अमेरिकेत पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर परतले आहेत. ट्रम्प यांनी ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्याबरोबर जेडी वेन्स यांनीही उप राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर ट्रम्प म्हणाले, “अमेरिकेचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. आम्ही आमचे सार्वभौमत्व राखू. अमेरिकेत यापुढे घुसखोरी होणार नाही.” या समारंभात टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांची कृती ही चर्चेचा विषय ठरली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एलॉन मस्क यांच्या पसंतीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतल्याने, ते खूप आनंदी असल्याचे या समारंभात पाहायला मिळाले. या सोहळ्यातील त्यांची कृती चर्चेचा विषय ठरली होती. ट्रम्प यांच्या प्रशासनात मस्क यांच्याकडे सरकारी दक्षता विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु, ट्रम्प यांच्या प्रशासनाच्या पहिल्या दिवशी एलॉन मस्क यांना काय मिळाले? त्याविषयी जाणून घेऊ…
हेही वाचा : एका हत्तीवरून भारत-बांगलादेशमध्ये वाद; नेमके प्रकरण काय?
ईमेल पत्ता आणि ऑफिससाठी जागा
‘द हिल’ने वृत्त दिले की, एलॉन मस्क यांना व्हाईट हाऊसचा ईमेल पत्ता आधीच दिला गेला आहे. एका सूत्राने सांगितले की, ‘फर्स्ट बडी’ असे स्वतःचे वर्णन केलेल्या मस्क यांना राष्ट्राध्यक्षांच्या अंतर्गत शोधकार्याच्या कार्यकारी कार्यालयाचा एक भाग म्हणून ईमेल पत्ता देण्यात आला आहे. स्रोताने आउटलेटला ‘ईओपी’ प्रत्ययासह मस्क यांच्या नवीन ईमेल पत्त्याचा स्क्रीनशॉटदेखील दर्शविला. “आयझेनहॉवर एक्झिक्युटिव्ह ऑफिस बिल्डिंगमध्ये त्यांचे कार्यालय असेल याची पुष्टी होत आहे,” अशी स्रोतांची माहिती आहे. ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने वृत्त दिले आहे की, मस्क यांना आयझेनहॉवर एक्झिक्युटिव्ह ऑफिस बिल्डिंगमध्येही कार्यालय देण्यात आले आहे.
व्हाईट हाऊसच्या अगदी शेजारी असलेल्या या कार्यालयाच्या इमारतीतून मस्क डिपार्टमेंट ऑफ गव्हर्मेंट एफिशियन्सी (डॉज) म्हणजेच कार्यक्षमता विभागाचे संचालन करतील. ‘डॉज’ची शासकीय विभाग म्हणून औपचारिक स्थापना होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काही ट्रम्प अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, मस्क एक विशेष सरकारी कर्मचारी असू शकतात. ‘न्यू यॉर्क टाईम्स’ने वृत्त दिले आहे की, व्हाईट हाऊस कॉम्प्लेक्समध्ये एलॉन मस्क यांना आधीच एक कार्यालय देण्यात आले आहेत. ते तेथे आधीपासूनच काम करीत असल्याचे सांगण्यात आले.
अमेरिकेतली डॉज सेवा
ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प सत्तेवर परत आल्याने आता एलॉन मस्क यांना डिपार्टमेंट ऑफ गव्हर्मेंट एफिशियन्सी (डॉज) लाँच करण्याचा मार्ग मोकळा झाला; ज्याचे लक्ष्य अमेरिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात तीन लाख कोटी डॉलर्सची (३ ट्रिलियन डॉलर) कपात करणे आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोमवारी यूएस इन-हाऊस टेक्नॉलॉजी थिंक-टँक डिजिटल सर्व्हिसचे नाव बदलले आहे.
अमेरिकेतील डॉज सर्व्हिस मस्क यांच्या गटाला कर्मचारी देईल. ही बाहेरील स्वयंसेवक तज्ज्ञांची नियुक्ती करणारी अधिकृत असलेली तात्पुरती संस्था असेल. ‘आउटलेट’ला ट्रम्प यांनी सांगितले की, २० लोकांना कामावर ठेवत आहोत, याची खात्री करण्यासाठी मस्क यांना कार्यालय दिले जाईल. या आदेशाने कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक फेडरल एजन्सीमध्ये किमान चार लोकांचा समावेश असलेल्या डॉज संघाची स्थापना करण्यात आली.
आदेशात म्हटले आहे की, ही मोहीम सरकारला सरकारी कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढविण्यासाठी फेडरल तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअरचे आधुनिकीकरण करून अधिक कार्यक्षम करेल. दरम्यान, मस्क यांना यापुढे विवेक रामास्वामी यांच्याबरोबर सत्ता वाटून घेण्याची गरज नाही. माजी राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार रामास्वामी यांना मस्क यांच्याबरोबर डॉजचे सह-अध्यक्षपद सोपवण्यात आले होते. परंतु, व्हाईट हाऊसने सांगितले की, ते यापुढे डॉजशी संबंधित नसतील. त्याऐवजी त्यांच्यावर ओहायोच्या गव्हर्नरशिपसाठी प्रचार करण्याचे काम सोपवण्यात आले आहे.
रामास्वामी यांनी सोमवारी ‘एक्स’वर लिहिले की, डॉजच्या निर्मितीला मदत करणे हा सन्मान आहे. “मला विश्वास आहे की, एलॉन आणि टीम सरकारला सुव्यवस्थित करण्यात यशस्वी होईल. ओहायोमधल्या माझ्या भविष्यातील योजनांबद्दल मला लवकरच बरेच काही सांगायचे आहे,” असे तो पुढे म्हणाले. शेकडो हजारो फेडरल कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनियनने डॉजवर ट्रम्प प्रशासनावर आधीच खटला दाखल केला आहे.
डॉजवरून ट्रम्प यांच्यावर खटला दाखल
अमेरिकन फेडरेशन ऑफ गव्हरमेंट एम्प्लॉईज (एएफजीई) आणि नॉन प्रॉफिट पब्लिक सिटीझनने डॉजसंदर्भात ट्रम्प यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. या योजनेचा उद्देश सरकारी खर्च कमी करणे आहे. परंतु, त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नोकरी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. ‘एएफजीई’चे म्हणणे आहे की, यामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात.
हेही वाचा : चीनच्या नव्या तंत्रज्ञानामुळे चंद्रावर जाणं झालं स्वस्त; काय आहे प्रणाली?
मस्क यांच्या कृतीची चर्चा
एलॉन मस्क यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मस्क एक हाथ एका बाजूने उंचावून सॅल्युट करताना दिसत आहेत. या सॅल्युटला नाझी सॅल्युट म्हटले जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. एलॉन मस्क ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी झाले होते. या शपथविधीत लोकांना संबोधित करताना ते म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेला विजय हा सामान्य विजय नाही. तुम्ही सगळ्यांनी जे घडवून आणले, त्यासाठी मी तुमचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद! या भाषणादरम्यान त्यांनी त्यांचा उजवा हात छातीजवळ घेतला आणि नंतर तो बाहेर काढला. ही कृती सॅल्युटप्रमाणे असल्याने त्यांनी नाझी सॅल्युट केला, अशी टीका मस्क यांच्यावर केली जात आहे.