ्या
केस कुरळे किंवा सरळ कशामुळे होतात? या मागील विज्ञान
डॉ चित्रा आनंद या बेंगळुरू स्थित त्वचातज्ज्ञ आणि ट्रायकोलॉजिस्ट आहेत. त्यांनी इंडियन एक्स्प्रेस डॉटकॉमला सांगितले की, “केसांचा पोत किंवा प्रकार हा ९९ टक्के गुणसूत्र आणि अनुवांशिकतेवर अवलंबून असतो. तर उरलेला एक टक्का हे सभोवतालचे वातावरण/ पर्यावरणीय आणि केसांची घेतली जाणारी काळजी यावर ठरतो. गरम हवामानात केस अधिक कुरळे होतात, त्यामुळे दक्षिण भारतात कुरळे/ सरळ केस अधिक प्रचलित असतात, असे त्या म्हणाल्या. कुरळे किंवा सरळ नसलेले केस हे अनुवांशिकतेनुसारच आलेले असतात, असे मुंबईतील त्वचा आणि केसतज्ज्ञ डॉ स्तुती खरे यांनी सांगितले. तसेच त्यांनी इंडियन एक्स्प्रेस डॉटकॉमकडे हेही नमूद केले की, शुष्क आणि उष्ण हवामानामुळे केसांना कुरळेपणा येतो.
नैसर्गिक केस आणि त्याचा इतिहास
त्वचेच्या रंगाच्या पलीकडे, केसांच्या प्रकारावरून देखील भेदभाव केला गेला आहे. कुरळ्या केसांकडे आफ्रिकन-अमेरिकन इतिहासात युरोपियन सौंदर्य मानकांच्या विरोधी म्हणून पाहिले गेले आहे. म्हणजेच कुरळे हे सौंदर्याचे लक्षण मानले जात नव्हते.
अयाना बर्ड आणि लोरी थार्प्स यांनी त्यांच्या २०१४ साली लिहिलेल्या ‘हेअर स्टोरी: अनटँगलिंग द रुट्स ऑफ ब्लॅक हेअर इन अमेरिका’ या पुस्तकात, आफ्रिकन लोकांबद्दल वांशिक भेद होतं होता, याचे वर्णन केले आहे. गोऱ्या लोकांनी चांगल्या केसांपेक्षा खराब केसं असणाऱ्यांना वाईट वागवले. चांगले केस हे लांब आणि मऊ असतात, दाट किंवा कुरळे नसतात, अशी धारणा असते; असे त्यांनी नमूद केले आहे. काळ्या म्हणजे आफ्रिकन लोकांचे केसं दाट आणि कुरळे होते वा असतात. त्यामुळे हा भेदभाव आजही काही मार्गांनी चालू आहे.
‘सोशल सायकोलॉजिकल अँड पर्सनॅलिटी सायन्स जर्नल’मध्ये क्रिस्टी झोउ कोव्हल आणि अॅशले शेल्बी रोसेट यांचा ‘नोकरी भरतीमध्ये नैसर्गिक केसांचा पूर्वाग्रह’ नावाचा संशोधन निबंध २०२० साली प्रकाशित झाला, या निबंधात समकालीन कामाच्या ठिकाणी असणाऱ्या कृष्णवर्णीय महिलांविरुद्ध केसांचा पूर्वग्रह कसा असतो हे नमूद केले आहे.
अमेरिकेतील नोकरीच्या अनेक अर्जांवरील अभ्यासांद्वारे, त्यांनी असा निष्कर्ष काढला की, नोकरीसाठी सरळ केसं हवे , हा नियम गोऱ्या स्त्रियांच्या शारीरिक वैशिष्ट्यावर अवलंबून आहे, हा पक्षपातीपणा आणि त्यानंतरचा भेदभाव केसाच्या पोतावर ठरत असे. गोर्या स्त्रियांच्या तुलनेत केस नैसर्गिक केशरचना असलेल्या काळ्या स्त्रिया कमी व्यावसायिक आणि कमी सक्षम मानल्या जात होत्या, त्यांनी केस सरळ केले तरी हेच मानले जात होते असे त्यांनी नमूद केले.
बर्ड आणि थार्प्स यांनी त्यांच्या पुस्तकात “चांगली” आणि “वाईट” हा केसांविषयीचा समज पिढ्यानपिढ्या कसा चालू आहे याचा उल्लेख केला आहे. “नंतर, ‘चांगले केस’ असणे म्हणजे केसांचा पोत जो आर्थिक संधी आणि सामाजिक फायद्याच्या बरोबरीचा होता. तर ‘खराब केस’ हे मागासलेपणाचे चिन्ह आणि एखाद्याच्या कनिष्ठतेचे लक्षण असल्याचे मानले जात होते,” याशिवाय त्यांनी २१ व्या शतकातील नैसर्गिक केसांच्या आसपासच्या समस्यांवर लिहिले आहे.
केसांबद्दल भारतीय समज काय आहे?
भारतात कुरळ्या केसांना अमेरिकेसारखे वागवत जात नसले तरी, गुलामगिरीने व्यापलेला ऐतिहासिक संबंध लक्षात घेता, कुरळ्या केसांबद्दल भारतात पूर्णतः सकारात्मक समज नाही. हा अमेरिकेमध्ये अस्तित्त्वात असलेल्या भेदभावपूर्ण समजुतींचा परिणाम आहे, असे फिक्समाय कर्ल्स या भारतीय कुरळे केसांच्या ब्रँडच्या संस्थापक अंशिता मेहरोत्रा यांनी सांगितले, ज्यांचा उद्देश लोकांना त्यांचे नैसर्गिक केस स्वीकारण्यात मदत करणे हा आहे.
मेहरोत्रा, यांचे स्वतःचे केसही सरळ नाहीत , त्याम्हणाले, “जेव्हा लोक कुरळ्या केसांच्या लोकांना मूलनिवासी भारतीय समजत नाहीत तेव्हा ते वेदनादायी असते, विशेषतः हे दक्षिणेकडे अधिक घडते.
आणखी वाचा: विश्लेषण: आधुनिक फॅशन ट्रेण्डमध्ये ‘इंडिगो ब्लू’ आला कुठून?
युरोसेंट्रिंक सौंदर्याच्या धारणा
सध्याच्या सौंदर्याच्या धारणा या युरोसेंट्रिंक आहेत, म्हणजेच युरोपीय देशांप्रमाणे सौंदर्याच्या व्याख्या ठरवल्या जातात असे मत अश्बा बोटॅनिक्स या भारतीय कुरळे हेअर केअर ब्रँडच्या संस्थापक आशा बराक यांनी नोंदविले. त्यांचे स्वत:चे केस कुरळे असल्याने, २०१४ मध्ये ‘राइट रिंगलेट्स’ नावाचा कुरळे केसांची काळजी घेणारा ब्लॉग सुरू करणारी आशा भारतातील पहिली होती. त्यांनी ही “चळवळ पुढे चालू ठेवण्यासाठी” फेसबुकवर इंडियन कर्ल प्राइड नावाचा सोशल मीडिया कम्युनिटी ब्लॉग देखील सुरू केला.
बायर्ड आणि थार्प्सच्या निष्कर्षांच्या अनुषंगाने, बराक म्हणाल्या: “सरळ केस हे ‘आदर्श’ केस मानले जातात: ‘स्वच्छ’, ‘योग्य’ आणि ‘परिपूर्ण’. कर्ल हे “विस्कळीत आणि नियंत्रणाबाहेर” म्हणून पाहिले जातात. “वैयक्तिक अनुभवावरून, मी असे म्हणू शकते की भारतात सरळ नसलेले केसांना दुय्यम दर्जा दिला जातो कारण युरोपियन सौंदर्याचे नियम भारतात लागू केले गेले आहेत.
भारतात सरळ नसलेल्या केसांची ही टिकून राहणारी धारणा मीडिया आणि लोकप्रिय संस्कृतीतही दिसून येते. भारतीय काल्पनिक चित्रपट किंवा टेलिव्हिजनमध्ये महिला लीड किंवा “हिरोईन”ची भूमिका करणार्या प्रत्येक व्यक्तीला मुख्यतः सरळ केसांसह दाखवले जाते, एकही केस बाहेर आलेला नसतो , असे मेहरोत्रा यांनी नमूद केले आहे. याउलट “नकारात्मक भूमिका, पुरुष आणि/किंवा स्त्री, कुरळे किंवा सरळ नसलेल्या केसांनी दाखवल्या जाण्याची शक्यता असते. मला कुरळे केस असलेले कोणतेही लीड कॅरेक्टर कधीच दिसले नाही, असे त्या सांगतात.
“किशोरवयीन मुलांनाही कर्ल आणि वळण असलेल्या केसांचा तिरस्कार वाटतो आणि त्यांना आपल्या आजूबाजूला पॉप कल्चरमध्ये दिसणारे ‘परफेक्ट’ सरळ केस हवे आहेत,”असे डॉ आनंद म्हणाल्या. तथापि, त्यांनी नमूद केले की सध्या लोक, विशेषतः २० आणि ३० च्या वयोगटातील स्त्रिया त्यांचे नैसर्गिक केस स्वीकारत आहेत.
कर्लस् आणि बदल
डॉ. आनंद आणि डॉ खरे या दोघींच्या मते, भारतातील सर्वात सामान्यपणे लागू केलेल्या केसांची निगाराखण्याच्या पद्धतीत – केस धुवा, तेल लावा, कंगवा वापरा हे शिकविले जाते, हे अधिक लोकांच्या वास्तविकतेशी जुळवून घेण्यासाठी केलेली सोय आहे. “आमच्या सर्व पालकांनी आम्हाला दिलेली आंतरिक दिनचर्या सर्व प्रकारच्या केसांसाठी काम करत नाही,” डॉ खरे म्हणाले.
“सुरुवातीला, केसांचा नैसर्गिक पोत बदलून अधिक चांगले दिसण्यासाठी ‘कायमस्वरूपी’ निराकरण करण्याची इच्छा असलेले बरेच लोक मला भेटले. आता ते बदलत आहे, नैसर्गिक केसांचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिक लक्ष देत आहे,” असे डॉ चित्रा आनंद म्हणाल्या. केसांची काळजी घेणारे तज्ज्ञ आणि विस्तारत असलेल्या कुरळे केसांची निगा राखण्याच्या उद्योगातील उद्योजक सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या जनजागृतीला याचे श्रेय देतात.
२०१८ च्या आसपास सोशल मीडियावर जागतिक ‘कर्ली हेअर मूव्हमेंट’ सुरुवात केल्यावर, फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #CurlyisBeautiful आणि #CurlyHairDontCare सारख्या हॅशटॅगसह याला गती मिळाली. “मी FixMyCurls सुरू करण्याच्या एक वर्ष आधी, २०१८ मध्ये मला फेसबुकवर Asha’s Indian Curl Pride आढळले. त्यांचे जवळपास ४०,००० सदस्य होते आणि तेव्हापासून आम्ही फक्त वाढलो आहोत,” असे मेहरोत्रा यांनी सांगितले.
“आपल्या समाजाला अशी कोणतीही गोष्ट आवडत नाही ज्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. सरळ नसलेले केस, विशेषतः कुरळे केस नियंत्रित करता येत नाहीत. त्यापेक्षा ते स्वीकारणे आणि निगा राखणे अधिक चांगले आहे,” असेही त्या पुढे म्हणाल्या.
(हा लेख अनुवादित असून या लेखाच्या मूळ लेखिका विभा बी माधव या आहेत, तसेच हा लेख ८-९-२३ रोजी इंडियन एक्स्प्रेसच्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला आहे.)