देशातील सर्वात मोठ्या उद्योग समूहांपैकी एक असलेल्या टाटाने आपली एका मोठी कंपनी लवकरच दोन भागात विभागली जाणार असल्याची घोषणा केली आहे. टाटा मोटर्सने एका मोठ्या कंपनीला दोन भागात विभागण्याचे प्रस्तावित केले आहे. याअंतर्गत व्यावसायिक वाहनं आणि प्रवासी वाहनं व्यवसाय वेगळे केले जाणार असून, त्यानंतर दोन कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध होतील.

व्यावसायिक अन् प्रवासी वाहनांचे युनिट वेगळे राहणार

टाटा मोटर्सने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, या विभाजनाअंतर्गत ते आपला व्यवसाय दोन स्वतंत्र सूचीबद्ध कंपन्यांमध्ये विभाजित करतील. एका युनिटमध्ये व्यावसायिक वाहनं (CV) व्यवसाय आणि त्याच्याशी संबंधित गुंतवणूक असेल, तर दुसऱ्या युनिटमध्ये वैयक्तिक, प्रवासी वाहनं (PV), इलेक्ट्रिक वाहन (EV), JLR आणि त्यांच्याशी संबंधित गुंतवणूक यांचा समावेश असेल. स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे की, टाटा मोटर्सचे विभाजन एनसीएलटी व्यवस्थेतील योजनेद्वारे लागू केले जाणार आहे. दोन्ही विभाग वेगवेगळे केल्यानं टाटा मोटर्ससाठी फायद्याचे ठरू शकते. कंपनीच्या प्रवासी वाहनांमध्ये ब्रिटिश लक्झरी कार जेएलआर विभागाचा तीन चतुर्थांशपेक्षा जास्त वाटा आहे. तर इलेक्ट्रॉनिक विभागामार्फत कंपनी स्वतंत्रपणे नफा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या या कंपनीकडून ४.२० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळतो. कंपनीचे विभाजन झाल्यानंतर हा महसूल आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
t Plus zero transaction system
आघाडीच्या ५०० कंपन्यांमध्ये ३१ डिसेंबरपासून ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणाली
jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी
MG Select shares first look of mg cyberster with electric cissor doors
महागड्या स्पोर्ट्स कारला देणार टक्कर! ‘या’ कंपनीने नव्याकोऱ्या कारचा पहिला लूक केला शेअर, इलेक्ट्रिक डोअर्ससह मिळतील खास फिचर्स
Pune and Pimpri Chinchwad may raise PMPML ticket prices due to rising operational deficit
पीएमपी तिकीट दरवाढीचे भवितव्य, ‘दादांच्या ‘ हाती, काय निर्णय घेणार ?
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’
Nearly 90000 Honda Elevate Suvs Sold Since Launch, See This Details Honda Elevate Suvs price details
वर्षभरात तब्बल ९० हजार ग्राहकांनी खरेदी केली होंडाची ‘ही’ एसयूव्ही कार; जाणून घ्या काय आहे एवढं खास

दोन्ही कंपन्यांमध्ये भागधारकांची हिस्सेदारी किती?

विभाजनानंतर टाटा मोटर्स लिमिटेडचे ​​सर्व भागधारक दोन्ही सूचीबद्ध कंपन्यांमध्ये समान भागीदारी ठेवतील. कंपनीच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, गेल्या काही वर्षांत टाटा मोटर्सची व्यावसायिक वाहने, प्रवासी वाहने आणि जग्वार लँड रोव्हर व्यवसायांनी वेगवेगळ्या धोरणांची यशस्वी अंमलबजावणी करून चांगली कामगिरी केली आहे. वर्ष २०२१ पासून हे तिन्ही व्यवसाय आपापल्या सीईओंच्या अधिपत्याखाली स्वतंत्रपणे काम करीत आहेत. टाटा मोटर्सकडून प्रवासी वाहनं आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या व्यवसायांना आणखी मजबूत करण्यासाठी ही महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत. २०२१ पासून हे व्यवसाय त्यांच्या वेगवेगळ्या सीईओंच्या अंतर्गत स्वतंत्रपणे काम करीत आहेत, असंही प्रवासी वाहन विभागाचे प्रमुख शैलेश चंद्र आणि व्यावसायिक वाहनांचे प्रमुख गिरीश वाघ म्हणालेत. तसेच व्यावसायिक वाहनं आणि प्रवासी वाहनांमध्ये समन्वय असल्याने विभक्त झाल्यानंतरही इतर कंपन्या एकमेकांना मदत करणार आहेत. त्यामुळे वेगवेगळे प्रयोग करून गाड्यांचा व्हॉल्यूम परफॉर्मन्स, मार्जिन, ड्रायव्हर्स आणि स्पर्धक इत्यादी श्रेणीत वैविध्य आणता येणार आहे.

टाटा सन्सचे चेअरमन विभाजनावर काय म्हणाले?

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राच्या या मोठ्या विभाजनावर बोलताना टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले की, टाटा मोटर्सने गेल्या काही वर्षांत जोरदार परिवर्तन घडवले आहे. तीन ऑटोमोटिव्ह बिझनेस युनिट्स आता स्वतंत्रपणे काम करीत आहेत आणि मजबूत कामगिरी करीत आहेत. विभाजनामुळे त्यांचा फोकस वाढवून बाजाराद्वारे प्रदान केलेल्या संधींचे अधिक चांगले भांडवल उभे करण्यात मदत होणार आहे.

टाटा मोटर्सचे शेअर्स वाढले

एन चंद्रशेखरन यांच्या मते, एका कंपनीचे दोन युनिटमध्ये विभाजन केल्याने आमच्या ग्राहकांना आणखी चांगला अनुभव मिळेल. हे आमच्या कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या वाढीची शक्यता आणि आमच्या भागधारकांसाठी चांगले मूल्य प्रदान करेल. टाटा मोटर्स लिमिटेडचे ​​शेअर्स गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चांगली कामगिरी करीत आहेत. सोमवारी हा शेअर ९८८.९० रुपयांवर हिरव्या चिन्हावर बंद झाला. टाटा मोटर्सचा शेअर ०.५६ टक्क्यांनी वाढला. सोमवारी तो ९९५ रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. कंपनीचे बाजार भांडवल ३.६२ लाख कोटी रुपये आहे. टाटा मोटर्सचे शेअरहोल्डर्स दोन्ही सूचीबद्ध कंपन्यांमध्ये समान भागधारक असतील. याचा अर्थ जर एखाद्या शेअरहोल्डरकडे टाटा मोटर्सचे १०० शेअर्स असतील, तर त्याला दोन विभाजन केलेल्या कंपन्यांमध्ये प्रत्येकी ५० शेअर्स मिळतील. विभाजनासाठी NCLT योजना टाटा मोटर्स लिमिटेडच्या संचालक मंडळासमोर येत्या काही महिन्यांत मंजुरीसाठी ठेवली जाणार आहे. ती सर्व आवश्यक भागधारक, कर्जदार आणि नियामक मंजुरींच्या अधीन असेल, ज्यांना पूर्ण होण्यासाठी आणखी १२ ते १५ महिने लागू शकतात. विभाजनाचा कर्मचारी, ग्राहक आणि त्याच्या व्यावसायिक भागीदारांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, असे कंपनीने म्हटले आहे. गेल्या एका वर्षात टाटा मोटर्स लिमिटेडचे शेअर्स १५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत.

तज्ज्ञ काय म्हणतात?

टाटा मोटर्सच्या या विभाजनावर तज्ज्ञांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यूबीएस यांनी टाटा मोटर्सच्या विभाजनानं फार काही मोठा बदल किंवा फायदा होणार नाही, असे म्हटलं आहेत .तर या निर्णयामुळे टाटा मोटर्ससाठी अधिक चांगले मूल्य निर्मिती करता येईल, असंही मॉर्गन स्टॅन्ले यांनी म्हटले आहे. “विभाजन टाटा मोटर्सला वाढीच्या संधींचा अधिक चांगला फायदा करून घेण्यास आणि दीर्घकालीन भागधारकांसाठी मूल्य वाढवण्यास मदत करेल,” असेही मेहता इक्विटीज लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) प्रशांत तपासे म्हणाले. सध्याच्या स्पर्धेच्या युगात प्रवासी वाहनांचा व्यवसाय आता थेट बाजारपेठेतील आघाडीची कंपनी मारुतीशी स्पर्धा करू शकतो, प्रवासी वाहनांमध्ये टाटा मोटर्स नवा खेळाडू म्हणून उदयास येऊ शकतो. तसेच गुंतवणूकदारांनाही गुंतवणुकीसाठी योग्य कंपनी निवडता येईल, असंही LKP सिक्युरिटीजचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक अश्विन पाटील म्हणालेत.

Story img Loader