२००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल पुरोहित यांची याचिका फेटाळण्यात आली आहे. आज बॉम्बे हायकोर्टाने कर्नल पुरोहित यांची याचिका फेटाळली आहे. यामुळे मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरण आणि त्याच्याशी असलेलं कर्नल पुरोहित यांचं कनेक्शन या दोन्ही बाबी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. हा स्फोट नेमका कधी आणि कसा घडला? कर्नल पुरोहितला कधी अटक करण्यात आली हे आपण जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालेगाव स्फोट प्रकरण आहे तरी काय?
सन २००८ मध्ये, रमजान सण काही तासांवर येऊन ठेपल्याने नवे कपडे आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी मुस्लीम आबालवृद्धांची लगबग सुरू असताना २९ सप्टेंबर २००८ च्या रात्री पावणेदहाच्या सुमारास गजबजलेल्या भिक्कू चौकातील एका दुकानाबाहेर उभ्या करून ठेवलेल्या दुचाकीत पेरून ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट घडवण्यात आला. या घटनेत सात जणांचा मृत्यू आणि ९२ जण जखमी झाले होते. मोठय़ा प्रमाणावर चेंगराचेंगरीही झाली होती.

हे पण वाचा “जे खरोखर देशभक्त आहेत, ते हेमंत करकरेंना देशभक्त म्हणत नाहीत”; साध्वी प्रज्ञा ठाकूरचं वादग्रस्त विधान!

या स्फोटाच्या दोन वर्षे आधी काय घडलं होतं?
याआधी दोन वर्षांपूर्वी २००६ मध्ये शहरातील बडा कब्रस्तानात झालेल्या बॉम्बस्फोटात ३१ जण मृत्युमुखी आणि तीनशेहून जास्त रहिवासी जखमी झाले होते. संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगावात दुसऱ्यांदा बॉम्बस्फोट होतो, एकंदर ३८ बळी तात्काळ जातात तरीही तपास संथ कसा, यावरून मोठी खळबळ उडाली. या वेळी जमावाने केलेल्या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले होते. घटनास्थळी तातडीने गेलेले मालेगावचे तत्कालीन सहायक पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्यावरही जमावाने हल्ला केला होता. त्या वेळी अंगरक्षक आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखून हवेत गोळीबार केल्याने प्रभू हे बालंबाल बचावले होते.

बॉम्बस्फोटप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याच्या गृह मंत्रालयाने दुसऱ्याच दिवशी हा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविला. २६/११च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे हे अधिकारी या पथकाचे प्रमुख होते. त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या तपासात संशयित म्हणून साध्वी प्रज्ञा सिंह यांचे नाव आले. या पथकाने प्रारंभी प्रज्ञा सिंहसह काही संशयितांना अटक केली. नंतर या गुन्ह्यात काही निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे तपासात समजले. त्यानुसार लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित (निवृत्त), मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), समीर कुलकर्णी यांना अटक करण्यात आली. प्रज्ञा, पुरोहित आणि उपाध्याय हे या कटाचे सूत्रधार असल्याचे आणि स्फोटात वापरलेली दुचाकी ही प्रज्ञा यांचीच असल्याचा दावा एटीएसने केला होता. यानंतर राजकीय पटलावर भगवा दहशतवाद अशी मांडणी होण्यास सुरूवात झाली.

कर्नल प्रसाद पुरोहितचं कनेक्शन काय?
कर्नल प्रसाद पुरोहितवर बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आणि त्यासाठी २००३-०४ मधलं RDX वापरल्याचा आरोप आहे. कर्नल प्रसाद पुरोहितचा संबंध अभिनव भारत नावाच्या हिंदुत्ववादी संघटनेशी आहे असंही बोललं गेलं. तसंच पुरोहितने कथित हिंदू राष्ट्र या संकल्पनेसाठी वेगळा ध्वज, वेगळं संविधान तयार केलं असाही दावा काहींनी केला आहे. मुस्लिम समाजाने जो अत्याचार केला त्याच्या विरोधात उत्तर देण्यासाठी कर्नल पुरोहितने स्फोटकं जमवली असाही आरोप त्याच्यावर आहे.